मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज वाशिम जिल्ह्यातील रिसोड दौऱ्यावर. भाजप रिसोडमध्ये शक्तिप्रदर्शन करणार. भाजपचे नेते अमित शाह उद्या मुंबईच्या दौऱ्यावर. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा घेणार आढावा. मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याचे भाव कोसळले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धकमी देणारा जयेश पुजारी हा पीएफआय संघटनेशी संबंधित असल्याची धक्कादायक माहिती उघड. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.
नवी दिल्ली :
दिल्लीत विरोधी पक्षाच्या गोटात घडामोडींना वेग
काँग्रेसचे केंद्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक
राहुल गांधी, के सी वेणुगोपाल बैठकीसाठी दाखल
महत्त्वाच्या मुद्द्यांवर खलबतं
ताशी 200 किलोमीटर वेगाने धावेल रेल्वे
याठिकाणी सुरु आहे ट्रॅकवर चाचणी
भारतीय रेल्वे टाकणार कात
प्रवाशांना होईल असा फायदा
देशात जलद दळणवळणाचे मोठे जाळे
हा प्रकल्प जागतिक इतिहासात भारताचे नाव कोरणार, बातमी एका क्लिकवर
पुण्यात मेघगर्जनेसह रिमझिम पावसाला सुरुवात
पुण्यातील बहुतांश भागात मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली आहे
अवकाळीचे ढग दाटून आल्यानंतर शहरात विविध ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झालीय
शहरातील अनेक भागात पावसाला सुरुवात
दिवसभराच्या उकड्यापासून पुणेकरांना दिलासा
ट्विटर खरेदीचा झाला पश्चाताप
ट्विटर खरेदी करताना झाली चूक
रात्रीची उडाली होती झोप
ट्विटर विक्रीचा घातला मस्क यांनी घाट
या व्यक्तीला करणार ट्विटरची विक्री, वाचा सविस्तर
येऊर येथे मोठ्या रोषणाईच्या विद्युत लाईट बंद कराव्यात, वेळप्रसंगी टर्फ उखडून टाकावेत, ध्वनी प्रदुषण होणार नाही, या दृष्टीकोणातून काळजी घ्यावी. त्याअनुषंगाने रात्री १० नंतर लग्न किंवा इतर समांरभ होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. इको सेन्सीटीव्ह झोन असल्याने प्रखर प्रकाज्योत आणि रात्रीच्या आवाज बंद करण्यासाठी पावले उचलावीत, पोलिसांनी अनाधिकृत हॉटेलच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत, अशा आशयाचे महत्वाचे आदेश या बैठकीत देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुलींनी केली व्यवसायाची भरभराट
उद्योगपतींच्या मुलीने नवीन व्यवसायात काढले नशीब
अनेक मोठ्या उद्योग घराण्यातील मुलींच्या कार्याची यशोगाथा
कमी वयातच पेलली मोठी जबाबदारी, वाचा सविस्तर
सुषमा अंधारे यांची मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर टीका:
“ज्या खात्याला महिला मंत्री नाही तिथं असंवेदनशील दिसून येणारच. गंगा भगीरथी महिलांना तर पुरुषांना म्हसोबाचा माळ लावणार का? असा फाजीलपणा लोढा यांनी करु नये. माझं तर म्हणणं आहे लोढा यांनी जास्त लोढ घेऊ नये”, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
“हे हिंदू राष्ट्र म्हणायचं असेल तर बकी सर्वांना वाऱ्यावर सोडणार आहात का? माझं तर म्हणणं आहे की जर हिंदू अजेंडा असेल तर मग भाजपने भारतीय जनता पार्टी पेक्षा हिंदू जनता पार्टी हे नावं करावं”, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.
