मुंबई : राज्याच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज तिसऱ्या दिवशीही सलग सुनावणी होणार आहे. यावेळी ठाकरे गटाचे वकील काय युक्तिवाद करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा प्रचारासाठी पुण्यात तळ. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
लवकरच नवीन दर होतील लागू
अदानी आणि टाटांचा वीज दरवाढीचा प्रस्ताव
दोन्ही कंपन्यांनी पुढील वर्षासाठी मात्र दिला दर कपातीचा प्रस्ताव
बेस्टने मात्र दोन्ही वर्षी दिला दर कपातीचा प्रस्ताव
महावितरण कंपनीचाही दरवाढीचा प्रस्ताव, वाचा सविस्तर
हिंडनबर्ग रिसर्च अहवालानंतर त्सुनामी
एका महिन्यानंतर अब्जावधी रुपयांचा बसला फटका
कंपन्यांच्या शेअर्समध्ये 21.7 टक्के ते 80 टक्क्यांपर्यंत घसरण
अहवाल सार्वजनिक होऊन एक महिना उलटला, वाचा बातमी
नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांचा जल्लोष
Parali, Beed | संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन
खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत बेताल वक्तव्याप्रकरणी राऊत यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन
परळीत शिवसेनेकडून राऊत यांच्या फोटोला जोडे मारुन निषेध
राणी लक्ष्मीबाई टावर येथे जोडे मारो आंदोलन
आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा सहभाग.
लोकांचे प्रश्न, महागाईच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष – सुप्रिया सुळे
त्यांचेच आमदार म्हणत आहेत 50 खोके एकदम ओके – सुप्रिया सुळे
सर्व सामान्य लोकांना दोन वेळचं जेवणही मिळत नाही हे आजचं वास्तव आहे – सुप्रिया सुळे
उत्पादन शुल्क घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भात समन्स
गोंडपिपरी येथे आहे कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह
मद्यधुंद अवस्थेत शिरून अखिल ताडशेट्टीवार या तरुणाने घातला गोंधळ
एका युवतीचा पाठलाग करत वसतिगृहात शिरून शिवीगाळ
पोलिसांनी गुन्हा दाखल करून सुरू केला तपास
12 वीच्या उत्तरपत्रिका तपसणीवर मॉडरेटरचा बहिष्कार
12 वीच्या उत्तरपत्रिका तपासणी येणार अडचणीत
जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी उत्तरपत्रिका तपसणीवर बहिष्कार
औरंगाबादच्या एचएस्सी बोर्डसमोर परिक्षकांचे आंदोलन सुरू
जुन्या पेंशन योजनेसाठी परिक्षकांची घोषणाबाजी सुरू
परीक्षकांच्या बहिष्कारामुळे 12 विचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान मैदानातच खेळाडूंची फ्रीस्टाइल हाणामारी
बिजिएम स्पोर्ट्स आणि झुंजार क्लबच्या सामन्यात खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावले
छत्रपती राजश्री शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या सतेज चषक स्पर्धेवेळी प्रकार
कोल्हापूरच्या फुटबॉलला पुन्हा एकदा गालबोट
बुधवारी सामान्यादरम्यान घडला प्रकार
चिंचवड : महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी आज आमदार रोहित पवार शहरात,
आमदार रोहित पवार किवळे गावातील ग्रामदैवत बाबदेव महाराज यांचे दर्शन घेत करणार प्रचाराला सुरुवात,
विविध भेटीगाठी, पदयात्रा करत करणार नाना काटे यांचा प्रचार.
कोल्हापूरमधील शेतकऱ्यांची बँक टीडीसी बँकचे खातेदार व शेतकरी संस्थेचे पदाधिकारी किरीट सोमय्या यांच्या भेटीला
टिडीसी बँकेचे नाव खराब करू नये अशी पदाधिकारी किरीट सोमय्या यांना करणार मागणी
वारंवार किरीट सोमय्या करत असलेल्या आरोपवरून शेतकरी शंस्थेचे पदाधिकारी व अध्यक्ष नाराज
12 तालुक्यातील महत्वचे पदाधिकारी भेटीला
भाजप नेत्यांनी जावेद अख्तर यांचं अभिनंदन केलं पाहिजे
अख्तर यांचं अभिनंदन संपूर्ण देशाने करावं
जावेद अख्तर यांच्या हिंमतीला दाद
पाकिस्तानात जाऊन त्यांना बोलण्यासाठी 56 इंचांपेक्षाही मोठी छाती लागते
संजय राऊत यांच्याकडून जावेद अख्तर यांचं कौतुक
सर्किट हाऊस येथून कोल्हापूर उद्योग भवन येथे जाण्यास निघाले,
कोल्हापूर उद्योग भवन येथे सहाय्यक निबंधक यांची घेणार भेट,
कोल्हापूर जिल्हा माध्यवर्ती सहकारी बँक येथे 156 कोटी घोटाळ्याचा घेणार अपडेट.
चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
मूल तालुक्यातील चितेगाव येथील घटना
लाखोळी खोदायला महेश तोडासे शेतात जात होता
वाघाने हल्ला करून महेशला जखमी केले
शेजारी असलेल्या झाडावर चढून वाचवला जीव
IND vs AUS : काँग्रेसचा हा नेता काय म्हणाला? वाचा सविस्तर…..
IND vs AUS ODI : भारताविरुद्ध वनडे सीरीजसाठी निवडलेल्या टीममध्ये कोण-कोण खेळाडू आहेत? वाचा सविस्तर…..
