Maharashtra Breaking News Live : सोने-चांदीचा पुन्हा नवीन रेकॉर्ड

| Updated on: Apr 15, 2023 | 8:13 AM

Maharashtra Live News : देश-विदेशातील तसंच तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live : सोने-चांदीचा पुन्हा नवीन रेकॉर्ड
Maharashtra Live News Image Credit source: tv9 marathi

मुंबई : सातत्याने राहुल गांधी यांच्या विरोधात टीका करणारे भाजप खासदार अनिल बोंडे यांची वरुड बाजार समितीत काँग्रेससोबत युती. भंडारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सहा संचालकांचे राजीनामे. परभणी जिल्ह्यात रब्बी आणि खरीप हंगामात शेतकऱ्यांना बँकेकडून 1500 कोटींचे पीक कर्ज वाटप. राज्यातील खासगी शाळेत RTE अंतर्गत पहिल्या वर्गातील प्रवेश रखडले. RTE प्रवेशप्रक्रिया वेबसाईट हँग. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Apr 2023 08:50 PM (IST)

    रांगेत उभे राहण्यास सांगितले म्हणून तरुणांकडून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

    कल्याण बैलबाजार परिसरातील हिंद ऑटोमोबाईल्स पेट्रोलपंपावरील घटना

    सर्व घटना सीसीटीव्हीत कैद

    बाजारपेठ पोलिसात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

  • 14 Apr 2023 08:18 PM (IST)

    ‘या रविवारी कुठलाही मेगाब्लॉक नको’, भाजप आमदार प्रसाद लाड यांची मागणी

    मुंबई :

    ‘या रविवारी कुठलाही मेगाब्लॉक नको’

    केंद्र शासनाकडे भाजप आमदार प्रसाद लाड यांची मागणी

    अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याचे निमित्त

    सोहळ्यास लाखो अनुयायी नवी मुंबईला येणार

    महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यास येणाऱ्या अनुयायांची गैरसोय नको

    मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वेवर या रविवारी मेगाब्लॉक नको

    आता रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

  • 14 Apr 2023 07:57 PM (IST)

    अक्षय तृतीयेपूर्वीच सोने-चांदीचा रेकॉर्ड

    गेल्या तीन महिन्यात रेकॉर्डवर रेकॉर्ड

    सोने-चांदीने मोडले यापूर्वीचे सर्व विक्रम

    दोन्ही मौल्यवान धातूची दमदार घौडदौड

    खरेदीदारांच्या तोंडचे पाणी पळाले

    तज्ज्ञांना भाववाढीमुळे फुटला घाम, वाचा बातमी 

  • 14 Apr 2023 07:28 PM (IST)

    छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आज पुन्हा गारपीट

    गंगापूर तालुक्यातील तीन ते चार गावांना गरपीटीचा फटका

    कांद्याच्या पिकाचे झाले नुकसान

  • 14 Apr 2023 07:27 PM (IST)

    अरविंद केजरीवाल यांना सीबीआयची नोटीस

    16 एप्रिल ला हजर राहण्याचे आदेश

    कथित दारू घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना नोटीस

  • 14 Apr 2023 07:16 PM (IST)

    या सरकारी कंपनीचा आयपीओ येणार

    आयपीओसंबंधीत सर्व तयारी पूर्ण

    बाजारात गुंतवणूकदारांना कमाईची संधी

    भविष्यात या क्षेत्रात करणार मोठी गुंतवणूक

    सार्वजनिक क्षेत्रातील या कंपनीमुळे होईल फायदा

    आयपीओ लवकरच येणार बाजारात, वाचा सविस्तर 

  • 14 Apr 2023 07:12 PM (IST)

    कर्नाटक निवडणुकीच्या अनुषंगाने उद्या राष्ट्रवादीची बैठक

    मुंबई :

    कर्नाटक निवडणुकीच्या अनुषंगाने उद्या राष्ट्रवादीची बैठक

    राष्ट्रवादीच्या कर्नाटकातील पदाधिकाऱ्यांसोबत अध्यक्ष शरद पवार सकाळी अकरा वाजता चर्चा करणार

    मुंबईत राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात सकाळी 11 वाजता बैठक

    10 मे रोजी कर्नाटकात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार तर 13 मे ला निवडणुकांचे निकाल जाहीर होणार

  • 14 Apr 2023 07:01 PM (IST)

    अहमदनगर शहरातील कापडबजार परिसरात दोघा व्यवसायिकांवर प्राणघातक हल्ला

    दीपक नवलानी आणि प्राणिल बोगावत या दोन व्यावसायिकांवर चाकूने हल्ला

    किरकोळ कारणाने हल्ला झाल्याची घटना

    या दोन्ही व्यापाऱ्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात केले दाखल

