Maharashtra Breaking News Live : शेती पिकांचे युद्धपातळीवर पंचनामे करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

| Updated on: Apr 11, 2023 | 7:52 AM

Maharashtra Live News : देश-विदेशातील तसंच तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live : शेती पिकांचे युद्धपातळीवर पंचनामे करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
Maharashtra Live NewsImage Credit source: tv9 marathi

मुंबई : नाशिक, जळगावसह संपूर्ण राज्यात अवकाळीचा प्रचंड तडाखा. मका, हरभरा, गहू, केळी, मिरचीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोलापुरात उजनी धरणाजवळील मानेगावातील एमएसईबीच्या पोलवर वीज कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडित. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आढावा. अकोल्यात काल रात्री झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू. अमूल दुधावरून कर्नाटकात राजकारण तापले. अमूल दुधावर बहिष्कार टाकण्याचा हॉटेल व्यावसायिकांचा निर्णय. यासह राज्य आणि देशातील विविध घडामोडी जाणून घेऊया.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 Apr 2023 08:54 PM (IST)

    पुण्यातील कात्रज कोंढवा परिसरात उड्डाणपूलाच्या पिलरचा लोखंडी सांगाडा कोसळला

    सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही

    तोल जाऊन लोखंडी सांगाडा कोसळल्याची माहिती

    एनएचआयच्या माध्यमातून या रस्त्यावर उड्डाणपूलाचं काम सुरू

  • 10 Apr 2023 08:50 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांच्या आयोध्या दौऱ्यावर ठाकरे गटाचा आक्षेप

    दौऱ्यात झालेल्या खर्चावरून ठाकरे गट आक्रमक

    हा दौरा शासकीय केला गेला

    या दौऱ्याचा खर्च कोणी केला

    दौऱ्याचा खर्च शासकीय तिजोरीतून झाला का?

    सचिन अहिरांचा एकनाथ शिंदे यांना सवाल

    आरटीआयमधून ठाकरे गट मागवणार माहिती

  • 10 Apr 2023 07:42 PM (IST)

    पुण्यात भाजप तर्फे सावरकर गौरव यात्रेचे आयोजन

    पुणे : 

    पुण्यात भाजप तर्फे सावरकर गौरव यात्रेचे आयोजन

    शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघात भाजपची सावरकर गौरव यात्रा

    डेक्कन येथील सावरकर स्मरकपासुन यात्रेला सुरूवात

  • 10 Apr 2023 03:11 PM (IST)

    आपच्या नेत्यांचा बीआरएस पक्षात पक्षप्रवेश होणार

    राज्यातील अनेक आपच्या नेत्यांचा चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात पक्षप्रवेश होणार

    छत्रपती संभाजी नगरमध्ये होणाऱ्या सभेत आपचे अनेक नेते आणि कार्यकर्ते करणार चंद्रशेखर राव यांच्या पक्षात प्रवेश

    हरिभाऊ राठोड यांची पुण्यात माहिती

    त्यासोबतच राज्यातील तीन मोठे आमदार पक्षप्रवेश करणार

    काँग्रेसचे दोन आणि अपक्ष एक आमदार पक्ष प्रवेश करणार

  • 10 Apr 2023 02:33 PM (IST)

    पुण्यात ठाकरे गटाचे कार्यकर्ते लागले कामाला

    शहरात आज ठाकरे गटाच्या तीन मोठ्या शाखेंचे उद्घाटन

    ठाकरे गटाचे नेते आमदार सचिन अहिर यांच्या हस्ते पुण्यात ठाकरे गटाच्या शाखांचे होणार उद्घाटन

    पक्ष बांधणीसाठी ठाकरे गटाची पुण्यात जोरदार तयारी

  • 10 Apr 2023 02:14 PM (IST)

    पुण्यात सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी

    राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा भावी खासदार म्हणून उल्लेख

    पुणेकरांच्या प्रश्नावर आवाज उठवणारा यंदा संसदेत हवा, अशा आशयाची सोशल मीडियावर पोस्टरबाजी

    लोकसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी

    आतापासूनच प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून लढण्याचे संकेत

  • 10 Apr 2023 02:11 PM (IST)

    रत्नागिरीच्या नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना महाविकास आघाडीचा घेराव

    शहरातील विकास कामांच्या रखडलेल्या कामासंदर्भात घेराव

    उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे देखील पदाधिकारी उपस्थित

    रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर

    रस्ते पाणी नगरपरिषद कर्मचाऱ्यांवरून मुख्याधिकाऱ्यांना धरलं धारेवर

  • 10 Apr 2023 01:08 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या वर्षा बंगल्यावरून बाहेर निघाले

    नाशिक : मुख्यमंत्री चा ताफा राजभवन च्या दिशेने निघाला,

    राजभवन इथून हेलीपॅडने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर जाणार,

    अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची करणार पाहणी.

