मुंबई : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कागल येथील घरावर ईडीने छापे मारले आहेत. त्यामुळे मुश्रीफ समर्थकांनी जोरदार निदर्शने केली आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी रुग्णालयात जाऊन राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची भेट घेतली. तसेच धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
अशोकराव भांगरे यांचे निधन
हृदय विकाराच्या झटक्याने अशोक भांगरे यांचे निधन झाले
अकोले तालुक्यातील आदिवासी समाजाचे नेते अशोक भांगरे होते
अगस्ती साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष
अशोकराव भांगरे यांच्या निधनाने अकोले तालुक्यावर शोककळा
कांदिवली एकता नगरमध्ये ग्राउंड प्लस दोन झोपड्या पडल्याची घटना
एकता नगर, कांदिवली पश्चिम, मुंबई येथे असलेली एक ग्राउंड प्लस टू झोपडी अचानक कोसळली.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीएमसीचे नाले खोदण्याचे काम सुरू होते, त्याचवेळी नाल्याला लागून असलेली एक झोपडी खाली पडली.
या घटनेमध्ये कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही आणि कोणीही अडकलेले नाही.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा घनाघात
मिरजेत भाजपा आमदाराच्या भावानं केलेला प्रकार हा प्रशासनाला हाताशी धरूनच
मिरजेतील पाडकाम प्रकरणात पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी सामील असल्याचा जयंत पाटलांचा आरोप
भाजपाकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचा जयंत पाटलांचा आरोप
नवी दिल्ली :
आंतरराष्ट्रीय इंदिरा गांधी विमानतळावर मोठी खळबळ
दिल्लीमधून पुण्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा कॉल
दिल्ली पोलिसांकडून आणि सीआयएसएफकडून विमानाची तपासणी सुरू
सर्व प्रवाशांना सतर्क राहण्याची सूचना
स्पाइस जेट कंपनीचे विमान
प्रवासी विमानात बसण्यापूर्वीच दिल्ली विमानतळावर आला फोन
कॉल
विमानाची कसून तपासणी
विमानाची तपासणी झाल्यानंतर फोन कॉलमध्ये तथ्य नसल्याचे समोर
विमानात कोणतीही संशयित वस्तू न सापडल्याने प्रवाशांसह विमान लवकरच पुण्याला रवाना होणार
धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना मिळणार ः खा. नवनीत राणा
अमरावती
अमरावतीत युवा स्वाभिमानच्या वतीने कृषी महोत्सवाचे आयोजन
यावेळी खासदार नवनीत राणा यांचे ठाकरे शिंदे यांच्या शिवसेना चिन्हावरील वादावर वक्तव्य
येत्या निवडणुकीत धनुष्यबाण चिन्हं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानांच मिळेल
नवनीत राणा यांनी व्यक्त केला विश्वास
सांगली
शिराळा तालुक्यातील तडवळे गावात धक्कादायक घटना
ट्रॅक्टर खाली येणाऱ्या आपल्या मुलांना वाचवताना आईचा दुर्दैवी मृत्यू
घटनेमुळे सर्वत्र हळहळ
चंद्रकांत पाटील ऑन विरोधक
भाषण करताना मला वर्तमान पत्रात, टीव्हीत काय मेसेज जाणार, कुणी माझा काय मेसेज पाठवायचं ठरवलं आहे, याचा विचार करावा लागतो
केवळ मी बोलून चालत नाही, कुणीतरी त्याची स्कीम तयार करत की याने काही बोलल्यानंतर त्याचा असा अर्थ लावायचा
असा मस्त प्रोग्राम तयार होतो
आणि त्याला इको क्रीयट करणं म्हणतात, हा बोलला तो बोलला
संध्याकाळपर्यंत मीच कन्फ्युज होतो, मी असं बोललो की काय
पण माझीही यंत्रणा मोठी आहे, माझं प्रत्येक भाषण कॅसेट होतं
त्याच्यामुळे विरोधक मला अडचणीत आणताना थकतात बिचारे, मला त्यांची कीव येते
दर दोन महिन्यांनी काहीतरी काढतात
नाशिक
– भाजप कोअर कमिटी सदस्यांनी आणले AB फॉर्म
– सत्यजित तांबे यांच्यासाठी एक फॉर्म
– तर दुसरा फॉर्म अन्य उमेदवारासाठी
– अद्याप पर्यंत कुणालाही AB फॉर्म दिलेला नाही
अतिक्रमण धारकांची याचिका न्यायालयाने फेटाळली
न्यायालयाच्या निर्णयानंतर विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याचा मार्ग मोकळा
अतिक्रमण कारवाई विरोधात गेल्यावर्षी गडावरील 25 अतिक्रमणधारकांनी घेतली होती न्यायालयात धाव
अतिक्रमणाची बाब दिवाणी न्यायालयाच्या कार्यकक्षेत येत नसल्याचं न्यायालयाचे मत
ठाणे : शाळेतील शिक्षक उपस्थित नसल्याने घडला प्रकार,
काल संध्याकाळी मुलाला ठाण्यातील सिविल रुग्णालय येथे घेऊन आणण्यात आले,
परंतु मुलाचा मृत्यू झाल्याची डॉक्टरांनी दिली माहिती,
ज्या शाळेत मुलाचा मृत्यू झाला त्या शाळेत नागरिकांनी घातला घेराव,
कापूरबावडी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा घेत आहे तपास,
मुलाच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट.
