Maharashtra Breaking News Live : उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद, गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा.
Maharashtra Breaking News Live : देशासह राज्यभरातील दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
मुंबई : सध्या राज्यात विविध घडामोडी घडत आहेत. राजकीय घडामोडींना वेग आलाय. मुंबईतील ताडदेव पोलीस स्टेशनमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मध्यरात्री भिडल्याचं पाहायला मिळालं. तलवारी, सुरी, चॉपरर्स घेऊन जनता नगर येथील बिल्डिंग मध्ये अज्ञात 30 ते 40 जणांनी हल्ला केला. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांची महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली आहे. तीन जणांची माय आणि खाटल्यावर जीव जाय!, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. पुणे सातारा महामार्गवरील कापूरहोळ गावाच्या हद्दीत वाहनांचा विचित्र अपघात झालाय. 6 वाहने एकमेकांना धडकली, यामध्ये 3 ट्रक, 2 टेम्पो आणि 1 कारचा समावेश आहे. यासह प्रत्येक जिल्ह्यातील बातमी तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून वाचायला मिळेल.
LIVE NEWS & UPDATES
-
‘उद्धव ठाकरेंनी शब्द जपून वापरावेत, अन्यथा जनताच धडा शिकवेल’, चंद्रकांत पाटील यांचा निशाणा
पुणे :
राज्यातील सत्ता हातून गेल्यापासून उद्धव ठाकरे हताश झाले आहेत. त्यामुळे ते आता संजय राऊतांची भाषा बोलू लागले आहेत. मात्र, उद्धवजी आपल्या तोंडून हे शब्द शोभत नाहीत. आपण शब्द जपून वापरावेत, असा सल्ला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला. तसेच, आमच्या नेत्यांवर टीका कराल, तर जशास तसे उत्तर मिळेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरील उद्धव ठाकरे यांच्या वैयक्तिक टीकेवर बोलताना मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, सध्या राज्याच्या राजकारणात टीका करण्यासाठी काही नेते अगदी खालच्या पातळीवर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे हे संयमी नेते होते. मात्र, सत्ता हातून गेल्यापासून ते हताश झाले आहेत. त्यामुळे सध्या उद्धवजी संजय राऊतांची भाषा बोलत आहेत. त्यांनी सांभाळून बोलावे. अन्यथा जनताच त्यांना योग्य धडा शिकवेल. तसेच भाजपाच्या नेत्यांवर टीका कराल, तर त्याला जशास तसे उत्तर मिळेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
-
गौतम अदानी यांना पुन्हा एकदा झटका
हिंडनबर्ग अहवालानंतर आता सेबीचा दणका
बाजारात वृत्त दाखल होताच, शेअरमध्ये पडझड
श्रीमंतांच्या यादीत पण झाली घसरण
अदानी यांची संपत्ती इतकी घसरली, वाचा बातमी
-
-
नरेश मस्के यांची उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी
मुख्यमंत्री यांच्या विरोधात खोटा संदेश तसेच माहिती पोहचवण्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी
मुख्यमंत्री यांच्या विरोधात वारंवार असे प्रकार घडत आहेत
ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी..
