Maharashtra Live Updates : उद्या MPSC आयोगाचे अध्यक्ष आणि विद्यार्थी शिष्टमंडळामध्ये बैठक, शरद पवार असणार उपस्थित

| Updated on: Feb 23, 2023 | 6:04 AM

Maharashtra News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Live Updates : उद्या MPSC आयोगाचे अध्यक्ष आणि विद्यार्थी शिष्टमंडळामध्ये बैठक, शरद पवार असणार उपस्थित
Maharashtra News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई : राज्याच्या सत्तासंघर्षावर आजही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे आज वकिलांकडून काय युक्तिवाद केला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यातील महाविद्यालयीन आणि विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आजपासून संप. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर अखेर एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 22 Feb 2023 06:00 PM (IST)

    किरीट सोमय्या यांच्यासाठी हसन मुश्रीफ यांचं पत्रक

    कोल्हापूर :

    किरीट सोमय्या यांचे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत स्वागतच

    त्यांना जी हवी ती माहिती त्यांनी घ्यावी

    जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी काढलं पत्रक

    आपण याआधी केलेल्या आवाहनानुसारच सोमय्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत येत असावेत

    मुश्रीफ यांच्या पत्रकात उल्लेख

    कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचंही मुश्रीफांचं आवाहन

    किरीट सोमय्या यांच्या उद्याच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार हसन मुश्रीफ यांनी काढलं पत्रक

  • 22 Feb 2023 05:27 PM (IST)

    गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज घेतले श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे दर्शन

    गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे दर्शन

    2024 मध्ये पुन्हा देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला यश मिळू दे असं विठ्ठलाला घातले साकडे

    महाराष्ट्र सरकारने जागा दिल्यास पंढरपुरात गोवा भवन उभारणार

  • 22 Feb 2023 05:21 PM (IST)

    अक्कलकोट रोडवरील तीन स्पिनिंग कारखान्यांना मोठी आग

    सोलापूर : 

    – अक्कलकोट रोडवरील तीन स्पिनिंग कारखान्यांना मोठी आग

    – अक्कलकोट रोडवरील बालाजी स्पिनिंग अँड विव्हिग मिलला मोठी आग

    – बाजूच्या दोन कारखान्यांनाही लागली आग, जवळपास तीन कारखाने आगीच्या बक्ष्यस्थानी

    – बालाजी स्पिनिंग अँड व्हिविंग मिलसह दोन कारखान्यामधील आगीत लाखोचा माल जळून भस्मसात

    – अग्निशामक दलाच्यावतीने आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू

    – शॉट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती

    – बुधवार साप्ताहिक सुट्टी असल्याने कोणतेही कर्मचारी कारखान्यात नव्हते त्यामुळे कोणतेही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती

    – अग्निशामक दल, पोलीस कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांकडून आग विजवण्याच प्रयत्न सुरू

  • 22 Feb 2023 03:26 PM (IST)

    VIDEO : जिंकण्याची जिद्द संपली की, असं होतं, पाकिस्तान vs इंग्लंड सामन्यातील हे पहा उत्तम उदहारण

    पाकिस्तानी खेळाडूची ही बालिश चूक आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात चेष्टेचा विषय बनलीय. वाचा सविस्तर…..

  • 22 Feb 2023 12:51 PM (IST)

    नाशिक

    शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक कांद्यासह विविध मागण्यांसाठी रस्तारोको आंदोलन नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावरील निफाड तालुक्यातील विंचूर येथे उप बाजार समिती समोर रास्तारोको कांद्याला तीन हजार रुपये हमीभाव देण्याची मागणीच्या जोरदार घोषणाबाजी आंदोलनादरम्यान गळ्यात कांद्याच्या माळा घालून काही कांदा रस्त्यावर फेकून दिला रस्ता रोको दरम्यान नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावर लागल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा

  • 22 Feb 2023 12:43 PM (IST)

    IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियाने आपल्या प्लेयरची इज्जत ठेवली नाही, अपमानास्पद वागणुकीनंतर पाठवलं मायदेशी

    IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियाने आपल्याच प्लेयरसोबत असं काय केलं? वाचा सविस्तर…..

  • 22 Feb 2023 11:51 AM (IST)

    आकाश चोपडा KL Rahul चा इतका बचाव करतोय, त्यामागे सुनील शेट्टी कनेक्शन का?

    फॅन्स प्रश्न विचारतायत, म्हणून तू राहुलला वाचवतोयस का? वाचा सविस्तर…..

  • 22 Feb 2023 11:39 AM (IST)

    उद्या MPSC आयोगाचे अध्यक्ष आणि विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळामध्ये बैठक

    बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असणार उपस्थित

    आज सकाळी शरद पवारांनी MPSC आयोगाच्या अध्यक्षांशी फोनवर साधला संवाद

    उद्या मुंबईत सकाळी 11 वाजता होणार बैठक

  • 22 Feb 2023 11:35 AM (IST)

    इंदापूरमध्ये पहाटेच्या वेळी अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन महिलांचा मृत्यू

    इंदापूरमध्ये पहाटेच्या वेळी अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन महिलांचा मृत्यू

    मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन महिलांचा मृत्यू

    पालखीमार्गालगत जंक्शन येथे घडली दुर्दैवी घटना

    वालचंदनगर पोलिस ठाण्यासमोरच दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू

    वालचंदनगर पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु

  • 22 Feb 2023 11:08 AM (IST)

    Crime News Live | 75 वर्षीय वृद्धाची दिल्लीत हत्या

    घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करताना वृद्धाची हत्या

    पोलीस पोहोचताच घरातील सर्व सामान विखुरलेलं पहायला मिळालं

    पुढील तपास सुरू असल्याची दिल्ली पोलिसांची माहिती

  • 22 Feb 2023 11:04 AM (IST)

    KL Rahul च्या मनात त्याच्या बॅटबद्दल शंका आहे का? एका कृतीमुळे सर्वांना पडला प्रश्न

    केएल राहुलच करिअर संकटात सापडलय. कुठे गेला होता केएल राहुल. वाचा सविस्तर…..

  • 22 Feb 2023 10:47 AM (IST)

    Entertainment Update : ‘पठाण’ ने करून दाखवलं; सलग चौथ्या आठवड्यातही सिनेमा करतोय कोट्यवधींची कमाई

    शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमाने मोडले सर्व रोकॉर्ड; ‘बाहुबली 2’ सिनेमालाही टाकलं मागे,

    चौथ्या अठवड्यात देखील किंग खान याला पाहण्यासाठी सिनेमागृहात चाहत्यांची गर्दी… वाचा सविस्तर

  • 22 Feb 2023 10:26 AM (IST)

    National News Live | उत्तरप्रदेशातील हाथरसमध्ये मिनी ट्रक आणि ट्रॅक्टरची एकमेकांना धडक

    अपघातात चार जणांचा मृत्यू

    हाथरस गेट परिसरातील रुहेरी गावाजवळ झाला अपघात

  • 22 Feb 2023 10:10 AM (IST)

    Live- औरंगाबाद शहरातील 5000 घरांवर बुलडोझर चालणार

    कटकट गेट परिसरातील 22 एकरचे पीआर कार्ड आणि सातबारा रद्द करण्यात आला

    एनीमी प्रॉपर्टी घोषित केली आहे. तब्बल 22 एकर 21 गुंठे जमिनीचे पी आर कार्ड- सातबारा रद्द करण्यात आलेय.

    ही जमीन आता केंद्र शासनाच्या नावावर झाली आहे.

  • 22 Feb 2023 10:09 AM (IST)

    तेजीनंतर सोने-चांदीत पुन्हा घसरण

    विक्रमी भावानंतर आता स्वस्ताई

    गुंतवणूकदारांना, खरेदीदारांना खरेदीची मोठी संधी

    लग्नसराईत सोन्याच्या मागणीत होईल वाढ,  वाचा बातमी 

  • 22 Feb 2023 10:07 AM (IST)

    Dinesh Karthik : 6,6,6,6,6,6 डीवाय पाटीलकडून खेळताना दिनेश कार्तिकने समोरच्या टीमला जाम धुतलं

    त्याच्या आक्रमक बॅटिंगमुळे डीवाय पाटीलने मोठी धावसंख्या उभारली. 38 चेंडूत ठोकल्या इतक्या धावा. वाचा सविस्तर….

  • 22 Feb 2023 10:06 AM (IST)

    KL Rahul वरुन टीम इंडियाच्या दोन मोठ्या खेळाडूंमध्ये पडली फूट

    एकाने निमंत्रण दिलं, दुसऱ्याने धुडकावलं. वाचा सविस्तर….

  • 22 Feb 2023 09:28 AM (IST)

    शेअर बाजाराच्या वेळेत होऊ शकते वाढ

    इक्विटी ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदारांना मिळू शकतो अधिक वेळ

    नॅशनल स्टॉक एक्सचेंजने केली वेळ वाढविण्याची मागणी

    बाजार नियामक सेबीच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष

    काहींनी आवळला विरोधाचा सूर, वाचा सविस्तर

  • 22 Feb 2023 09:25 AM (IST)

    महाराष्ट्र काँग्रेस अंतर्गत वादाचा अहवाल तयार

    काँग्रेस पक्षात फेरबदल होणार नाही, सूत्रांची माहिती

    काँग्रेस नेते रमेश चेनिथला यांनी तयार केलाय अहवाल

    चेनिथला आज पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना अहवाल सादर करणार

