Maharashtra Breaking News Live : एकनाथ शिंदे यांच्या आयोध्या दौऱ्यावर अजित पवार यांनी दिले उत्तर
Maharashtra Live News : देश-विदेशातील तसंच तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
मुंबई : राज्यात नांदेड, लातूर, उस्मानाबाद येथे मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता. मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे आणि नंदुरबारमध्ये आकाश ढगाळ राहील, हवामान खात्याचा अंदाज. ट्विटरवर पुन्हा चिमणीचा लोगो आला. कोल्हापूरच्या राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीतील 29अपात्र उमेदवारांचा फैसला आता सोमवारी होणार. यासह राज्यासह देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.
LIVE NEWS & UPDATES
-
वाशीमध्ये अडकलेल्या कबुतराची अग्निशमन दलाच्या जवानाकडून सुटका
नवी मुंबईतील वाशी मध्ये एका इमारतीच्या खिडकीत कबुतर अडकला होता
वाशी अग्निशमन दलाची गाडी तात्काळ घटनास्थळी पोहचली आणि शिडीच्या सहाय्याने अडकलेल्या कबुतराला रेस्क्यू केला
-
शीतपेय बाजारानंतर आता या क्षेत्रात रिलायन्स
रिलायन्स खवय्यांच्या जीभेचे पुरविणार चोचले
एफएमसीजी बाजारात रिलायन्सचं खणखणीत नाणे
कॅम्पा कोलानंतर थंड बाजारात लागणार आग
20,000 कोटींच्या मार्केटमध्ये रिलायन्सची लवकरच एंट्री, वाचा बातमी
-
-
कोल्हापुरात शैक्षणिक कर्ज देत नाही म्हणून शेतकऱ्याने स्वत:ला संपवलं?
कोल्हापूर :
शैक्षणिक कर्ज देत नाही म्हणून शेतकऱ्याने केली आत्महत्या?
बँक शैक्षणिक कर्ज देत नसल्याच्या कारणाने शेतकऱ्यांनए आत्महत्या केल्याचा आरोप
वैद्यकीय शिक्षणासाठी बँकेकडे वारंवार कर्जाची मागणी केल्याचा दावा
नैराश्यात गेलेल्या शेतकऱ्यांनी केली घरातच गळफास घेऊन आत्महत्या
या प्रकरणातील बँकेची बाजू समोर आली नाही
-
नव्या योजनेतून करा कमाई
केंद्र सरकारने केली सुरुवात
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये केली होती घोषणा
या योजनेत मिळते 7.5 टक्के चक्रवाढ व्याज
नवीन योजनेत गुंतवणूकदारांना जोरदार परतावा
या योजनेत गुंतवणूक कोणाला करता येणार, वाचा बातमी
-
कोल्हापुर जिल्ह्यातील आजरा परिसरात पावसाची हजेरी
कोल्हापूर :
आजरा परिसरात पावसाची हजेरी
वादळी वाऱ्यासह बरसला पाऊस
आठवडी बाजाराच्या दिवशी आज रात्री पावसाच्या सरी
विक्रेते आणि ग्राहकांची तारांबळ
कोल्हापूर शहर आणि परासेरातही ढगाळ वातावरण
वीज पडून हातिवडे येथे महिला जखमी
-
-
सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक निमित्ताने माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील गटाचे शक्ती प्रदर्शन
सांगली :
सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक निमित्ताने माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील गटाचे शक्ती प्रदर्शन
सांगली जिल्ह्यातील आमदार आणि खासदार वसंतदादा यांच्या विचारांचा पाहिजे, विशाल पाटलांचा निर्धार
मदन पाटील आणि दादा गटाचे कार्यकर्ते पहिल्यांदाचं आले एकत्र
वसंतदादा नातू काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील वसंतदादा प्रेमी कार्यकर्ते आणि नेत्यांची पार पडली बैठक
काँग्रेस नेत्या जयश्री पाटील आणि विशाल पाटील यांनी एकत्र बैठक घेत आगामी सर्व निवडणूका एकत्रित एकसंधपणे लढवण्याचा केला निर्धार
आमच्या घरातील अंतर्गत वादामुळे आम्ही मागे पडलो, विशाल पाटील यांची जाहीर कबूली
-
नोकरदारांसाठी आयकर खात्याचा महत्वाचा अलर्ट
या नियमाकडे दुलर्क्ष केल्यास पडेल भूर्दंड
नवीन कर प्रणाली आता आपोआप होईल लागू
कर्मचाऱ्यांना एक कर प्रणालीचा पर्याय निवडावा लागेल
माहिती न दिल्यास कर्मचाऱ्यांना टीडीएसचा बसेल फटका, वाचा बातमी
-
वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात
यवतमाळ शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात
विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
काल हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्यात गारपिटीचा वर्तविला होता अंदाज
त्यानुसार आज उद्या दोन दिवस पाऊस पडणार
-
उद्या मुख्यमंत्र्यांसोबत आमदार रवी राणा हे देखील अयोध्येला जाणार
अमरावती : अमरावतीमध्ये निर्माण होत असलेल्या हनुमानाच्या 111 फूट उंच मूर्तीच्या मंदिर बांधकामासाठी हनुमान गढी वरून आणली जाणार माती
हनुमान गढी वरून अमरावतीत येत असलेल्या रथाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आयोध्येतील महंत दाखवणार हिरवी झेंडी..
