Maharashtra Breaking News Live : महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि पुण्यातही कोरोनाची संख्या वाढली

| Updated on: Apr 20, 2023 | 7:21 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राजकारण, समाजकारणासह विविध क्षेत्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live : महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि पुण्यातही कोरोनाची संख्या वाढली
Maharashtra Live NewsImage Credit source: tv9 marathi

मुंबई : चीनच्या रुग्णालयात भीषण आगीत 21 जणांचा होरपळून मृत्यू. विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपसोबत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांशी फोनवरून चर्चा झाल्याची माहिती. अजितदादांना भाजपसोबत यायचं असेल तर त्यांनी वैयक्तिक निर्णय घ्यावा, भाजप नेते आशिष शेलार यांच्या विधानाने खळबळ. भंडाऱ्याच्या वरठी जिल्हा परिषद शाळेत उभारण्यात आली जिल्ह्यातील पहिली स्टेम लॅब. यासह राज्य आणि देशविदेशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 19 Apr 2023 11:59 PM (IST)

    महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि पुण्यातही कोरोनाची संख्या वाढली

    मुंबईः

    महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि पुण्यातही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले

    कोरोना रुग्णांची संख्या मुंबईमध्ये 1 हजार 591, ठाणे 1 हजार 009 तर पुण्यात 766 आहे.

    आतापर्यंत महाराष्ट्रातील 8 कोटी 68 लाख 33 हजार 770 लोकांची कोरोनाची चाचण्या

    आतापर्यंत 81 लाख 58 हजार 393 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले

    महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 80 लाख 3 हजार 802 रुग्ण कोरोनाचे बरे झाले आहेत.

  • 19 Apr 2023 11:44 PM (IST)

    अमरावतीत आयपीएलवर ऑनलाईन सट्टा; गोव्यातून सट्टेबाज अटकेत

    अमरावती:

    अमरावतीत आयपीएलवर ऑनलाईन सट्टा

    गोव्यातून सट्टेबाज अटकेत

    अमरावती शहरात इंडियन प्रिमियर लीग ‘आयपीएल’वर ऑनलाईन सट्टा

    तीन सट्टेबाजांना पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाकडून अटक

    आरोपींकडून एकूण 19 मोबाईल जप्त

    16 लाख रुपयांचे मुद्देमाल जप्त

    एका आरोपीला गोव्यातून अटक

  • 19 Apr 2023 11:33 PM (IST)

    कुटुंबासह पर्यटनासाठी आलेल्या दोन वर्षाच्या मुलाचा गाडी खाली सापडून मृत्यू

    कोल्हापूरः

    कुटुंबासह पर्यटनासाठी आलेल्या दोन वर्षाच्या मुलाचा गाडी खाली सापडून मृत्यू

    कोल्हापूरच्या पन्हाळगडावरील दुर्दैवी घटना

    इंद्रनील दबडे असे दुर्दैवी बालकाचं नाव

    भुदरगड तालुक्यातील खानापूर येथून आई-वडिलांबरोबर आला होता इंद्रनील

    पन्हाळगडावरील तबक उद्यानाजवळ आई-वडील चहा घेत असताना हात सोडून रस्ता ओलांडण्याचा इंद्राणीने केला प्रयत्न.

    इंद्रनील दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ

  • 19 Apr 2023 11:20 PM (IST)

    मराठा आरक्षणासाठी मराठा समन्वयक पुन्हा रस्त्यावर उतरणार, मराठा वनवास यात्रा निघणार

    पुणे :

    मराठा आरक्षणासाठी मराठा समन्वयक पुन्हा रस्त्यावर उतरणार

    6 मे रोजी तुळजापूरातून निघणार मराठा वनवास यात्रा

    मराठा समाजाला ओबीसी कोट्यातूनचं आरक्षण मिळावं या मागणीसाठी निघणार यात्रा

    तुळजापूर ते मुंबई पायी चालत निघणार यात्रा

    कालही मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत समन्वयकांनी केली होती घोषणाबाजी

  • 19 Apr 2023 11:16 PM (IST)

    बीड जिल्ह्यात वीज कोसळून दोन महिलांसह 2 बैलांचा जागीच मृत्यू

    बीड:

    आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

    केरुळ आणि सांगवीत वीज कोसळून दोन महिला शेतकऱ्यांचा मृत्यू

    काजल माळी केरुळ, तर सांगवीच्या राणी सावंत यांचा मृत्यू

    पारगाव येथे दोन बैलही दगावले

    जिल्ह्यात सर्वदूर वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात

    बीड शहरासह परिसरातील विद्युत पुरवठा खंडित

  • 19 Apr 2023 11:08 PM (IST)

    केंद्र सरकारतर्फे महाराष्ट्रातील 6 बस चालकांचा ‘सुरक्षा पुरस्कार’ ने गौरव

    पुणे :

    पुण्याचे अरुण कुचेकर यांचा ‘सुरक्षा पुरस्कारा’ने गौरव

    सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये अपघातमुक्त बस चालविणाऱ्या महाराष्ट्रातील 6 बस चालकांचा ‘सुरक्षा पुरस्कार’ देऊन सन्मान

    देशभरातील एकूण 42 बस चालकांना पुरस्कार

    या पुरस्कार विजेत्यांमध्‍ये महाराष्‍ट्रातील पुणे म‍हानगर परिवहन महामंडळातील अरुण नारायण कुचेकर (24 वर्षे अपघातमुक्त सेवा दिली

    केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या सचिव अलका उपाध्याय यांच्या हस्ते अपघात मुक्त, निर्दोष सेवेबद्दल कृतज्ञता म्हणून पुरस्कार प्रदान

  • 19 Apr 2023 10:49 PM (IST)

    अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक आणि रेल्वे मंत्र्यांची भेट

    अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनी केंद्रीय रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली.

  • 19 Apr 2023 10:42 PM (IST)

    परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा विदेश दौरा

    जयशंकर गयाना, पनामा, कोलंबिया, डोमिनिकन रिपब्लिक या देशांना भेट देणार, या देशातील मुख्य नेत्यांशी चर्चा करणार

  • 19 Apr 2023 10:32 PM (IST)

    एअर मार्शल संदीप सिंग सल्लागार म्हणून नियुक्ती

    एअर मार्शल संदीप सिंग यांची राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे लष्करी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  • 19 Apr 2023 10:19 PM (IST)

    शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय

    शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीसाठी प्रति एकर 50,000 रुपये आणि प्रति हेक्टर 1.25 लाख रुपये देण्यात येणार आहेत. निर्माण होणाऱ्या सौरऊर्जेद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • 19 Apr 2023 09:35 PM (IST)

    कोरोना वाढतोय

    मुंबईत आज कोरोनाचे 234 नवे रुग्ण, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

  • 19 Apr 2023 08:08 PM (IST)

    यंदा विजेची मागणी वाढली

    एप्रिल महिन्यात सर्वाधिक वीजेची मागणी

    यंदाचा उन्हाळा घामाटा काढणार

    केंद्र सरकारची वाढली चिंता

    या राज्यांमध्ये विजेची मागणी वाढली

    विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी खास उपाय, वाचा बातमी 

  • 19 Apr 2023 07:09 PM (IST)

    मोदी सरकारचा आर्थिक समानतेचा नारा!

