Maharashtra Breaking News : कसब्यात 29, तर चिंचवडमध्ये 40 उमेदवार रिंगणात
आज मंगळवार 7 फेब्रुवारी. आजच्या दिवसभरातील सर्व महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...
आज मंगळवार 7 फेब्रुवारी. आजच्या दिवसाची सुरुवात एका भीषण आगीच्या बातमीने झाली आहे. मुंबईतील माटुंबा भागात एका गाडीला भीषण आग लागलीये. माटुंगा ब्रीजवर कारने अचानकपणे पेट घेतला. तर दुसरं महत्वाचं म्हणजे कसबा आणि पिंपरी-चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा आहे. आजपासून सगळेच उमेदवार जोरदार प्रचार करताना दिसतील. तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानाचे पडसाद उमटताना दिसत आहेत. तसंच आजपासून व्हॅलेंटाईन विक सुरु होतोय. आज रोज डे आहे. त्यामुळे दिवसाची ही एक फ्रेश सुरुवात… यासह अन्य महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…
LIVE NEWS & UPDATES
-
कसब्यात 29 उमेदवारांनी 39 अर्ज भरले
पुणे :
– पुणे कसबा व चिंचवड पोटनिवडणूक
– कसब्यात २९ उमेदवारांनी ३९ अर्ज भरले तर चिंचवड पोटनिडणुकीसाठी ४० जणांनी ५३ उमेदवारी अर्ज भरले
– आज होता अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
– कसबा आणि चिंचवड अपक्ष उमेदवार भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढणार, अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी
– १० फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत
– यावेळी दोन्ही पोटनिडणुकीत किती उमेदवार अर्ज मागे घेतात हे पाहणे महत्वाचे
-
पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भात मोठी बातमी
पुणे :
पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भात मोठी बातमी
भिडे वाड्यातील घरमालकांना, गाळेधारकांना पर्यायी जागा देणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच आश्वासन
आज मुंबईत घरमालकांची घेतली बैठक
16 तारखेला मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि ओबीसी मंत्री अतुल सावेंच्या उपस्थितीत बैठक
भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचं लवकरच काम सुरू होण्याची शक्यता
बैठकीत अंतिम निर्णयावर होणार शिक्कामोर्तब
आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली बैठक
-
-
मुरलीधर मोहोळ यांच्याकडे पुन्हा एकदा पक्षाकडून मोठी जबाबदारी
पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ भाजपचे निवडणूक प्रभारी
आमदार माधुरी मिसाळ निवडणूक प्रमुख आणि धीरज घाटे सहप्रमुख
चिंचवडमध्ये शंकर जगताप यांच्यावर जबाबदारी
चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं जबाबदारीचं वाटप
-
जुन्या पेन्शन योजनेवरुन केंद्राचा पुन्हा इशारा
भविष्यातील आर्थिक आपत्तीचे येऊ शकते संकट
अर्थराज्यमंत्र्यांनी दिली पाच राज्यांच्या धोरणाची माहिती
अनेक कर्मचारी संघटनांची जुन्या पेन्शन योजनेसाठी मोर्चेबांधणी
केंद्र सरकारचा मात्र नवीन पेन्शन योजनेवर भर, वाचा सविस्तर
-
अभिनेत्री राखी सावंतच्या पतीला अखेर ओशिवारा पोलिसांकडून अटक
मुंबई :
अभिनेत्री राखी सावंतच्या पतीला अखेर ओशिवारा पोलिसांकडून अटक
दिवसभराच्या चौकशीनंतर पोलिसांनी केली अटक
राखी सावंतने नवऱ्यावर फसवणूक आणि मारहाणीचा गंभीर आरोप केलाय
पोलिसांनी दुराणीवर दाखल केलेल्या FIR मध्ये 377 हे कलम वाढवलं आहे
-
-
नाशिकमध्ये रामकुंड परिसरात भाविकांच्या आस्थेशी खेळ
नाशिक :
रामकुंड परिसरात भाविकांच्या आस्थेशी खेळ
विसर्जित केलेल्या अस्थींचा रामकुंडात पडतोय ढीग
भाविक श्रद्धेने करतात रामकुंडात अस्थी विसर्जन
मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भाविकांच्या श्रद्धेला ठेच
गोदावरी काँक्रीट मुक्त करण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी
-
निफ्टी देणार गुंतवणूकदारांना सूखद धक्का
लवकरच इतिहास रचण्याची तज्ज्ञांचा अंदाज
सध्या बाजारात पडझडीचे सत्र, तरीही घेणार भरारी
