Maharashtra Breaking News Live : राज्यात पुन्हा ग्रामपंचायत निवडणुकींचा धुराळा उडणार, निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा

| Updated on: Apr 06, 2023 | 11:48 PM

Maharashtra Live News : देश-विदेशातील तसंच तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live : राज्यात पुन्हा ग्रामपंचायत निवडणुकींचा धुराळा उडणार, निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा
Maharashtra Live News Image Credit source: tv9 marathi

मुंबई : हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. हनुमान जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज भाजपचा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्तानेही महाराष्ट्रासह संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपच्या स्थापना दिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. फोर्ब्सची अब्जाधीशांची यादी जाहीर. श्रीमंतांच्या यादीत 16 भारतीयांचा समावेश. यासह राज्यासह देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 06 Apr 2023 08:35 PM (IST)

    कोविड, एच१एन१, एच३एन२ च्या वाढत्या संसर्गाबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी घेतली आढावा बैठक

    पुणे :

    – कोविड, एच१एन१, एच३एन२ च्या वाढत्या संसर्गाबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी घेतली आढावा बैठक,

    – यावेळी कोविड रुग्णालयातील सर्व साधने व्हेंटीलेटर, आरटीपीसीआर टेस्टींग किटस्, ऑक्सीजन इ. बाबींची उपलब्धता तपासण्याचे आदेश,

    – कोरोना लागण झालेल्या रुग्णाच्या नातेवाईक यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याच्या सूचना,

    – बैठकीला आरोग्य सचिवांसह राज्यातील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते

  • 06 Apr 2023 08:32 PM (IST)

    देहूरोड पोलीस ठाण्याच्या वादग्रस्त पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांची वाहतूक शाखेत बदली

    पिंपरी चिंचवड :

    -देहूरोड पोलीस ठाण्याच्या वादग्रस्त पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांची वाहतूक शाखेत बदली

    -देहूरोड पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांची उचलबांगडी होताच केला देहूरोडमधील नागरिकांनी आनंदोत्सव साजरा

    -एकमेकांना पेढे भरवत, फटाके फोडत केला आनंदोत्सव साजरा

    -देहूरोड पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांनी देहूरोड परिसरात खूप खोटे गुन्हे दाखल करत नागरिकांना नाहक त्रास दिला होता, अनेक अवैध धंद्यांना दिले होते अभय, असा आरोप करण्यात आलेला

  • 06 Apr 2023 08:07 PM (IST)

    पिंपरी चिंचवड: वादग्रस्त पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांची वाहतूक शाखेत बदली

    पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांची उचलबांगडी होताच देहूरोड मधील नागरिकांनी केला आनंदोत्सव साजरा

    एकमेकांना पेढे भरवत,फटाके फोडत केला आनंदोत्सव साजरा

    देहूरोड पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांनी देहूरोड परिसरात खूप खोटे गुन्हे दाखल करत नागरिकांना नाहक त्रास दिला होता, अनेक अवैध धंद्यांना दिले होते अभय

  • 06 Apr 2023 07:44 PM (IST)

    आता युपीआय युझर्ससाठी सर्वात मोठी सुविधा

    कोणापुढे हात पसरवता कशाला, सहज मिळवा पैसा

    खात्यात नसू द्या छदाम, तरीही मिळेल युझर्सला पैसा

    युपीआयच्या माध्यमातून मिळेल क्रेडिट रक्कम

    युपीआयचा करा आता क्रेडिट कार्ड सारखा वापर, वाचा सविस्तर 

  • 06 Apr 2023 06:43 PM (IST)

    पृथ्वीराज चव्हाण यांनी एखाद्या ठिकाणाहून खासदार होऊन दाखवावे : गिरीश महाजन

    घोडा मैदान आता जवळ आहे. स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुका जवळ आले आहेत, वर्षभरात लोकसभेच्या ही निवडणूक आहेत, लोकसभेच्या निवडणुकीला तुम्ही उभे राहा आणि एकदा अनुभव घ्या, महाविकास आघाडीचा एवढा जर जोर असेल पृथ्वीराज बाबांनी एखाद्या ठिकाणहून खासदार होऊन निवडून येऊन दाखवावे असे आव्हान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