आमदार रवी राणा यांची माहिती.
-
बदलापूर : एमआयडीसीतील प्रदूषण ८० टक्क्यांनी कमी
एमआयडीसीतील प्रदूषण ८० टक्क्यांनी कमी
रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात नवीन DAF टेक्नॉलॉजी
सांडपाण्यातील सर्व घटक वेगळे करून खाडीत सोडणार
-
अंबरनाथ : चिखलोली रेल्वे स्थानकाचे भूसंपादन अखेर पूर्ण
चिखलोली रेल्वे स्थानकाचे भूसंपादन अखेर पूर्ण
५० शेतकऱ्यांना मिळणार ८९ कोटींचा मोबदला
४० वर्षांपासूनची रेल्वे स्टेशनची मागणी होणार पूर्ण
-
अक्कलकोट तालुक्यात कौटुंबिक वादातून नवऱ्याने पत्नीचा कान उपटून काढल्याची घटना घडली
अक्कलकोट तालुक्यातील उटगी गावात नवरा बायकोच्या घरगुती वादातून हा प्रकार घडला
-
एकनाथ शिंदे यांच्या आयोध्या दौऱ्याच्या प्रश्नावर अजित पवार यांचं उत्तर
मला कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ते गुजरातपासून पश्चिम बंगालपर्यंत सगळ्या धार्मिक स्थळांना भेटी द्यायच्या आहेत
पण माझ्याकडे काम घेऊन येणाऱ्या लोकांची गर्दी इतकी जास्त असते की मला ते शक्य होत नाही
पण मला देशातल्या सगळ्या धार्मिक स्थळावर जायला नक्की आवडेल
एकनाथ शिंदे यांच्या आयोध्या दौऱ्याच्या प्रश्नावर अजित पवार यांचं उत्तर
-
बदलापुरात कचरा प्रकल्पाविरोधात महाविकास आघाडीचं आंदोलन
मुंबई : कचरा प्रकल्पाच्या टेंडरची महाविकास आघाडीकडून होळी
राष्ट्रवादीच्या नेत्या ऋता आव्हाड यांच्या नेतृत्त्वात आंदोलन
अंबरनाथ, उल्हासनगरचा कचरा बदलापुरात नको अशी भूमिका
-
नवी दिल्ली : कोरोनाबाबतची आढावा बैठक सुरू
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांच्या उपस्थितीत बैठक
सर्व राज्यांचे आरोग्य मंत्री बैठकीत सहभागी
सर्व राज्यांकडून परिस्थितीचा केंद्र सरकार आढावा घेणार
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या तेलंगणा दौऱ्यावर
हैदराबाद तिरुपती वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार
हैदराबाद तिरुपती सिकंदराबाद तिरुपती वंदे भारत ट्रेन सुरू केल्या जाणार
पंतप्रधान मोदी यांच्याकडून तेलंगणासाठी विकास कामांच्या घोषणा होण्याची शक्यता
-
अहमदनगर : खासदार संजय राऊत यांनी घेतले प्रसिद्ध राशींच्या जगदंबा देवीचे दर्शन
खासदार संजय राऊत यांनी घेतले प्रसिद्ध राशींच्या जगदंबा देवीचे दर्शन
देवीचे दर्शन घेऊन बरं वाटलं, अयोध्या दौऱ्यावर बोलणं टाळलं
राऊत पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात
-
IPL 2023 : Hardik pandya साठी धोक्याची घंटा, तयार आहे त्याची परफेक्ट रिप्लेसमेंट
IPL 2023 : एकदम भारी, टीम इंडियाला अजून काय हवं? वाचा सविस्तर…..