    कर रचनेत बदलासाठी आखली खास योजना

    प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांचाही घेणार आढावा

    कर प्रणालीचा मोदी सरकार पडताळा

    श्रीमंत-गरीबांमधील दरी कमी करण्यासाठी प्लॅन

    गरीबांवरचे कराचे ओझे कमी करण्याचा मानस

    नियमातील बदलाचा असा मिळेल सर्वसामान्यांना फायदा, बातमी एका क्लिकवर

  • 19 Apr 2023 06:51 PM (IST)

    नागपूर : आमदार नितीन देशमुख यांची पाणी संघर्ष यात्रा

    यात्रा नागपूर जिल्ह्यातील बाजारगावजवळ पोहचली

    देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर जाणार होती यात्रा

    देशमुख यांच्या पदयात्रेला पोलिसांनी परवानगी नाकारली

  • 19 Apr 2023 06:28 PM (IST)

    रायगड : आमदार राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी

    दुसऱ्या दिवशीदेखील पाच तासाहून अधिक काळ चौकशी

    अलिबागच्या एसीबी कार्यालयात झाली कसून चौकशी

    काल आठ तास तर दुसऱ्या दिवशी पाच तास चालली चौकशी

    चौकशीनंतर साळवी कुटुंबीय एसीबी कार्यालयाबाहेर

    राजन साळवी यांच्या पत्नी, दोन मुलं आणि मोठा भाऊ चौकशीच्या फेऱ्यात

  • 19 Apr 2023 06:25 PM (IST)

    सातारा: महाबळेश्वर येथे वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

    आज संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस

    पाचगणी परिसरात गारपिटीमुळे स्ट्रॉबेरीचे मोठे नुकसान

    सलग तीन दिवस संध्याकाळच्या सुमारास पावसाची हजेरी

  • 19 Apr 2023 06:19 PM (IST)

    पुणे : रॅप साँग प्रकरण

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून उच्चस्तरीय चौकशी समिती गठित

    माजी पोलीस महासंचालक डॉ. जयंत उमराणीकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती

    समिती एका महिन्याच्या आत अहवाल देणार असल्याची माहिती

  • 19 Apr 2023 06:08 PM (IST)

    बँकेच्या मनमानीला बसवा चाप

    एटीएममधून रक्कम न आल्यास करा तक्रार

    खात्यात रक्कम शिल्लक असताना घडल्यास प्रकार

    बँकेने तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यास करा आरबीआयकडे तक्रार

    बँकेला प्रत्येक दिवशी खातेदाराला द्यावा लागेल 100 रुपये दंड

    फाटक्या नोटांविषयी कशी कराल तक्रार, वाचा बातमी एका क्लिकवर

  • 19 Apr 2023 06:07 PM (IST)

    पाचोरा येथील उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत जळगाव जिल्हा दौऱ्यावर

    21 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर संजय राऊत यांचे आगमन होणार

    22 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद आणि दुपारी पाचोरा येथे उद्धव ठाकरे यांच्या सभा स्थळाची पाहणी करणार

    23 एप्रिल रोजी पाचोरा येथील उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेसाठी राहणार उपस्थित

    पाचोराची सभा मालेगावपेक्षाही रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी संजय राऊत सलग तीन दिवस जळगावात

  • 19 Apr 2023 05:44 PM (IST)

    शिवाजीनगर मेट्रो स्थानकाचे नामांतर छत्रपती शिवाजी महाराज नगर करा

    भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

    आमदार शिरोळे यांचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांना पत्र

    छत्रपती शिवाजी महाराजांचा आदरपूर्वक सन्मान होण्यासाठी मेट्रो स्थानकाचे नामांतर करण्याची मागणी

  • 19 Apr 2023 05:43 PM (IST)

    इन्काउंटरचा कल्चर लोकशाहीसाठी घातक आहे – मीरा बोरवणकर

    त्वरीत केस चालवून न्याय मिळाला तर लोक पण खूश होत आहे

    नागरिकांमध्ये न्यायाबाबत अनास्था निर्माण झाली आहे

    राजकीय लोकांचा हस्तक्षेप कमी व्हायला हवा

  • 19 Apr 2023 05:42 PM (IST)

    कर्नाटक निवडणुकीसंदर्भात मोठी बातमी

    महाराष्ट्रातील नेत्यांनी माध्यमांशी बोलू नका

    महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा परिणाम कर्नाटक निवडणूकीवर होऊ शकतो

    भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं घेतली सावध भूमिका

    कर्नाटकात पक्षाचं काम करा स्थानिक नेते माध्यमात बाजू मांडतील

    राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डांनी सूचना दिल्याची विश्वसनीय सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती

  • 19 Apr 2023 05:41 PM (IST)

    विरोधी पक्षनेते अजित पवार शुक्रवारी पुणे दौऱ्यावर

    यावेळी अजित पवार जिल्हा बँकेच्या कामकाजाचा आढावा घेणार

    जिल्हा बँकेचा आढावा घेतल्यानंतर अजित पवार यांची सकाळी 9:30 वाजता पत्रकार परिषद

    राजकीय घडामोडीनंतर अजित पवार पुणे दौऱ्यावर

  • 19 Apr 2023 05:26 PM (IST)

    छोटूरामची हनुमान उडी!

    या पेन्नी स्टॉकमुळे गुंतणूकदार मालामाल

    केवळ रुपयांच्या शेअरने केली कमाल

    गुंतवणूकदारांना पाच वर्षांत 225 टक्क्यांचा परतावा

    अवघ्या पाच दिवसांतच 70 टक्क्यांची घेतली उसळी

    किती दिवस चालेल दरवाढीची रॅली, वाचा बातमी 

  • 19 Apr 2023 05:10 PM (IST)

    बोरिवली पूर्व राजेंद्र नगर सिंहगड बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावर आग

    अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश

    या घटनेत कोणी अडकले किंवा जखमी झाल्याची माहिती नाही

  • 19 Apr 2023 05:07 PM (IST)

    कर्नाटक विधानसभा निवडणूक

    काँग्रेसकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर

    राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांचा समावेश

    प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार, सिद्धरामय्या, जगदीश शेट्टार, शशी थरूर यांचाही स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश

    महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांचाही स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश

    10 मे ला विधानसभेसाठी मतदान होणार

  • 19 Apr 2023 04:55 PM (IST)

    श्री सदस्यांच्या मृत्यू प्रकरणावरून काँग्रेस विशेष अधिवेशनाची मागणी करणार

    एवढ्या लोकांचा मृत्यू झालाय याला सरकार जबाबदार आहे

    काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे

    आम्ही विशेष अधिवेशनाची मागणी करणार आहोत

    काँग्रेसचे माजी मंत्री नेते विजय वडेट्टीवारांची टीव्ही 9 मराठीला माहिती

  • 19 Apr 2023 04:47 PM (IST)

    चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी वेळांमध्ये बदल

    तापमान चढते असल्याने जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी वेळांमध्ये बदल

