Maharashtra Live Updates : उद्योग, सेवा आणि शेती क्षेत्रात विकास करण्याचा प्रयत्न : देवेंद्र फडणवीस

| Updated on: Feb 14, 2023 | 12:01 AM

Maharashtra News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Live Updates : उद्योग, सेवा आणि शेती क्षेत्रात विकास करण्याचा प्रयत्न : देवेंद्र फडणवीस
Maharashtra Live UpdatesImage Credit source: tv9 marathi

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आशियातील सर्वात मोठ्या एयरो शो एयरो इंडिया 2023चं उद्घाटन करणार आहेत. बंगळुरू येथे हा शो होणार आहे. बिग बॉस-16चं एमसी स्टॅनने विजतेपद पटकावलं आहे. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 13 Feb 2023 10:38 PM (IST)

    राज्यात पुन्हा महाराष्ट्र भुषण पुरस्काराचा वाद पेटणार

    पुणे : 

    राज्यात पुन्हा महाराष्ट्र भुषण पुरस्काराचा वाद पेटणार

    आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिलेला महाराष्ट्रभुषण पुरस्कार परत घ्या

    संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांची राज्य सरकारकडे मागणी

    रामदासी बैठकांमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास पसरवण्याचं काम

    राज्यात रामदासी विषमता आणि ब्राह्मणी व्यवस्था निर्माण करण्याचं काम केलंय

    संभाजी ब्रिगेडनं नोंदवला आक्षेप

    शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्याही महाराष्ट्र भुषण पुरस्कारालाही संभाजी ब्रिगेडनं विरोध केला होता

  • 13 Feb 2023 05:30 PM (IST)

    उद्योग, सेवा आणि शेती क्षेत्रात विकास करण्याचा प्रयत्न : देवेंद्र फडणवीस

    “महाराष्ट्राची पुढची वाटचाल मी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्र हे भारताचं ग्रोथ इंजिन आहे. महाराष्ट्र प्रत्येक सेक्टरमध्ये अग्रेसर आहे. अतिशय प्रोगेसिव्ह स्टेट म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं. देशाची अर्थव्यवस्था फाईव्ह ट्रिलियन डॉलर करण्याचं पंतप्रधान मोदींचं ध्येय आहे. त्यासाठी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वन ट्रिलियन डॉलर करण्याची इच्छा आहे. महाराष्ट्रात रोजगार आणि सगळ्याच क्षेत्रात विकास करण्याचा प्रयत्न सुरु आहे, उद्योग, सेवा आणि शेती क्षेत्रात विकास करण्याचा प्रयत्न आहे”, असं देवेंद्र फडणवीस टीव्ही ९ मराठीच्या कार्यक्रमात म्हणाले.

    नागपूर-गोवा हायवे तयार करतोय. समृद्धी महामार्ग गडचिरोली जोडतोय. विरार-अलिबाग कॉरिडोर तयार करतोय. पुण्याचा रिंगरोड तयार करतोय, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

    आपलं सरकार आल्यानंतर एक लाख कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता दिलेली आहे. राज्यात प्रचंड गुंतवणूक येत आहे. देशातील ८० हजार स्टार्टअप हबपैकी १५ हब आपल्याकडे आहेत, असं फडणवीसांनी सांगितलं.

    नवी मुंबईचे विमानतळ सुरु करण्याचं काम सुरु आहे. तिथे तिसरी मुंबई उभारतोय, असं फडणवीस म्हणाले.

    वाळवणला बंदर तयार करतोय. मासेमारांसाठी काम करत आहोत. आपण डहाणूला तिथून वगळलं आहे, असं फडणवीस म्हणाले.

    महाराष्ट्रात शेती क्षेत्र महत्त्वाचं आहे. जलयुक्त शिवार योजना आपण राबवत आहोत. गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात पाणी अडवून मराठवाड्यातील परिसर दुष्काळमुक्त करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असं फडणवीसांनी सांगितलं.