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येस जाणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 एप्रिल रोजी रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येत
अयोध्येत शिंदे त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू
एकनाथ शिंदे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घेणार भेट
अयोध्या दौरा अविस्मरणीय बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली
-
सीएनजी-पीएनजीच्या किंमती होणार कमी
केंद्रीय मंत्रीमंडाळाचा नवा फॉर्म्युला
ग्राहकांना होणार असा फायदा
गॅस उत्पादक कंपन्यांना मिळणार दिलासा
किंमती होतील इतक्या कमी, वाचा बातमी
-
KKR vs RCB : शाहरुखसाठी विराटने नाही केली दुखापतीची पर्वा, फक्त एका शब्दावर पुरी केली डिमांड, VIDEO
Virat kohli and Shahrukh Khan: मैदानावर मॅचनंतर एक वेगळं दुश्य पहायला मिळालं. वाचा सविस्तर….
-
KKR vs RCB 2023 : ‘फक्त एक संधी द्या…’ जे बोलला, ते करुन दाखवलं, KKR च्या छोट्या प्लेयरचा डेब्युमध्ये मोठा इम्पॅक्ट
KKR vs RCB 2023 : खरंतर फ्रेंचायजीने त्याच्यासाठी मोठं बजेट ठेवलं होतं. पण तो बेस प्राइसमध्ये मिळाल्याने KKR च काम सोपं झालं. वाचा सविस्तर….
-
आकांक्षा दुबे मृत्यूप्रकरणी अखेर बॉयफ्रेंड समर सिंह अटकेत
भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्येप्रकरणी गायक समर सिंहला अटक
वाराणसी पोलिसांनी गाझियाबाद इथून केली अटक
समरवर आकांक्षाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप, वाचा सविस्तर..
-
नागपूर : पोलिसांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी
नागपुरातील यशोधरा पोलीस ठाण्यातील पोलिसांना धमकी
डायल 112 वर बिट मार्शलला अज्ञात व्यक्तीचा फोन
तक्रारीवर कारवाई केली नाही म्हणून बॉम्बने उडवून देण्याची धमकी
बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीनंतर पोलिसांची भागमभाग
-
गणपती बाप्पा निघाले परदेशात
पेणमधील बाप्पा निघाले अमेरीका, साउथ आफ्रिका, दुबई अन् वेस्ट इंडीजला
गणेशोत्सवासाठी परदेशी अनिवासी भारतीयांकडून गणेशमूर्तींची मागणी धूमधडाक्यात सुरु झाली आहे
२०२३ नव्या वर्षांतील तब्बल ३५०० गणेशमूर्ती जाणार
-
बारावीची परीक्षा दोन टप्प्यात होणार का ?