    सकाळची फेरी 5.30 ते 9.30 तर दुपारची फेरी 3 ते 7 वाजेपर्यंत, 20 एप्रिलपासून नवे नियम होणार लागू,

    ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने कोअर क्षेत्राचे उपसंचालक एन व्ही काळे यांच्या स्वाक्षरीने जारी केला आदेश,

    हमखास व्याघ्रदर्शनाच्या काळात सफारी करत असलेल्या पर्यटकांनी नव्या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन

  • 19 Apr 2023 04:45 PM (IST)

    सोने खरेदीचा अक्षय तृतीयाला साधा मुहूर्त

    फिजिकल गोल्डपेक्षा हा पर्याय येईल कामी

    वाढत्या भावामुळे पडलात संभ्रमात

    पेपर गोल्डमधील गुंतवणूक ठरेल फायद्याची

    गेल्या पाच वर्षांत सोन्याने दिला दुप्पट परतावा

    पेपर गोल्डमधील गुंतवणुकीचा असा होईल फायदा, बातमी सविस्तर वाचा

  • 19 Apr 2023 04:45 PM (IST)

    राज्यभरातील नागरिकांना उकाड्यापासून मिळणार दिलासा

    राज्यभरातील नागरिकांना उकाड्यापासून मिळणार दिलासा, पुढील 4 दिवस तापमानात होणार मोठी घट

    उद्यापासून पुढील 4 दिवसात राज्यातील उष्णतेत मोठी घट होणार असून उन्हाळ्यामुळे हैराण झालेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

    पुढील 4 दिवस राज्यभरतील तापमानात मोठी घट होणार असल्याची माहिती पुणे वेध शाळेचे प्रमुख डॉ के एस होसाळीकर यांनी दिली आहे.

    गेल्या काही दिवसात पुण्याचे तापमान 40 च्या वर जात आहे. पुण्यात एप्रिल किंवा मे 40 अंश तापमान बऱ्याचदा नोंदी झाल्या आहेत.

    40 अंशापेक्षा जास्त तापमान गेल्यावर नागरिकांनी काळजी घ्यावी. दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत लोकांनी गरज नसेल तर बाहेर पडू नये असे देखील आवाहन हवामान विभागाने केले आहे.

  • 19 Apr 2023 04:20 PM (IST)

    छत्रपती संभाजी नगर ब्रेकिंग

    तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांच्या सभेला अखेर परवानगी

    नियम व अटी घालून सभेला देण्यात आली परवानगी

    शहरातील जाबिंदा मैदानावर देण्यात आली परवानगी

    सायंकाळी 5 ते 10 या वेळेत सभेसाठी परवानगी

    कुठल्याही रॅली न काढण्याच्या परवानगी पत्रात सूचना

  • 19 Apr 2023 04:05 PM (IST)

    कल्याणमधील आंबिवली परिसरात फ्री स्टाईल हाणामारी

    महिलेला आपल्याकडे बघून काही तरुण बोलत असल्याने झाला होता वाद

    पोलीस ठाण्यात आधी दिली तक्रार नंतर दोन्ही गटांत सुरू झाली हाणामारी

    मारहाणीचा व्हिडीओ समोर येताच कल्याण खडकपाडा पोलिसांनी दोन्ही गटाच्या 10 जणा विरोधात केला गुन्हा दाखल

  • 19 Apr 2023 03:58 PM (IST)

    शेतकऱ्यांना सौर ऊर्जेची वीज कमी किंमतीत देणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

    सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी जमिनी भाडेतत्त्वार घेणार

    शेतकऱ्यांची दिवसा वीजेची मागणी पूर्ण होईल- उपमुख्यमंत्री

    साखर कारखान्यासंदर्भात उपसमिती स्थापन करण्यात आली- फडणवीस

    दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत ४% आरक्षण

  • 19 Apr 2023 03:49 PM (IST)

    AT म्हणजे अकलेचे तारे…. शीतल म्हात्रे यांची आदित्य ठाकरेंवर टीका

    ट्विटरच्या माध्यमातून साधला निशाणा

    ‘एटी’केटी मिळवून पास झालेला हा ढ विद्यार्थी आहे…

    २५ वर्षे मुंबई पालिकेची सत्ता उपभोगताना रस्त्यांच्या कामात घोटाळे करून काळ्याचे किती पांढरे केले ?

    आम्ही जर त्याचा हिशोब बाहेर काढला तर मुंबईकर तुमच्या तोंडाला डांबर फासतील…

  • 19 Apr 2023 03:47 PM (IST)

    नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील रुई येथे मारहाण

    अतिक्रमणा बाबत तक्रार केली म्हणून सरपंच पत्नी आणि तिच्या पतीला चौघांनी मारहाण केली

    या घटनेचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • 19 Apr 2023 03:41 PM (IST)

    सांगली- राम मंदिर चौकात तणाव

    रिक्षा स्टॉप वरील प्रभू श्रीरामांचा पोस्टर अज्ञात समाज कंटकानी फाडल्यामुळे तणावाचे वातावरण

    शहर पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर सांगलीतील हा तणाव निवळला.

  • 19 Apr 2023 03:38 PM (IST)

    संभाजीनगर- तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांच्या सभेला अखेर परवानगी

    नियम व अटी घालून सभेला देण्यात आली परवानगी

    शहरातील जाबिंदा मैदानावर देण्यात आली परवानगी

    सायंकाळी 5 ते 10 या वेळेत सभेसाठी परवानगी

  • 19 Apr 2023 03:32 PM (IST)

    कर्नाटक विधानसभा निवडणूक

    बेळगावात महाराष्ट्र एक्कीकरण समितीकडून मोठं शक्तीप्रदर्शन..

    बेळगाव ग्रामीणचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांचा उमेदवारी अर्ज दाखल  करण्यासाठी सिमावासियांचं शक्तीप्रदर्शन

  • 19 Apr 2023 03:29 PM (IST)

    बदलापुरात सलग दुसऱ्या दिवशी दुसरी हत्या

    बदलापूर पूर्वेत महिलेची गळा चिरून हत्या

    राजश्री भोसले (३५) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव

    शिरगाव परिसरातील राऊत आर्केड इमारतीतली घटना

    बदलापूर पूर्व पोलीस घटनास्थळी दाखल

    पोलिसांकडून पंचनामा करत तपास सुरू

  • 19 Apr 2023 03:26 PM (IST)

    अन्न व औषध खात्यात घोटाळा नाही- संजय राठोड

    केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे आरोप फेटाळले

    मुख्यमंत्र्यांकडे केली होती तक्रार

  • 19 Apr 2023 03:24 PM (IST)

    कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज शिगावी-सावनूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवारी अर्ज दाखल केला..

    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा व अभिनेते सुदीप आदी यांची उपस्थिती

    अर्ज दाखल करण्यापूर्वी मोठं शक्तीप्रदर्शन करत शिगावी येथे भव्य रोड शो

  • 19 Apr 2023 03:23 PM (IST)

    खारघर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी- माजी खासदार हुसैन दलवाई यांची मागणी

    अप्पासाहेबांनी ज्यांच्या हस्ते पुरस्कार घेतला त्यांची पार्श्वभूमी तरी पाहायला हवी होती.

