Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरांसह गावागावांतील बातम्यांचे अपडेट आणि ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई : आज शनिवार, 3 डिसेंबर 2022. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरुन करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचे तीव्र पडसाद राज्यात उमटू लागले आहेत. आजही या पार्श्वभूमी महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींसोबत इतर राजकीय बातम्या, महत्त्वाच्या शहरांमधील ताज्या अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज यांचा आढावा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
LIVE NEWS & UPDATES
-
नवी दिल्ली महापालिका निवडणूक : मतदानाला सुरुवात, 7 डिसेंबरला मतमोजणी
नवी दिल्ली महापालिका निवडणूक
8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात
250 जागांसाठी राजधानी दिल्लीत आज मतदान
सत्ताधारी भाजपसह काँग्रेस आणि आप पक्षाची प्रतिष्ठा पणाला
1349 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
7 डिसेंबरला मतमोजणी होणार
-
समृद्धी महामार्गाच्या कार्यक्रम स्थळात बदल
Marathi News LIVE Update
समृद्धी महामार्गाच्या कार्यक्रम स्थळात बदल
11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्धघाटन
समृद्धी महामार्गाचं मोदींच्या हस्ते उद्धघाटन
वायफळमधील टोल प्लाझावर होणार होता अगोदर कार्यक्रम
गर्दीमुळे कार्यक्रमाचं स्थळ बदलण्यात आले
-
-
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अडचणीत वाढ?
Marathi News LIVE Update
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अडचणीत वाढ?
केंद्रीय गृहमंत्री राज्यपालांच्या वक्तव्याची चौकशी करणार?
राष्ट्रपती भवनाकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा मुद्दा वर्ग
उदयनराजे भोसले यांनी केली होती राज्यपालांची तक्रार
-
राहुल गांधी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल
Marathi News LIVE Update
राहुल गांधी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल
कच्चे तेल 25 टक्के तर एलपीजी 40 टक्के दराने स्वस्त
आंतरराष्ट्रीय बाजारात 6 महिन्यांपासून दरात घसरण
पण देशांतर्गत भाव जैसे थे, किंमती कमी झाल्याच नाही
पंतप्रधानांच्या लूट तंत्राविरोधातच भारत जोडो यात्रा
राहुल गांधी यांचा पंतप्रधानांवर जोरदार टीका
कच्चा तेल – 25% सस्ता एलपीजी – 40% सस्ती
ये 6 महीनों के अंतरराष्ट्रीय कीमतों के आंकड़े हैं। फिर भी पेट्रोल, डीज़ल और गैस सिलेंडर के दाम कम क्यों नहीं हुए?
प्रधानमंत्री जी, आपके ‘लूट-तंत्र’ के खिलाफ लोकतंत्र की आवाज़ है – भारत जोड़ो यात्रा। जवाब दीजिए!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 3, 2022
-
सोलापुरात कर्नाटक भवन उभारणार
Marathi News LIVE Update
सोलापुरात कर्नाटक भवन उभारणार
कर्नाटक भवनासाठी 10 कोटींचा निधी
मुख्यमंत्री बोम्मईकडून निधीची घोषणा
गोवा आणि केरळमध्ये पण कर्नाटक भवन बांधणार
-
-
राज्यपालांच्या नियुक्तीचे निकष ठरवले गेले पाहिजेत- उद्धव ठाकरे
मुंबई : मी उदयनराजेंना धन्यवाद देतो, राज्यपालांच्या नियुक्तीचे निकष ठरवले गेले पाहिजेत- उद्धव ठाकरे
-
उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांना सवाल
मुंबई : कर्नाटक प्रश्नावर मुख्यमंत्री गप्प का? उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांना सवाल, आरे कारशेडवरुनही निशाणा, पर्यावरणाची हानी करुन कारशेड सुरु, ठाकरेंची टीका
-
श्रद्धा वालकरच्या मोबाईलचं लास्ट लोकेशन हाती!