    जिल्हा रुग्णालय बाहेर व्यापाऱ्यांची मोठी गर्दी

    तर कापड बाजारातील व्यापाऱ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ बाजारपेठ बंद करण्याचा घेतला

    शहरात तणावाचे वातावरण, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

  • 14 Apr 2023 06:49 PM (IST)

    नितीन देशमुख यांची संघर्ष यात्रा अमरावतीत दाखल

    अमरावती :  नितीन देशमुख यांची संघर्ष यात्रा अमरावतीत दाखल यात्रेत शेकडो कार्यकर्ते पाणी घेऊन सहभागी नितीन देशमुख यांच्या नेतृत्वातील ही संघर्ष यात्रा देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घराबाहेर धडकणार

  • 14 Apr 2023 06:29 PM (IST)

    Maharashtra Corona Update | कोरोनाचा कहर सुरुच, दिवसभरात 1 हजार 152 रुग्ण

    राज्यात कोरोनाचा कहर सुरुच

    राज्यात दिवसभरात 1 हजार 152 नवे रुग्ण

    तर कोरोनामुळे 4 जणांचा मृत्यू

    वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट

  • 14 Apr 2023 06:18 PM (IST)

    मल्टिबॅगर शेअरची कमाल

    गुंतवणूकदारांनी खोऱ्याने ओढला पैसा

    10,000 रुपयांचे झाले 16 लाख

    असा मिळाला जोरदार परतावा

    आता तज्ज्ञांनी केला हा दावा

    असा होईल गुंतवणूकदारांना मोठा फायदा, वाचा सविस्तर 

  • 14 Apr 2023 06:18 PM (IST)

    नवी मुंबईत रबाळे एमआयडीसीमध्ये भीषण आग

    एका कंपनीला लागली आग

    अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

    केमिकल कंपनीला आग

    आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

  • 14 Apr 2023 05:33 PM (IST)

    आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस

    यात्रेच्या दिवशी तब्बल 11 जणांना घेतला चावा

    मंचर शहरांमध्ये भीतीचे वातावरण

    चावा घेतल्यामध्ये लहान मुलाचा समावेश

    दोन जणांची प्रकृती चिंताजनक उपचारास पुणे येथे दाखल केले

    नगर पंचायत ने पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी

  • 14 Apr 2023 05:32 PM (IST)

    गुंतवणूकदार अक्षय तृतीय पावली

    ग्राहकांना मिळाले अक्षय धन

    गेल्या 11 वर्षांत दिला मोठा परतावा

    गेल्या 11 अक्षय तृतीयांना काय राहिला सोन्याचा भाव

    धन धना धन झाला फायदा, जोरदार मिळला परतावा

    चांदीने करुन दिली बक्कळ कमाई, भावात झाली इतकी वाढ, बातमी एका क्लिकवर

  • 14 Apr 2023 05:24 PM (IST)

    राहुल गांधींनी सरकारी बंगला रिकामा केला

    नवी दिल्ली :

    राहुल गांधींनी सरकारी बंगला रिकामा केला

    खासदारकी रद्द झाल्यानंतर सरकारी बंगला रिकामा केला

  • 14 Apr 2023 04:42 PM (IST)

    भर दिवसा हिरडामाली येथे गोठ्याला आग

    गोंदिया :

    भर दिवसा हिरडामाली येथे गोठ्याला आग

    आगीत एक लाखाचे साहित्य जळून खाक

    जनावरांचा चारा आणि शेतीचे साहित्य जळून खाक

    आगीवर गोंदिया अग्निशमन दलाने नियंत्रण

  • 14 Apr 2023 04:39 PM (IST)

    आरोग्य विमा पण महागला

    ग्राहकांच्या हप्त्यात झाली इतकी वाढ

    आरोग्य विम्यावर आता करावा लागेल वाढीव खर्च

    महागड्या पॉलिसीपासून कशी होईल सूटका

    ग्राहकांपुढे काय आहेत पर्याय, वाचा बातमी 

  • 14 Apr 2023 04:26 PM (IST)

    बेस्टच्या धडकेत पोलिस निरीक्षकाचा मृत्यू

    मुंबई : मरीन ड्राईव्ह येथे पोलीस वाहतूक विभागात होते कार्यरत,

    बेस्ट बसचे ब्रेक फेल झाल्याने घडला अपघात,

    पोलिस निरीक्षक प्रवीण दिनकर हे मरीन ड्राईव्ह येथे पोलीस वाहतूक विभागामध्ये कार्यरत होते.

