मुंबई: राज्यभरात आज मकर संक्रातीचा उत्सव साजरा होत आहे. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात पुण्यातील खेडमधील पैलवान शिवराज राक्षे हा महाराष्ट्र केसरी ठरला. नाशिक पदवीधर मतदारसंघात शुभांगी पाटील यांना शिवसेनेसह महाविकास आघाडीचा पाठिंबा. त्यामुळे नाशिक पदवीधर निवडणूक चुरशीची होणार. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात भेटीत होणार चर्चा
शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी आज संध्याकाळी 6 वाजता होणार भेट
काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची माहिती
अपघातानंतर धनंजय मुंडे यांच्यावर गेल्या आठवड्यापासून मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू आहेत
आज खासदार संजय राऊत यांनी मुंडेंची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली
या आधी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही मुंडे यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली होती
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे घेणार शरद पवार यांची भेट
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी शिवराज रक्षेला भेटायला बोलावलं
आज सायंकाळी मोदी बागेत शिवराज घेणार शरद पवारांची भेट
ब्रह्मपुरी या त्यांच्या मतदारसंघात सध्या तीन दिवसीय ब्रह्मपुरी महोत्सव सुरू आहे
यानिमित्त तीन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
त्याच दरम्यान वेळात वेळ काढून मकर संक्रांती निमित्त वडेट्टीवार यांनी सर्वांसोबत पतंगबाजीचा आनंद लुटत दिल्या मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा
स्वतः वडेट्टीवार पतंगबाजीसाठी मैदानात उतरल्याचे बघून सर्वच कार्यकर्त्यांना जोश आला
आबालवृद्धही वडेट्टीवारांसोबत पतंगबाजीचा आनंद लुटण्यासाठी मैदानात हजर झाले
क्रूड ऑईलच्या किंमतीत जवळपास 8 टक्क्यांची वाढ
कच्चे तेल महागल्याचा परिणाम दिसून येणार का
पेट्रोल -डिझेलच्या किंमती जैसे थे, कोणताही बदल नाही
प्रत्येक दिवशी सकाळी 6 वाजता नवीन दर लागू होतात
मागील आठवड्यात सातही दिवस पुणे शहराचा पारा 10 अंश सेल्सिअसच्याखाली
पुढील दोन ते तीन दिवस थंडी वाढणार, पुणे हवामान वेधशाळेचा अंदाज
आजही पुण्याचे तापमान 10°c च्या खाली
महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील थंडी वाढण्याची शक्यता
पुढील दोन दिवस महाराष्ट्रात गारठा वाढणार, हवामान खात्याचा अंदाज
तब्बल दोन वर्षानंतर आज मुंबईत टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत.
जवळपास 55 हजार धावपटू हे सिलिंकवरून धावताना दिसत आहेत
ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे
तर जागोजागी अनेक स्वयंसेवकांकडून धावपटूंना पाण्याची व्यवस्था करण्यात आलीय
घरासमोर असलेली वाहनं फोडून खाली पाडली
इमामवाडा परिसरात दहशत
पोलीस घटनास्थळी, अज्ञान आरोपींचा शोध सुरू
शुक्रवारी 8050 च्या दराने कापूस खरेदी
यंदाच्या हंगामात कापसाच्या बाजारात सारखी अस्थिरता दिसून येत आहे
अगदी सोने-चांदीच्या बाजारपेठेपेक्षा पांढऱ्या सोन्याच्या दरात कमालीची अस्थिरता जाणवत आहे
शेतकरी कापूस विक्री बाबत संभ्रमावस्थेत आहेत
संक्रातीनंतर कापूस बाजार सावरेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे
काही दुकानांची तोडफोड तर काही जणांमध्ये हाणामारी
वादानंतर शिरपूर जैन कडकडीत बंद
घटनेची माहिती कळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल
माहीमपासून या मरेथॉनला सुरूवात झाली आहे
पहिली मॅरेथॉन 42 किलोमीटर असणार
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते मुंबई मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात