Maharashtra Live Updates : अमरावतीच्या पंचवटी चौकमधील हॉटेलवर अज्ञातांचा हल्ला

| Updated on: Feb 21, 2023 | 7:55 AM

Maharashtra News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Live Updates :  अमरावतीच्या पंचवटी चौकमधील हॉटेलवर अज्ञातांचा हल्ला
Maharashtra News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यावरू दिल्लीतील जेएनयूमध्ये वाद झाला आहे. डाव्या आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने बोलावली तातडीची बैठक. निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिलं आहे. आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गट आज सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 20 Feb 2023 08:02 PM (IST)

    अमरावतीच्या पंचवटी चौकमधील हॉटेल ‘नाईस डे’वर अज्ञातांचा हल्ला

    अमरावती : 

    अमरावतीच्या पंचवटी चौकमधील हॉटेल ‘नाईस डे’वर अज्ञातांचा हल्ला

    तलवार घेऊन ५ ते ७ लोकांनी फोडले काच

    गाडगे नगर पोलीस घटनास्थळी दाखल

    दारूचे बिल देण्यावरून वाद झाल्याची माहिती

    एका आरोपीस अटक

  • 20 Feb 2023 04:59 PM (IST)

    चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचाराचा जोर वाढला 

    पुणे :

    चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचाराचा जोर वाढला

    भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी मामुर्डी गावात आज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची बैठक

    गावातील नागरिकांसोबत बैठक घेत भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना मतदान करण्यासाठी आवाहन करणार

  • 20 Feb 2023 04:49 PM (IST)

    श्रीरामपूर / अहमदनगर

    ६५ वर्षाच्या नराधमाचा २ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार श्रीरामपूर तालुक्यातील मानवतेला काळीमा फासणारी घटना श्रीरामपूर पोलिसांनी ठोकल्या या ६५ वर्षाच्या नराधमाला बेड्या खेळण्यासाठी आलेल्या शेजारच्या नातीबरोबर ६५ वर्षीय नराधमाने केला अत्याचार भास्कर मोरे वय – ६५ असे आरोपीचे नाव पिडीत मुलीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल भादवि कलम ३७६ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण, पोस्को कायदा कलम ४, ८ , १२ प्रमाणे पोलिसांत गुन्हा दाखल पोलीस उपनिरीक्षक सुरेखा देवरे यांच्याकडुन पुढील तपास सुरू

  • 20 Feb 2023 03:57 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात दाखल

    पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री एकाच गाडीत

    कसबा पोटनिवडणुकीसाठि आता मुख्यमंत्री घेणार बैठक

    5 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद

  • 20 Feb 2023 03:55 PM (IST)

    विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना मातृशोक

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निलम गोऱ्हेंच्या भेटीला

    नीलम गोऱ्हे यांच्या घरी जाऊन आस्थेनं केली विचारपूस

  • 20 Feb 2023 03:53 PM (IST)

    Congress LIve- काँग्रेसचा अंतर्गत वाद मिटवण्यासाठी रमेश चेन्निथला मुंबईत दाखल

    बाळासाहेब थोरात- नाना पटोले वाद मिटवण्यासाठी हायकमांडने चेन्निथला यांना पाठवलं

    केरळ काँग्रेस आमदार रमेश चेन्निथला मुंबईत दाखल

    पक्षांतर्गत आरोप-प्रत्यारोपांची माहिती घेऊन अहवाल हायकमांडला पाठवणार

  • 20 Feb 2023 03:48 PM (IST)

    Shivsena Live- ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात नवी याचिका दाखल, याचिकेतील मुद्दे काय?

    निवडणूक आयोगाने कायदेशीर चौकट ओलांडून चिन्ह आणि पक्षाच्या नावाचा निर्णय घेतला का ?

    निवडणूक आयोगाला शिवसेना पक्षात गटबाजी सुरू आहे हे माहीत नव्हतं का ?

    स्वेच्छेने शिवसेना पक्ष सोडणारे एकनाथ शिंदें कशा पद्धतीने नाव आणि चिन्हावर दावा करू शकतात ?

  • 20 Feb 2023 03:47 PM (IST)

    मंत्री दादा भूसेंची धडक कारवाई..

    मालेगाव महापालिकेच्या विरोधात धडक कारवाई..

    कचरा संकलन करणाऱ्या वाहनांवर केली कारवाई..