निफ्टी गुंतवणूकदारांना मालमाल करण्याच्या तयारीत
बाजाराची दशा आणि दिशा सोडा, पण चाल तर पाहा, वाचा बातमी
-
दुधाला महागाईची उकळी, जनता त्रस्त
दुधाला शोधला नवीन पर्याय, सर्वेक्षणात बाब उघड
स्वस्तातील पर्यायांकडे लोकांचा ओढा
वाढत्या महागाईने जनतेची प्रचंड नाराजी
इतक्या कुटुंबांनी बंद केले दूध, वाचा सविस्तर
-
केंद्रीय आश्रम शाळेतील कर्मचारी शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला
मुंबई :
केंद्रीय आश्रम शाळेतील कर्मचारी शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला
16 दिवसांपासून आझाद मैदानवर विविध मागण्यांसाठी सुरू आहे उपोषण
16 दिवसांनंतर आज होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा
मुख्यमंत्र्यांसोबत समाधान कारक उत्तर मिळाले तर आंदोलन मागे घेणार, अन्यता उग्र आंदोलन करण्याचा इशारा
-
Entertainment News Live | सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी अडकले लग्नबंधनात
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा विवाह संपन्न
जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये पार पडला विवाहसोहळा, वाचा सविस्तर
-
गौतम अदानी यांच्या मुद्यावर संसदेत वातावरण तापले
राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला घेरले
गौतम अदानी यांच्या मुद्यावर 50 मिनिटं बॅटिंग
अदानी 609 क्रमांकावरुन दुसऱ्या क्रमाकांवर कसे आले?
राहुल गांधी यांचा मोदी सरकारला खोचक सवाल वाचा सविस्तर
-
राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी स्मृती इराणी मैदानात
नवी दिल्ली :
राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी स्मृती इराणी मैदानात
भाजपकडून स्मृती इराणी यांच्यावर जबाबदारी
थोड्याच वेळात लोकसभेत स्मृती इराणी राहुल गांधी यांच्या आरोपांवर उत्तर देणार
-
अमरावतीत भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
अमरावती :
– अमरावतीत भीषण अपघात – दोघांचा जागीच मृत्यू, आठ गंभीर जखमी – धामणगाव देवगाव रोडवर ऑटो दुचाकीची जबर धडक – जखमींना ग्रामीण रुग्णालयात केले दाखल – पुढील उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
-
नाशिकमध्ये सप्तशृंगी गडावर पेड दर्शन सुरू
नाशिक :
सप्तशृंगी गडावर पेड दर्शन सुरू
सोमवार पासून सुरू होणार पेड दर्शन व्यवस्था
प्रति व्यक्ती 100 रुपये असणार पेड दर्शन
पेड दर्शन भाविकांसाठी असणार ऐच्छिक
10 वर्षांच्या आतील लोकांना पास निःशुल्क
स्थानिकांना मात्र आधार कार्डावर मोफत दर्शनाची व्यवस्था
-
शिवसेना नगरसेवक अमरदिप रोडे खून प्रकरणातील आरोपींना जन्मठेप
परभणी :
शिवसेना नगरसेवक अमरदिप रोडे खून प्रकरणातील आरोपींना जन्मठेप
मार्च 2019 मध्ये झाला होता शिवसेना नगरसेवक अमरदिप रोडे यांचा खून
7 आरोपींपैकी 04 आरोपींना कोर्टाने जन्मठेपेची दिली शिक्षा
03 आरोपींना पुराव्या आभवी सुटका,
जिल्हा सत्र न्यायाधीश एन. जी. सातपुते यांनी दिला निकाल
302 ,120 बी, 201 आणि 34 अंतर्गत आरोपींना शिक्षा
-
श्रद्धा वालकर हत्या प्रकरण, उद्या कोर्टात चार्जशीट दाखल केलं जाणार
नवी दिल्ली :
श्रद्धा वालकर हत्या प्रकरण
उद्या साकेत कोर्टात श्रद्धाच्या हत्येच्या खटल्याची सुनावणी
तब्बल साडेसहा हजार पानांचं चार्जशीट पोलिसांकडून तयार
उद्या कोर्टात चार्जशीट दाखल केल जाणार
आफताब कडून वकील बदलण्याची कोर्टाकडे लेखी मागणी
-
सोन्या-चांदीवर तेजीचे गारुड
वायदे बाजारात भावात पुन्हा वाढ, सराफा बाजारातही दर वधारले
आज सोन्यात 154 रुपयांची वाढ,चांदीच्या किंमतीही वधारल्या
गुंतवणूकदारांना लवकरच मोठी लॉटरी, किंमती पुन्हा सूसाट, वाचा बातमी
-
भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांचं लोकसभेत दमदार भाषण
भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांचं लोकसभेत दमदार भाषण
अदानी आणि नरेंद्र मोदींचे फोटो दाखवत विचारलं, “ये रिश्ता क्या कहलाता है?”