दिल्ली : श्रद्धा वालकरच्या मोबाईलचं लास्ट लोकेशन अखेर पोलिसांच्या हाती, 19 मे रोजी बंद झाला होता श्रद्धा वालकरचा फोन
-
राज्यपालांच्या वक्तव्यावर केसरकरांची प्रतिक्रिया
कोल्हापूर : राज्यपाल संदर्भात निर्णय केंद्राने घ्यायचा आहे, झालेलं वक्तव्य मागे घेण्याबाबतच्या बाबतीत स्टेटमेंट यायला हवं होतं- दीपक केसरकर
-
अंबादास दानवे यांच्यावर गुन्हा
औरंगाबाद : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर गुन्हा दाखल, सक्तीच्या वीज बिल वसुली विरोधामध्ये केलेल्या आंदोलनप्रकरणी गुन्हा, विनापरवाना आंदोलन करून शासनाच्या विरोधात घोषणा दिल्याविरोधात कारवाई
-
इंडिया गेट जवळ दिव्य कला मेळा 2022 चे आयोजन
दिव्यांग व्यक्तींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मेळ्याच आयोजन
महाराष्ट्रातील थक्क करणारी कलाकृती दिव्य कला मेळ्यामध्ये
देशभरातल्या दिव्यांग कलाकारांचा मेळ्यामध्ये समावेश
-
मातोश्रीवर पोलादपूरमधील काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा आज जाहीर प्रवेश
पोलादपूर मधील विविध गावातील काँगेसच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश
हा प्रवेश 11:30 वाजता प्रवेश होणार आहे
मातोश्री बाहेर काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते जमण्यास सुरुवात
-
2 दिवसांत चंद्रपूर जिल्ह्यात 6 वाघांचा मृत्यू
चंद्रपूर : गेल्या दोन दिवसांत चंद्रपूर जिल्ह्यात सहा वाघांचा मृत्यू, दोन दिवसांपूर्वीच आगरझरी येथे एक बछडा आणि शिवनी क्षेत्रात वाघीणीचा मृत्यू तर आज पुन्हा वाघाच्या 4 बछड्यांचा मृत्यू
-
ठाकरे गटाचा रास्ता सोलापुरात रोको
सोलापूर : मंद्रूप येथील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ शिवसेनेच्या ठाकरे गटाचा रास्ता रोको, प्रस्तावित एमआयडीसीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या सातबारावर एमआयडीसी चे नाव चढवल्याने शेतकऱ्यांचे दीड महिन्यापासून उपोषण, प्रशासनाकडून उपोषणाची दखल घेतली जात नसल्याने ठाकरे गटातर्फे रास्ता रोको, दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ येथे आंदोलन
-
सहा एक्करवरील ऊस जळून खाक
बीड : गेवराई तालुक्यातील बेलगाव येथे शॉर्ट सर्किटमुळे सहा एक्करवरील ऊस जळून खाक, पाच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
-
मिरा भाईंदरमध्ये शिंदे गटाचं पहिल्या जनसंपर्क कार्यालय सुरु
मिरा रोडच्या हॉटकेश परिसरातील शाखा प्रमुख महेश शिंदे यांच्याकडून शिंदे गटाचं पाहिलं जनसंपर्क कार्यालय सुरु
हळूहळू मिरा भाईंदर शहरात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचं अनेक कार्यालय सुरु होणार, शाखा प्रमुख महेश शिंदेंचा दावा
बाळासाहेबांची शिवसेना जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्व नागरिकांची समस्या सोडवल्या जातील: महेश शिंदे
-
राज ठाकरे यांचा आज रत्नागिरी दौरा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याचा आजपासून दुसरा टप्पा
राज ठाकरे आज रत्नागिरीत
राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी रिफायनरी समर्थकांचे पोस्टर झळकले
राजापूर शहराच्या हद्दीवर ‘राजापूर नगरीत राजसाहेब ठाकरे यांचं स्वागत’ अशा आशयाचे पोस्टर
सकाळी साडेदहा वाजता रिफायनरी समर्थक घेणार राज ठाकरे यांची भेट
बारसू सोलगाव रिफायनरी संदर्भातराज ठाकरे यांची भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
-
कोल्हापूर जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकांना ब्रेक
कोल्हापूर, जयसिंगपूर, गडहिंग्लज बाजार समितीच्या निवडणुका 15 मार्चपर्यंत पुढे ढकलल्या
बाजार समिती आणि ग्रामपंचायत निवडणूक एकत्र आल्यानं निर्माण झाला होता संभ्रम