पोषण ट्रॅकर अॅपसाठी मिळणार नवे मोबाईल
राज्य शासन करणार १४० कोटी रुपयांची तरतूद
कर्मचाऱ्यांच्या मानधनातही होणार १० टक्क्यांनी वाढ
विश्वसनीय सूत्रांची माहिती
२६ जानेवारीपर्यंत होणार घोषणा
शेतकरी महिलेसह तिच्या मुलाला सुनेला बेदम मारहाण
औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील अंधानेर गावातील धक्कादायक घटना
मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
कन्नड शहर पोलिसात गुन्हा दाखल
चार आरोपींविरोधात पोलिसात गुन्हा दाखल
पुणे
तरुणांनी हातात कोयता हातात घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये
पोलिसांकडून कारवाई केली जाणार
आतापर्यंत पोलीस कारवाईत 183 कोयते जप्त
75 गुन्हेगारांवर कारवाई
पुणे पोलीसांकडून पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बिग ऑपरेशन सुरू
शहरात सर्वत्र गुन्हेगारांवर कारवाई
पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांची माहिती
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट झाली. इंदुमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामा संदर्भात चर्चा करण्यात आली. – ॲड. प्रकाश आंबेडकर
अंबड पोलिसांनी अंबड लिंक रोडवरील एका दुकानातून हस्तगत केले 12 कोयते,
आरोपी महेबुब खानला पोलिसांनी केली अटक,
कोयत्यांची कोणाला विक्री होणार होती ? यासह अधिक तपास सुरू,
पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये कोयता गॅंग ऍक्टिव्ह ?
गृहमंत्री उद्या दुपारी जम्मूला पोहोचतील आणि तेथून राजौरीला जातील
गृहमंत्री राजौरीतील डांगरी गावालाही भेट देतील, जिथे स्थानिक लोकांची हत्या करण्यात आली होती
गृहमंत्री मृतांच्या कुटुंबीयांचीही भेट घेणार आहेत
जम्मू राजभवनात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर गृहमंत्री सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेतील
त्यानंतर गृहमंत्री स्थानिक भाजप नेत्यांचीही बैठक घेणार आहेत
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या तयारीबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे
अर्बन बँक निवडणूक बिनविरोध
बँकेवर भाजपच्या परिचारक गटाचा झेंडा, पण प्रशांत परिचारकांची माघार
प्रशांत परिचारक यांचे बंधू राजाराम परिचारक बँकेवर
गेल्या 20 वर्षापासून प्रशांत परिचारक बँकेवर संचालक आणि चेअरमन म्हणून होते कार्यरत
सोलापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून पंढरपूर अर्बन बँकेची ओळख
दिल्लीनंतर पुणे शहराची हवा सर्वाधिक प्रदूषित
गेल्या साठ दिवसात गुणवत्ता खराब प्रवर्गात गेली आहे
सफर संस्थेने काल मांडलेल्या अहवालानुसारची माहिती
धुलिकणांतून प्रदूषित होणाऱ्या शहरात दिल्ली पुणे मुंबई अहमदाबाद शहरे आघाडीवर
भाजपा व महाविकास आघाडी पाठोपाठ वंचीत व आप ने घेतली पदवीधर निवडणुकीत उडी,
वंचीत वाहुजन आघाडी कडून अनिल अमलकार करणार आपला उमेदवारी अर्ज करणार दाखल,
आम आदमी पार्टीने पदवीधर निवडणुकीत घेतली उडी,
आम आदमी पार्टी कडून भारती दाभाडे यांचा नामांकन अर्ज केला दाखल.
आरोपी विक्रम सिंगला पोलिसांकडून अटक
गुजरातमधील मोरबी या ठिकाणाहून अटक केल्याची मुंबई पोलिसांची माहिती
नवी दिल्ली : समता पार्टी सर्वोच्च न्यायालयात जाणार,
दिल्ली उच्च न्यायालयाने दोन वेळा समता पार्टीची याचिका फेटाळली,
मशाल चिन्हावर अजूनही समता पार्टीचा दावा,
निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल चिन्ह दिल्याने समता पार्टीचा आक्षेप,
येत्या 2 दिवसात सर्वोच्च न्यायालयात याबाबतची याचिका समता पार्टी दाखल करणार.