जिल्ह्यातील जिवती तालुक्यातल्या कुसुंबी गावातील आदिवासीच्या जमीन प्रकरणात दिला आदेश
एका सिमेंट कंपनीने ही जमीन बेकायदेशीररीत्या संपादित केल्याप्रकरणी सुरू आहे प्रकरण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार एमपीएससी विद्यार्थी सोबत घेणार होते बैठक
राज्यसेवेच्या वर्णनात्मक परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी 2025 पासून सुरू करा, या मागणीसाठी सलग चौथ्या दिवशीही एमपीएससी आंदोलन सुरू आहे
सोन्या-चांदीच्या किंमतीत चढउतार
2 फेब्रुवारीनंतर सोन्यात मोठी उसळी नाही
चांदीच्या किंमतीतही किलोमागे 12,000 पेक्षा अधिकची घसरण, वाचा बातमी
जिल्ह्यातील जिवती तालुक्यातल्या कुसुंबी गावातील आदिवासीच्या जमीन प्रकरणात दिला आदेश
एका सिमेंट कंपनीने ही जमीन बेकायदेशीररीत्या संपादित केल्याप्रकरणी सुरू आहे प्रकरण
राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाने समन्स जारी करूनही त्याचे पालन न केल्याप्रकरणी आयोगाने दिला कठोर आदेश
पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांना अंमलबजावणी करण्याचे दिले आदेश
आयोगाच्या या आदेशामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
सोलापुरातील हिरज गावातून 32 लाखाची गोवा बनावटीची विदेशी दारू जप्त
या कारवाईमध्ये व्हिस्की, मॅकडॉवेल, इम्पेरियल ब्लू या विदेशी ब्रांडचे लेबलही जप्त करण्यात आले
राज्य उत्पादन शुल्कच्या कारवाईमुळे बनावट दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आला
उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज येथे शेतात बांधलेल्या एका बंगल्यात हा सर्व साठा करण्यात आलाय
समता पार्टी आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार
मशालचिन्ह आम्हालाच मिळावं यासाठी याचिका दाखल करणार
ठाकरे गटाला मशाल चिन्ह दिल्यानंतर समता पार्टीचा आक्षेप
आज सकाळी 11 वाजता समता पार्टी याचिका दाखल करणार
आंतरराष्ट्रीय बाजारात भावात 2 डॉलरपेक्षा अधिकची घसरण
गेल्या महिन्याभरात क्रूड ऑईल घसरणीवर
देशात पेट्रोल-डिझेलचे भाव कधी होणार कमी
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिलेले संकेत कधी येणार प्रत्यक्षात, बातमी एका क्लिकवर
सर्वप्रथम ‘या’ चित्रपटात दोघे एकत्र आले होते. वाचा सविस्तर….
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आज T20 सेमीफायनलचा सामना खेळला जाणार आहे. भारतासाठी हे चॅलेंज खूप कठीण असणार आहे. वाचा सविस्तर….
सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर आज सुनावणी
आज सुप्रीम कोर्टात शिवसेनेचे वकील युक्तिवाद करणार
गेल्या दोन दिवसात ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद
महेश जेठमालानी, नीरज कौल आज एकनाथ शिंदे यांच्या गटासाठी युक्तिवाद करणार
अमरावती : अमरावती, अकोला, यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यातील चार हजार विद्यार्थ्यांची दांडी.
विद्यार्थ्यांनी घेतला इंग्रजी पेपरचा धसका,
अमरावती विभागातील 97.19 टक्के विद्यार्थ्यांची इंग्रजीच्या पेपरला हजेरी.
523 केंद्रांवर 12 वीच्या परीक्षेला सुरुवात.
मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
प्रकाश सुर्वे यांना गेल्या अनेक दिवसांपासून घसादुखी आणि खोकल्याचा त्रास होत होता
सध्या सुर्वे हे मुंबईतील रुग्णालयात दाखल असून तेथून त्यांची कामे करत आहेत
प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते वैद्यकीय उपचारादरम्यान काम करताना दिसत आहेत
प्रकाश सुर्वे हे 18 फेब्रुवारीपासून रुग्णालयात दाखल आहेत
कल्याणला वळसा घालून भिवंडी मार्गे ठाणे ते मुंबईचा प्रवास डोंबिवली मोटा गाव मानकोली उड्डाण पुलामुळे अवघ्या काही मिनिटात होणार
पूलाचे काम 84 टक्के पूर्ण झाले असून लवकरच खासदार श्रीकांत शिंदे पाहणी करून पूल वाहतूकीसाठी एप्रिल महिन्यात खुला करणार
शिवसेना शिंदे गट युवा सेना नेते दीपेश म्हात्रे यांची माहिती
नेरळच्या मुख्य बाजारपेठेतील मोबाईल वर्ल्ड नावाच्या दुकानात चोरी
चोरट्याने 15 लाखांचे मोबाईल नेले चोरून
गल्ल्यात असलेली 80 हजार रुपयांची रोख रक्कमही चोरट्याने चोरून नेली
चोरीची घटना सीसीटीव्हीत झाली कैद
चार महिन्यापूर्वी झाली होती तडीपारी
नवी मुंबई उपायुक्त विवेक पानसरे यांनी केले होते तडीपार
मनोहर मढवी ठाकरे गटाचे नवी मुंबईतील मोठे नेते
मनोहर मढवी यांच्या तडीपारीला स्थगिती मिळाल्याने ठाकरे गटात आनंदाचे वातावरण
शिवासेना मध्यवर्ती कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची बैठक पार पडली
कसबा विधानसभा मतदार संघातील अनेक व्यापारी, मुख्य गणेश मंडळाचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
कसबा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या बैठका पार पडत आहेत