Maharashtra Breaking News Live : राज्यात दिवसभरात 248 नवे कोरोनाबाधित रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या वाढली

| Updated on: Apr 04, 2023 | 7:34 AM

Maharashtra Live News : देश-विदेशातील तसंच तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live : राज्यात दिवसभरात 248 नवे कोरोनाबाधित रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या वाढली
Maharashtra Live News Image Credit source: tv9 marathi

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सूरतच्या सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेला आव्हान देणारी याचिका ते आज गुजरात उच्च न्यायालयात दाखल करणार आहेत. त्यासाठी राहुल गांधी सूरतला येणार आहेत. पुण्यात 9 ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल. यासह देशविदेशातील बातम्या जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 Apr 2023 10:24 PM (IST)

    पश्चिम रेल्वेवर 5 एप्रिल पासून 12 डब्यांच्या नॉन एसी लोकलमध्ये वाढ

    मुंबई : 

    पश्चिम रेल्वेवर 5 एप्रिल पासून 12 डब्यांच्या नॉन एसी लोकलमध्ये वाढ

    रेल्वेने अतिरिक्त 12 डब्यांच्या नॉन-एसी लोकल फेऱ्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वाढ करण्यात येत आहे

    प्रवाशांच्या सुविधेसाठी पश्चिम रेल्वेने 11 फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे

    या अतिरिक्त सेवा 5 एप्रिलपासून लागू होतील.

    पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

    या अतिरिक्त फेऱ्यांसह एकूण फेऱ्यांची संख्या 1383 वरून 1394 होईल

  • 03 Apr 2023 08:14 PM (IST)

    पुण्यात काँग्रेसची मशाल सांज फेरी

    पुणे : 

    पुण्यात काँग्रेसची मशाल सांज फेरी

    काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली, या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेसच मशाल फेरी

    झाशीची राणी पुतळा चौक ते खंडोजी बाबा चौक पर्यंत पार पडणार मशाल सांज फेरी

  • 03 Apr 2023 08:04 PM (IST)

    राज्यात दिवसभरात 248 नवे कोरोनाबाधित रुग्ण

    मुंबई :

    मुंबई शहरात आज ७५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    ठाण्यात ५७ रुग्णांना कोरोनाचा संसर्ग

    राज्यातील नवीन कोरोना रुग्णांची आजची आकडेवारी २४८ इतकी

    राज्यात एकूण ३५३२ सक्रिय रुग्ण

  • 03 Apr 2023 07:08 PM (IST)

    अरविंद सावंत यांनी केलेल्या वक्तव्याबाबत ठाण्यातील रिक्षा चालक झाले आक्रमक

    ठाणे :

    ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंत यांनी केलेल्या वक्तव्याबाबत ठाण्यातील रिक्षा चालक झाले आक्रमक

    ठाण्यातील कामगार नाका या ठिकाणी शिवसेना पक्ष, रिक्षा चालक-मालक आणि संघटनेच्या वतीने अरविंद सावंत यांचा पुतळा जाळत निषेध करण्यात आला

    अरविंद सावंत जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत असाच रोष रिक्षावाल्यांचा राहणार असल्याचे आंदोलन कर्त्यांकडून सांगण्यात आले आहे

  • 03 Apr 2023 06:16 PM (IST)

    मुंबईच्या चारकोप परिसरात भाजप-शिवसेनेच्या सावरकर गौरव यात्रेला सुरुवात

    मुंबई : 

    मुंबईच्या चारकोप परिसरात भाजप-शिवसेनेच्या सावरकर गौरव यात्रेला सुरुवात

    मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मी सावरकर अशा आशयाचे फलक घेऊन घोषणाबाजी करत रॅलीत सहभागी

    थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही या गौरव रॅलीत होणार सहभागी

    चारकोप पासून सुरू झालेल्या या गौरव यात्राचा बंदर पकाडी परिसरातील सावरकर चौकात होणार सांगता

  • 03 Apr 2023 05:51 PM (IST)

    भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांची यशोमती ठाकुरांवर टीका

    गुजरात पोलिसांनी आमदार यशोमती ठाकूरांशी कुठलाही उद्धट व्यवहार केला नाही

    मात्र यशोमती ठाकूर यांनीच पोलिसांना चेथावणी देणारी वक्तव्य केली

    भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांची यशोमती ठाकुरांवर टीका

    पोलीस चिडले पाहिजे, काहीतरी तणाव निर्माण झाला पाहिजे म्हणून यशोमती ठाकूर यांचा हा प्रयत्न प्रयत्न होता

    यशोमती ठाकूर यांच्या कडून पोलिसांच्या विरोधात नरेटीव्ह सेट करण्याचा आणि भाजपा कशी दडपशाही करते हे दर्शवण्याचा केविलवाना प्रयत्न झाल्याचा आरोप