कोल्हापूर : काल बारा तासाहून अधिक काळ ईडी कडून सुरु होती करावाई,
कारवाई सुरू असताना मोठ्या संख्येने जमले होते मुश्रीफ समर्थक,
आज मात्र निवासस्थाना बाहेर शुकशुकाट.
नवी दिल्ली : 31 जानेवारी पूर्वी होणार केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल,
16, 17 जानेवारी रोजी भाजप कार्यकारिणीची नवी दिल्लीत बैठक,
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल होणार,
मोदी शहा यांच्याकडून कुणाचा पत्ता कट ? कुणाला नवी संधी याची जोरदार चर्चा,
महाराष्ट्रातील शिंदे गटाला दोन मंत्री पद दिली जाण्याची शक्यता.
पंजाब : भाजपचे महासचिव विनोद तावडे चंदीगड मध्ये दाखल,
चंदिगड महापौर पदासाठी आप आणि भाजपमध्ये मुख्य लढत,
पंजाब मध्ये सरकार बदलल्यामुळे भाजपसाठी महापौर पदाची लढाई महत्त्वाची,
महापौर पदाच्या निवडणुकीची जबाबदारी विनोद तावडे यांच्यावर.
परशुराम सेवा संघ आजच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला विरोध करणार
याआधी पुस्तकावर बंदीसाठी परशुराम सेवा संघाचे पुणे पोलिसांना निवेदन
विलास खरात यांच्या या पुस्तकाचे आज प्रकाशन
हे पुस्तक जातीय द्वेष निर्माण करणारं असल्याचा परशुराम सेवा संघाचा आरोप
चोप देतानाचा व्हीडीओ सीसीटीव्ही कँमेऱ्यात कैद
एका गुंडाला पोलिसांनी घेतलं ताब्यात
शहरात कोयते दाखवून दहशत माजवण्याच्या प्रकारात वाढ
पोलीस महासंचालकांनीही घेतली दखल
कोयता गँगचा बंदोबस्त करणार
पिंपरी चिंचवड : यामध्ये सातवीत शिकणारी विद्यार्थिनीला इजा पोहचली आहे,
ही घटना निगडी मधील यमुनानगर येथील एसपीएम शाळेत घडली.
शाळेतील काही खोल्यांमध्ये पावसाचे पाणी गळत असल्याने स्लॅबवर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू आहे.
त्याचवेळी आज दुपारी सातवीच्या वर्गातील स्लॅबच्या प्लास्टरचा काही भाग अचानक कोसळला,
कोसळले प्लास्टर एका विद्यार्थ्यीनीच्या हातावर पडल्याने ती या जखमी झाली, तिला एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे,
ही घटना घडली तेंव्हा वर्गातील सर्व विद्यार्थी मैदानावर होते, ही सुदैवाची बाब ठरली,
जखमी विद्यार्थ्यीनी शाळेची बॅग घ्यायला आली तेंव्हाच ही घटना घडली.
किरीट सोमय्यांना हसन मुश्नीफ ग्रामविकास मंत्री असताना करण्यात आली होती जिल्हाबंदी
ईडीच्या कारवाईनंतर सोमय्यांचा कोल्हापूर दौरा
कोल्हापूर दौऱ्यात सोमय्यां कारखाना स्थळावर जाणार?
सोमय्या कोल्हापूरात जाऊन मुश्नीफांना आव्हान देणार?
राजे लखुजीराव जाधव यांच्या वंशजाकडून माँ जिजाऊ यांचे पूजन
सिंदखेराजा येथे साजरा होतोय 425 वा जिजाऊ जन्मोत्सव
लाखो जिजाऊ भक्त येणार अभिवादन करण्यासाठी
जिजाऊ जन्मस्थळ विद्युत रोषणाईने उजळले
फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरू… प्रकृती स्थिर असल्याची माहीती…
संजय राऊतांनंतर त्यांचे भाऊ सुनिल राऊत यांचीही अँजिओप्लास्टी
छातीत 3 ब्लॉक होते अशी माहिती
पुढार्यांना जास्त धावपळ करावी लागते, त्यामुळे पुढार्यांचे जास्त अपघात होत आहेत
माझ्या ड्रायव्हरच्या हातून एकदाच अपघात झाला होता
नियम पाळून चालले त्याचा फायदा होतो
जळगाव बस स्थानकावर आयोजित अपघात सुरक्षा सप्ताह अभियान कार्यक्रमात गुलाबराव पाटील बोलत होते
या आगीत एक घर जळून पूर्ण खाक झालं आहे
ज्या रूममध्ये आग लागली ती रूम बंद होती, त्यामुळे यात मोठी दुर्घटना टाळली
अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे
आगीनंतर काही वेळ दगडी चाळ परिसरात भीतीचे वातावरण होते