नवीन निवडून येणाऱ्या सरपंच, सदस्यांना बाजार समितीसाठी मतदानाचा हक्क बजावता येणार
नियोजित वेळेनुसार 29 जानेवारीला होणार होत्या बाजार समितीच्या निवडणुका
-
लक्झरी बस आणि पीएमपी बसचा समोरासमोर अपघात
हडपसर, पुणे : बीआरटी रोडमध्ये लक्झरी बस आणि पीएमपी बसचा समोरा समोर अपघात, दोन्ही गाड्यांचे ड्रायव्हर गंभीर जखमी, पहाटे 4:30 वाजता घडला भीषण अपघात
-
7 डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक
सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत होणार बैठक
सरकारला घेरण्याची काँग्रेसची तयारी
राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणून सध्या खरगेच काम पाहणार
आजच्या बैठकीमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते पदाधिकारी सहभागी होणार
-
गुंड विरोधी पथकाकडून 5 जणांना अटक
पिंपरी चिंचवड : पोलिस आयुक्तालयाच्या गुंड विरोधी पथकाकडून 5 जणांना अटक, 3 गावठी पिस्तूलं, 11 जिवंत काडतुसे आणि 6 कोयतेही जप्त, एका अल्पवयीन मुलालाही घेतलं ताब्यात
-
संदीपान भुमरे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता
औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे लोकसभा निवडणुकीत उतरण्याची शक्यता
चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे असा सामना रंगण्याची शक्यता
संदीपान भुमरे यांना लोकसभेची तयारी करण्याच्या सूचना मिळाल्याची सूत्रांची माहिती
संदीपान भुमरे यांच्याकडूनही लोकसभेची तयारी सुरू झाल्याची माहिती
औरंगाबाद लोकसभेची जागा शिंदे गट निवडून आणण्यासाठी करणार प्रयत्न
-
उडगी येथे ग्रामस्थांनी फडकवले कर्नाटकचे झेंडे
सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील उडगी येथे ग्रामस्थांनी फडकवले कर्नाटकचे झेंडे, कर्नाटकचा जयघोष करत कर्नाटकात जाण्याची इच्छा व्यक्त केली
-
विशाल गायकवाड या सराईत गुन्हेगाराची हत्या
पिंपरी चिंचवड : मोहननगर भागात विशाल गायकवाड या 29 वर्षीय सराईत गुन्हेगाराची हत्या, गोळीबार करत तसेच धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आल्यानं खळबळ, पोलीस तपास सुरु
-
उदयनराजे भोसले 9 वाजता रायगडावर दाखल होणार
उदयनराजे भोसले 9 वाजता रायगडावर दाखल होणार
त्यानंतर शिरकाई देवीचं घेणार दर्शन
होळीच्या माळावरून राजसदरेकडे रवाना होतील
छत्रपती शिवाजी महाराजांंना अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात होईल
आज उदयनराजे काय निर्णय घेणार ? याकडे सगळ्यांच लक्ष
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी , प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी, वर कोणती भूमिका मांडणार ?
थोड्या वेळात उदयनराजे हॉटेलवरून निघतील
-
कोल्हापूर महानगरपालिकेचा रस्ते ठेकेदारांना दणका
कोल्हापूर महानगरपालिकेचा रस्ते ठेकेदारांना दणका
39 ठेकेदारांना प्रशासकांनी नोटीसा बजावल्या
रस्त्याची काम निर्धारित वेळेत सुरू केली नसल्याने कारवाई
ठेकेदारावर दंडात्मक कारवाईलाही सुरुवात
शहरातील खराब रस्त्यांबाबत नागरिकांमध्ये संताप
नागरिकाच्या संतापानंतर महानगरपालिका प्रशासन ॲक्शन मोडवर
-
MBBS च्या विद्यार्थ्यांच्या रॅगिंग प्रकरणी गुन्हा
नागपूर : मेडीकल कॅालेजच्या सहा डॉक्टरांवर अखेर गुन्हा दाखल, नागपूरच्या मेडीकल कॉलेजमध्ये MBBS च्या विद्यार्थ्यांच्या रॅगिंग प्रकरणी अजनी पोलीस स्टेशन येथे गुन्हा
-
अन्नातून 200 जणांना विषबाधा
भंडारा : सरांडी येथे अन्नातून 200 जणांना विषबाधा, लग्नाच्या जेवणातून विषबाधाा झाल्याची माहिती, सर्वांती प्रकृती आता स्थिर, गावात येऊन आरोग्य विभागाने केले विषबाधा झालेल्यांवर उपचार
Published On - Dec 03,2022 7:28 AM