  • 14 Apr 2023 03:30 PM (IST)

    आमदार रमेश बोरणारे यांना धमकीचे पत्र

    गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे यांना धमकी

    मला धमकीचे पत्र चार दिवसांपूर्वी आले -बोरनारे

    पोस्टाने हे पत्र नगरवरून आले आहे

    या पत्रात चार ओळी आहेत, ज्यात गुंड प्रवृत्तीचे लोक तुम्हाला जीवे मारणार आहेत असा मजकूर आहे

  • 14 Apr 2023 03:26 PM (IST)

    भुसावळ शहराचा पारा वाढला

    हॉट सिटी समजल्या जाणाऱ्या भुसावळ शहराचा पारा सलग दुसऱ्या दिवशी देखील 40 पार राहिला. त्यामुळे भुसावळचे तापमान उच्चांकी नोंदवले गेले आहे. गेल्या वर्षी भुसावळचे तापमान ४२.९ अंश होते. फेब्रुवारी महिन्यापासूनच भुसावळच्या तापमानाने चाळीस ओलांडली आहे. यंदा अवकाळी पाऊस पडल्यामुळे दिलासा मिळाला होता. मात्र आज रोजी पुन्हा वातावरणात बदल झाला व तापमान 43.3 अंशावर पोहोचले आहे

  • 14 Apr 2023 02:41 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनात शिंदे यांच्याकडून मृत आंदोलकाच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत

    नाशिकहून मुंबईच्या दिशेने मागील महिन्यात १७ मार्च रोजी निघाला होता लाँग मार्च

    पुंडलिक जाधव या शेतकऱ्याचा आंदोलनादरम्यान झाला होता मृत्यू

    नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील मोहाडी गावचे होते पुंडलीक जाधव

    जाधव यांच्या कुटुंबियांना आज एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द

  • 14 Apr 2023 02:37 PM (IST)

    राजधानी नवी दिल्ली जवळच्या नोएडा मध्ये मास्क बंधनकारक

    कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मास्क बंधनकारक

    गौतम बुद्ध नगर जिल्हा प्रशासनाकडून आदेश जारी

    नोएडा मध्ये अनेक माध्यमांची कार्यालय , त्याचबरोबर कार्पोरेट कार्यालय

    कर्मचारी, नागरिकांना यापुढे मास्क बंधनकारक असणार

  • 14 Apr 2023 02:24 PM (IST)

    नोएडामध्ये मास्क बंधनकारक

    राजधानी नवी दिल्ली जवळच्या नोएडामध्ये मास्क बंधनकारक

    कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मास्क बंधनकारक

    गौतमबुद्धनगर जिल्हा प्रशासनाकडून आदेश जारी

    नोएडामध्ये अनेक माध्यमांची कार्यालय , त्याचबरोबर कार्पोरेट कार्यालय

    कर्मचारी, नागरिकांना यापुढे मास्क बंधनकारक असणार

  • 14 Apr 2023 02:04 PM (IST)

    हिंदुराष्ट्र हा विषय अजेंड्यावर नसतांना हा विषय व्यक्त करण्याचं काही कारण नाही

    चंद्रपूर : हे ट्विट का केलं, कोणी केलं हे पुढं लक्षात येईल… हिंदुराष्ट्र ट्विट प्रकरणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया,

    भाजपची भूमिका ही सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची आहे, आम्हाला कुठल्याही धर्माबद्दल आकस नाही,

    मोदींची पण हीच भूमिका आहे म्हणूनच गुजरात मधील मुस्लिमांच देशातील कुठल्याही राज्यापेक्षा नौकरी मध्ये जास्त प्रमाण आहे.

  • 14 Apr 2023 01:38 PM (IST)

    पुण्यात तापमानात आज थोडीशी घट

    पुणे शहरातलं तापमान आज 36 डिग्री सेल्सिअस

    शहरात आजही सायंकाळच्या सुमारास पावसाची शक्यता

  • 14 Apr 2023 12:46 PM (IST)

    विरारमध्ये ग्लोबल सिटी परिसरात हायवा ट्रक आणि पिकअप जीपचा भीषण अपघात

    आज सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली घटना

    मोटारसायकलवरुन जाणारे तिघे ट्रकखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू

    अपघातात दोन जण गंभीर जखमी

  • 14 Apr 2023 12:42 PM (IST)