    रायपूरच्या अधिवेशनात महाराष्ट्र बाबत चर्चा होणार

    24 तारखेपासून रायपूरमध्ये काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन

    अधिवेशनातील चर्चेनंतरही काँग्रेसमध्ये फेरबदल होणार नाही, सूत्र

    बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले वादावर काँग्रेस हायकमांड घेणार निर्णय, सूत्र

  • 22 Feb 2023 09:22 AM (IST)

    संजय राऊत यांना पोलीसांचा एसकोर्ट

    संजय राऊत यांना पोलीसांचा एसकोर्ट

    राऊतांच्या पोलीस सुरक्षेत वाढ

    जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राऊतांची सुरक्षा वाढवली

    संजय राऊतांना नाशिक पोलिसांनी सुरक्षा दिली

    काल पासून नाशिकमध्ये आलेले संजय राऊत आज सिन्नरकडे जाणार

  • 22 Feb 2023 08:58 AM (IST)

    अहमदनगर

    पाथर्डी येथे बारावीच्या पेपरला कॉफी पुरवण्यासाठी उकळले हजारो रुपये

    पाथर्डीत कॉप्या पुरवणाऱ्या एजंटचा सुळसुळाट

    मात्र कॉफ्या न आल्याने विद्यार्थी आणि पालकांनी गाठले पोलीस स्टेशन

    तर मध्यस्थ्याच्या भूमिकेमुळे गुन्हा दाखल नाही

    कॉफी पुरवण्यासाठी एजंटने पर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून उकळले 20 ते 70 हजार रुपये

    परीक्षेत कॉफी न आल्याने एजंटला विद्यार्थी आणि पालकांकडून चोप

  • 22 Feb 2023 08:46 AM (IST)

    आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव काय

    इंधन लवकरच जीएसटीच्या कक्षेत

    केंद्रीय अर्थमंत्र्यांचा राजस्थानमध्ये पुनरुच्चार

    जीएसटी परिषद आणि राज्यांकडे टोलावला चेंडू

    पण लवकरच कर कपातीचे संकेत, वाचा बातमी 

  • 22 Feb 2023 08:28 AM (IST)

    Rahul Dravid : टीम इंडिया नाही, दुसऱ्या देशाच्या टीमकडून खेळण्यासाठी राहुल द्रविड यांनी घेतले होते 34 लाख, 3 महिन्यांसाठी झालेला करार

    टीम इंडियाच नाही, राहुल द्रविड ‘या’ देशाच्या टीमकडून सुद्धा खेळले होते. वाचा सविस्तर…..

  • 22 Feb 2023 08:27 AM (IST)

    Suryakumar Yadav : इच्छापुर्ती होताच सूर्या 2000 किलोमीटर प्रवास करुन देवदर्शनासाठी पोहोचला ‘या’ मंदिरात

    सूर्यकुमार दर्शनासाठी आला, त्यावेळी राजकुमारी सुद्धा तिथे होती. वाचा सविस्तर….

  • 22 Feb 2023 08:19 AM (IST)

    संजय राऊत सलग दुसऱ्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर

    नाशिक : सिन्नर येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने संजय राऊत नाशिकमध्ये,

    राजकीय गणिते यावर चर्चा होण्याची शक्यता,

    पक्ष बांधणी आणि कार्यकर्त्यांशी संवाद यादृष्टीने संजय राऊत यांनी चर्चा केल्याची माहिती.

  • 22 Feb 2023 07:47 AM (IST)

    महावितरणने अमरावती जिल्ह्यातील 8,355 ग्राहकांची वीज कापली

    महावितरणने अमरावती जिल्ह्यातील 8,355 ग्राहकांची वीज कापली

    महावितरणकडून ग्राहकांना थकीत बिल भरण्याचे आवाहन

    महावितरणचे नागरिकांकडे कोट्यवधी रुपयांचे थकीत वीज बिल

    कृषी ग्राहकांकडे सर्वाधिक 832 कोटींचे वीज बिल थकीत

    महावितरणकडून थकीत वीज बिल धारकांचा विद्युत पूरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू

  • 22 Feb 2023 07:36 AM (IST)

    भाजप नेते किरीट सोमय्या उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

    सोमय्यांचा उद्याचा दौरा चर्चेचा ठरणार

    किरीट सोमय्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला देणार भेट

    बँकेवरील ईडी कारवाईच्या नंतर सोमय्या बँकेचे अधिकारी आणि विभागीय सहाय्यक निबंधकांची घेणार भेट

    जिल्हा बँकेची संबंधित शेतकऱ्यांशी भेटून संवादही साधणार

    आमदार हसन मुश्रीफ यांच्यावरील ईडी कारवाईमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असंतोष असतानाच सोमय्यांचा कोल्हापूर दौरा

    राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि मुश्रीफ समर्थक सोमय्यांना विरोध करणार का याकडे लक्ष

  • 22 Feb 2023 07:11 AM (IST)

    35 वर्षीय तरुणाची जंगलात दुप्पट्याने गळफास लावून आत्महत्या

    भंडारा  : प्रदीप देविदास वलथरे असे मृताचे नाव

    महालगाव जंगलात झाडाला दुपट्टा बांधून गळफास लावलेल्या अवस्थेत प्रदीपच्या मृतदेह असल्याची माहिती काका प्रेमलाल वलथरे यांनी यांना मिळाली

    पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविन्यात आला आहे पुढील तपास करीत आहेत.