  • 06 Apr 2023 06:34 PM (IST)

    बँकेच्या एटीएमवर मिळवा मोफत विमा

    प्रत्येक एटीएम कार्डवर मिळते विमा संरक्षण

    कार्डच्या श्रेणीनुसार मिळतो विम्याची रक्कम

    अपघात आणि जीवन विम्याची मिळते सुविधा

    पण त्यासाठी या अटीची करावी लागते पुर्तता, वाचा बातमी 

  • 06 Apr 2023 06:24 PM (IST)

    राज्यात पुन्हा ग्रामपंचायत निवडणुकींचा धुराळा उडणार, निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा

    मुंबई : 

    राज्यभरातील सुमारे 2 हजार 620 ग्रामपंचायतीतील 3 हजार 666 सदस्य आणि 126 थेट सरपंचांच्या रिक्तपदांचा पोटनिवणुकांसाठी 18 मे 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे आज येथे देण्यात आली.

    निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होत आहे. नामनिर्देशनपत्र 25 एप्रिल ते 2 मे 2023 या कालावधीत दाखल करता येतील. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 3 मे 2023 रोजी होईल.

    नामनिर्देशनपत्रे 8 मे 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. 18 मे 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त व दुर्गम भागात मात्र दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 19 मे 2023 रोजी होईल.

  • 06 Apr 2023 06:21 PM (IST)

    विविध ग्रामपंचायतीतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 18 मे रोजी मतदान

    राज्यभरातील सुमारे 2 हजार 620 ग्रामपंचायतीतील 3 हजार 666 सदस्य आणि 126 थेट सरपंचांच्या रिक्तपदांचा पोटनिवणुकांसाठी 18 मे 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे आज येथे देण्यात आली.

  • 06 Apr 2023 06:10 PM (IST)

    काँग्रेसला मोठा झटका, दिग्गज नेत्याच्या मुलाचा भाजपमध्ये प्रवेश

    काँग्रेसचे माजी दिग्गज नेते आणि माजी संरक्षण मंत्री एके एंटनी (AK Antony) यांचा मुलगा अनिल एंटनी यांचा भाजपमध्ये प्रवेश

    अनिल एंटनी केरळ काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमचे संयोजक राहिले आहेत.

    केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal), वी मुरलीधरन, केरळ भाजप प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

    (Anil Antony, the son of Congress leader and former Union Minister AK Antony joined the BJP today.)

  • 06 Apr 2023 06:03 PM (IST)

    नवी मुंबईतील सिडको घरांच्या किमती कमी करा- मनसे

    अन्यथा मनसेचे भीक मागा आंदोलन

    नवी मुंबईतील सिडकोच्या घरांच्या किंमती कमी करण्याची मागणी मनसेने केली आहे.

    घरांच्या किंमती कमी न केल्यास मनसे भीक मागा आंदोलन करणार

    मनसे प्रवक्ते गजानन काळे यांचा इशारा

    मनसे शिष्टमंडळाने सोडतधारकांसोबत सिडको सह-व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेतली.

  • 06 Apr 2023 05:50 PM (IST)

    नवी मुंबई: नेरूळ जिमखाना परिसरात अपघातात दुचाकीस्वराचा मृत्यू

    नवी मुंबई परिवहन विभागाच्या बसला दुचाकीस्वार ओव्हरटेक करत असताना बसच्या चाकाखाली आल्याने मृत्यू

    पुढील तपास नेरूळ पोलीस करत आहेत

  • 06 Apr 2023 05:38 PM (IST)

    पूर्णविराम नाहीच, हा तर स्वल्पविराम!