    कोट्यावधींचा घोटाळा उघड…

    शहरातील कचरा संकलन करणाराऱ्या ठेकेदाराकडून वजन काट्यावर होत होता घोटाळा…

    कचरा गाड्यांच्या वजनाच्या काट्यावर होत होता मोठा घोटाळा भूसेंनी केला उघड…

    वजन काटा सील करण्याचे दिले आदेश..

  • 20 Feb 2023 03:07 PM (IST)

    चोरांना राज प्रतिष्ठा देण्याचा काळ सुरू झाला

    चोरांना राज प्रतिष्ठा देण्याचा काळ सुरू झाला

    उद्धव ठाकरे यांचा भाजपसह शिंदे गटावर हल्लाबोल

    हुकुमशाहीचा नंगानाच सुरू होऊ शकतो

    आयोगाचा निकाल आयोग्य आहे

    उद्धव ठाकरे यांनी घेतला आक्षेप

  • 20 Feb 2023 02:06 PM (IST)

    येत्या काळात शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला जाणार; उद्धव ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांना सूचना

    येत्या काळात शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला जाणार

    जिल्हा प्रमुखांना महत्वाच्या सूचना

    राज्यभर दौरे करणार

    बीएमसीसीच्या कार्यालयातील ताब्यात घेण्याची तयारी

    शिवसेना संपवण्याचा प्रयत्न

    जुनी प्रकरणं उखरून काढण्याचा केला जाणार प्रयत्न

  • 20 Feb 2023 01:00 PM (IST)

    Entertainment Update : 3 Idiots साठी आर माधवन याने अशी दिली ऑडिशन; 13 वर्षांनंतर व्हायरल झालेल्या व्हिडीओची चर्चा

    सिनेमासाठी आर माधवन याने दिलेल्या ऑडिशनचा व्हिडीओ तुफान व्हायरल; तुम्ही व्हिडीओ एकदा नक्कीच पाहाच…

    3 Idiots सिनेमाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं, आजही होते सिनेमाची चर्चा… वाचा सविस्तर

  • 20 Feb 2023 12:56 PM (IST)

    कसब्यात आज भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ विजय संकल्प मेळावा

    कसब्यात आज भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ विजय संकल्प मेळावा

    मंत्री गिरीश महाजन, रविंद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील राहणार उपस्थित

    मेळाव्यात कसब्यातील रहिवासी असतील अशाच कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जाणार

    आधार कार्ड बघून कार्यकर्त्यांना आत सोडलं जाणार

    कसब्यात मतांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपची अनोखी कल्पना

    आधार कार्ड बघूनच आम्ही सभेत सोडणार

    आजच आमचा निकाल लागेल

    भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडेंची माहिती

  • 20 Feb 2023 12:51 PM (IST)

    उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल

    थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार

    उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष

    शिवसेना भवन शिंदे गटाकडून ताब्यात घेणार असल्याची चर्चा

    शिवसेना भवनासमोर शिवसैनिक प्रचंड संख्येने जमले

  • 20 Feb 2023 12:50 PM (IST)

    IND vs AUS Test : Venkatesh Prasad यांनी केएल राहुलच्या बाबतीत सत्य समोर आणलं, BCCI कडे उत्तर आहे का?

    Venkatesh Prasad यांच्याकडून केएल राहुलची पोल-खोल. वाचा सविस्तर….

  • 20 Feb 2023 12:49 PM (IST)

    IPL 2023 सुरु होण्याआधी धोनीच्या CSK ला मोठा झटका, प्रमुख गोलंदाज OUT

    CSK च्या ‘या’ प्लेयरवर शस्त्रक्रिया होणार आहे. वाचा सविस्तर….

  • 20 Feb 2023 12:18 PM (IST)

    Entertainment Update : कलाविश्वाला मोठा धक्का… प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या निधनानंतर चाहते आणि सेलिब्रिटींवर दुःखाचा डोंगर..

    अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख केलं व्यक्त… सध्या त्यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ… वाचा सविस्तर

  • 20 Feb 2023 12:07 PM (IST)

    कोल्हापुरातल्या कणेरी मठ इथं आज पासून पंचमहाभूत लोकोत्सवाला होणार सुरूवात

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार पंचमहाभूत लोकोत्सवाच उद्घाटन

    थोड्याच वेळात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवर कार्यक्रमस्थळी दाखल होणार

    20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे पंचमहाभूत लोकोत्सव

    पंचमहाभूत लोकोत्सवाच्या निमित्ताने कणेरी मठच्या तब्बल 600 एकर परिसरात वेगवेगळी प्रदर्शनं

    40 लाखाहून अधिक लोक भेट देण्याचा हा अंदाज

    कणेरी मठाचे मठाधीपती अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींच्या संकल्पनेतून होतोय पंचमहाभूत लोकोत्सव

  • 20 Feb 2023 11:51 AM (IST)

    विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा डॅा. नीलम गोऱ्हे यांना मातृशोक

    नीलम गोऱ्हे यांच्या मातोश्री लतिकाताई दिवाकर गोऱ्हे यांचे आज सकाळी निधन झाले

    अंत्यदर्शन वेळ दुपारी 2.30 ते 4.30 पर्यंत घेता येणार आहे

    सिल्हररॅाक्स, हरेकृष्ण मंदिर पथ, मॅाडेल कॅालनी, पुणे येथे अंत्यदर्शन घेता येणार आहे.

    सायंकाळी 5 वाजात वैकुंठ स्मशानभूमी येथे लतिकाताई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत

  • 20 Feb 2023 11:49 AM (IST)

    निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा फटका उद्धव ठाकरेंना बसणार

    निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा फटका उद्धव ठाकरेंना बसणार

    पक्षाचा फंड वापरण्याचीही एकनाथ शिंदेंना परवानगी

    शिवसेना पक्षाकडे तब्बल 148 कोटी रुपयांची FD

    186 कोटी रुपयांची पक्षाकडे स्थावर मालमत्ता

    नाव आणि पक्ष चिन्ह सह मालमत्ता आणि डिपॉझिट रक्कम वापरण्यासही निवडणूक आयोगाने दिली आहे मान्यता

  • 20 Feb 2023 11:02 AM (IST)

    पुणे : कात्रज बालाजीनगर भागात ठाकरे गटाचे झळकले बँनर

    सगळं चोरलं …पण ठाकरी बाणा आणि बाप कुठून चोरणार ?

    जगातील कोणतीही व्यवस्था ही तुम्हाला देऊ शकत नाही

    आम्ही फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत

    ठाकरे गटाचे युवासेना सहसचिव कृनाल धनावडे यांची बँनरबाजी …

  • 20 Feb 2023 11:02 AM (IST)

    महापालिका मुख्यालयासमोर वॉटर ग्रेस कंपनीच्या कामगारांचे आंदोलन

    नाशिक : शहरातील 450 सफाई कर्मचारी आजपासून आमरण उपोषण करणार,

    पूर्व सूचना न देता कंपनीने कामावरून काढल्याचा आरोप,

    मनसेच्या नेतृत्वात शहरातील सफाई कर्मचारी आजपासून आंदोलनात सहभागी.

  • 20 Feb 2023 10:59 AM (IST)

    नाशिक महापालिका मुख्यालयासमोर वॉटर ग्रेस कंपनीच्या कामगारांचे आंदोलन

    नाशिक महापालिका मुख्यालयासमोर वॉटर ग्रेस कंपनीच्या कामगारांचे आंदोलन

    शहरातील 450 सफाई कर्मचारी आजपासून आमरण उपोषण करणार

    पूर्व सूचना न देता कंपनीने कामावरून काढल्याचा आरोप

    मनसेच्या नेतृत्वात शहरातील सफाई कर्मचारी आजपासून आंदोलनात सहभागी

  • 20 Feb 2023 10:46 AM (IST)

    IND vs AUS Test : कॅप्टन Pat Cummins चा मोठा निर्णय, ऑस्ट्रेलियन टीमला मोठा झटका

    IND vs AUS Test : सीरीजच्या मध्यावर Pat Cummins ने घेतलेल्या या निर्णयामुळे ऑस्ट्रेलियन टीमला मोठा झटका बसला आहे. वाचा सविस्तर….

  • 20 Feb 2023 10:45 AM (IST)

    टीमला चॅम्पियन बनवण्याच फळ, 10 वर्षानंतर भारताच्या वनडे टीममध्ये मिळालं स्थान

    10 वर्षानंतर वनडे टीममध्ये कमबॅक करणारा तो खेळाडू कोण? वाचा सविस्तर….