अदानींसाठी पंतप्रधानांनी नियम बदलले
नियम बदलून अदानींना 6 एअरपोर्टची मालकी दिली गेली
राहुल गांधी यांची मोदींवर टीका
-
Mumbai News Live | राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानीला अटक
अभिनेत्री राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानीला ओशिवरा पोलिसांनी केली अटक
राखी सावंतनेच पतीविरोधात दाखल केली होती FIR, वाचा सविस्तर
-
अभिजीत बिचुकले आणि लहुजी छावा संघटना यांच्यात वाद
निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर गोंधळ
लहुजी छावा संघटनेचे अध्यक्ष सचिन इंगळे आणि बिचुकले यांच्यात बाचाबाची
-
Live- सत्यजित तांबे यांना ऑफर दिली नाही- भाजप प्रदेशाध्यक्ष
– भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्ट वक्तव्य
– सत्यजित तांबे भाजपमध्ये आल्यास दरवाजे खुले- बावनकुळे
– नाना पटोले-थोरात वादावर प्रतिक्रिया
– काँग्रेस नेतृत्वाने आत्मचिंतन करण्याची गरज – बावनकुळे
-
Live- पिंपरी-चिंचवड पोट निवडणूक अपडेट
राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे यांना उमेदवारी
अजित पवार यांच्या उपस्थिती नाना काटे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघाले
नाना काटेंच्या उमेदवारीवरून बंडखोरी उफाळली, राहुल कलाटे नाराज
-
Live- काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षनेते पदावरून बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा
– नाना पटोले – बाळासाहेब थोरात वाद विकोपाला
– माझ्याकडे राजीनामा आलेला नाही- नाना पटोले यांची प्रतिक्रिया
-
दिल्लीच्या IGI विमानतळावर सीमाशुल्क विभागाची कारवाई
नवी दिल्ली : दुबईहून आलेल्या 2 भारतीय प्रवाशांना अटक,
अंतर्वस्त्रांमधून सुमारे 4.5 किलो सोन्याची पेस्ट जप्त,
1.95 कोटी मूल्याचे 3.85 किलो शुद्ध सोने जप्त.
-
वातावरण बदलाचा थेट परिणाम आरोग्यावरती
दिवसभर उन्हाचे चटके, रात्री थंडीची हुडहुडी, सहनही होईना आणि सांगताही येईना अशी परिस्थिती
Amravati News : ग्रामीण भागात आतापासूनच पाणी टंचाईचा झळा, वातावरणाचा बदलाचा फटका शेतकऱ्यांनाही
-
राहुल गांधी आज लोकसभेत बोलणार
नवी दिल्ली : दुपारी 12 नंतर राहुल गांधी लोकसभेत बोलणार,
भारत जोडो यात्रेनंतर दीर्घ कालावधीनंतर राहुल गांधी संसदेत दाखल होणार,
अदानी आर्थिक घोटाळ्यावरून आणि इतर मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक असतानाच आता राहुल गांधी काय बोलणार याकडे सत्ताधाऱ्यांचही लक्ष.