  • 10 Apr 2023 12:27 PM (IST)

    रत्नागिरी : नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना महाविकास आघाडीचा घेराव

    शहरातील विकास कामांच्या रखडलेल्या कामासंदर्भात घेराव

    उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे देखील पदाधिकारी

    रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर

    रस्ते पाणी नगरपरिषद कर्मचाऱ्यांवरून मुख्याधिकाऱ्यांना धरलं धारेवर

  • 10 Apr 2023 12:26 PM (IST)

    प्रशांत जगताप यांचा खासदार म्हणून उल्लेख; पुण्यात चर्चा

    भाजपच्या जगदीश मुळीक नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा खासदार म्हणून उल्लेख

    प्रशांत जगताप यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

    पोस्टर मध्ये प्रशांत जगताप यांचा खासदार म्हणून उल्लेख

    पुण्यनगरी चे भावी खासदार म्हणून प्रशंत जगताप यांचे पोस्टर होत आहे व्हायरल

  • 10 Apr 2023 12:02 PM (IST)

    आज आणि उद्या आरोग्य विभागाकडून मॉकड्रील केलं जाईल

    नाशिक : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची माहिती

    जिल्हा शासकीय रुग्णालयात काय तयारी आहे, याचा आढावा घेतला जातोय

    रुग्ण वाढल्यावर प्रशासनाची धावपळ होऊ नये, म्हणून तयारीसाठी मॉकड्रील

    ज्येष्ठ रुग्णांकडे लक्ष देणे गरजेचे

    गर्दीच्या ठिकाणी स्वतःहून काळजी घेणे आवश्यक

    आवश्यकतेनुसार राज्य लस खरेदी करू शकतात

  • 10 Apr 2023 11:21 AM (IST)

    रत्नागिरी : अवकाळी पावसाचा फटका हापूसला

    अवकाळी पावसानंतर तापमानात वाढ

    दोन दिवसात तापमानाचा पारा चाळीस अंशावर

    तापमान वाढल्याने आंब्याची मोठी गळ

    तापमान वाढीमुळे आंबा निघतोय भाजून

    यावर्षी आंब्याचे उत्पादन केवळ 25 ते 30 टक्केच

  • 10 Apr 2023 10:52 AM (IST)

    नवी दिल्ली : राहुल गांधी उद्या केरळ दौऱ्यावर

    वायनाडमध्ये होणार राहुल गांधी यांची जाहीर सभा

    लोकसभा सदस्यत्व गेल्यानंतर पहिल्यांदाच राहुल गांधी मतदारसंघात

    वायनाडमध्ये जाहीर सभा आणि रोड शोचे आयोजन

    राहुल गांधी उद्या मतदारांसमोर काय बोलणार याकडे दक्षिण भारताचे लक्ष

    राहुल यांच्या दौऱ्याची वायनाडमध्ये जोरदार तयारी

  • 10 Apr 2023 10:39 AM (IST)

    शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मोठा दावा

    एकनाथ शिंदे गटात काहीतरी गडबड, अस्वस्थता-राऊत

    अयोध्या दौऱ्यात काही आमदार-खासदार गैरहजर

    ३ आमदार, १ खासदार अयोध्येला का गेले नाहीत, चर्चांना उधाण

  • 10 Apr 2023 10:07 AM (IST)

    IPL 2023 : SRH चा 13 कोटीचा प्लेयर असा बोल्ड झाला, तर कसं चालेलं? त्याच्या धावा आहेत 13,3,13,

    IPL 2023 : असं सुरु राहिलं, तर सनरायजर्स हैदराबादची टीम कशी जिंकणार? अर्शदीपने त्याची कशी दांडी गुली केली, ते VIDEO मध्ये पहा. त्याला 13 धावा करण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतोय. वाचा सविस्तर….

  • 10 Apr 2023 10:07 AM (IST)

    IPL 2023 : करियर धोक्यात घालून आधी हिरो बनला, मग दीड तासात 3.2 कोटींचा खेळाडू बनला झिरो

    IPL 2023 : आयपीएल असंच आहे, इथे हिरोचा झिरो, तर झिरोचा हिरो व्हायला वेळ लागत नाही. वाचा सविस्तर….

  • 10 Apr 2023 10:06 AM (IST)

    Rinku Singh : IPL 2023 मध्ये मराठमोळ्या खेळाडूच्या 4 शब्दांची जादू, त्यानंतर रिंकूने जे घडवलं, तो इतिहास

    Rinku Singh IPL 2023 : तुमच्यामध्ये कितीही टॅलेंट असलं, तरी आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो. मैदानात अनेकदा याच आत्मविश्वासाच्या बळावर चमत्कार घडतो. कालच्या सामन्यात रिंकू सिंहने तेच केलं. वाचा सविस्तर….