    आरबीआय गव्हर्नरने जोर का धक्का

    एप्रिल महिन्याच्या तिमाहीसाठी दिलासा

    जून महिन्यात वाढी शकतो रेपो दर

    आताच्या आनंदावर पडू शकते विरजण, वाचा बातमी 

  • 06 Apr 2023 04:37 PM (IST)

    नगर शहरात पावसाची हजेरी

    अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ

    पावसामुळे वातावरणात गारवा तर उकाड्यापासून नागरिकांची सुटका

    शहरासह जिल्ह्यात काही भागात पावसाची हजेरी

  • 06 Apr 2023 04:14 PM (IST)

    पुढील तीन दिवस पुणे जिल्ह्यात यलो अलर्ट जारी

    दिवसातील तापमान वाढल्यानं वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल

    6,  7 आणि 8 तारखेला विजांच्या कडकडासह हलक्या पावसाची शक्यता

    सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता असल्यानं काळजी घेण्याचं हवामान विभागाचं आवाहन

  • 06 Apr 2023 04:13 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगर

    शिंदे गटाच्या विरोधात रॅप सॉंग बनवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी केली अटक

    राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत दिली माहिती

    शिंदे गटाच्या गद्दारीवर राम मुंगसे या तरुणाने बनवले होते रॅप सॉंग

    आम्ही सर्व तरुणाच्या पाठीशी असल्याचे जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट

    दोन दिवसापूर्वीच तरुणाचे रॅप झाले होते व्हायरल

  • 06 Apr 2023 03:46 PM (IST)

    जळगावमध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन मांडी घालून बसले जमिनीवर!

    मोदींच्या भाषणापेक्षा गिरीश महाजनांचीच चर्चा जास्त

    जामनेरात आयोजित भाजपच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला गिरीश महाजनांची हजेरी

    कार्यक्रमात गिरीश महाजनांनी जमिनीवर बसून मोदींचं भाषण ऐकलं

    गिरीश महाजन कार्यकर्त्यांसोबत जमिनीवर बसले

    कार्यक्रमाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

  • 06 Apr 2023 03:11 PM (IST)

    पीएमपीएमल प्रशासनाचा संप पुकारलेल्या ठेकेदार कंपन्यांना मोठा दणका

    संप काळात बस बंद केल्यानं आर्थिक दंड केला जाणार वसूल

    तब्बल 8 कंपन्यांकडून 2 कोटी 31 लाख 76 हजार 842 रुपये केले जाणार वसूल

    पीएमपीएमल प्रशासनाचा संप पुकारलेल्या ठेकेदार कंपन्यांना मोठा दणका

    संप काळात बसेस बंद केल्यानं त्यांच्या रकमेतून दंड केला जाणार वसूल

  • 06 Apr 2023 02:45 PM (IST)

    रोशनी शिंदे मारहाण प्रकरण

    पोलिसांनी दिलेल्या अहवालावर महिला आयोग असमाधानी

    आज संध्यकाळी महिला आयोग भूमिका मांडणार

    पत्रक काढून महिला आयोग मांडणार भूमिका

    काल आयोगाने ठाणे पोलिसांना आदेश दिल्यानंतर कासारवडवली पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी आज सादर केला अहवाल

    पण अहवालात सगळ्या गोष्टी स्पष्ट होत नाहीत – महिला आयोग

  • 06 Apr 2023 02:42 PM (IST)

    बिबट्यांच्या पिल्लांना पुन्हा सोडले

    पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील देलवडी येथे शेतकरी संदीप शेंडगे यांच्या उसाच्या शिवारात बिबट्याची तीन पिल्ले वनाधिकाऱ्यांना आढळून आली. त्या पिल्लांना दौंडच्या इको रेस्क्यू टीम व वन विभागाच्या साहाय्याने अत्यंत शिताफीने तिन्ही बछड्यांना रेस्क्यू ऑपरेशन करून सुखरूप आईजवळ सोडलेय

  • 06 Apr 2023 02:37 PM (IST)

    नागपूरात हनुमान जयंतीचा उत्साह

    एकाच छताखाली एक लाख लोकांसाठी तयार होतोय महाप्रसाद

    महाप्रसाद बनवण्यासाठी लागतात बारा तास

    पन्नास पेक्षा जास्त गंजांमध्ये बनतोय स्वयंपाक

  • 06 Apr 2023 02:33 PM (IST)

    नवी दिल्ली : खासदार भावना गवळी यांनी घेतली अमित शहा यांची भेट

    खासदार भावना गवळी यांनी घेतली अमित शहा यांची भेट

    प्रियांका चतुर्वेदी यांच्या भेटीनंतर शिवसेना खासदार अमित शहा यांच्या भेटीला

    रोशनी शिंदे हल्ल्याप्रकरणी चतुर्वेदी यांनी घेतली होती शहा यांची भेट

    शहा यांची भेट घेऊन भावना गवळी यांचे प्रियांका चतुर्वेदी यांना प्रत्युत्तर

  • 06 Apr 2023 02:18 PM (IST)

    गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पुण्यात तब्बल ४० लाखांचे ब्राऊन शुगर व हेरॉईन पकडले

    शाहिद अख्तरहुसेन शेख वय ४९ राहणार इनाम नगर. कोंढवा.याला घेतलं ताब्यात

    त्याच्याकडून एकूण ३३६.१ ग्रॅम. ब्राऊन शुगर उर्फ हेरॉईन ४० लाख ३३ हजार २०० रुपये किंमत व १० हजार विवो या कंपनीचा मोबाईल व रोख सोळाशे रुपये असा एकूण ४० लाख ४४ हजार ८०० रुपये असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    कोंढवा पोलिसांत ३५४/२०२३ एम.डी.पी.एस.कायदा कलम ८(क).२१ (क) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

  • 06 Apr 2023 02:10 PM (IST)

    बदलापूर एमआयडीसीतील प्रदूषण ८० टक्क्यांनी कमी!

    रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात नवीन DAF टेक्नॉलॉजी

    सांडपाण्यातील सर्व घटक वेगळे करून खाडीत सोडणार

  • 06 Apr 2023 01:19 PM (IST)

    राज्य सरकारकडे 25 हजार कोव्हीशिल्ड लसीची मागणी केलीय

    पुणे : येत्या आठवडाभरात लसीकरण सुरू होईल

    महापालिका क्षेत्रात लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत

    कोरोना सर्व्हेसाठी 184 पथकं तयार असून शहरात सर्व्हे सुरू आहे

    सध्या कोरोनाचा एकही रुग्ण रुग्णालयात ऍडमिट नाही

    महापालिका आरोग्यप्रमुख डॉ.भगवान पवार यांची माहिती

  • 06 Apr 2023 12:41 PM (IST)

    काँग्रेसची बैठक

    मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी काँग्रेसची बोलावली बैठक

    बैठकीत राज्यातील पदाधिकारी राहणार उपस्थित

    नाना पटोले आगामी निवडणुकीच्यादृष्टीने करणार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

    राज्यस्तरावरचे पदाधिकारी राहणार बैठकीला उपस्थित

    बैठक टिळक भवनला पार पडणार

  • 06 Apr 2023 12:20 PM (IST)

    पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे उद्घाटन 1 मे रोजी होणार

    चांदणी चौकातील कामाला आला वेग

    1 मे रोजी होणार मुख्य पुलाचे उद्घाटन

    चांदणी चौकातील जवळपास 90 टक्के काम पूर्ण

    15 ते 20 एप्रिल दरम्यान गर्डर टाकण्याचे काम होणार सूरू

    दोन दिवस चांदणी चौकातील वाहतूक असणार बंद

    प्रवाशांना करावा लागणार पर्यायी मार्गाचा वापर

    10 एप्रिल ला सुरू होणार चांदणी चौकातील सर्विस रोड

  • 06 Apr 2023 12:13 PM (IST)