  • 20 Feb 2023 10:45 AM (IST)

    Jasprit Bumrah : अखेर ठरलं, जसप्रीत बुमराहच्या कमबॅकच चित्र झालं स्पष्ट

    Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह कुठल्या टुर्नामेंटमधून क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणार? ते निश्चित झालय. वाचा सविस्तर….

  • 20 Feb 2023 10:21 AM (IST)

    न्यायालयात पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने-सामने येणार

    ठाकरे गटाला याचिका सर्वोच्च न्यायालयातच दाखल करावी लागणार

    ठाकरे गटासमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता

    ठाकरे गटासाठी करो, या मरो ची परिस्थिती, ज्येष्ठ वकिलांचे मत

    पहिल्यांदाच उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशी केस सर्वोच्च न्यायालयात दाखल होणार

    निवडणूक आयोगाच्या विरोधात जर याचिका दाखल झाली तर पहिल्यांदाच शिंदे-ठाकरे एकमेकांविरोधात न्यायालयात येणार

  • 20 Feb 2023 09:51 AM (IST)

    अहमदनगरच्या नामांतरासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

    अहमदनगरच्या नामांतरासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

    नगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर करण्याची मागणी

    दुपारी 12 वाजता बिस्तभाग चौकातून मोरच्याला होणार सुरूवात

    तर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाची सांगता

  • 20 Feb 2023 09:36 AM (IST)

    पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत आचारसंहिताभंगाच्या 59 तक्रारी

    पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत आचारसंहिताभंगाच्या 59 तक्रारी

    आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने सी-व्हिजिल या ऑनलाईन अॅपवर

    मतदार संघात होत असलेल्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे

    आचार संहिता लागू झाल्यापासून 59 तक्रारी या ॲपवर आल्या होत्या

    या सर्व तक्रारीचे निरसन करण्यात आलं

    चिंचवड विधानसभा क्षेत्रात जर आचारसंहिता भंग होत असेल तर या अॅपवर तक्रार करण्याचं आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आलंय

  • 20 Feb 2023 08:45 AM (IST)

    शरद पवार यांचा आज सांगली दौरा

    बारामती : शरद पवार अपडेट

    – शरद पवार यांचा आज सांगली दौरा..

    – थोड्याच वेळात सांगलीकडे होणार रवाना..

    – बारामतीतील गोविंद बाग निवासस्थानाहून निघणार सांगलीकडे..

    – हेलिकॉप्टरने होणार सांगलीकडे प्रयाण…

  • 20 Feb 2023 08:30 AM (IST)

    VIDEO : लास्ट ओव्हरमध्ये 18 धावांची गरज, 4,1,4,4, वेस्ट इंडिज-पाकिस्तान सामन्यातील थरार

    सगळ्यांचे श्वास रोखले गेलेल्या या सामन्यात फक्त एका चेंडूने मॅच फिरली. वाचा सविस्तर….

  • 20 Feb 2023 08:30 AM (IST)

    Prithvi Shaw : वाईट काळात पृथ्वी शॉ याच्या पाठिशी उभा राहिला तेंडुलकर, ‘या’ शब्दातून वाढवली हिम्मत

    सध्या पृथ्वी शॉ भारतीय क्रिकेटमध्ये एकाकी पडलाय. वाचा सविस्तर….

  • 20 Feb 2023 07:58 AM (IST)

    कसबा आणि चिंचवडमध्ये आज दिग्गज प्रचारात उतरणार

    पुणे :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसब्यात 4 वाजता घेणार विविध समाज प्रतिनिधीच्या बैठका,

    तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज संध्याकाळी 6 वाजता कसब्यात जाहीर सभा,

    अजित पवारांच्या उपस्थितीत संध्याकाळी 5 वाजता कसब्यात बाईक रॅली,

    तर भाजप नेत्या पंकजा मुंडे कसब्यात भाजप उमेदवाराच्या पदयात्रेत सहभागी होणार.