  • 03 Apr 2023 04:19 PM (IST)

    नाशिक : अरविंद सावंत यांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे आंदोलन

    अरविंद सावंत यांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे आंदोलन

    सावंत यांनी रिक्षा वाल्यांबद्दल केलेल्या वक्तव्याचा केला निषेध

    सावंत यांच्या फोटोला चपला मारून केलं आंदोलन

  • 03 Apr 2023 03:30 PM (IST)

    काँग्रेस नेते राहुल गांधी सुरत कोर्टात दाखल

    काँग्रेस नेते राहुल गांधी सुरत कोर्टात दाखल

    प्रियांका गांधीही राहुल यांच्यासोबत

    आडनाव अवमान प्रकरणी झालेल्या शिक्षे विरोधात राहुल यांची याचिका

    कोर्ट परिसरात काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित

  • 03 Apr 2023 03:29 PM (IST)

    नवी दिल्ली : मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

    दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील आरोपी मनीष सिसोदिया यांच्या कोठडीत वाढ

    सीबीआयशी संबंधित खटल्यात राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने केली वाढ

    न्यायालयीन कोठडीत १७ एप्रिलपर्यंत वाढ

  • 03 Apr 2023 01:22 PM (IST)

    वर्ध्यात तहसिलदार, नायब तहसीलदारांचे बेमुदत कामबंद आंदोलन

    नायब तहसीलदारांना वर्ग दोनची वेतनश्रेणी देण्याची मागणी

    जिल्ह्यातील तहसिलदार, नायब तहसीलदारांचा आंदोलनात सहभाग

    कामबंद आंदोलनाने महसूलशी संबंधित विविध कामांचा खोळंबा

    वारंवार सादरीकरण करूनही दुर्लक्ष केल्याने आंदोलन

  • 03 Apr 2023 01:21 PM (IST)

    सांगली महापालिकेच्या आयुक्तांना बूट फेकून मारला

    आयुक्त सुनील पवार यांच्यावर बूट फेकून शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार

    लोकशाही दिना निमित्ताने तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तीकडून हल्ला

    आयुक्तांकडून तक्रार अमान्य केल्याच्या रागातून तक्रारदाराचे कृत्य

    हल्ला करणाऱ्या व्यक्तीस सांगली शहर पोलिसांनी घेतले ताब्यात

    घटनेनंतर महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी हल्ल्याच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन करत महापालिकेसमोर सुरू केले आंदोलन

  • 03 Apr 2023 12:06 PM (IST)

    जून महिन्यात बारावीचा निकाल लागण्याची शक्यता

    जूनच्या पहिल्या आठवड्यात बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लागण्याची शक्यता

    तर दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता

    बारावी आणि दहावी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल वेळेवरच लागणार

    राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे हे निकाल वेळेवर लागणार नाही अशी चर्चा होती

    दहावी आणि बारावीच्या उत्तर पत्रिका जलद गतीने तपासणी होणार असल्याची माहिती बोर्डाने दिली आहे

    १४ लाख ५७ हजार २९४ विद्यार्थ्यांनी दिली बारावीची परीक्षा तर १५ लाख, ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी दिले दहावीचे पेपर

  • 03 Apr 2023 11:39 AM (IST)

    काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचं आंदोलन

    – सोलापुरात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसकडून निदर्शने

    – राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींना पत्र पाठवत निषेध

    – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोलापूर पोस्ट ऑफिस मधून लेखी पत्र पाठवत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आंदोलनात सहभागी.

    – राहुल गांधींचे खासदारकी रद्द केली ही लोकशाही विरोधी कारवाई नाही का?

  • 03 Apr 2023 11:39 AM (IST)

    पुण्यात तरूणाचे पोलिसांना पुणेरी भाषेत टोमणे

    “आमच्याकडे लायसन्स आहे, आम्हाला थांबवून तुम्ही आमचा आणि तुमचा वेळ वाया घालवू नका”

    तरुणाचे वाहतूक पोलिसांना पुणेरी भाषेत टोमणे

    वाहतूक पोलिांकडून कायम अडवणूक होत असल्याने तरुणाची शक्कल

    वैतागलेला पुणेकर थांबला नदी पात्रात

  • 03 Apr 2023 11:18 AM (IST)

    पुण्यात बालगंधर्व चौकात एमपीएससी विद्यार्थीच पुन्हा आंदोलन

    पुणे : टायपिंग स्किल टेस्ट मध्ये आयोगाने बदल केला आहे त्याविरोधात एमपीएससी मुलं रस्त्यावर,

    राज्य परीक्षा परिषद नियमानुसार स्किल टेस्ट घ्यावी अशी मागणी.