-
दहशतवाद्यांविरोधात पोलिसांनी केलेली मॉक ड्रिल वादात
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची नोटीस
गृहमंत्रालय, पोलीस महासंचालकांसह इतर प्रतिवाद्यांना नोटीस
या कारणामुळे केली फौजदारी जनहित याचिका दाखल, वाचा बातमी
-
काँग्रेस बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार
काँग्रेस बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार
बाळासाहेब दाभेकर हे अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यामुळे दाभेकर अपक्ष निवडणूक लढवणार
जोरदार शक्तिप्रदर्शन करत थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज भरणार
-
या कारणामुळे बुलढाणा शहराला इंग्रजांनी जिल्हा मुख्यालय घोषित केले होते ?
Buldhana : दुर्लक्षित असलेल्या ब्रिटिशकालीन सरकारी तलावाचा कायापालट होणार, कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर
-
Aurangabad Live- औरंगाबाद जिल्ह्यातील वादग्रस्त गंगापूर सहकारी कारखान्याची निवडणूक सुरू
भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा रंगतोय सामना
भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यासमोर महाविकास आघाडीच्या कृष्णा पाटील डोनगावकर यांचे आव्हान
कारखान्यावरील सत्ता टिकवण्याचे आमदार प्रशांत बंब यांच्या समोर आव्हान
-
सोलापूर शहरात खराब रस्त्यांच्या त्रासामुळे नागरिकांकडून बॅनरबाजी
सोलापूर : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कुंभार वेस परिसरात लावले बॅनर्स,
सोलापुरातील जनता ही माणसं आहेत की जनावर? असा संतप्त सवाल करण्यात आला आहे,
महापालिकेचे अधिकारी आणि राजकारण्यांना नागरिकांनी बॅनरद्वारे विचारला सवाल,
एक सोलापूरकर या नावाने महापालिकेला विचारला सवाल.
-
IND vs AUS Test : अश्विन नाही, भारताचा ‘तो’ गोलंदाज जास्त धोकादायक, शेन वॉटसनने दिला इशारा
IND vs AUS Test : शेन वॉटसन यांच्या मते अश्विन नाही, दुसराच बॉलर ऑस्ट्रेलियन टीमसाठी जास्त धोकादायक ठरेल. वाचा सविस्तर…..
-
VIDEO: कॅच पकडताना मोठी दुर्घटना, LIVE मॅचमध्ये प्लेयरला स्ट्रेचरवरुन न्याव लागलं बाहेर
मैदानात नेमकं काय घडलं? आता या प्लेयरची तब्येत कशी आहे? वाचा सविस्तर….
-
व्हॅलेंटाईन वीकलाही महागाईच्या झळा
फुलांच्या किंमतीत यंदा जोरदार वाढ
फुलांच्या किंमतीत 40 ते 50 टक्क्यांची वाढ
गुलाबाच्या भावात मोठी वाढ, इतर फुलांच्या किंमती ही वाढल्या
यंदा थंडीमुळे उत्पादनावर परिणाम तर रोगांचा ही झाला प्रादूर्भाव वाचा बातमी
-
अमेरिकेच्या राजकीय नेत्या हिलरी क्लिंटन औरंगाबाद दौऱ्यावर
अमेरिकेच्या राजकीय नेत्या हिलरी क्लिंटन औरंगाबाद दौऱ्यावर
हिलरी क्लिंटन करणार दोन दिवसांचा औरंगाबाद दौरा
आज दुपारी दीड वाजता हिलरी क्लिंटन येणार औरंगाबाद दौऱ्यावर
औरंगाबाद दौऱ्यात वेरूळ लेणी आणि कैलास मंदिराला देणार भेट
खुलताबाद तालुक्यातील एका फार्म बंगल्यावर हिलरी क्लिंटन करणार दोन दिवसांचा मुक्काम
-
व्हॅलेंटाईन वीकमध्ये मिळालेले गिफ्ट या दिशेला ठेवा, तुमचा कधी ब्रेकअप होणार नाही ?