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याची शिफारस
मात्र राज्य अभ्यासक्रम आराखड्यात बदल करण्याचा अधिकार राज्य शासनाचा
जोपर्यंत राज्य शासनाचं धोरणं ठरत नाही तोपर्यंत दोनवेळा परीक्षा घेण्याच विचार नाही
वर्णनात्मक आणि वैकल्पिक अशा पद्धतीने परीक्षा घेण्याची शिफारस राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा समितीनं केली आहे
मात्र या संदर्भात राज्यात अजून कोणताही निर्णय नाही
बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांची माहिती….सविस्तर वाचा
-
सोने-चांदीच्या भावात घसरण
तोळ्यामागे खरेदीदारांना मोठा दिलासा
रेकॉर्डवर रेकॉर्ड करणारी चांदी ही नरमली
किलोमागे चांदी झाली इतकी स्वस्त
2 फेब्रुवारीच्या तुलनेत 5 एप्रिलच्या भावात मोठी वाढ, वाचा बातमी
-
वरळीमध्ये उभारण्यात आला हायटेक बस थांबा
वरळीच्या नेहरूनगर तारांगण परिसरातला हा बस थांबा आहे अत्याधूनीक
बेस्ट बसचा स्तूत्य उपक्रम
प्रवाशांसाठी अत्याधूनीक सुविधांनी सज्ज आहे हा बस थांबा
-
सोलापुरातील येणकी येथील ग्रामदैवत जकराया महाराजांच्या यात्रेला प्रारंभ
मोहोळ तालुक्यातील येणकी येथे ग्रामदैवत श्री जकराया महाराजांच्या यात्रेला प्रारंभ
तीन दिवस चालणार्या या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेय
हुन्नूर येथील बिरोबा आणि हुलजंती येथून महालिंगराया यांच्या पालख्यांचे आगमन येणकी येथे सकाळी झाले
यावेळी तिन्ही पालख्यांच्या भेटीचा नयनरम्य सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थित पार पडला
गावातील देवतांना गोड नैवद्य दाखवून कन्नड आणि मराठी धनगरी ओव्यांचा बहारदार कार्यक्रम पार पडतो
या यात्रेला राज्यभरातून भक्तगण उपस्थित होतात
-
पुण्यात राजकीय नेत्यांना धमकी देत खंडणी मागणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांच्या बेड्या
पुण्यातील घोरपडी परिसरातून आरोपीला अटक, इम्रान शेख असं आरोपी तरुणाच नाव
महेश लांडगे, अविनाश बागवे आणि वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी देणारा इमरान शेख अखेर पोलिसांच्या ताब्यात
अनेक दिवसापासून पुण्यातील राजकीय नेत्यांना येत होते धमकीचे फोन
धमकी देत इमरान मागत होता पुण्यातील राजकीय नेत्यांना खंडणी
एकतर्फी प्रेमातून मुलीच्या नावाने राजकीय नेत्यांना देत होता इम्रान धमकी
केवळ आपल्या प्रियसीला त्रास देण्यासाठी इमरान हे सगळे प्रकार करत होता
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये नागरिकांनी रिचवली तब्बल अडीच हजार टँकर दारू
शहर आणि जिल्ह्यात 2 कोटी 48 लाख 18 हजार 430 लिटर दारू रिचवली
औरंगाबाद जिल्ह्यातून मिळाला तब्बल 5 हजार 100 कोटींची महसूल
सर्वाधिक झाली देशी दारूची विक्री तर सर्वात कमी झाली वाईन विक्री
10 हजार लिटरचा एक टँकर या हिशोबाने अडीच हजार टँकर इतकी रिचवली दारू
40 लाख लोकसंख्येच्या शहरात अडीच हजार टँकर दारू रिचवली
-
पुण्यात राजकिय नेत्यांना धमकी देत खंडणी मागणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांच्या बेड्या
पुण्यातील घोरपडी परिसरातून आरोपीला अटक
इम्रान शेख असं आरोपी तरुणाच नाव
महेश लांडगे, अविनाश बागवे आणि वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी देणारा इमरान शेख अखेर पोलिसांच्या ताब्यात
अनेक दिवसापासून पुण्यातील राजकीय नेत्यांना येत होते धमकीचे फोन
-
KKR vs RCB : दोन किंग एकत्र होते, पण बाजी मारली ShahRukh Khan ने, एकदा VIDEO बघा, म्हणजे समजेल
KKR vs RCB IPL 2023 : डोन्ट अंडर एस्टिमेट द पावर ऑफ शाहरुख खान. वाचा सविस्तर….
-
KKR vs RCB : Shardul Thakur च्या बॅटिंगचा suhana khan ने लुटला आनंद, तिच्यासोबत फोटोमध्ये असलेली मुलगी कोण?
KKR vs RCB : नेटीझन्सनी विचारलं अनन्या पांडे कुठे आहे? मागच्यावर्षी आयपीएलच्या सामन्याला सुहाना खान सोबत अनन्या पांडे उपस्थित होती. यावेळी सुहानासोबत दुसरी मैत्रीण होती. वाचा सविस्तर…..