-
मल्टिबॅगर स्टॉकने केले मालामाल
गुंतवणूकदार झाले करोडपती
अवघ्या 25 पैशांच्या शेअरने वीस वर्षात केली कमाल
एक लाखांचे झाले काही वर्षांतच कोट्यावधी
येत्या काळात हा शेअर पुन्हा उसळी घेणार, वाचा बातमी
-
कोल्हापुरात भाजप-शिवसेना युतीच्या वतीने वीर सावरकर यात्रा
कोल्हापूर :
कोल्हापुरात भाजप-शिवसेना युतीच्या वतीने वीर सावरकर यात्रा
शहरातील मिरजकर तिकटी चौकातून यात्रेला झाली सुरुवात
यात्रा बिंदू चौक मार्गे शिवाजी चौकापर्यंत जाणार
सावरकर यात्रेत लेझीम पथकासह मर्दानी खेळांच प्रात्यक्षिक
भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित
-
-
नाशिकच्या महामार्ग बसस्थानकावर उभ्या बसला लागली आग
मुंबई नाका येथील महामार्ग बसस्थानकात दुपारच्या सुमारास घडली घटना
नाशिकहून बोरिवलीकडे निघत असताना शिवशाही बसला लागली आग
सुदैवाने बसमध्ये प्रवासी नसल्याने कुठलीही जीवितहानी नाही
घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान तत्काळ दाखल
बसचे टायर फुटून आग लागल्याची प्राथमिक माहिती
-
पुण्येश्वर मंदिर आणि नारायणेश्वर मंदिर परिसरात उत्खनन आणि सर्वेक्षण करा
पुरातन वस्तूचे संरक्षण होणं गरजेचं आहे
गेल्या काही वर्षंपासून पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या खुणा आणि अवशेष आहेत ते नष्ट करण्यात येत आहेत
मनसेचे नेत अजय शिंदेंचा आरोप
साफ सफाई करताना सापडलेल्या अवशेषावरून मनसेची पुन्हा मागणी
-
पुण्याच्या शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी अटक
तीन आरोपींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या
शनिवारच्या रात्री सव्वा नऊच्या सुमारास साई बाबांच्या मंदिरासमोरच घडली होती घटना
घटनेनंतर आरोपी फरार होते
खेड शिवापूर, मुळशी आणि पवना धरण या परिसरात ते वारंवार लोकेशन बदलत होते
मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांनी काल रात्री त्यांना सापळा रचून अटक केली
अद्याप या तिघांनी हत्येमागचं मूळ कारण सांगितलेलं नाही
सर्व आरोपींना न्यायालयाने 7 दिवस पोलीस कोठडी सुनावली
-
कोल्हापूरमध्ये श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या कार्याध्यक्ष पदी पुंडलिक व्हसमनी याची निवड
पुंडलिक व्हसमनी याची एकमताने निवड
अकरापैकी 10 ट्रस्टीची बैठक कर्नाटकतील संकेश्वर येथे पार पडली
बेकायदेशीर पद्धतीने यापूर्वी केलेले ठराव रद्द
मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या अनुउपस्थितीत निवड
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कर्नाटकात बैठक घेतल्याची माहिती
-
अंबरनाथमध्ये शिंदे गटाच्या आमदारांविरोधात बदनामीकारक रॅप सॉंग
अंबरनाथमध्ये युवासेनेकडून पोलिसांना निवेदन
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात युवासेनेचे कार्यकर्ते जमले
रॅपर विरोधात गुन्हा दाखल करण्याची युवासेनेची मागणी
-
ठाण्यातील राडा प्रकरणी विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोर्हे यांची पोलीस आयुक्तांना विचारणा
मारहाण झालेल्या महिला कार्यकर्त्यांशी साधला संवाद
पोलिसांनी या घटनेत काय कारवाई केली याची केली विचारणा
आम्ही या प्रकरणाची दखल घेतल्याची पोलीस आयुक्तांची माहिती
घडलेली घटना निंदनीय निलम गोर्हे यांची प्रतिक्रिया
-
आहेरवाडीत तब्बल 70 ते 75 क्विंटल वांग्याची भाजीची यात्रा महोत्सव
परभणी : परभणीच्या पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी ग्रामस्थांकडून जोपासली जाते अनेक वर्षांपासूनची परंपरा,
सजगीर महाराज, हिरागीर महाराज आणि गुरुवर्य रामगिरी महाराज यांच्या समाधी मंदिर येथे दरवर्षी वांग्यांची भाजी यात्रा महोत्सव आयोजित करण्यात येते,
तालुक्यासह परिसरातील जवळपास 50 हजार भाविक या ठिकाणी वांग्याची भाजीच्या महाप्रसादाचा लाभ घेतात,
यात्रा राज्यात प्रसिध्द आहे.