  • 22 Feb 2023 06:39 AM (IST)

    भंडारा जिल्हा झाला जातिवाचक नावातून मुक्त

    आता समाज सुधारकाच्या नावावरून एखादा भाग ओळखला जाणार

    राज्य सरकारच्या निर्णयानंतर भंडारा प्रशासन सुद्धा नावे बदलण्याच्या कामाला लागले

    जिल्ह्यातील 49 पैकी 46 नावे बदलण्यात आले

    सामाजिक सलोखा, आणि सौदार्ह निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वाढण्यास होणार मदत

  • 22 Feb 2023 06:37 AM (IST)

    धारावीच्या शाहू नगरमध्ये भीषण आग

    एक वॉटर टँकर, 8 जेठी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी अधिकारी घटनास्थळी दाखल

    पहाटे 4 वाजून 22 मिनिटांनी लागली आग

    आग नियंत्रणात आणण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

    जीवित वा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही

  • 22 Feb 2023 06:33 AM (IST)

    निवडणूक आयोगाविरोधातल्या याचिकेवर आज दुपारी सुनावणी

    तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठांसमोर होणार सुनावणी

    सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासह दोन न्यायमूर्तींचा खंडपीठात समावेश

    पी. नरसिम्हा आणि जे बी पार्डीवाला या दोन न्यायमूर्तींचा खंडपीठांमध्ये समावेश

    आज दुपारी साडेतीन वाजता उद्धव ठाकरे यांच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याबाबतच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

  • 22 Feb 2023 06:20 AM (IST)

    बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये तीन प्रश्नांची बोर्डाकडून गोंधळ

    इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये A 3 प्रश्न परीक्षकांना सूचनेचा

    तर A 4 प्रश्नाचं उत्तरचं प्रश्नामध्ये

    A5 हा प्रश्नच विद्यार्थ्यांना समजला नाही

    बोर्डाकडून काल इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये झालेल्या गोंधळाची विद्यार्थ्यांना मार्क मिळणार का ?

  • 22 Feb 2023 06:18 AM (IST)

    एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर मागे

    अखेर 39 तासांनी विद्यार्थ्यांनी घेतलं आंदोलन मागे

    शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थ्यांनी आपला आंदोलन मागे घेतलं

    विद्यार्थ्यांची एक समिती स्थापन करून स्वतः शरद पवार मुख्यमंत्र्यांसोबत बैठक करणार आहेत

  • 22 Feb 2023 06:15 AM (IST)

    राज्यातील महाविद्यालयीन आणि विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आजपासून संप

    औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आजपासून काम बंद आंदोलन

    महाविद्यालय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी 16 फेब्रुवारीला लक्षणिक आंदोलन केले होते

    सातवा वेतन लागू करणे, विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यास मान्यता द्यावी,

    2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी आदी मागण्यांसाठी संप

Published On - Feb 22,2023 6:11 AM

Follow us
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.
राणांच्या सभेत राडा; शिवीगाळ, खुर्च्या फेकून मारल्या, अल्लाहच्या घोषणा
राणांच्या सभेत राडा; शिवीगाळ, खुर्च्या फेकून मारल्या, अल्लाहच्या घोषणा.
भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध अन् महायुतीत अजित पवारांची कोंडी
भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध अन् महायुतीत अजित पवारांची कोंडी.
..तेव्हा गमंत केली आता नको, अजितदादांचा बारामतीकरांना विनंती वजा इशारा
..तेव्हा गमंत केली आता नको, अजितदादांचा बारामतीकरांना विनंती वजा इशारा.
दापोलीत दादागिरीवरून हल्लाबोल, बर्फावर झोपवण्याचं आव्हान; कोणात जुंपली
दापोलीत दादागिरीवरून हल्लाबोल, बर्फावर झोपवण्याचं आव्हान; कोणात जुंपली.
प्रचार तापला, 'व्होट जिहाद'ला 'धर्मयुद्धा'नं उत्तर, फडणवीसांचा पलटवार
प्रचार तापला, 'व्होट जिहाद'ला 'धर्मयुद्धा'नं उत्तर, फडणवीसांचा पलटवार.
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.