    अजित पवार संदर्भात अफवा पसरवल्या गेल्या

  • 19 Apr 2023 03:20 PM (IST)

    नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या येवला तालुक्यातील सायगाव शाखेतील मॅनेजरची बदली रद्द करण्यावरून आंदोलन

    प्रवेशद्वाराला ठोकले टाळे….

    येवला तालुक्यातील सायगाव येथे बँकेच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकून शेतकऱ्यांचं आंदोलन

  • 19 Apr 2023 03:16 PM (IST)

    पुणे महापालिकेच्या हद्दीतील मालमत्ता करात ४० टक्के सवलत पुन्हा लागू

    पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

  • 19 Apr 2023 03:09 PM (IST)

    माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची फडणवीसांवर टीका

    माण खटाव तालुक्यात मी मुख्यमंत्री असताना साखळी बंधारयाची कामे केलीत

    ही कामे पूर्ण झाल्यानंतर फडणवीस सरकार आले आणि त्यांनी क्रेडिट जाईल म्हणुन जल युक्त शिवार योजना नाव ठेवले

    सातारा-म्हसवड येथील क्रांतिवीर इंग्लिश मीडियम स्कूलच्या नवीन इमारत उद्घाटन सोहळा…

    महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती

  • 19 Apr 2023 03:05 PM (IST)

    काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी कर्नाटक निवडणूकीची सूत्र घेतली हातात

    काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बोलावली बैठक

    बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे करतायेत मार्गदर्शन

    कर्नाटकमधील प्रमुख नेते आणि प्रचारासाठी आलेले नेते उपस्थित

  • 19 Apr 2023 02:58 PM (IST)

    गोंदिया | ग्रामंचायतमधील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी सरपंच सदस्यांचे उपोषण

    वडेगाव ग्रामपंचायत दोषींवर कारवाईची मागणी

    चौकशीकरुन यातील दोषींवर तत्कालीन पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

    पंचायत समितीच्या आवारात आमरण उपोषण सुरू

  • 19 Apr 2023 02:50 PM (IST)

    कॉमेडियन अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    कलाविश्वाला मोठा धक्का… प्रसिद्ध कॉमेडियनचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

    सेलिब्रिटींसह चाहत्यांनी व्यक्त केलं दुःख.. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी वाहिली श्रद्धांजली… वाचा सविस्तर

  • 19 Apr 2023 02:42 PM (IST)

    बंगळूरूतील हॉटेल रेडीसनमध्ये कर्नाटक काँग्रेस कमिटीची बैठक

    विविध राज्यातून प्रचारासाठी आलेल्या नेत्यांना जबाबदारीचं केलं जाणार वाटप

    काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटेंवर मतदारसंघ निरीक्षकाची जबाबदारी

    भाजपाला शह देण्यासाठी काँग्रेसचीही जोरदार तयारी

    कर्नाटक विधानसभेसाठी निवडणूक अर्ज भरायला झाली सुरुवात

    महाराष्ट्रातून मोठे नेते प्रचारासाठी येणार

  • 19 Apr 2023 02:32 PM (IST)

    पुणे महापालिकेकडून अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईला सुरूवात

    पिंपरी चिंचवड मधील किवळे येथील दुर्घटनेनंतर पुणे मनपा अतिक्रमण विभाग अनधिकृत होर्डिंग्ज बाबत आक्रमक

    एमआयबीएम, कोंढवा हडपसर भागातील रोडवर असणारे अनेक अनधिकृत होर्डिंग्ज पाडले जात आहे

    अतिक्रमण विभाग अधिकारी कर्मचारी सतर्क

    पुणे शहरातल्या 1400 अनधिकृत होर्डिंग्जवर होणार कारवाई

  • 19 Apr 2023 02:26 PM (IST)

    जगात लोकसंख्येत भारत प्रथम क्रमांकावर

    चीन पेक्षा भारताची लोकसंख्या जास्त, आकडेवारी जाहीर

    चीनची लोकसंख्या 142.57 कोटी

    भारताची 142.86 कोटी

    यापूर्वी चीन देश होता जगात प्रथम क्रमांकावर

  • 19 Apr 2023 02:17 PM (IST)

    ‘जेव्हा सर्व मर्यादा ओलांडल्या जातात…’, राघव चड्ढा यांच्यासोबत असलेल्या नात्यावर Parineeti Chopra हिचं स्पष्टीकरण

    खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत असलेल्या नात्यावर पहिल्यांदा व्यक्त झाली अभिनेत्री परिणीती चोप्रा;

    अभिनेत्री म्हणाली, ‘जेव्हा सर्व मर्यादा ओलांडल्या जातात…’ वाचा सविस्तर

  • 19 Apr 2023 02:06 PM (IST)

    भिवंडी शहरातील अग्नि तांडव सुरूच

    शहरातील नवीबस्ती गौतम कंपाउन्ड येथील प्लास्टिक मणी बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग

    आगीच्या ज्वाळा उंच आकाशात, परिसर काळवंटला

  • 19 Apr 2023 02:01 PM (IST)

    ‘रोज रस्त्यांवर हत्या आणि…’, बॉलिवूड अभिनेत्याने थेट मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा

    राज्यातील धक्कादायक घटनांवर भाष्य करत बॉलिवूड अभिनेत्याने थेट मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा

    आपल्या बेधडक वक्यव्यांमुळे अभिनेते वादाच्या भोवऱ्यात देखील अडकले आहेत… वाचा सविस्तर

  • 19 Apr 2023 02:00 PM (IST)

    नाशिक मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांचा राजीनामा

    नाशिक : नाशिक मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांचा राजीनामा

    दिलीप दातीर यांनी राजीनामा दिल्याने मनसेत खळबळ

    राजीनाम्यानंतर नाशिकमध्ये राजकीय वर्तुळात खळबळ

    राज ठाकरे राजीनामा मंजूर करणार की नाही याकडे लक्ष

  • 19 Apr 2023 01:53 PM (IST)

    सरकार अपघात झाल्यानंतर अपघातीची रेपारींग करत आहे – आव्हाड

    ठाणे : खारघर मध्ये किती मृत्यू झाले हे खरं सांगा

    जितेंद्र आव्हाड यांचा शिंदे सरकारला सवाल

    डॉ. सावंत जे बोलताय ते खरं आहे.

