राज्यातील किराणा दुकानांची वेळ सकाळी 7 ते 11 होण्याची शक्यता, राजेश टोपे यांचं मोठं विधान
राज्यात सुरु असलेला लॉकडाऊन आणखी कडक करण्यात येणार आहे (Rajesh Tope said essential services shops timing will be change during lockdown).
मुंबई : राज्यात सुरु असलेला लॉकडाऊन आणखी कडक करण्यात येणार आहे. किराणा माल आणि इतर अत्यावश्यक सेवेतील दुकानांच्या वेळेत बदल करण्यात येणार असल्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. “येत्या 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनमध्ये आणखी कडक निर्बंध केले पाहिजेत. विनाकारण बाहेर रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना पायबंद केलं पाहिजे. त्यासाठी किराणा दूकान हे 7 ते 11 या दरम्यान सुरु ठेवण्याबाबतची चर्चा झाली. याबाबतचा बदल कलेक्टर स्थरावावर न करता वरुनच केला जावा, अशी चर्चा झाली”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपेही उपस्थित होते. या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली (Rajesh Tope said essential services shops timing will be change during lockdown).
राजेश टोपे नेमकं काय म्हणाले?
“किराणा दुकान दिवसभर उघडं राहतं. त्यामुळे किराणा दुकानाच्या नावाने अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. त्यासाठी अजित पवार यांनी सकाळी 7 ते 11 असे चार तास किराण्यासाठी ठेवूयात, असं सांगितलं. कारण दिवसभर किराण्याच्या नावाखाली बाहेर पडणं योग्य नाही. त्यामुळे अशा स्वरुपाचा बद केला पाहिजे. विशेष म्हणजे वरुनच तो बदल व्हावा. कलेक्टरच्या लेव्हलवर तो बदल ठेवू नये, असा निर्णय सर्वानुमते झाला”, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
‘दुर्गम भागात पालक सचिवांनी निर्णय घ्यावा’
“दुर्गम भागातील जिल्ह्यात जेथील कलेक्टरचा संबंध रोज मंत्रालयाशी होत नाही. तिथे पालक सचिवांनी अधिक अॅक्टिव्हली काम केलं पाहिजे. त्यांनी आपापल्या जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण ठेवावं, असा निर्णय झाला”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली (Rajesh Tope said essential services shops timing will be change during lockdown).
‘ऑक्सिजनच्या विषयावर चर्चा झाली’
“ऑक्सिजन हा महत्त्वाचा विषय आहे. आपण स्वत:चं साडेबाराशे मेट्रिक टन ऑक्सिजन वापरत आहोत. पण त्याचबरोबर 300 मेट्रिक टन आपण बाहेरुन भिलाई, बिल्लारी आणि विशापट्टणम येथून आणतोय. त्यामुळे 1550 टन ऑक्सिजन दररोज महाराष्ट्रात आहे. येत्या 20 तारखेपर्यंत ऑक्सिजन कोट्यापर्यंत सांगितलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली तर आणखी ऑक्सिजनची गरज लागेल. पुढे आपण ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करुन कलेक्टरने त्वरित निर्णय घ्यावा”, असंही त्यांनी सांगितलं.
रेमडेसिवीरवरही चर्चा
“बैठकीत रेमडेसिवीर इंजेक्शनवर चर्चा झाली. येत्या चार-पाच दिवसांनी सर्वच सात उत्पादन कंपन्यांना केंद्र सरकारने नवीन ठिकाणी प्लांट लावण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे उत्पादन वाढेल. महाराष्ट्रात ज्या फार्मा कंपनी आहेत त्यांनी उत्पादन करु शकतो अशी आशा व्यक्त केली तर ज्या सात कंपन्यांना परवानगी आहे त्यांच्या परवान्यावर प्लांट टाकता येईल अशाही स्वरुपाचे निर्णय घेण्यात आले. ज्या कंपनी पुढे येतील त्यांना संधी देऊ, असं एफडीएकडून सांगण्यात आलं”, असं राजेश टोपे म्हणाले.
हेही वाचा : नागपूर जिल्ह्यात कोरोनाची स्थिती घातक! सरकारकडून कोणत्या उपाययोजना? वाचा सविस्तर