गुंतवणूकदारांना कमाईची पुन्हा संधी
हिंडनबर्ग अहवालानंतर बदलली व्यवसायाची रणनीती
अदानी इलेक्ट्रिसिटी औरंगाबाद लिमिटेडनंतर नवीन कंपनी
या क्षेत्रात कंपनी आजमावणार नशीब, वाचा सविस्तर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बार्टीतर्फे घरोघरी संविधान वाटप
उद्यापासून जवळपास १० हजार संविधनांच्या कॉपी वितरीत करण्यात येणार
आपल संविधान आपण गावोगावी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार
आम्ही १ लाख संविधान वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे
डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे महासंचालक सुनील वारे यांची माहिती
शरद पवार आज दिल्लीत दाखल होणार
उद्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीबाबत बैठक
काँग्रेस सह विरोधी पक्षाच्या नेत्यांची उद्या बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटक विधानसभा निवडणुकीत उतरणार
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस अधिकाऱ्यांची घेतली तातडीची बैठक
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना सूचना
संवेदनशील ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार
ओबीसी आवास योजणेतून मिळणार 10 लाख घर
येत्या काळात एकही समाज बेघर राहणार नाही. प्रत्येकाला घर मिळणार आहे.
बंजारा तांड्यावर जाण्यासाठी 4 हजार कोटी रुपयांच्या रत्यांची तरतुद केली आहे.
गावोगावीच्या रस्त्याची जी मागणी केली आहे.ती मागणी आम्ही एका वर्षात पूर्ण करू
जी 10 लाख घर बांधणार आहोत, त्या घराला पाहिलं नाव महिलांच राहणार…
अशी घोषणा करण्यात आलीये.
नळाला पाणी आले असता आले काळे पाणी
वारंवार नळाला काळे पाणी येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी
औरंगपुरा येथे नळाला काळे पाणी येत असल्याने नागरिक हैराण
नागरिकांनी केली शुद्ध पाण्याच्या पुरवठ्याची मागणी
पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात व मराठवाडा मधील आत्महत्या ग्रस्त जिल्ह्यात 9 हजार रुपये शेतकरीं कुटुंबाच्या खात्यात पडणारमविआच्या काळात शेतकऱ्यांनी विमा भरला पण शेतकऱ्यांना विमा मिळत नव्हता.
त्यामुळे आता पंतप्रधान पीक विमामध्ये केवळ 1 रुपयांमध्ये आपण विमा देत आहोत
मागच्या सरकारने निर्णय केला होता नियमित कर्ज भरणाऱ्याला 50 हजार देऊ पण फुटकी कवळी दिली नाही.पण आपल्या सरकारने त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे भरले.
2019 मध्ये आपलं सरकार आलं पण उद्धव ठाकरे यांनी पाठीत खंजीर खुपसला..आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत घरोबा केला. अडीच वर्ष राज्यात नाकर्ते सरकार होत
अडीच वर्षात विदर्भासाठी एक निर्णय ठाकरे सरकारने घेतला नाही- देवेंद्र फडणवीस
आता सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे होत आहे
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपले सरकार सत्तेवर आले
दुष्काळ अन् अतिवृष्टीने नियम बदलले
बाबरीबाबत चंद्रकांत पाटलांचा दावा खोटा ठरवणारा शिवसैनिक tv9 मराठीवर
कारसेवक म्हणून संजय मुळे यांनीच बाबरीचा मुख्य ढाचा तोडल्याचा केला दावा
ढाचा तोडतानाचा फ़ोटो केला प्रसिद्ध
बाळासाहेबांच्या प्रेरणेनेच बाबरी पाडल्याचा केला दावा
ढाचा पाडल्यावर 3 महिने शिक्षा भोगल्याचा आहे दावा
चंद्रकांत पाटलांनी पुरावे खोडून दाखवण्याचे थेट आव्हान
पुरावे सिद्ध न झाल्यास गुन्हा दाखल करावा अशी थेट केली मागणी
चंद्रकांत पाटील बाबरी पडतांना होते का? असा केला थेट सवाल
कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात…
गारपिट आणि अवकाळी पावसाने ओला झालेला कांदा सडू लागला….