    डोंबिवलीत पार्सलच्या पैशावरुन ग्राहक आणि डिलिव्हरी बॉयमध्ये तुफान राडा

    पार्सल दिल्यानंतर पैशाच्या देवाणघेवाणीवरून राडा

    सोसायटी परिसरात फ्री स्टाईलने हाणामारी सीसीटीव्हीत कैद

    मानपाडा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हा दाखल

  • 06 Apr 2023 11:39 AM (IST)

    इंदू मिल स्मारकामध्ये बाबासाहेबांचा पुतळा साकारणार

    इंदू मिल स्मारकामध्ये बाबासाहेबांचा पुतळा साकारणार

    उत्तर प्रदेशमधल्या गाजियाबादमध्ये पुतळ्याची प्रतिकृती तयार

    महाराष्ट्रातील शिष्टमंडळाने पुतळ्याची केली पाहणी

    350 फुटांचा ब्रांझचा पुतळा स्मारकामध्ये साकारला जाणार

  • 06 Apr 2023 11:19 AM (IST)

    RBI ने दिला मोठा दिलासा

    सर्वसामान्यांच्या ईएमआयमध्ये नाही होणार वाढ

    रेपो दरात केला नाही कुठलाही बदल

    रेपो रेपमध्ये बदल न केल्याने सर्वसामान्यांवरील व्याजाचा बोजा कमी

    महागाईत सर्वसामान्यांना मिळाला मोठा दिलासा, बातमी एका क्लिकवर

  • 06 Apr 2023 11:12 AM (IST)

    ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी मराठी भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घेतला मागे

    मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांच्या विनंतीवरून राजीनामा मागे घेतला असल्याचं देशमुख यांची माहिती

    कोबाड गांधी यांच्या ‘फॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाच्या अनुवादिकेचा पुरस्कार अचानक रद्द केल्याच्या निषेधार्थ देशमुखांनी राजीनामा दिला होता

  • 06 Apr 2023 10:56 AM (IST)

    इंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तयार

    महाराष्ट्रातील शिष्टमंडळ आज पुतळ्याची पाहणी करण्यासाठी दाखल

    लवकरच डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा इंदू मिल स्मारकामध्ये बसवला जाणार

  • 06 Apr 2023 10:48 AM (IST)

    सिंहगड एक्स्प्रेसमधील धक्कादायक प्रकार

    सिंहगड एक्स्प्रेसमधील धक्कादायक प्रकार

    चालत्या एक्सप्रेसमध्ये महिलेचा व्हिडिओ शूटिंग करत छेडछाड

    महिलेने गोंधळ घालल्याने संतप्त प्रवाश्यांनी व्हिडीओ काढणाऱ्या इसमाला चोप दिली

    कल्याण लोहमार्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

  • 06 Apr 2023 10:33 AM (IST)

    पुण्यात लसीकरण केंद्र बंद

    पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील कोरोना लस संपल्यामुळे लसीकरण केंद्र बंद

    सध्या कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि कोर्बेव्हॅक्स लसींचा साठा उपलब्ध नाही

    कोव्हॅक्सिन लसीचे 800 ते 1000 डोस मुदतबाह्य झाले आहेत

    त्यामुळे शहरातील सर्व लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत

    महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये 1 एप्रिलपासून लस उपलब्ध झालेली नाही

    पुढील लसीकरणासाठी पुणेकरांना किमान आठ दिवस वाट पहावी लागणार आहे

  • 06 Apr 2023 10:24 AM (IST)

    IPL 2023 मध्ये दुखापत, मोठा खेळाडू वनडे वर्ल्ड कपमधून होऊ शकतो बाहेर

    IPL 2023 मधल्या दुखापतीचा एका देशाच्या टीमला बसणार फटका. वाचा सविस्तर….