Valentines Week 2023 : व्हॅलेंटाईन वीकमध्ये मिळालेले गिफ्ट योग्य दिशेने ठेवा, नाते मजबूत होईल… वाचा बातमी
-
आज राज्यात पेट्रोल डिझेलचा भाव काय
मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर
अहमदनगर पेट्रोल 106.51 तर डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर
अकोल्यात पेट्रोल 106.66 आणि डिझेल 93.19 रुपये प्रति लिटर
अमरावतीत 107.50 तर डिझेल 93.99 रुपये प्रति लिटर
औरंगाबाद 107.85 पेट्रोल आणि डिझेल 94.31 रुपये प्रति लिटर
नागपूरमध्ये पेट्रोल 106.14 तर डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
नांदेडमध्ये पेट्रोल 108.08 तर डिझेल 94.56 रुपये प्रति लिटर
जळगावमध्ये पेट्रोल 107.56 आणि डिझेल 94.05 रुपये प्रति लिटर
नाशिकमध्ये पेट्रोल 106.43 आणि डिझेल 92.94 रुपये प्रति लिटर
लातूरमध्ये पेट्रोल 107.38 तर डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर
कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.91 आणि डिझेल 93.43 रुपये प्रति लिटर
पुण्यात पेट्रोलचा भाव 106.70 आणि डिझेल 93.19 रुपये प्रति लिटर
सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.92 रुपये तर डिझेल 93.43 रुपये प्रति लिटर
-
दहावी बारावीची प्रश्नपत्रिका मोबाईलवर व्हायरल केल्यास परीक्षार्थी होणार 5 वर्ष डिबार
औरंगाबाद : इंजीनियरिंग, फार्मसी च्या प्रश्नपत्रिका परीक्षा पूर्वी सोशल मीडियावर होत होत्या व्हायरल,
पेपर फुटी ला आळा बसण्यासाठी राज्य मंडळांनी जारी केली बारा पानांची शिक्षा सूची,
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर प्रश्नपत्रिका फॉरवर्ड केल्यास पाच वर्षे परीक्षेतून येणार निलंबित करण्यात,
अन्य दोषी आढळणाऱ्यांवर करण्यात येणार फौजदारी गुन्हा दाखल,
शाळांना लेखी शिक्षा सूची आली पाठवण्यात.
-
IND vs AUS : भारत दौऱ्या दरम्यान मोठ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूची निवृत्तीची घोषणा, 76 चेंडूत ठोकल्या होत्या 172 धावा
IND vs AUS : कोण आहे तो ऑस्ट्रेलियन प्लेयर? वाचा सविस्तर…..
-
Pune Live- कसबा विधानसभा पोटनिवडणूक
निवडणूक अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख
काल एका दिवसात नऊ उमेदवारांनी भरले अर्ज
सोमवारी सायंकाळपर्यंत 16 उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज जिल्हा निवडणूक विभागाकडे झाले प्राप्त
आज दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र भरण्याची अंतिम मुदत
-
जेलरोड येथील करन्सी नोट प्रेसला मिळाले नेपाळच्या नोटा छापण्याचे कंत्राट
नाशिक : नेपाळच्या एक हजारच्या 430 दशलक्ष नोटा छापण्याचे मिळाले कंत्राट,
पन्नास रुपयांच्या 300 दशलक्ष नोटा छापण्याचे देखील कंत्राट,
डिजिटल चलानामुळे संकट असतानाच मिळाले काम.
-
निवडणूक आयोगाचा निर्णय पोटनिवडणुकीनंतरच
निवडणूक आयोगाचा निर्णय पोटनिवडणुकीनंतरच
पुणे जिल्ह्यातील पोट निवडणुकीपूर्वी निर्णय देण्याची शिवसेनेच्या दोन्ही गटांनी केली होती मागणी
निवडणूक आयोगाने मागणी फेटाळली असल्याची सूत्रांची माहिती
सर्वोच्च न्यायालयातल्या 14 फेब्रुवारीच्या सुनावणीनंतरच निवडणूक आयोग निर्णय देणार
-
आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरात मराठा समाजाचा नवा एल्गार
आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरात मराठा समाजाचा नवा एल्गार
23 मार्चला मराठा समाजाचा महामेळावा
दसरा चौकात मराठा समाज पुन्हा एकदा एकवटणार
मराठा महासंघाच्या वतीने आयोजित सर्वपक्षीय बैठकीत निर्णय
लाखोंच्या संख्येने समाज बांधव सहभागी होण्यासाठी प्रबोधन केलं जाणार
Published On - Feb 07,2023 7:52 AM