दहा ते पंधरा टक्के ही कांदा हातात येणार नाही….
उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक आणि मजुरी निघणे कठीण झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत…..
काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकरांची चंद्रकांत पाटलांवर टीका
चंद्रकांत पाटील आलेला पाहुणा किती दिवस ठेवायचा हे पुणेकर पाहतील
निवडणुकीत कोल्हापूरला जातील की थांबतील हे कळेल
त्यांच्या बोलण्याचा रुबाब हा पुणेकर उतरवतील
मध्ये शिवसेनेवरचं घसरले
भाजपा सर्व्ह करतं जिंकत असलं तरचं निवडणुका घेतं नाहीतर निवडणूक लावत नाही
मात्र पुण्याची लोकसभा लागली तर महाविकास आघाडीच्या ताब्यात आम्ही ठेऊ
ही जागा कोणाला द्यायची याचा निर्णय महाविकास आघाडी घेईल
राज्यातील सरकार जनतेचं नाही ईडीचं आहे
उन्हाळी सुट्यांसाठी विशेष रेल्वे गाड्या
रेल्वे मंत्रालयाने जाहीर केली माहिती
4,010 मार्गांवर 217 विशेष रेल्वे गाड्या धावणार
विशेष गाड्या भारतातील प्रमुख स्थळ जोडली जाणार
पाटणा, मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नई सारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांसाठी विशेष गाड्या
दक्षिण पश्चिम रेल्वेद्वारे 69 विशेष गाड्या, तर दक्षिण मध्य विभागाकडून 48 गाड्यांचे नियोजन
दक्षिण पश्चिम रेल्वे झोनमध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणामधील रेल्वे स्थानकांचा समावेश
पश्चिम रेल्वे झोन 40 विशेष गाड्या चालवणार ,आणि दक्षिण रेल्वे झोन 20 विशेष गाड्या चालवणार
आरोपी जयेश पुजारी देशविघात कट रचत होता
जयेश पुजारीचे दाऊद गँग, प्रतिबंधित संघटनांशी संबंध
जेलमध्ये राहून जयेश पुजारी गँग चालवत होता
नागपूर पोलीस आयुक्तांची धक्कादायक माहिती
धमकीचे कॅाल आणि गडकरी विरोधात कट
पालघरमधील साधू हत्या प्रकरण
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी दोन आठवडे लांबणीवर
महाराष्ट्र राज्य सरकार घटनेचा तपास सीबीआयकडे द्यायला तयार
वकिलांची सर्वोच्च न्यायालयात माहिती
दोन आठवड्यानंतर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सीबीआयकडे तपास द्यायला नकार दिला होता
अतिक अहमद याचा मुलगा आणि उमेश पाल हत्याकांडातील शूटर असद याचं एन्काऊंटर करण्यात आलं आहे
उत्तर प्रदेश पोलिसांची मोठी कारवाई
असद आणि गुलाम या दोघांवरही प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं
सोलापूरच्या पाणी प्रश्नावर नागरिक आणि लोकप्रतिनिधी आक्रमक पवित्र्यात
सोलापूर महानगरपालिकेच्या कारभाराविरोधात प्रवेशद्वारावर मटका फोडून केला निषेध
माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी महानगरपालिकेत जाऊन पाणी प्रश्न संदर्भात आयुक्तांना विचारला जाब
बुधवारपेठ, बाळे भागातील नागरिकांची महानगरपालिकेसमोर जोरदार घोषणाबाजी
नवी दिल्ली
BBC वृत्त संस्थेवर गुन्हा दाखल
ईडी कडून गुन्हा दाखल
2 महिन्यांपूर्वी दिल्ली आणि मुंबई मधील कार्यालयांवर टाकले होते छापे
ईडी यापुढे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार
Climate change : देशातल्या शेतकऱ्यांवरील संकट कमी होण्याची चिन्ह काही दिसत नाहीत. अवकाळी पावसानंतर आता पिकांवर किडींचा हल्ला सुरु झाला आहे. शेतकऱ्यांना आपल्या पीकांची काळजी घ्यावी लागणार आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
पुण्यात शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्यात बैठक
पुण्यातील बारामती होस्टेलच्या इमारतीत सुरू आहे दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडे केंद्रीय जीएसटी थकवल्या प्रकरणी जीएसटीचे अधिकारी
सकाळी दहा वाजल्यापासून वैधनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये अधिकारी चौकशी करत आहेत..