-
नदीकाठ सुधार प्रकल्पाच्या विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली
नदीकाठ सुधार प्रकल्पाच्या विरोधात केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
या प्रकल्पात 6 हजार झाडं तोडली जाणार असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून करण्यात येत होता
एनजीटीनंही ही याचिका फेटाळून लावली होती आता सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळून लावली
माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची ट्टीट करून माहिती
लवकरच या प्रकल्पाला वेग येईल व्यक्त केली भावना
-
मलबार हिल मारहाण प्रकरणी एनसीपीचे नेते अमोल मातले यांची टिका
भाजपकडून राज्यात अराजक माजवण्याचा प्रसत्न सुरू असल्याचा आरोप
-
आरोपींची नावे गल्लीबोळात लावा – उद्धव ठाकरे
ठाणे : तुम्हाला जर पटत नसेल तर या हल्ल्याचा नुसता निषेध करून चालणार नाही याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. एक तर मी पुन्हा सांगतो फडणवीस आहे त्यांना झेपत नसेल. कदाचित त्यांना तसे वरून आदेश आला असेल तर त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेशी प्रामाणिक राहून पदभार सोडून द्यावा. जेणेकरून त्यांच्यावरती सगळे जे काही येथे करावे लागते. हे करावे लागण्याची वेळ राहणार नाही. तसेच आयुक्त आणि या पोलीस स्टेशन कासारवाडी यांची बदली करा. जे आरोपी आहेत त्यांची नावे दर्शना शिंदे यांनी सांगितली आहेत त्यांचे नाव आणि फोटो गल्लीबोळामध्ये लावा आणि सांगा की हे आरोपी आहेत.
-
उद्धव ठाकरे यांनी घेतली दर्शना शिंदे यांची भेट
ठाणे पोलीस आयुक्तांच्या भेटीनंतर घेणार पत्रकार परिषद
ठाणे : ठाण्यातील युवासेना कार्यकर्ती हिला काल मारहाण करण्यात आली. या तरुण कार्यकर्तीला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन तिच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, खासदार राजन विचारे, खासदार विनायक राऊत, नेते केदार दिघे आदी उपस्थित होते. यांनतर उद्धव ठाकरे ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहे. त्यानंतर ते पत्रकार परिषद घेणार आहेत.
-
माजी मंत्री रामदास कदम
शिवसेनेचं इतिहास लिहला जाईल तेव्हा गद्दार म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव लिहल जाईल
आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण विभाग काका म्हणून माझ्याकडे असणारे खातं समजून घेतलं, नंतर काका आऊट साहेब इन
पांडुरंगाला साकडे यापुढे बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत सेवा शिंदे फडणवीस यांच्याकडून घडू दे, सर्वांना न्याय मिळू दे
मागील अडीच वर्ष ठाकरेंनी मातोश्रीमध्ये बसून काम केले, पण शिंदेंनी नागरिकांसाठी काम केले
अजित पवार यांनी 57% निधी दिला
हेच उद्धव ठाकरेंनी केलं असतं तर 40 पैकी एकही आमदार गेला नसता
ठाकरे यांचं खोटं बोल पण रेटून बोल असं आहे
सह्या कोणी मुख्यमंत्र्यांनी केल्या ना?, आपल्याच नेत्या आणि आमदाराला संपवण्याचा काम ठाकरेंनी केलं.
गद्दार उद्धव ठाकरे आहेत
मुख्यमंत्री बनण्यासाठी राष्ट्रवादीकडून किती खोके घेतले याची चौकशी करावी लागेल
ठाकरेंना वाघ नको शेळ्या मेंढ्या हव्या आहेत
शिवसेना प्रमुखांनी केलेला डोलारा पाडण्याच पाप उद्धव ठाकरेंनी केलं
अफझल खानप्रमाणे उद्धव ठाकरे खेडमध्ये चालून आले
एकट्याची डाळ शिजत नाही म्हणून इतरांना सोबत घेऊन सभा घेत आहेत
उद्धव ठाकरेंनी काय भोगलं आहे?
बापाशी बेइमानी केली त्यांनी गुलाबराव पाटलांनी बापसह जेल भोगली भगव्यासाठी
-
तलवारीने कापला केक
दहशत निर्माण करण्यासाठी वाढदिवसाला तलवारीने कापला केक
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील मकरंदपूर येथील व्हिडीओ असल्याची माहिती
सोशल मीडियावर तलवारीने केक कापल्याचा व्हिडीओ.
राजकीय क्षेत्रात दबदबा असलेल्या व्यक्तीचा मुलगा व्हिडीओमध्ये असल्याने व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल
तलवारीने केक कापून दहशत माजवण्याचा प्रयत्न.