-
राहुल गांधी यांच्या निषेधार्थ नंदूरबारमध्ये सावरकर गौरव यात्रा
भाजपचे अनेक पदाधीकारी यात्रेत सहभागी
काँग्रेसने माफी मागावी ही भाजपची मागणी
मोठ्या संख्येने कार्यकर्ते सामील
-
रत्नागिरीत कोरोनाचा धोका
रत्नागिरी जिल्हाात सुद्धा कोरोनाचा धोका वाढतोय
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे १८ अँक्टिव्ह रुग्ण
दहा रुग्ण रुग्णालयात दाखल तर काही होम क्वारंटाईन
आरोग्य यंत्रणा अलर्टवर, फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यत तीन जणांचा मृत्यू
-
भटक्या कुत्र्यांची दहशत, 6 मुलांसह दोन डझनहून अधिक लोकांना घेतला चावा
भटक्या कुत्र्यांची दहशत, 6 मुलांसह दोन डझनहून अधिक लोकांना घेतला चावा
-
नवी मुंबई : भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र, मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल – दुरुस्तीची कामे
भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातुन होणारा पाणी पुरवठा 24 तासांकरिता बंद
10 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 11 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तसेच कामोठे, खारघर नोडमधील नागरिकांना आवाहन
या कालावधीसाठी आवश्यक असलेला पाण्याचा साठा करून ठेवण्याचं आवाहन
-
नाशिक – जिल्ह्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत महिला आघाडीवर
60 महिन्यांत 17 हजार 761 महिलांनी घेतला पुढाकार
अवघ्या 0.42 टक्के म्हणजेच 76 पुरुषांनी केली नसबंदी शस्त्रक्रिया
-
कच्चा तेलाने वाढवली डोकेदुखी
कंपन्यांना बसणार मोठा फटका
रशियाच्या निर्णयावर दरवाढीचा फैसला
आतापर्यंत मिळत होते स्वस्तात इंधन
देशात पेट्रोल-डिझेलचा भडका उडणार का
आजचा देशातील इंधनाचा भाव काय, वाचा बातमी
-
नाशिक- आठ हजार अनधिकृत फेरीवाल्यांना वर्षभरात अटक
नाशिकरोड रेल्वे सुरक्षा दलाची वर्षभरात कामगिरी
प्रवासात गाडीची चेन खेचण्याची 847 प्रकरणे आली समोर
‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत 273 बेपत्ता मुले सापडली
-
कोल्हापूरच्या राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीतील 29 अपात्र उमेदवारांचा फैसला आता सोमवारी
आमदार सतेज पाटील आणि महाडिक गटाचा परस्पर विरोधी नियुक्तीवर पूर्ण
साखर सहसंचालकांसमोर झाली सुनावणी
सोमवारी येणाऱ्या निकालानंतर उमेदवारी बाबतच चित्र होण्यास स्पष्ट
राजाराम निवडणुकीत आमदार सतेज पाटील गटाच्या 29 उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात सतेज पाटील गटाची साखर सहसंचालककडे धाव
सतेज पाटील गटाकडून एक लाख तीस हजार पानांचे देण्यात आलेत पुरावे
-
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे सर्व आर्थिक व्यवहार झाले आता ऑनलाईन
विद्यापीठातून विद्यार्थ्यांचा कर्मचाऱ्यांचे सोयीसाठी ऑनलाईन रिसीट पोर्टलची निर्मिती
काल दिवसभरातील सर्व व्यवहार झाले ऑनलाइन
इतिहासात पहिल्यांदाच जमा स्वीकृती विभागासह आणि विभागातील सर्व व्यवहार झाले ऑनलाइन
मोबाईल वरूनही वरूनही करता येणार विद्यापीठाची व्यवहार
-
सहा महिन्यांत नाशिक शहरात धावणार 50 इलेक्ट्रिक बसेस
दोन टप्प्यात धावणार 50 बसेस
या बसेससाठी निविदा करण्यात आली प्रसिद्ध
केंद्र सरकारच्या एन कॅप योजनेतून मिळणार अनुदान
Published On - Apr 07,2023 8:18 AM