कोण आहे भारतातील कमी संपत्ती असणारा मुख्यमंत्री
भारतातील 30 पैकी इतके मुख्यमंत्री आहेत करोडपती
मुख्यमंत्र्यांकडे कितीची आहे संपत्ती
किती मुख्यमंत्र्यांविरोधात आहेत गंभीर गुन्हे, वाचा सविस्तर
दोन दिवसांपूर्वीच्या घटनेनं नागपूर पोलीस अलर्ट, महिलांच्या सुरक्षेसाठी बीट मार्शल अलर्टवर
दीड तासांच्या प्रयत्नानंतर नागपूर पोलिसांनी आरोपीला केली अटक
एकतर्फी प्रेमातून आरोपीने विद्यार्थीनीला जीवे मारण्याची दिली होती धमकी
संजू तिवारी नावाच्या आरोपीला पोलिसांनी केली अटक
आरोपीजवळ धारदार शस्र असल्याची माहिती
आरोपी संजू तिवारीचे आणखी काही साथीदार असल्याची माहिती, पोलिसांचा तपास सुरु
दहा ते अकरा या तारखेला 24 तास पाणीपुरवठा हा बंद होता
जल पुरवठा विभागाने दुरुस्तीसाठी जल पुरवठा केला होता खंडित
दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्याने उद्या सर्वत्र पाणीपुरवठा सुरळीत होईल
नवी मुंबई मनपाच्या पाणीपुरवठा विभागाची माहिती
कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकरांवर कलाकारांनी तयार केलं गाणं
हु इज धंगेकर, एकजूटीनं साऱ्यांच्या मतानं कसा उधळून टाकलाय डाव
अगं चंपाबाई धंगेकरला जीव थोडा लाव, आमदाराला जीव थोडा लाव
गाण्यातून चंद्रकांत पाटलांवर टिकास्त्र
रशियासारखा हा देश आला मदतीला धाऊन
देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता कमी
रशियापाठोपाठ या देशामुळे भारताला मिळाला मोठा दिलासा
कच्चे तेल 2 डॉलर प्रति बॅरलने मिळाले स्वस्त
ओपेक देशाच्या उत्पादन घटविण्याचा निर्णय भारताच्या पथ्यावर, वाचा सविस्तर
भारताच्या हद्दीत पुन्हा पाकिस्तानचा ड्रोन
लभारतीय लष्कराने ड्रोन केला जप्त
12 एप्रिल च्या रात्री राजुरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टर मधील घटना
ड्रोनसह एके 47 चे 131 राउंड पाच मॅक्झिन आणि दोन लाख रुपये जप्त
भारतीय लष्करांकडून शोध मोहीम सुरू
छत्रपती संभाजीनगर : तीन दिवसात 560 वाहनाची केली तपासणी,
वाहनांचे टायर घासुन गुळगुळीत झाले असेल तर समृद्धी वरून फिरावे लागेल माघारी,
घासलेल्या टायर प्रकरणी 67 वाहनाना फिरावे लागले माघारी,
वाढते अपघात पाहता RTO ची मोहीम.