-
पूर्व नागपुरातील दर्शन कॅालनीत वज्रमुठ सभा होणार
१६ तारखेच्या सभेत उद्धव ठाकरे, नाना पटोले उपस्थित राहणार
अजित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील प्रमुख वक्ते
पूर्व विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते येणार
सभेच्या तयारीसाठी पूर्व विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात बैठकांचे आयोजन
-
ठाण्यात युवा कार्यकर्तीला मारहाण, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे ठाण्यात जाणार
ठाण्यातील युवासेना कार्यकर्ती हिला काल मारहाण करण्यात आली. या टर्न कार्यकर्तीला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आज दुपारी 1 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे ठाण्यात जाणार आहेत. त्यांच्यासोबत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील ठाण्यात जाणार आहेत.
-
गौतमी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर
घुंगरू चित्रपटाच्या माध्यमातून गौतमी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर माढ्यात अखेरचे चित्रीकरण झाले पूर्ण लोकलावंताची व्यथा मांडणारा घुंगरू महाराष्ट्रातील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं काम प्रेक्षक करतात. प्रेक्षकांमुळेच आज मी उभी आहे- गौतमी पाटील
-
ठाणे राडा प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची बैठक
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आनंदाश्रमामध्ये दाखल
मुख्यमंत्री यांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत आनंदाश्रमामध्ये बैठक सुरू
ठाकरे आणि शिंदे गटात झालेल्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक..
मुख्यमंत्र्यांकडून कालच्या राड्याबाबतची घेतली जाते इंत्यंभूत माहिती…
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये सामुहिक बलात्कार करून महिलेची हत्या
चर्चमधून परतणाऱ्या महिलेची सामुहिक बलात्कार करून हत्या
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या चिखलठा परिसरातली घटना
महिलेवर सामूहिक बलात्कार आणि दगडाने डोके ठेचून केली हत्या
बलात्कारी नराधमांवर याधीचे 50 गुन्हे दाखल
चर्चमधून परतत असताना एकटीला गाठून तिच्याच कपड्याने झाडाला बांधून बलात्कार केला
बलात्कार करून महिलेचा खून करणाऱ्या 3 आरोपींना अटक
वयाच्या 14 वर्षांपासून बलात्कारी नराधमांतील एक जण महिलांविषयी गैरप्रकार करण्यात कुख्यात
-
रेपो दरात वाढीची दाट शक्यता
आरबीआय करणार 0.25 टक्के वाढ
रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाने ईएमआय वाढणार
सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार मोठ बोजा
रेपो दर वाढी मागची नेमकी कारणं काय
येत्या काही महिन्यात पेट्रोल-डिझेलचे भाव होतील का कमी
महागाईवरचा उतारा आरबीआयला कधी गवसणार, वाचा सविस्तर
-
नागपूर महानगरपालिकेकडून ३१ मार्चपासून कोरोना लसीकरण बंद
नागपूर महानगरपालिकेकडून ३१ मार्चपासून कोरोना लसीकरण बंद
– राज्य सरकारकडून लसीचा साठा उपलब्ध झाला नाही
– एकीकडे कोरोना रुग्ण वाढतायत, दुसरीकडे लस उपलब्ध नाही
– लसीचा साठा नसल्याने लसीकरण बंद
– नागपूरात गेल्या २४ तासांत चार नवे रुग्ण… सक्रिय रुग्णसंख्या १०० वर
– ३१ मार्चला २५०० ते २६०० कोरोना लसीच्या डोजेसची मुदत संपली
– लोकांनी लस न घेतल्याने ३१ मार्चला २५०० ते २६०० लसीचे डोजेस वाया गेले
-
CSK vs LSG : MS Dhoni विजयानंतर चिडला, इम्पॅक्ट प्लेयरवर काढला राग, फोटो व्हायरल
CSK vs LSG IPL 2023 : लखनौ सुपर जायंट्सवर विजय मिळवूनही धोनीच स्वत:वरील नियंत्रण सुटलं. वाचा सविस्तर….
-
उपनगरीय लोकल गाड्याचे लाइव्ह लोकेशन समजणार
मध्य रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उपनगरीय लोकल गाड्याचे लाइव्ह लोकेशन समजणार आहे.
पश्चिम रेल्वे प्रवाशांना लोकल गाड्याचे लाइव्ह लोकेशन समजण्यासाठी उद्यापासून ५ एप्रिलपासून यात्री ऍप’ सुरू करणार आहे.