  • 06 Apr 2023 10:23 AM (IST)

    IPL 2023 Points Table मध्ये पहिल्या स्थानावर कुठली टीम? तळाला कोण? जाणून घ्या

    IPL 2023 Points Table in Marathi : टुर्नामेंटच्या 16 व्या सीजनमध्ये आतापर्यंत 8 सामने झाले आहेत. यात 6 टीम्सनी प्रत्येकी 2-2 सामने खेळले आहेत. वाचा सविस्तर….

  • 06 Apr 2023 10:22 AM (IST)

    RR vs PBKS : कॅप्टन Sanju Samson ची एक घोडचूक राजस्थान रॉयल्सला महाग पडली, जिंकायची मॅच हरली

    IPL 2023 RR vs PBKS : संजू सॅमसन इतका विचित्र निर्णय कसा घेऊ शकतो?. महत्वाच म्हणजे संजू सॅमसनकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. वाचा सविस्तर….

  • 06 Apr 2023 10:22 AM (IST)

    भाजप स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण, काँग्रेसवर निशाणा

    देशभरातील भाजप पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्त्यांना पंतप्रधानांकडून शुभेच्छा

    ६ एप्रिल १९८० रोजी भाजपची स्थापना

    भाजप वंशवादाच्या विरोधात – मोदी

    विकासासाठी भाजप हाच पर्याय- मोदी

  • 06 Apr 2023 10:22 AM (IST)

    IPL 2023 मध्ये खेळणाऱ्या मुंबईच्या एक मोठ्या क्रिकेटपटूसाठी वाईट बातमी

    IPL 2023 सुरु असताना मुंबईचा हा क्रिकेटपटू अडचणीच सापडला आहे. त्याच्या अडचणीच आणखी भर पडली आहे. वाचा सविस्तर….

  • 06 Apr 2023 10:16 AM (IST)

    आरबीआयचा महागाईचा खलिता?

    आरबीआय देईल फटका की मिळेल दिलासा

    रेपो दरात किती होईल वाढ

    लवकरच येईल व्याजदर वाढीची खबरबात

    गेल्या सात वर्षांतील दरवाढीचा गाठेल का उच्चांक, वाचा सविस्तर 

  • 06 Apr 2023 10:07 AM (IST)

    अंजनेरी हनुमान मंदिरावर द्रोण च्या माध्यमातून पुष्पवृष्टी

    नाशिक : अंजनेरी देवस्थानचा अनोखा प्रयोग

    हनुमान जयंती निमित्त ड्रोन च्या मदतीने पुष्पवृष्टी

  • 06 Apr 2023 09:54 AM (IST)

    कल्याणमध्ये सिंहगड एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक प्रकार

    व्हिडियो शूटिंग करत महिलांची छेड काढणाऱ्या इसमाला प्रवाशांनी दिला चोप

    गेल्या काही दिवसांपासून हा इसम असे प्रकार करत असल्याचा आरोप

    आज व्हिडिओ काढताना रंगेहात पकडत प्रवाशांनी दिला चोप

    प्रवाशांनी दिले रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

    कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात या विकृत इस्मा विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

  • 06 Apr 2023 09:30 AM (IST)

    नवी मुंबई- भाजपच्या स्थापना दिनानिमित्त भाजप आमदार गणेश नाईक यांनी कोपरखैरण्यातील जनसंपर्क कार्यालयात ध्वजारोहण केलं

    यावेळी भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, माजी खासदार संजीव नाईक माजी आमदार संदीप नाईक आदी उपस्थित होते

    भाजप स्थापना दिनानिमित्त ज्येष्ठांचा सत्कार यावेळी करण्यात आला

  • 06 Apr 2023 09:28 AM (IST)