    उष्माघात की चेंगराचेंगरीत मृत्यू झाला ? आव्हाड यांचा सवाल

  • 19 Apr 2023 01:51 PM (IST)

    कृषीप्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाडचा कमाल तापमानाच्या पाऱ्यात वाढ

    नाशिक : जिल्ह्यातील निफाडचा पारा चाळीशी पार

    कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 40.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद

    उन्हाची तीव्रता वाढल्याने उष्णतेमुळे नागरिक हैराण

    शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी नागरिकांचा थंडपेयकडे कल

  • 19 Apr 2023 01:49 PM (IST)

    कोल्हापुरात महाविकास आघाडीत बिघाडी

    कोल्हापूर : बाजार समितीच्या निवडणुकीत बिघाडी

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला काँग्रेस राष्ट्रवादीन डावल्याचा आरोप

    यापुढे अशी वागणूक मिळाली तर आम्ही वेगळा विचार करू

    ठाकरे गटाचा थेट इशारा

    आम्ही देईल ते नाव घेण्याची मागणी

    आज संध्याकाळ पर्यंत निर्णय न झाल्यास उद्या स्वतंत्र पॅनेल तयार करू

    निमंत्रक सुनील मोदी यांचा इशारा

  • 19 Apr 2023 01:44 PM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

    नाशिक : जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन राज ठाकरे भेटणार मुख्यमंत्र्यांना,

    सकाळी 11 वाजता वर्षा बंगल्यावर राज ठाकरे मुख्यमंत्री यांची भेट,

    नाशिक मधील मनसेचे निवडक पदाधिकारी असणार उपस्थित,

    शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत होणार चर्चा.

  • 19 Apr 2023 01:41 PM (IST)

    माध्यमांसमोर बोलू नका कर्नाटकात आलेल्या भाजपा नेत्यांना वरिष्ठ स्तरावरून आदेश

    कर्नाटक : टीव्ही 9 मराठीनं विनोद तावडेंनी संवाद साधण्याचा केला प्रयत्न,

    विनोद तावडेंचा माध्यमांसमोर बोलण्यास नकार,

    विनोद तावडेंनी केंद्रीय नेतृत्वाला महाराष्ट्रातील अहवाल दिल्याच्या चर्चेनंतर मात्र विनोद तावडेंचा बोलण्यास नकार,

    कर्नाटक विधानसभेवर विचारलं असता त्यावर सदानंद गौडा बोलतील दिलं उत्तर,

    माध्यमांसमोर विनोद तावडेंचा काढता पाय.

  • 19 Apr 2023 01:40 PM (IST)

    मढ समुद्र किनाऱ्यावरील अनधिकृत स्टुडिओ प्रशासनाकडून भुईसपाट

    मालाड : भाजपा नेते किरीट सोमया यांच्या तक्रार नंतर स्टुडिओवर कारवाई,

    आज किरीट सोमया यांनी अनधिकृत स्टुडिओ पडल्यानंतर केली पाहणी,

    मढ समुद्र किनाऱ्यावरील अनधिकृत स्टुडिओ उभारण्यात आला होता.

  • 19 Apr 2023 01:36 PM (IST)

    कल्याण डोंबिवली तापमानाचा पारा वाढला

    कल्याण डोंबिवली : आज कल्याण डोंबिवली 42°c तापमान,

    गर्मीमुळे नागरिक हैराण,

    उन्हाच्या कडक्याने अंगाची लाही लाही.

  • 19 Apr 2023 01:34 PM (IST)

    मंत्रालया बाहेर एक दिवसीय पासेस घेण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी

    मुंबई : भर उन्हामध्ये लागल्या लांबच लांब रांगा दोन तासापासून पासेस निघत नसल्याने गर्मीमुळे नागरिकांची लाही लाही

    दोन तासापासून रांगेत उभे आहे आणि पासेस निघत नाही त्यामुळे गैरसोय होते अशी या सर्वसामान्य नागरिकांची सरकारबाबत तक्रार

    इंटरनेट सुविधा ठप्प झाल्याने नागरिकांना याचा फटका बसत असल्याची प्राथमिक माहिती

  • 19 Apr 2023 01:30 PM (IST)

    नवी मुंबईचा पारा 37 अंशावर, उकाडा वाढला

    मुंबई : मुंबईसह राज्यातील इतर शहरांचाही पारा वाढला

    मालेगावचे तापमान गेल्या तीन दिवसांपासून 40 अंशाच्या वर

    उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातही तापमानाचा पारा वाढताच

  • 19 Apr 2023 01:27 PM (IST)

    मुंबईतील रस्त्याच्या कंत्राटावरुण आदित्य ठाकरे आक्रमक

    मुंबई : मुंबईतील रस्त्याच्या कामात घोटाळा सुरू असल्याचा आरोप

    आदित्य ठाकरे यांनी कंत्राट दारांवर घेतला आक्षेप

    भाजपच्या नेत्यांच्या पत्राचा दाखला देत सरकारवर हल्ला बोल

    चारशे किलोमीटरचे रस्त्यांची फक्त घोषणाच केली

    आदित्य ठाकरे यांचे शिंदे सरकारवर गंभीर आरोप

  • 19 Apr 2023 01:20 PM (IST)

    शिंदे सरकारकडून विकासाच्या नावाखाली घोटाळे सुरू – आदित्य ठाकरे

    मुंबई : मुंबईतील कॉक्रीट रस्त्यांमध्ये शिंदे सरकारकडून घोटाळे सुरू

    पालिकेत नगरसेवक नसतांना पाच मोठे कंत्राट दिले कसे ?

    पावसाळा तोंडावर असतांना काम सुरू झालेले नाही

    6 हजार 80 कोटी पैसे बिल्डरच्या घशात घालण्याचे काम सुरू आहे

    कंत्राट काढली गेली मात्र काम सुरू नाही

  • 19 Apr 2023 01:17 PM (IST)

    माझ्यावरील आरोप तथ्यहीन, संजय राठोड यांचं स्पष्टीकरण

    मुंबई : संजय राठोड यांच्या खात्यात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप

    संजय राऊत यांनी केली होती संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी

    संजय राठोड यांच्याकडून आरोपांवर स्पष्टीकरण

    संजय राठोड यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचार रोखा असं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहीलं होतं

    महाराष्ट्र स्टेट ड्रगिस्ट असोसिएशनने हे पत्र लिहीलं आहे.

  • 19 Apr 2023 01:12 PM (IST)

    सभेसाठी आमखास मैदान नाकारल्यानंतर बीआरएस कडून जबिंदा ग्राउंडची पाहणी

    छत्रपती संभाजीनगर : पोलिसांसह बीआरएस कडून जबिंदा ग्राउंडची पाहणी

    बीआरएसच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्याकडून जबिंदा ग्राउंड ची पाहणी

    बीआरएस चं पथक जबिंदा ग्राउंड दाखल

  • 19 Apr 2023 01:05 PM (IST)

    कर्नाटकमध्ये भाजपची रॅली, महाराष्ट्रातील नेत्यांची नावांचा समावेश

    कर्नाटक : कॉंग्रेसनंतर भाजपकडून महाराष्ट्रातील नेत्यांची यादी जाहीर

    महाराष्ट्रातून नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचे स्टार प्रचारक यादीत नाव

  • 19 Apr 2023 12:51 PM (IST)

    कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी हे आहेत भाजपचे स्टार प्रचारक, महाराष्ट्रातून कोण ?

    नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभेसाठी 10 मे रोजी मतदान होणार असून या निवडणुकांसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा या यादीत समावेश आहे.

    महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी खासदार प्रभाकर कोरे यांचाही या यादीत समावेश आहे.

    तर अन्य नेत्यांमध्ये कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आसामचे मुख्यमंत्री, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा, सदानंद गौडा, केंद्रीय संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचीही नावे आहेत.