या ऍपवर लोकल गाड्यांचे लाइव्ह ट्रॅकिंग सुविधा उद्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे लोकल प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पश्चिम रेल्वे प्रशासनाने यात्री ऍपसाठी लोकल गाड्यांमध्ये जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा बसवली आहे.
त्यामुळे प्रवाशांना लोकल गाड्यांचे रिअल-टाइम लाइव्ह लोकेशन समजण्यास मदत होणार आहे.
या ऍपमुळे प्रवाशांना एका टचवर लोकलचे लाईव्ह अपडेट्स, वेळापत्रक, प्रमुख रेल्वे स्थानकांचे नकाशे आणि त्यातील सुविधांबाबत माहिती मिळणार आहे.
दरम्यान, दिव्यांग प्रवाशांनासुद्धा सदर ऍप वापरता येणार आहे. ते हे ऍप व्हाईस कमांडद्वारे हाताळू शकतील.
-
सोने-चांदीची स्वस्ताईची वर्दी
सोन्याच्या दरवाढीला लागला ब्रेक
चांदीच्या भावातही झाली घसरण
जानेवारी ते मार्च या तिमाहीत सर्वाधिक रिटर्न
सोन्याने गुंतवणूकदारांना केले मालामाल
चांदीने गुंतवणूकदारांना दिला सर्वाधिक परतावा, वाचा बातमी
-
पुण्यात लसीकरण बंद
कोरोना लस शिल्लक नसल्यामुळे पुण्यात लसीकरण बंद
कोव्हीशिल्ड,कोव्हॅक्सीन कुठलीच लस उपलब्ध नाही,
महापालिका रुग्णालयामधील लसीकरण सध्या बंद
महापालिका रुग्णालयामध्ये लागलेत लसीकरण बंदचे बो
-
धारशिव बाजार समिती निवडणूक
धाराशिव जिल्ह्यातील आठ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 144 जागांच्या निवडणुकीसाठी 1 हजार 62 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. 6 एप्रिल हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असुन त्यानंतर चित्र स्पष्ट होईल.
-
श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात २१ हजार सूर्यफुलांची आरास
– चैत्र महिन्यात वसंत ऋतूत गणरायाला सूर्यफुलांचा अभिषेक
– मंदिराच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत तब्बल २१ हजार सूर्यफुलांची आरास
– फुलांवर पडलेल्या सूर्यप्रकाशामुळे ही फुले अधिकच उठून दिसत आहेत
-
कच्चा तेलाचे भाव गगनाला
तेल उत्पादन घटविण्याच्या निर्णयाचा फटका
ओपेक, रशियाने इंधनाचे उत्पादन घटवले
भाव थेट 85 रुपयांच्या घरात पोहचले
देशात पेट्रोल-डिझेल महागले काय
पेट्रोलियम कंपन्यांनी सकाळीच जाहीर केले भाव
तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत काय, बातमी एका क्लिकवर
-
सुषमा अंधारे Vs संजय शिरसाट कोल्ड वॉर सुरूच,
व्रत करणाऱ्या महिलांची खिल्ली उडवणारा Video पोस्ट
सुषमा अंधारे यांचा शिवसेनेत येण्यापूर्वीचा व्हिडिओ संजय शिरसाट यांच्याकडून शेअर
-
CSK vs LSG : मोईन अली नाही, चाहत्यांच्या मते हा खेळाडू ‘मॅन ऑफ द मॅच’चा खरा दावेदार, हा अन्याय?
चेन्नई सुपर किंग्सचा दुसरा खेळाडू खरंतर या पुरस्कारासाठी दावेदार होता. वाचा सविस्तर…..
-
CSK vs LSG : चेन्नई जिंकूनही MS Dhoni ने कॅप्टनशिप सोडण्याची वॉर्निंग का दिली? पहा VIDEO
CSK vs LSG IPL 2023 : MS Dhoni ला काय खटकलं? तो इतका का चिडला? एमएस धोनीने मांडलेला मुद्दा योग्य आहे. कारण टी 20 क्रिकेटमध्ये ही चूक गुन्ह्यापेक्षा कमी नाही. वाचा सविस्तर….
-
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आकारणार उपयोगकर्ता शुल्क
– पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून आता उपयोगकर्ता शुल्क आकारले जाणार आहे.