    सोने-चांदीची हनुमान उडी

    सोन्याचा भाव गगनाला

    चांदीने कालच सर्व रेकॉर्डे मोडले

    सोन्याने किंमतीत केला मोठा विक्रम

    गुंतवणूकदार झाले मालामाल

    खरेदीदारांच्या तोंडचे पाणी पळाले

    आजचा सोने-चांदीचा भाव काय, वाचा बातमी 

  • 06 Apr 2023 09:22 AM (IST)

    छत्रपती संभाजी नगर किराडपुरा राडा प्रकरण

    पोलिसांनी आतापर्यंत 54 आरोपींना केली अटक

    काल दिवसभरात आणखी 12 आरोपींना घेतले ताब्यात

    10 पथके आणि शंभर अधिकारी कर्मचारी करतायत राड्याचा तपास

    आतापर्यंत 100 आरोपींची ओळख पटली असल्याचा पोलिसांचा दावा

  • 06 Apr 2023 09:09 AM (IST)

    प्रादेशिक हवामान खात्याकडून जालना जिल्ह्यात दिनांक 7 ते 9 एप्रिल या कालावधीत यलो अलर्ट जारी

    जालना : या कालावधीत विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता

    ताशी 30-40 किलो मीटर प्रति घंटा वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली

    या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे नागरीकांना दक्षता घेण्याबाबत सूचना.

    काही दुर्घटना झाल्यास जवळच्या तहसील कार्यालय, पोलीस ठाण्यात संपर्क करण्याच्या सूचना

  • 06 Apr 2023 08:58 AM (IST)

    कच्चा तेलाने आज घेतला ब्रेक

    कच्चा तेलाच्या भावात झाली घसरण

    पण भावात मोठी वाढ, त्याचा काय होईल परिणाम

    ओपेक संघटनेने तेल उत्पादनाचा घेतला निर्णय

    देशात पेट्रोल-डिझेल महागणार काय

    रशियाकडून स्वस्तात मिळणाऱ्या इंधनाचे काय होणार, वाचा सविस्तर

  • 06 Apr 2023 08:56 AM (IST)

    हनुमान जयंती निमित्त अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आज हजारो भाविकांच्या सोबत करणार 21 वेळा हनुमान चालिसा पठण

    अमरावतीच्या बडनेरा मार्गावरील खंडेलवाल लॉनमध्ये भव्य हनुमान चालिसा पठणाचे आयोजन

    जिल्ह्यातील प्रत्येक हनुमान मंदिरातील ट्रस्टच्या 11 सदस्यांना निमंत्रण

    हनुमान चालिसा कार्यक्रमाच्या बॅनरवर हिंदू शेरणी असा नवनीत राणांचा उल्लेख

    111 फूट हनुमानाची उंच मूर्ती उभारण्याचा संकल्प, 15 एकरवर साकारणार मोठे उद्यान

    आज खासदार नवनीत राणा यांचा वाढदिवस

  • 06 Apr 2023 08:53 AM (IST)

    पुण्यातील खालकर चौकातील हनुमान मंदिरात मनसे हनुमान जन्मोत्सव साजरा करणार

    थोड्याच वेळात हनुमानाची महाआरती आणि महारुद्र अभिषेक केला जाणार

    मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी याच मंदिरात महाआरती केली होती

    खालकर चौकातील हनुमान मंदिरात पहाटेपासून भाविकांची गर्दी

  • 06 Apr 2023 08:51 AM (IST)

    भाजपच्या स्थापना दिनानित्ताने देशभर कार्यक्रमांचं आयोजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

    भाजपच्या स्थापना दिनानिमित्ताने देशभरात आठवडाभर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे

    यावेळी केंद्राच्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेला दिली जाणार आहे

    कार्यक्रमात वॉल रायटिंग आणि पोस्टर अभियानावर भर

    देशभरात 14,000 ठिकाणी भाजपच्या स्थापना दिनाचे कार्यक्रम होणार

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनापर्यंत म्हणजे 14 एप्रिलपर्यंत हे कार्यक्रम सुरू राहणार आहेत

Published On - Apr 06,2023 8:45 AM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.