  • 19 Apr 2023 12:45 PM (IST)

    शिक्षणही झाले महाग, पुस्तकांच्या किंमती वाढणार

    कागद महाग झाल्यामुळे बालभारतीच्या पुस्तकांच्या किमतीमध्ये ३० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारतर्फे ९० टक्के विद्यार्थ्यांना बालभारतीची पुस्तके मोफत देण्यात येतात. परंतु, कागदाच्या किंमती वाढल्यामुळे आता अन्य विद्यार्थावर पुस्तकांच्या किमती वाढीचा बोझा पडणार आहे.

    येत्या शैक्षणिक वर्षापासून शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, शूज, सॉक्स शासनातर्फे दिले जाणार आहेत.

    पुस्तकातील प्रत्येक धड्यानंतर त्याला वहीचे एक पान जोडले जाणार आहे. ज्यामुळे मुलांना अधिक सराव करता येणार आहे.

  • 19 Apr 2023 12:39 PM (IST)

    मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राजीनामा द्या, नाना पटोले यांची मागणी

    महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी झालेले मृत्यू हे चेंगराचेंगरीमूळे झालाय का ? खोके सरकार नक्की काय लपवतंय?

    या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा दिला पाहिजे. अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीट करून केली आहे.

    मी राज्यपाल रमेश बैस यांना हे सरकार बरखास्त करण्याची विनंती करतो असेही नाना पटोले म्हणाले आहेत.

  • 19 Apr 2023 12:34 PM (IST)

    बोगस शाळांविरोधात मोठी कारवाई करणार

    राज्यात ज्या शाळा अनधिकृत आहे त्यांची यादी प्रकाशित केली आहे. त्या सर्व शाळांना नोटीस काढण्यात आली आहे.

    या शाळांनी विहित मुदतीमध्ये राज्य सरकारची मान्यता घेतली नाही तर या शाळा बंद केल्या जातील.

    मान्यता न घेता या शाळांनी जर शाळा सुरु ठेवल्या तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशारा सरकारने दिला आहे.

  • 19 Apr 2023 12:29 PM (IST)

    साखर प्रति किलो तीन रुपयांनी होणार महाग

    राज्यात साखर उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्याचा थेट परिणाम साखरेच्या होलसेल आणि किरकोळ दरात होणार आहे.

    तोंडाला गोड वाटणारी साखर आता महागणार आहे. प्रतिकिलो दोन ते तीन रुपयांनी साखरेची किंमत वाढणार आहे. हा दर आता 48 रुपयांवर जाणार आहे.

    राज्यात 2022 – 23 या वर्षाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यातील 210 साखर कारखान्यांनी गेल्या सहा महिन्यांमध्ये 105 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन केले. गेल्या वर्षी हेच उत्पादन 137 लाख मेट्रिक टन इतके होते.

  • 19 Apr 2023 12:21 PM (IST)

    राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना न्यायालयाचा मोठा धक्का

    पुण्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आलेले एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

    एकनाथ खडसे, त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी भोसरी येथील जमीन बेकायदेशीररीत्या भोसरी येथील संपादित केली हे पुराव्यांवरून प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

    न्या. अनुजा प्रभुदेसाई यांनी ही याचिका फेटाळताना खडसे यांच्यावरही ताशेरे ओढले आहेत. खडसे यांना महसूल मंत्री नात्याने सार्वजनिक हिताचे निर्णय घेण्याचे अधिकार प्राप्त होते. पण, या अधिकारांचा वापर स्वत: किंवा कुटुंबासाठी तसेच आर्थिक किंवा अन्य फायदा मिळवण्यासाठी केला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवले आहे.

  • 19 Apr 2023 12:08 PM (IST)

    अजित पवार यांची अजून तिथी आलेली नाही – गुलाबराव पाटील

    अजित पवार यांच्या कालच्या घडामोडींवर गुलाबराव पाटील यांनी मोठे वक्तव्य केलं आहे. अजित पवार यांची वेळ येईल काळजी करू नका.

    सध्या गुण जमत नाही तर आता कोणत्या तरी ब्राह्मणाला विचाराव लागेल की कोणती पूजा करावी अशी टिपण्णी त्यांनी केली आहे.

    हा वरचा ब्राह्मण फार कठीण आहे, असेही ते म्हणाले.

  • 19 Apr 2023 11:59 AM (IST)

    मुंबईतील अनधिकृत स्टॉल्सवर राज्यसरकारची मेहेरनजर

    वरळी, नायगाव, ना. म. जोशी मार्ग आणि शिवडी या परिसरात असणारे अनधिकृत स्टॉल्स नियमित करण्याची मागणी अखिल बी. डी. डी चाळ स्टॉलधारक संघ यांनी केली होती.

    या परिसरात सुमारे 359 अनधिकृत स्टॉल्स नियमित करावेत अशी त्यांची मागणी होती.

    यापैकी दिनांक 1/1/1995 पूर्वीचे 23 आणि दिनांक 1/1/1995 नंतरचे व दिनांक 1/1/2000 पूर्वीच्या 74 अनधिकृत स्टॉल्सधारकांनी 1995 पूर्वीचे पुरावे सादर केले अशा एकूण 97 अनधिकृत स्टॉल्सधारकांना नियमित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

  • 19 Apr 2023 11:04 AM (IST)

    टॅलेंटला वयाचं कसलं आलं बंधन!

    त्याने अवघ्या 16 व्या वर्षीच व्यवसायाची केली खटपट

    आज आहे 900 दशलक्ष डॉलरची कंपनी

    देशातील महानगरात घरपोच पोहचवतो किराणा सामान

    तरुणाईसमोर या युवकाने ठेवला मोठा आदर्श

    स्टार्टअपची आता युनिकॉर्न कंपनीकडे वाटचाल, वाचा सविस्तर 

  • 19 Apr 2023 10:12 AM (IST)

    मुकेश अंबानी यांनी रचला इतिहास

    आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतीचा प्रवास

    आज मुकेश अंबानी यांचा वाढदिवस

    भारतात नव्हे तर या देशात झाला होता जन्म

    वडिलांच्या व्यवसायाचे केले साम्राज्यांत रुपांतर

    140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात रिलायन्सचा दबदबा

    अनेक ब्रँड्स घेतले रिलायन्स रिटेलच्या पंखाखाली

    भविष्यात देशातील मोठी खासगी वित्त संस्थाही रिलायन्सच्या नावे, वाचा बातमी 

  • 19 Apr 2023 10:04 AM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचाच राजीनामा मागायला हवा; संजय राऊत यांची मागणी

    महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 14 निरपराध लोकांचा मृत्यू झाला

    फडणवीस विरोधी पक्षात असते तर नवी मुंबईत जाऊन पोलिसांसमोर त्यांनी धुडगूस घातला असता

    आता ते सत्तेत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागावा

    या 14 लोकांच्या मृत्यूची जबाबदारी शिंदे-फडणवीस सरकारचीच आहे, राऊत यांची मागणी

  • 19 Apr 2023 10:00 AM (IST)

    पुण्यात सरकारी कार्यालयात हेल्मेट सक्ती

    सरकारी कार्यालयात आरटीओकडून हेल्मेट सक्ती

    पुणे जिल्हा परिषदेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची आरटीओकडून तपासणी

    कर्मचाऱ्यांकडे हेल्मेट नसल्यास दंडात्मक कारवाई केली जातेय

  • 19 Apr 2023 09:49 AM (IST)

    उद्धव ठाकरे यांची पाचोरा येथे सभा

    उद्धव ठाकरे यांची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा

    गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे घेरणार

    शिवसेना व भाजपवर हल्लाबोल करणार

    सभेचा टीझर जारी

  • 19 Apr 2023 09:45 AM (IST)

    बस कंटनेरचा अपघात

    पालघरमधील वाडा मनोर मार्गावर बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. वाड्या जवळील वरले येथे कंटेनर आणि बसमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातात दोन्ही वाहनाचालक आणि बसमधील सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहे.