– शहरातील नागरिकांचे आरोग्य व्यवस्थित रहावे यासाठी आरोग्य विभागाकडून घनकचरा व्यवस्थापन केले जाते. त्यावर जवळपास 100 कोटी रुपये महापालिका खर्च करते.
– 2019 च्या अधीनियमानुसार आता महापालिका त्या बदल्यात उपयोगकर्ता शुल्क आकारणार आहे. प्रति महिना 60 रुपये असे वर्षाला 720 रुपये अतिरिक्त शुल्क मालमत्ता कराबरोबर भरावे लागणार आहेत.
– विविध आस्थापनांना हा कर भरावा लागणार आहे. दरम्यान महापालिकेच्या या निर्णयाला भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी विरोध केला आहे. मात्र महापालिका हे शुल्क आकारण्यावर ठाम आहे.
-
पुणे : इनोवा-पीक अपची समोरासमोर धडक; तीन जणांचा जागेवर मृत्यू
जुन्नर तालुक्यातील माळशेज घाटाजवळ हा भीषण अपघात घडलाय
नगर-कल्याण महामार्गावर हा अपघात झाला
या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला
इंव्होवा आणि पीकअप टेम्पो या गाड्यांचा समोरासमोर आपघात
-
शाळाबाह्य मुलांना शिकवण्याचे काम केले जात आहे
पिंपरी चिंचवड
-पिंपरी चिंचवड शहरात सिग्नल वर भीक मागणाऱ्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने एका खाजगी सामाजिक संस्थेबरोबर मासुळकर कॉलनी मध्ये विशेष वर्ग सुरू केलाय
-या ठिकाणी परिसरातील शाळाबाह्य मुलांना शिकवण्याचे काम केले जात आहे
-शहरात सर्वच मुलांना शिक्षण मिळावं यासाठी महापालिकेने जागा आणि वर्ग उपलब्ध करून दिला आहे त्यामध्ये विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेताना दिसत आहेत
-
पुणे : आरटीई प्रवेश प्रक्रियेची आज ऑनलाइन सोडत
सकाळी अकरा वाजता काढण्यात येणार
या प्रवेश प्रक्रियेतंर्गत बालकांच्या प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या पालकांची प्रतीक्षा संपणार
राज्यातील सुमारे एक लाख एक हजार ९६९ जागांवर प्रवेशाच्या प्रतीक्षेत
तीन लाख ६४ हजार ४७२ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची सोडत
राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांची माहिती
-
गोदावरी काठावर 600 किलो कचरा संकलित
नाशिक : मनपाच्या स्वच्छता विभागाकडून विशेष मोहीम,
श्रीराम रथोत्सव मिरवणूक मार्गावर राबविण्यात आली स्वच्छता मोहीम,
महापालिकेच्या 135 कर्मचाऱ्यांनी घेतला सहभाग.
-
पोलिस बीट मार्शलला मारहाण करणाऱ्या तिघांना अटक
रस्त्यात थांबलेल्या संशयास्पद मोटारीबाबत चौकशी करणाऱ्या पोलिस बीट मार्शललाच तिघांनी मारहाण केल्याची घटना
याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे
याबाबत पोलिस अंमलदार रोहित बळवंत पाटील यांनी फिर्याद दिली आहे
याप्रकरणी मितेश संजय परदेशी (वय ३२, रा. वानवडी), मनीष जयप्रकाश मेहता (वय ३६, रा. दापोली, जि. रत्नागिरी) आणि सुमीत राजेश परदेशी (वय ३६, रा. वानवडी) अशी अटक केलेल्यांची नावे
-
उत्तरपत्रिकांची आता ऑनलाइन तपासणी
उत्तरपत्रिकांची आता ऑनलाइन तपासणी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय
उत्तरपत्रिकांची तपासणी वेगाने होऊन निकाल लवकर जाहीर करण्यासाठी उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय
संपूर्ण प्रक्रियेसाठी येत्या काही दिवसांत निविदा प्रक्रिया राबवली जाणार
पहिल्या टप्प्यात या प्रणालीचा वापर विद्यापीठ संकुलातील आणि संलग्न महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी केला जाणार
Published On - Apr 04,2023 7:32 AM