  • 03 Apr 2023 10:56 AM (IST)

    जालना : कुरियर कंपनीकडून आल्या सहा तलवारी

    जालना शहरात कुरिअरने मागवण्यात आलेल्या तलवारी जप्त

    गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून या तलवारी जप्त केल्या

    तलवारी ऑर्डर करणाऱ्या दोन तरुणांना बेड्या ठोकल्या

    या तलवारी कशासाठी मागवण्यात आल्या होत्या याचा शोध सुरू

  • 03 Apr 2023 10:39 AM (IST)

    ‘मनसे’च्या नव्या गाण्यावर प्राजक्ता माळीने धरला ठेका; व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल… वाचा सविस्तर

    ‘करू तयारी रे, घेऊ भरारी रे… राजमुद्रा ही मिरवूया… ‘

    ‘मनसे’च्या नव्या गाण्यावर थिरकली प्राजक्ता मळी… वाचा सविस्तर

  • 03 Apr 2023 10:35 AM (IST)

     गोंदिया- स्फोटके घेवून जात असलेल्या टिपागड दलमच्या नक्षल सदस्याला अटक…..

    पोलिस स्टेशन केशारी अंतर्गत नागनडोह जंगल परिसरात केली अटक…..

    नक्षली साहित्य जप्त……

  • 03 Apr 2023 10:20 AM (IST)

    IPL 2023 Points Table : मुंबईवर एकतर्फी विजय, पण तरीही RCB टॉपवर नाही, जाणून घ्या कोण नंबर-1

    IPL 2023 Points Table in Marathi : आयपीएल 2023 मध्ये सर्वच टीम्सनी आपआपला एक सामना खेळला आहे. त्यानंतर पॉइंट टेबलच चित्र स्पष्ट झालय. नंबर 1 कुठली टीम आहे, ते चित्र सुद्धा स्पष्ट आहे. वाचा सविस्तर….

  • 03 Apr 2023 10:19 AM (IST)

    MI vs RCB : Rohit Sharma 1 वर्षापासून प्रतिक्षेत होता, विराट कोहलीकडून 17 बॉलमध्ये त्याचा गेम ओव्हर

    MI vs RCB IPL 2023 : विराट कोहलीने रोहित शर्माला धक्का देत आपला मास्टर क्लास दाखवून दिला. विराट कोहलीच्या इनिंगच वैशिष्ट्य म्हणजे त्याने मुंबई इंडियन्सच्या शक्तीस्थळावरच हल्लाबोल केला. वाचा सविस्तर….

  • 03 Apr 2023 10:18 AM (IST)

    MI vs RCB : पहिली हार, वैतागला Rohit Sharma, पराभवासाठी दिली ‘ही’ कारणं

    RCB vs MI Captain Rohit Sharma Statement : रोहितने यंदाच्या सीजनमधील पहिल्याच पराभवासाठी कोणाला धरलं जबाबदार? रोहित शर्माने सीजनमधील पहिल्या पराभवानंतर बोलताना त्याची बाजू मांडली. वाचा सविस्तर….

  • 03 Apr 2023 10:17 AM (IST)

    MI vs RCB : कोहली-डुप्लेसीने फक्त 22 बॉलमध्ये तोडलं मुंबई इंडियन्सच मनोबल

    MI vs RCB : विराट कोहली आणि फाफ डुप्लेसीने 22 चेंडूत फिरवला सामना.  वाचा सविस्तर….

  • 03 Apr 2023 10:17 AM (IST)

    संसदेच्या अधिवेशनाच्या कामकाजाचा शेवटचा आठवडा

    आजपासून लोकसभा, राज्यसभेचे कामकाज पुन्हा सुरू होणार

    कामकाजापूर्वी काँग्रेस खासदारांची आज बैठक

    या आठवड्यात फक्त तीन दिवस चालणार कामकाज

    विरोधक आणि सत्ताधारी कामकाज चालू देणार का याकडे लक्ष

  • 03 Apr 2023 10:15 AM (IST)

    पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच

    पुण्यातील कात्रज परिसरात कोयता गँगकडून पुन्हा एकावर हल्ला

    तीनजण आणि एका तरुणावर केले कोयत्याने वार

    विशाल विठ्ठल धुळे या तरुणावर कोयत्याने हल्ला

    तीनजणांकडून कात्रज परिसरात कोयत्याने तरुणावर हल्ला

    याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

    एकूण तीन अल्पवयीन मुलांवर भारती विद्यापीठ पोलिसांनी केला गुन्हा दाखल

  • 03 Apr 2023 10:11 AM (IST)

    राहुल गांधी आज सूरतमध्ये, न्यायालयात याचिका दाखल करणार

    राहुल गांधी दुपारी सूरतला पोहोचण्याची शक्यता

    काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरातही सूरतला जाणार आहेत

    राहुल गांधी यांच्या याचिकेकडे सर्वांचं लक्ष

Published On - Apr 03,2023 10:07 AM

Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.