  • 19 Apr 2023 09:41 AM (IST)

    अपघात टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर

    पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर वारंवार अपघात होतात. हे अपघात टाळण्यासाठी आता मोठे पाऊल उचलले आहे. या मार्गावर आता अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात येणार आहे. परिवहन विभाग, महामार्ग पोलिस व ‘एमएसआरडीसी’ने त्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत….सविस्तर वाचा

  • 19 Apr 2023 09:40 AM (IST)

    यामुळे अजित पवारांचे बंड शमले- मनसे

    अजित पवार आणि त्यांचा गट राष्ट्रवादीत अस्वस्थ

    36 चा आकडा जुळला नसेल म्हणून कालचं बंड शांत झालं आहे

    पण अजितदादांचे बंड हे तात्पुरतं शमलं आहे

    मनसे प्रवक्ता योगेश खैरे यांची माहिती

  • 19 Apr 2023 09:34 AM (IST)

    मंदिरात तुषार सिंचन

    नागपुरातील कडाक्याच्या उन्हापासून गणेभक्तांचं संरक्षण व्हावं, या उद्देशाने प्रसिद्ध गणेश टेकडी मंदिरात तुषार सिंचन लावण्यात आलंय. वाढत्या उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून मंदिर परिसरात थंड पाण्याचे स्प्रिंक्लर्स लावण्यात आलेय. नागपूरसह संपूर्ण विदर्भात तापमानात मोठी वाढ झालीय. पारा ४१ च्या पुढे गेलाय. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भक्तांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंदिर परिसरात थंड पाण्याचे स्प्रिंक्लर्स लावण्यात आलेय.

  • 19 Apr 2023 09:29 AM (IST)

    सांगलीच्या सेजल पाटील मिस्टर इंडिया

    राष्ट्रीय स्तरावर द इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्टच्या सीजन दोन मिस्टीम इंडिया 2023 मध्ये सांगलीच्या सेजल पाटील हिने सहभाग् घेत मिस्टीम इंडिया 2023 चा किताब पटकावला. याचा ग्रँड फिनाले मुंबई येथे पार पडला. या फिनाले मध्ये सेजल पाटील इन महाराष्ट्राचे नेतृत्व केले. यामध्ये सेजलने पहिले स्थान मिळवत प्रतिष्ठित असणाऱ्या मिस्टीन इंटरनॅशनल वर्ल्ड इंडिया 2023 चे विजेतेपद पटकावले.

  • 19 Apr 2023 09:22 AM (IST)

    भाजप आमदारांची नाराजी वाढली

    मणिपूरमध्ये एन बीरेन सिंग सरकारविरोधात भाजप आमदारांची नाराजी वाढली आहे. आमदारांच्या एक गटाने दिल्ली गाठली आहे. भाजपचे किमान ४० आमदार केंद्रीय नेत्यांच्या भेटीसाठी दिल्लीत तळ ठोकून आहेत. सोशल मीडियावरील पोस्टवरही या आमदारांची नाराजी दिसून येत आहे. हायकमांडशी बोलणे म्हणजे शिस्तभंग नाही असे त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे भाजपशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, सरकारमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

  • 19 Apr 2023 09:16 AM (IST)

    पतीच्या मारहाणीमुळे महिलेने संपवले जीवन

    धाराशिव तालुक्यातील कोंड येथे एका महिलेने 3 लहान मुलांसह तलावात उडी घेऊन केली आत्महत्या

    पतीने दारू पिऊन मारहाण केल्याने महिलेने उचलले टोकाचे पाऊल

    कोंड गावात दारूबंदी ठराव घेऊनही सुरु होती अवैध दारूविक्री

  • 19 Apr 2023 09:14 AM (IST)

    अक्षय तृतीया ग्राहकांना पावणार

    सोने-चांदीच्या किंमतीचे आहिस्ता कदम

    गेल्या चार दिवसांत भावात घसरणीचे सत्र

    दरवाढ न झाल्याने खरेदीदारांचा जीव भांड्यात

    पण बँका, वित्तीय संस्थांना कशाची सतावत आहे चिंता

    दरवाढ होऊनही ग्राहकांना सोने कर्जावर तोटा, वाचा सविस्तर 

  • 19 Apr 2023 09:06 AM (IST)

    नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली

    नाशिकच्या बागलाणमध्ये सर्वाधिक 13 सक्रिय रुग्ण असून त्या खालोखाल निफाडमध्ये 11 रुग्ण आहेत.

    नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये 15 पैकीं 10 तालुक्यात कोरोना अक्टिव झाल्याचे दिसून येत आहे.

    आठवड्यात एकूण 54 कोरोना बाधित झाल्याची माहिती मिळाली

  • 19 Apr 2023 08:57 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगर | तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांच्या सभेला परवानगी नाकारली

    शहरातील आमखास मैदानावर सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली

    सभेसाठी दुसरे मैदान शोधण्याच्या आयोजकांना सूचना

    सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरही सभेसाठी पोलिसांची नकारघंटा

    तर मिलिंद कॉलेजचे स्टेडियम मैदान के. सी. राव यांनी नाकारल्याची माहिती

    मुख्यमंत्री के. सी. राव यांच्या सभेसाठी अजूनही मैदानाची शोधाशोध सुरूच

  • 19 Apr 2023 08:47 AM (IST)

    नाशिक | सिडको येथील गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी राबवले कोम्बिंग ऑपरेशन

    145 गुन्हेगारांना पोलिसांनी घेतले ताब्यात

    हत्यार बाळगणाऱ्या चौघांवर करण्यात आली कारवाई

    13 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 19 ठिकाणी करण्यात आली कारवाई

  • 19 Apr 2023 08:43 AM (IST)

    नाशिक | आता प्रांताधिकाऱ्यांना टँकर मंजुरीचे अधिकार

    पाण्याची निर्माण होणारी टंचाई परिस्थिती बघता तत्काळ पाणी उपलब्ध व्हावे यासाठी घेण्यात आला निर्णय

    नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली प्रक्रिया सुरू

    माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांनी केली होती प्रांताधिकाऱ्यांना टँकर मंजुरीचे अधिकार देण्याची मागणी

  • 19 Apr 2023 08:36 AM (IST)

    राज्यात पेट्रोल-डिझेलचा दिलासा

    अनेक शहरात भावात झाली घसरण

    चीन महागाईच्या आगीत तेल ओतणार

    इंधनाची मागणी वाढल्याने किंमती भडकण्याची शक्यता

    तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव जाणून घ्या एका क्लिकवर

  • 19 Apr 2023 08:32 AM (IST)