    रस्ता रोको आंदोलन

    कांदा पीक अनुदान मिळण्यासाठी सरकारकडून सात बारा पीक पेऱ्याची अट अनिवार्य करण्यात आलीय. ही अट रद्द करण्यात यावी यासाठी महाविकास आघाडी आक्रमक झालीये. महाविकास आघाडीचे नेते शिवाजी नाकाडे यांच्या नेतृत्वात आष्टीच्या धामणगाव येथे रस्ता रोको करण्यात आलाय. आंदोलकांनी यावेळी रस्त्यावरच टाळ मृदंग वाजवीत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

  • 14 Apr 2023 12:32 PM (IST)

    पुणे लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचाच दावा

    पोटनिवडणुक जाहीर झाल्यावर काँग्रेस या मतदारसंघातून निवडणूक लढवणार

    पुणे लोकसभेची जागा राष्ट्रवादीला दिली जाणार नाही

    पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ

    काँग्रेस नेते मोहन जोशी यांची माहिती

  • 14 Apr 2023 12:16 PM (IST)

    नगरमध्ये काल रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी मोठे नुकसान

    प्रेमदान हडको येथे लिंबाचे झाड अंगणवाडीवर पडल्याने अंगणवाडीचे मोठे नुकसान

    महानगरपालिकेने त्वरित अंगणवाडी बांधून द्यावी नागरिकांची मागणी

    हे झाड पडलं अंगणवाडीची भिंत कोसळली

    अनेक झाडे आणि विजेचे पोल वादळी वाऱ्यामुळे पडले

  • 14 Apr 2023 12:14 PM (IST)

    उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या बालेकिल्यात उद्धव ठाकरे गटाची मोर्चेबांधणी

    शिंदे गटात गेलेल्या उदय सामंत यांना घेरण्यासाठी ठाकरे गट अॅक्शन मोडमध्ये

    राजन साळवी आणि भास्कर जाधव यांना रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून लढवण्याची तयारी

    आमदार राजन साळवी यांचे होम पीच रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ

    रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून निवडणुक लढणार नाही

    राजापूर हीच माझी कर्मभूमी राजन साळवींकडून रत्नागिरी विधानसभा निवडणुक लढवण्याच्या चर्चांचे खंडन

  • 14 Apr 2023 10:42 AM (IST)

    पुण्यात मंगळवारी शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

    जलशुद्धीकरण केंद्रांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार

    वडगाव, धायरी, माणिकबाग आणि सनसीटी भागातील पाणी पुरवठा बंद राहणार

    महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची माहिती

  • 14 Apr 2023 10:32 AM (IST)

    इन्फोसिसने केली बक्कळ कमाई

    इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नीला फायदा

    इन्फोसिसमध्ये आहे त्यांचा इतका वाटा

    नारायण मूर्ती यांच्यासह कुटुंबियांनी केली एवढी कमाई

    इन्फोसिस लाभांश रुपाने वाटणार कोट्यवधी, वाचा सविस्तर 

  • 14 Apr 2023 10:30 AM (IST)

    शिंदे गट शिवसेनेचे आमदार रमेश बोरणारे यांना धमकीचे पत्र

    पोस्टाने आले धमकीचे निनावी पत्र

    पत्रात जीवाला धोका निर्माण करण्याबाबत दिली धमकी

  • 14 Apr 2023 10:24 AM (IST)

    साईबाबा मंदिर सुरक्षेचा अहवाल सादर करा : खंडपीठाचे आदेश

    छत्रपती संभाजीनगर शिर्डी येथील साईबाबा मंदिर आणि परिसराच्या सुरक्षेसाठी काय पावले उचलली जाणार आहेत, याचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. संजय देशमुख यांनी नगरच्या पोलिस अधीक्षकांना दिले. खंडपीठात मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा नगरच्या जिल्हा प्रधान न्यायाधीशांनी एक अहवाल सादर करून शिर्डीमध्ये रामनवमी उत्सवावेळी काही कार्यकर्ते जमावाने जमवून साईबाबांच्या समाधीजवळ चित्रीकरण करण्यासह स्वप्रतिमा घेण्यासाठी गर्दी करत होते. त्यामुळे मंदिराची सुरक्षा व्यवस्था कोलमडली होती, हे निदर्शनास आणून दिले.

  • 14 Apr 2023 10:00 AM (IST)

    चांदणी चौक उड्डाणपूलाच्या उदघाटनाचा मुहूर्त हुकणार?

    चांदणी चौक उड्डाणपूलाच्या उदघाटनाचा मुहूर्त हुकणार?

    चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाला अजून दीड ते दोन महिने वेळ जाणार,

    तसेच अन्य कामे पूर्ण होण्यास किमान जुलै महिना उजाडणार,

    त्यामुळे उड्डाणपूल उद्‌घाटनाचा 1 मे हा मुहूर्त हुकणार आहे.

    चौकातील रस्ता रूंदीकरण आणि उड्डाणपूलाचे काम 90 टक्के पूर्ण

  • 14 Apr 2023 09:30 AM (IST)

    सोने-चांदी खरेदीची मोठी संधी

    या महिन्यातील ऑलटाईम हायपेक्षा स्वस्त

    सोने-चांदीच्या किंमतीत घसरण

    सहा महिन्यात गुंतवणूकदारांना मोठा परतावा

    सोने-चांदीने केले मालामाल, वाचा बातमी 

  • 14 Apr 2023 08:43 AM (IST)

    परभणीत पेट्रोल-डिझेल महागले

    राज्यातील अनेक शहरात भावात तफावत

    औरंगाबाद, नांदेड, बीडसह इतर ठिकाणी किंमती घसरल्या

    आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलात एक डॉलरची घसरण

    तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव घ्या जाणून, या एका क्लिकवर

  • 14 Apr 2023 08:07 AM (IST)

    दुर्मिळ रानमेवा भंडारा शहरातील बाजारपेठेत दाखल, रानमेव्यांची नागरिकांत मोठी मागणी

    जिल्ह्यातील जंगलात आंबा, टेंभर, चारोळी, कवठ, बोर आदी निसर्गाचा गोडवा असलेली फळे भंडारा शहरातील बाजारपेठेत दाखल झाली आहेत

    र्षातून एकदा मिळणाऱ्या रानमेवा घेण्यासाठी नागरिकांडून मोठी मागणी आहे.

  • 14 Apr 2023 08:03 AM (IST)

    पिंपरी चिंचवडच्या उच्चभ्रू वसाहतीमध्ये बंद फ्लॅटच्या आत आयपीएलवर सट्टा, पाच बुकींना अटक

    पिंपरी चिंचवड पोलीसाच्या गुन्हे शाखा युनिट दोनची कारवाई

    चिंचवड गावातील मेट्रोपॉलिटन वसाहतीमध्ये काहीजण सट्टा घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली

    त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी सर्वांना अटक केली

    त्यांच्याकडून 14 मोबाईल, एक लॅपटॉप, दोन वायफाय आणि रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय

  • 14 Apr 2023 08:02 AM (IST)

    चंद्रपूर जिल्ह्यातील उष्णतेचा पारा चढला, चंद्रपूरचे तापमान 43.2 तर ब्रह्मपुरी 43 डिग्री सेल्सिअसची नोंद

    उन्हाची काहिली वाढू लागल्याने दुपारी घराबाहेर निघणे कठीण झाले आहे

    वाढत्या उन्हामुळे होणाऱ्या त्रासांचाही सामना करावा लागत आहे

    गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने चंद्रपुरात दुपारी रस्त्यांवरील गर्दी कमी झाली

    एप्रिलमध्ये पारा 43 च्या पुढे गेल्याने मे आणि जूनमध्ये काय होणार, याची चिंता सतावू लागली आहे

    वाढत्या उन्हामुळे कुलर आतापासूनच काम करणे बंद केले आहे

  • 14 Apr 2023 07:59 AM (IST)

    वाशी मधील एपीएमसी बाजारपेठेत दक्षिणेकडील आंब्याचे वर्चस्व कायम राहण्याची शक्यता

    एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कोकणच्या हापूस आंब्याची आवक कमी झाली असून दक्षिणेकडील राज्यातील आवक वाढली आहे

    मुंबई बाजार समितीमध्ये बदामी, लालबाग, तोतापुरी, गोळा आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू

    पुढील एक महिना कोकणपेक्षा दक्षिणेकडील आंब्याचे वर्चस्व कायम राहण्याची शक्यता

  • 14 Apr 2023 07:57 AM (IST)

    RTE प्रवेशप्रक्रिया वेबसाईट हँग; खासगी शाळांमधील प्रवेश रखडले

    12 एप्रिलला जाहीर होणार होती निवड आणि प्रतीक्षा यादी, पालकवर्ग चिंतेत

    मात्र वेबसाईट चालत नसल्याने ही प्रतीक्षा यादी आणि निवड यादी जाहीर झाली नाही

    त्यामुळे पालक वर्गामध्ये असंतोष निर्माण झाला आहे

    शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

    दुरुस्ती सुरू असल्याची शिक्षण अधिकाऱ्याची माहिती

Published On - Apr 14,2023 7:55 AM

Follow us
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.