  • 20 Feb 2023 07:57 AM (IST)

    सोमवती अमावस्ये निम्मित जेजुरी गड सजला

    जेजुरी गडावर भाविकांची मोठी गर्दी, यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषाने जेजुरी गड दुमदुमला

    जेजुरी गडावर भंडाऱ्याची मोठी उधळण

    खंडेरायाच्या मानाच्या पालखीचं गड उतरून कऱ्हा स्नानासाठी प्रस्थान

    सोमवती अमावस्या निमित्त जेजुरी गड भक्तांनी फुलला

    नगर प्रदिक्षणा करत देवाची पालखी कऱ्हा स्नानासाठी जाणार

    खंडेरायाच्या दर्शनासाठी हजारो भाविक जेजुरी गडावर

    जेजुरी गडाला सोन्याचं रूप

  • 20 Feb 2023 07:41 AM (IST)

    पोलीस भरतीची लेखी परीक्षा लांबली

    पोलीस भरतीची लेखी परीक्षा लांबली

    लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना महिनाभर करावी लागणार प्रतीक्षा

    राज्यभरात एकाच वेळी होणार लेखी परीक्षा

    पुण्यातील  निवडणुकांमुळे परीक्षा स्थगित

  • 20 Feb 2023 07:13 AM (IST)

    सुषमा अंधारे यांची तोफ आज अमरावती जिल्ह्यात धडाडणार

    शिवजयंती निमित्त अमरावतीच्या चांदूर रेल्वेत सुषमा अंधारे यांचे जाहीर व्याख्यान

    सायंकाळी 6 वाजता चांदूर रेल्वे शहरातील जिल्हा परिषदच्या मैदानावर सुषमा अंधारे यांचे व्याख्यान

    सुषमा अंधारे आणि आयोजकांना समज देण्याची वारकरी संप्रदायाने केली होती पोलिसांना मागणी

  • 20 Feb 2023 07:13 AM (IST)

    गुजरात-महाराष्ट्र सीमावर्ती भागात भूकंपाचे सौम्य धक्के

    नाशिक : चोवीस तासात तीन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के,

    रघतविहीर, फणसपाडा, राशा या गावांत भूकंपाचे धक्के,

    मोठा आवाज झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

  • 20 Feb 2023 06:16 AM (IST)

    बीडच्या परळी वैजनाथ येथे शिवजयंती मिरवणुकीवर पोलिसांचा लाठीचार्ज

    दोन युवकांनी आपापसात हुज्जत घातल्याने पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला

    लाठीचार्जे केल्यामुळे शिवभक्तांमध्ये पळापळ, घाबरून व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली

    राणी लक्ष्मीबाई टॉवर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने सार्वजनिक मिरवणूक सुरू असताना हा प्रकार घडला

  • 20 Feb 2023 06:12 AM (IST)

    डोंबिवलीच्या पलावा येथील एक्सपेरिया मॉलमध्ये आग

    रात्री उशिरा एक्सपेरिया मॉलमधील कपड्याच्या दुकानाला आग लागल्याने धुराचे साम्राज्य

    अचानक आग लागल्याने लोकांमध्ये गोंधळ, सुदैवाने जीवितहानी नाही

    आगीची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली

    दोन तास शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण

  • 20 Feb 2023 06:10 AM (IST)

    एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या घरावर दगडफेक

    नवी दिल्लीतल्या अशोक रोडवरच्या घरावर दगडफेक

    दगडफेक करणाऱ्या अज्ञात विरोधात पोलिसात गुन्हा दाखल

    दिल्ली पोलिसांकडून चौकशी सुरू

  • 20 Feb 2023 06:09 AM (IST)

    छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यावरून दिल्लीतील जेएनयूत वाद

    जेएनयुमध्ये पुन्हा विद्यार्थी संघटना आमने-सामने

    एबीव्हीपीकडून शिवजयंती सुरू असताना विरोध झाल्याचा दावा

    डाव्या संघटनांच्या विद्यार्थ्यांनी शिवजयंतीला विरोध केल्याचा एबीव्हीपीचा दावा

    दोन्ही गटातल्या विद्यार्थ्यांमध्ये शाब्दिक बचाबाची

    शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची तोडफोड झाल्याचा एबीव्हीपीचा आरोप

  • 20 Feb 2023 06:06 AM (IST)

    ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याबाबत संभ्रमात?

    निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्याबाबत संभ्रम?

    आज ठाकरे गट पुन्हा वकिलांशी चर्चा करणार, चर्चेनंतरच सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेणार

    निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हबाबत दिलेल्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्याचा होणार निर्णय

Published On - Feb 20,2023 6:03 AM

Follow us
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.