  • 13 Feb 2023 03:30 PM (IST)

    शिंदे गटाचे नेते , ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांची अजित पवार यांच्यावर टीका

    – ‘स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी परिस्थिती अजित पवारांची झाली आहे’

    -‘अजित पवारांनी सकाळचा शपथविधी घेतला ते बंड होते, गद्दारी होती की, शरद पवारांच्या विरोधात उठाव होता,ते आधी स्पष्ट करावं’

    – त्यावेळी राष्ट्रवादीच्या लोकांनी अजित पवारांचे पुतळे जाळले होत-नरेश म्हस्के

  • 13 Feb 2023 03:28 PM (IST)

    कसबा पोटनिवडणूकीच्या प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी शिंदे गटाची बैठक,

    भरत गोगावले आणि नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार बैठक

    सारसबाग परिसरातील बाळासाहेबांची शिवसेना पक्ष कार्यालयात बैठकीचे आयोजन,

  • 13 Feb 2023 12:54 PM (IST)

    नाशिकच्या लासलगाव रेल्वे अपघात प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

    केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांची माहिती

    अपघात कसा झाला याची चौकशी करण्याचे आदेश

    अपघात प्रकरणी इंजिन चालक ताब्यात

    सकाळी लासलगाव परिसरात रेल्वे अपघातात चार गँगमनचा मृत्यू झाला

    मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना दिली जाणार आर्थिक मदत

    केंद्र सरकारकडून दिली जाणार मदत, केंद्रीय राज्यमंत्री भारतीय पवार यांची माहिती

  • 13 Feb 2023 12:09 PM (IST)

    चुलीच्या ठिणगीमुळे झोपडीला आग लागून वृद्ध दांपत्याचा होरपळून जागीच मृत्यू

    सोलापूर : बार्शी तालुक्यातील गाडेगाव येथील हृदय द्रावक घटना,

    भीमराव काशीराम पवार, कमल भीमराव पवार असे या घटनेत मृत्यू झालेल्या वृद्ध दांपत्याचे नाव,

    आज पहाटे सहाच्या सुमारास कमल पवार यांनी पाणी गरम करण्यासाठी चूल पेटवली होती,

    चुलीतल्या ठिणगीमुळे झोपडीला आग लागली,

    पती भीमराव पवार हे झोपडी मध्ये झोपलेले असल्याने कमल पवार ह्या त्यांना उठवण्यासाठी आत गेल्या,

    मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने वृद्ध दांपत्याचा जागीच मृत्यू झाला.

  • 13 Feb 2023 10:01 AM (IST)

    रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवा…..

    करुणा शर्मा यांची लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याकडे मागणी…

    केंद्रीय महिला आयोगाला ही केली तक्रार…

    रुपाली चाकणकर पक्षपातीपने कामं करत असल्याचा करुणा शर्मा यांचा आरोप

  • 13 Feb 2023 09:56 AM (IST)

    नाशिक : हेड वायर तपासणी टॉवरच्या धडके चार गँगमन ठार

    नाशिक : हेड वायर तपासणी टॉवरच्या धडके चार गँगमन ठार

    लासलगाव रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन

    मृत गँगमन कर्मचाऱ्यांचे सहकारी संतप्त

    मनमाड-मुंबई गोदावरी एक्सप्रेस तब्बल वीस मिनिटे रोखून धरली

    रेल्वे पोलिसांच्या विनंतीनंतर रेलरोको आंदोलन तात्पुरते मागे

    वीस मिनिटानंतर गोदावरी एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना

  • 13 Feb 2023 09:46 AM (IST)

    नागपुरातील सराफा व्यापाऱ्याला चार कोटींचा गंडा

    कोलकात्यातील दोन कंपनीकडून सराफा व्यापाऱ्याची फसवणूक

    कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

    स्वस्त दरात सोनं विकण्याचं आमिष दाखवत केली फसवणूक

    ॲडव्हान्स घेऊन सोनं पाठवण्यात केली टाळाटाळ

    आशुतोष मुंदडा या व्यापाऱ्याची फसवणूक

  • 13 Feb 2023 09:16 AM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड शहर आज कडकडीत बंद

    औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड शहर आज कडकडीत बंद

    सिल्लोड नगरपरिषदेच्या करवाढी विरोधात भाजपचा आज सिल्लोड बंद

    शिंदे गटाचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भाजप आक्रमक

    अब्दुल सत्तार यांच्या ताब्यातील नगरपरिषदेच्या विरोधात भाजप आक्रमक

    सिल्लोड शहर बंद करण्यासाठी भाजपकडून जोरदार घोषणाबाजी

  • 13 Feb 2023 08:03 AM (IST)

    आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा आज 22 वा दीक्षांत समारंभ

    नाशिक : वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे राहणार उपस्थित,

    17 विद्यार्थ्यांना पीएचडी, तर 96 गुणवंत विद्यार्थ्यांना मिळणार सुवर्णपदक,

    12 हजार 727 graduate विद्यार्थ्यांना मिळणार पदवी.

  • 13 Feb 2023 07:56 AM (IST)

    पुण्यात आज शिंदेगटाची बैठक

    कसबा विधानसभा पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची बैठक

    भरत गोगावले आणि नरेश म्हस्के कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार

    कसबा विधानसभा पोट निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे

    या निवडणुकीचे सर्व जबाबदारी शिंदे गटाने गोगावले आणि म्हस्के यांच्यावर सोपवली आहे

    त्याच अनुषंगाने शिंदे गटाची हे दोन्ही नेते आज पुण्यात बैठका घेणार आहेत

    आज दुपारी बाळासाहेबांची शिवसेना भवनमध्ये ही बैठक पार पडणार आहे

  • 13 Feb 2023 07:47 AM (IST)

    पुण्यातील जर्मन बेकरी ब्लास्टला 13 वर्ष पूर्ण

    2010 साली पुण्यात झाला होता जर्मन बेकरी येथे ब्लास्ट

    कोरेगाव पार्क जागृत समितीतर्फे आज श्रद्धांजली सभा

    जर्मन बेकरी ब्लास्ट मध्ये 17 जणांनी गमावला होता जीव

    या सतरा जणांना श्रद्धांजली देण्यासाठी आज संध्याकाळी कोरेगाव पार्कमध्ये श्रद्धांजली सभा

  • 13 Feb 2023 06:33 AM (IST)

    आशियातील सर्वात मोठ्या एयरो शो ‘एयरो इंडिया 2023’चं आज उद्घाटन

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एयरो इंडिया 2023चं उद्घाटन होणार

    बंगळुरू येथे हा शो होणार आहे

    संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कार्यक्रमाला उपस्थित राहणार

  • 13 Feb 2023 06:31 AM (IST)

    गजानन महाराज यांच्या 145 व्या प्रगट दिनानिमित्ताने शेगांव नगरीत एक लाखाच्यावर भाविकांची हजेरी

    श्रीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

    श्रीच्या’ दर्शनासाठी मंदिर २४ तास सुरू

    राज्यासह इतर राज्यातील 1100 भजनी दिंड्या हजारो महिला, पुरुष वारकरी शेगावमध्ये दाखल

    विदर्भातील पंढरीत भाविकांची मांदियाळी जमली आहे

  • 13 Feb 2023 06:21 AM (IST)

    अजित पवारांचे भाषण सुरू असताना सभेच्या जवळ भाजपने वाजवले फटाके

    भाजपने खोडसाळपणा केल्याचा मविआ कार्यकर्त्याचा आरोप

    सभा सुरु असतानाच भाजपची रॅली सभेजवळ आली, पुण्यात घडला प्रकार

    भाजप कार्यकर्त्यांनी जोरात ढोल ताशे वाजवत फोडले फटाके

  • 13 Feb 2023 06:18 AM (IST)

    जळगावच्या चोपडा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 29.65 टक्के मतदान

    15 हजार 108 मतदारांपैकी 4 हजार 479 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

    विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांनीही केले मतदान

Published On - Feb 13,2023 6:16 AM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.