    नाशिक | जिल्ह्यात 7 ते 17 एप्रिल या कालावधीत गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी

    या कालावधीत 15 तालुक्यांतील 780 गावे झाली बाधित

    जवळपास 66 हजार 923 शेतकऱ्यांना बसला फटका

    एकूण 37 हजार 981 हेक्टरवरील शेती पिकांचे झाले नुकसान

    सर्वाधिक 30 हजार 256 हेक्टर क्षेत्रावरील कांदा पिकाचे नुकसान

    सटाणा तालुक्याला बसला सर्वाधिक फटका

  • 19 Apr 2023 08:30 AM (IST)

    पुणे | राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे भावी खासदार म्हणून बॅनर्स

    वडगाव भागात लागले बॅनर्स

    याआधी प्रशांत जगताप यांचे भावी खासदाराचे बॅनर्स सोशल मीडियावर झाले होते व्हायरल

    पुणे लोकसभा मतदारसंघात अद्याप पोटनिवडणुक जाहीर झाली नाही

    निवडणूक जाहीर होण्या आधीच शहरात जोरदार बॅनरबाजी

  • 19 Apr 2023 08:20 AM (IST)

    पुणे जिल्ह्यात बोगस शाळांचा सुळसुळाट

    पुण्यात शिक्षणाचा खेळखंडोबा

    पुणे जिल्ह्यात बारा शाळा अनधिकृत

    हवेली तालुक्यात सर्वाधिक चार शाळा अनधिकृत

    शिक्षण विभागाकडूनच करण्यात आली अनधिकृत शाळांची यादी जाहीर

    पुरंदर खेड दौंड मुळशी हवेली या तालुक्यांमध्ये अनधिकृत शाळा

  • 19 Apr 2023 08:18 AM (IST)

    मंत्री संजय राठोड यांच्या खात्याची चौकशी करा, ड्रगिस्ट असोसिएशनची मागणी

    ड्रगिस्ट असोसिएशनच्या राज्य संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

    संजय राठोड यांच्या खात्यात भ्रष्टाचार होत असल्याचा पत्रात आरोप

    ड्रगिस्ट असोसिएशनच्या पत्रामुळे खळबळ

    पत्रांमुळे संजय राठोड यांच्या खात्यावरती संशय वाढला

    असोसिएशनच्या पत्राची दखल घेऊन मुख्यमंत्री चौकशी करणार का?

  • 19 Apr 2023 08:11 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगर | जिल्ह्यातील अंधारी गावात विषबाधेमुळे 70 मेंढ्यांचा मृत्यू

    गट नंबर 597 मध्ये 70 मेंढ्यांचा झाला तडफडून मृत्यू

    वाल्मिक थोरवे आणि योगेश थोरवे या मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान

    विषारी पदार्थ खाण्यात आल्यामुळे मेंढ्यांचा मृत्यू

  • 19 Apr 2023 08:04 AM (IST)

    कोल्हापूर | कळंबा मध्यवर्ती कारागृहात मोबाईल, गांजा सापडण्याचं सत्र सुरूच

    मंगळवारी सायंकाळी 100 ग्रॅम गांजासह सापडले दोन मोबाईल, चार्जर आणि डेटा केबल असलेलं पार्सल

    कारागृहाच्या भिंतीशेजारील शेतवडीत मिळालं पार्सल

    पार्सल मिळताच कारागृहातील सर्व कैद्यांची झडती

  • 19 Apr 2023 07:58 AM (IST)

    सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, संभाजीनगर जिल्ह्यात तब्बल 80 जणांवर गुन्हे दाखल

    80 जणांवर गुन्हे दाखल करून केली अटक

    जिल्ह्यातील खुलताबाद, वैजापूर, कन्नड सिल्लोड, गंगापूर, पैठण या तालुक्यातील 80 जणांवर गुन्हे

    आक्षेपार्ह पोस्ट टाकून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्या प्रकरणी गुन्हे दाखल

  • 19 Apr 2023 07:16 AM (IST)

    हवामान बदलामुळे साखर उत्पादन घटले, यंदा हंगामात 105 लाख टन उत्पादन

    राज्यात 15 ऑक्टोबरला सुरू झालेला साखर हंगाम 18 एप्रिल रोजी आटोपला

    210 साखर कारखान्यांनी 105 लाख टन साखर उत्पादन केले

    मागील वर्षांपेक्षा 32 लाख टनांनी साखर उत्पादन घटले आहे

    राज्यात मागील वर्षी 137.28 लाख टन साखर उत्पादन झाले होते

    यंदा लागवडीखालील क्षेत्र गेल्या वर्षांएवढेच असल्यामुळे यंदा 135 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज

  • 19 Apr 2023 07:14 AM (IST)

    राज्यातील कारागृहावर आता ड्रोनची नजर

    पहिल्या टप्प्यात 12 ठिकाणी ड्रोन द्वारे पेट्रोलिंग केले जाणार

    प्रायोगिक तत्त्वावर येरवडा कारागृह, कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगर, तळोजा, ठाणे, अमरावती, नागपूर, कल्याण आणि चंद्रपूर याठिकाणी ड्रोन पाहणी सुरू

    कारागृह अंतर्गत हालचालीवर बारीक नजर ठेवण्यासाठी ड्रोनची मदत

  • 19 Apr 2023 07:12 AM (IST)

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी 90 जण इच्छुक

    मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या व्यक्तींना येत्या आठ दिवसांत ई-मेलद्वारे माहिती देण्यात येणार

    त्यानंतर पडताळणीत पात्र ठरलेल्या व्यक्तींच्या मुलाखती सुरू होणार

    पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलातील साधारण 16 प्राध्यापक हे कुलगुरू होण्यासाठी स्पर्धेत

    मुलाखतीद्वारे निवडलेली अंतिम काही नावे राज्यपाल कार्यालयाकडे पाठविण्यात येतील

  • 19 Apr 2023 07:11 AM (IST)

    नंदुरबारमधील शहादा येथील राज मोर्टर्स या ट्रॅक्टरच्या शोरुमला भीषण आग; 20 ट्रॅक्टर्स जळून खाक

    आयसर कंपनीच्या नवीन ट्रॅक्टर्सला आग, आगीत 20 पेक्षा जास्त ट्रॅक्टर्स आगीच्या भक्ष्यस्थानी

    आगीचे कारण अजून गुलदस्त्यात

    शहादा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू

  • 19 Apr 2023 07:11 AM (IST)

    भंडाऱ्यातील वरठी जिल्हा परिषद शाळेत उभारण्यात आली जिल्ह्यातील पहिली स्टेम लॅब

    जिल्हाधिकरी योगेश कुंभेजकर आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते या स्टेम लॅबचे उदघाटन

    विधानसभा क्षेत्रातिल 15 च्यावर जिल्हा परिषद शाळॆतील विद्यार्थ्यांना या स्टेम लॅबचा लाभ घेता येणार आहे

Published On - Apr 19,2023 7:05 AM

Follow us
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.