नाशिकच्या शिवसेना ठाकरे गटाची पुन्हा होणार संघटनात्मक बांधणी
शिंदे गटात गेल्यान रिक्त झालेल्या जागा त्वरित भरा मातोश्रीचे आदेश
पुढील 15 ते 20 दिवसात भरल्या जाणार रिक्त जागा
निष्क्रिय पदाधिकाऱ्यांची केली जाणार खांदेपालट
नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या विधानसभा मतदारसंघात निहाय बैठकाना सुरवात
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संघटनात्मक बांधणी सुरू
ब्रेक
ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरेंची इंदुरिकर महाराज आणि गौतमी पाटील यांच्यावर टिका
दोघांनाही आपापल्या क्षेत्रातील लोकं नावं ठेवतात
यांनी लावणीची संस्कृती बिघडवली आणि वारकरी सांप्रदायातील लोकंही महाराजांना नावं ठेवतात
दोघांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे
अशी खोचक टिका सदानंद मोरेंनी केली आहे
काल पुण्यात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय
गेल्या आठवड्यात इंदुरिकर महाराज आणि गौतमी पाटील यांच्यात किर्तनांचे पैसे आणि लावणीचे पैसे यावरून जूंपल्याच पाहायला मिळालं होतं…
ब्रेक
नाशिकच्या शिवसेना ठाकरे गटाची पुन्हा होणार संघटनात्मक बांधणी
– शिंदे गटात गेल्यान रिक्त झालेल्या जागा त्वरित भरा मातोश्रीचे आदेश
-पुढील 15 ते 20 दिवसात भरल्या जाणार रिक्त जागा,
निष्क्रिय पदाधिकाऱ्यांची केली जाणार खांदेपालट
नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या विधानसभा मतदारसंघात निहाय बैठकाना सुरवात
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संघटनात्मक बांधणी सुरू
नाशिक महापालिकेतील ऑफलाईन बांधकाम परवानगी बंद करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून सर्व बांधकाम प्रकरणे ऑनलाईन पद्धतीनेच दाखल करण्याचे आदेश शासनाने दिले आहे. याबाबत काल आदेश प्राप्त झाल्याने, आजपासून ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. मात्र ऑफलाईन बांधकाम परवानगी प्रक्रिया महापालिकेला फायदेशीर ठरली असून, यातून जवळपास 244 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. ऑफलाईन प्रक्रियेमुळे पालिकेला उद्दीष्टापेक्षा जास्त महसूल मिळालाय.
अकोला, अमरावती ते नागपूरपर्यंत पदयात्रा, सध्या अमरावती जिल्ह्यात दाखल
अकोल्यातून 10 एप्रिल रोजी पदयात्रेला सुरुवात, 21 एप्रिलला नागपुरात पोहोचणार
जमावबंदी आदेश धुडकावणे, परवानगी न घेता पदयात्रा काढणे यावरून अकोल्यात गुन्हा दाखल
आमदार नितीन देशमुख आणि १०० पेक्षा जास्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
राज्यातील वातावरणात एप्रिल महिन्यात मोठा बदल होत आहे. कधी तापमान ४० अंशावरपर्यंत जात आहे तर कधी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत आहे. एकीकडे सूर्यदेव कोपलेला असल्यामुळे राज्यात उकाडा प्रचंड वाढला आहे. उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे….वाचा सविस्तर
दरवाढीला मध्यंतरी लागला होता ब्रेक
आज किंमतीत झाली पुन्हा वाढ
गेल्या शंभर दिवसांत सोने-चांदीने केले मालामाल
गेल्या दिवाळीनंतर सोने-चांदीचा नव-नवीन रेकॉर्ड, वाचा सविस्तर
ज्येष्ठ अभिनेत्री उत्तरा बावकर यांचं बुधवारी पुण्यात निधन
वयाच्या 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, वाचा सविस्तर..
ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरेंची इंदुरीकर महाराज आणि गौतमी पाटील यांच्यावर टीका
दोघांनाही आपापल्या क्षेत्रातील लोकं नावं ठेवतात
यांनी लावणीची संस्कृती बिघडवली आणि वारकरी सांप्रदायातील लोकंही महाराजांना नावं ठेवतात
दोघांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे
अशी खोचक टिका सदानंद मोरेंनी केली आहे
काल पुण्यात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय
बेळगावमधील आमदार अनिल बेनके समर्थकांमध्ये नाराजी
बेनके यांच्यासह माजी आमदार अरविंद पाटील पक्ष सोडण्याच्या तयारीत
बेळगांव जिल्ह्यातील अनेक जाहीर उमेदवारांवर भाजप कार्यकर्त्यांचा असंतोष
बंडखोरी रोखण्याचं भाजपसमोर आव्हान
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे हवामानात बदल
धुळे, नगर आणि नाशिकमध्ये गारपिटीची शक्यता
सोलापूर शहरासोबतच आता ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ
बुधवारी एका दिवसात सोलापूर ग्रामीण मध्ये 27 तर शहरात 5 कोरोना रुग्ण आढळले
सोलापूर ग्रामीणमध्ये एकूण 67 तर शहरात 46 रुग्ण पॉझिटिव्ह झालेत
जिल्ह्यातील माढा तालुक्यात 13 रुग्ण तर पंढरपूर तालुक्यात 21 कोरोनाबाधित रुग्ण आहेत
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच मस्काचा वापर करा, लक्षणे आढळल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात भेट द्या, कोणताही आजार अंगावर काढू नका, असे आवाहन आरोग्य विभागाने केलेय
सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी केला दावा
15 तारखेला पुणे न्यायालयात मानहानीचा दाव्यासंदर्भात होणार सुनावणी
राहुल गांधींनी इंग्लंडमध्ये भाषण केलं होतं
एका मुस्लिम व्यक्तीला सावरकर आणि त्यांचे पाच सहा मित्र मारत होते
तेव्हा सावरकरांना आनंद होत होता, असं त्यांनी पुस्तकात लिहिले आहे असं राहुल गांधी म्हणाले होते
राहुल गांधी यांची ही कथा काल्पनिक आहे, असा याचिकेत दावा
तीन दिवसात 560 वाहनाची केली तपासणी
वाहनांचे टायर घासून गुळगुळीत झाले असेल तर समृद्धीवरून फिरावे लागेल माघारी
वाहनांचे टायर घासलेले असल्याने 67 वाहनाना फिरावे लागले माघारी
वाढते अपघात पाहता RTO ची मोहीम
काँग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आज करणार रिसोडमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन
रिसोड येथे भाजप कार्यकर्ते शेतकरी, शेतमजूर, मतदारसंघातील विकास कामाच्या दृष्टीने भव्य संकल्प सभा
काँग्रेसचे माजी खासदार, तथा मंत्री अनंतराव देशमुख यांनी काही पदाधिकाऱ्यांसह मुबईत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रिसोड- मालेगाव विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मतदारसंघात अनंतराव देशमुख याचं शक्तिप्रदर्शन, हजारो कार्यकर्ते करणार भाजपमध्ये प्रवेश
हिरवी मिरची, टोमॅटो, वांगे, कोथिंबीर, कोबी, शिमला मिरचीसह भाजीपाला भाव कोसळले
आधीच अवकाळीने ग्रासलेल्या शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले असताना आता तर भाजीपाला भावही कोसळल्याने शेतकरी दुहेरी संकटात
बाजार समिती आवक वाढली पण मालाला उठाव नसल्याने शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यास कवडीमोल भाव
आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती भडकल्या
ब्रेंट क्रूडसह डब्ल्यूटीई कच्चा तेलाच्या किंमती गगनाला
राज्यात ठाण्यात पेट्रोल-डिझेल सर्वात स्वस्त
परभणीसह नांदेडमध्ये इंधन इतके महागले
तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव काय, वाचा बातमी
उद्या शनिवारी अमित शाह हे मुंबईत येणार आहेत
एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईत येणार
यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार
मुंबई भाजपच्या नेत्यांशी संवाद साधणार