  • 10 Apr 2023 10:06 AM (IST)

    Rinku Singh : IPL 2023 मध्ये 5 चेंडूत 5 SIX मारुन मॅच फिरवणाऱ्या 9 वी पास मुलाची गोष्ट

    Rinku Singh IPL 2023 : रिंकूचे वडिल घरोघरी सिलेंडर पोहोचवायच काम करायचे. दिल्लीत एका स्पर्धेत त्याला मॅन ऑफ द सीरीज म्हणून बाइक मिळाली होती. ती त्याने आपल्या वडिलांना देऊन टाकली. वाचा सविस्तर….

  • 10 Apr 2023 10:00 AM (IST)

    छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीबाबत महत्वाची बातमी

    छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक

    सतेज पाटील गटाच्या 29 उमेदवारांचं अपील फेटाळलं

    साखर सहसंचालकांकडे केलेल अपील फेटाळलं

    आमदार सतेज पाटील गटाला मोठा धक्का

    निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज बाद केल्यानंतर पाटील गटांनी घेतली होती साखर सहचालकांकडे धाव

    एक लाख तीस हजार पानांचे पुरावे केले होते सादर

    साखर सरसंचालकांसमोर दोन वेळा याप्रकरणी झाली सुनावणी

    रात्री उशिरा निकालाच्या प्रति संबंधितांना पाठवल्या

  • 10 Apr 2023 09:10 AM (IST)

    दिग्गज नेत्यांचे फोटो मॉर्फ करणाऱ्याला अखेर बेड्या

    पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी ते उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगींपर्यंत अनेक दिग्गज नेत्यांचे फोटो आणि व्हिडीओ मॉर्फ

    देशातील बड्या नेत्यांची बदनामी करणाऱ्या विकृताला थेट रांचीतून अटक करण्यात आली

  • 10 Apr 2023 09:08 AM (IST)

    जळगावात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

    मका, हरभरा, गहू, केळी, मिरचीचे प्रचंड नुकसान, पिके झाली जमीनदोस्त

    गाव खेड्याला जोडणाऱ्या रस्त्यावर पडले वृक्ष, रस्ते पडले बंद

    जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा परिसरात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान झाले आहे

    तालुक्यातील कुऱ्हा काकोडा परिसरातील सुळे, रिगाव, कोराळा भोटा तालुक्यातील अनेक भागात फटका बसला आहे

    काढणीला आलेला पिकाचे नुकसान

    आधीच्याच नुकसानीचे मदत नाही आणि हे दुसरं संकट करावं तरी काय? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहे

  • 10 Apr 2023 09:06 AM (IST)

    चंद्रपुरात रेती वाहतूक करणाऱ्यांच्या आवळणार मुसक्या

    एसडीओंचे पथक 24 तास सक्रिय

    जिल्ह्यात होत असलेल्या गौण खनिज तस्करीबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना खडेबोल सुनावले

    जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनंतर गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकारी संजयकुमार ढवळे यांच्याकडून रेतीची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोन हायवा ट्रकवर कारवाई

  • 10 Apr 2023 09:04 AM (IST)

    सोलापूर शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत

    शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या उजनी धरणाजवळील माने गावाजवळ एमएसईबीच्या पोलवर वीज कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडित

    उजनी धरणातील पंप हाऊसवरील वीज खंडित झाल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झालाय

    पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी उजनी धरणावरील पंप हाऊसला भेट दिलीय

    वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा एक दिवस पुढे गेला आहे

  • 10 Apr 2023 09:02 AM (IST)

    सोलापुरात वादळी वाऱ्यामुळे बार्शी तालुक्यातील नांदणीतील दोन एकर द्राक्षबाग भुईसपाट

    सततच्या येणाऱ्या अस्मानी संकटामुळे बळीराजा झाला हतबल

    बार्शी तालुक्यातील नांदणी, उपळे, मळेगाव परिसरात रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याला बसला फटका

    नांदणीच्या शहाजी मासाळ या शेतकऱ्याची 2 एकर बाग झाली मातीमोल

    हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने शेतकऱ्याला लाखोंचा फटका

    येत्या दोन ते तीन दिवसात मासाळ द्राक्षांची करणार होते काढणी

    साधारण 40 ते 50 टन द्राक्ष उध्वस्त झाल्याने जवळपास 15 ते 16 लाखांचं झालं नुकसान

    प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी शेतकऱ्यांने केली मागणी

  • 10 Apr 2023 08:54 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अवकाळी पाऊस आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार

    राज्यातील अवकाळी पावसाचा आढावा आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीवरील उपाययोजनांबाबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक

    राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे मका, हरभरा, गहू, केळी, मिरची आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे

    अवकाळी पावसामुळे पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत

Published On - Apr 10,2023 8:49 AM

Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.