Maharashtra Live Updates : ‘भाजपचं गुपित उघड करणार, तीच आमची रणनीती’, नाना पटोले यांची महत्त्वाची प्रतिक्रिया
Maharashtra Breaking News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
मुंबई: ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे राऊत यांचा जामीन कायम राहतो की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उत्तर भारतात थंडीची लाट कायम. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
LIVE NEWS & UPDATES
-
गव्हाच्या किंमती पुन्हा गगनाला
यंदा गव्हाच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता
उत्तर प्रदेश, बिहारमध्ये आताच गव्हाच्या किंमत 3000 रुपये प्रति क्विंटल
गव्हाच्या किंमती 3300 ते 3500 रुपये प्रति क्विंटल होण्याची शक्यता
राजस्थानमध्ये गव्हाच्या किंमती 2800 रुपये प्रति क्विंटलवर
8 जानेवारी 2023 रोजी गव्हाचा भाव 2788 रुपये प्रति क्विंटलवर पोहचला
गेल्या वर्षीच्या तुलनेत भावात जवळपास 20 टक्क्यांची वाढ
-
सांगली शहरातील विलिंगडन कॉलेजमध्ये सिक्युरिटी गार्डकडून विद्यार्थ्यांना लाठीने बेदम मारहाण
पाठलाग करून घरात जाऊन पुन्हा मारहाण
चार सेक्युरिटी गार्डवर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
निष्पाप विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्याच्या धक्कादायक घटनेमुळे शहरात खळबळ
-
-
खाद्यतेलाच्या किंमतीत पुन्हा एकदा घसरण
मोहरी, शेंगदाणा तेलाचे भाव घसरले
दिल्लीसह इतर बाजारात खाद्यतेलाचे भाव कमी
येत्या काही दिवसांत भावात 30-70 टक्क्यांची घसरण
आयात शुल्क माफीमुळे केंद्र सरकारचा महसूल बुडाला
-
‘भाजपचं गुपित उघड करणार, तीच आमची रणनीती’, नाना पटोले यांची महत्त्वाची प्रतिक्रिया
ठाकरे गट आणि काँग्रेसची बैठक संपली उद्या पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली जाणार “नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी भाजपचा कोण उमेदवार आहे, त्यांना तिथे उमेदवार मिळाला नाही, त्यांनी जे गुपित ठेवलंय ते उघड करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तीच आमची रणनीती’ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया
-
राज्यात अंड्यांचा तुटवडा
दररोज जवळपास 1 कोटी अंड्यांचे शॉर्टेज
राज्यात प्रत्येक दिवशी 2.25 कोटींहून अधिक अंड्यांची विक्री
तुटवड्यामुळे रोजच्या विक्रीवर होत आहे परिणाम
महाराष्ट्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने कसली कंबर
ग्राहकांना अंड्यांचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी योजना
कर्नाटक, तेलंगाणा आणि तामिळनाडू राज्यातून मोठ्या प्रमाणात अंड्यांची खरेदी
अंड्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी उपाय योजना
1,000 पिंजरे, 21,000 रुपयांच्या सवलतीच्या दरात 50 व्हाईट लेघॉर्न कोंबड्या देणार
राज्य सरकारकडे पाठविला पशसंवर्धन विभागाने प्रस्ताव
-
-
पेन्शनबाबत इतर राज्यांना जे शक्य आहे ते आपल्याला का नाही; सत्यजित तांबे यांचा सवाल
पेन्शन बाबत इतर राज्यांना जे शक्य आहे ते आपल्याला का नाही
हा प्रश्न तडीस नेण्यासाठी ताकदीने प्रयत्न करणार
आपण सर्व जण मिळून सरकारवर दबाव गट निर्माण करावा लागणार
तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची माझी तयारी
मागच्या 15 वर्षात माझ्या वडिलांवर जे प्रेम केलं तसेच प्रेम माझ्यावर करा
कुणाच्याही विरुद्ध भांडणाची वेळ येवो, मी आपल्या सोबत राहील
-
नवीन ईव्हीएम मशीनवर येत्या निवडणुकांची मदार
2023 मध्ये 9 राज्यात विधानसभेच्या निवडणुका
त्यातील 5 राज्य मोठी, सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी
2024 मध्ये लोकसभेचा महासंग्राम रंगणार
सरकारी कंपन्यांना नवीन ईव्हीएम मशीन खरेदीचे कंत्राट
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) वर मोठी जबाबदारी
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) मिळाले कंत्राट
नवीन ईव्हीएम मशीनसाठी 1,335 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीकेसीत दाखल, पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यावरुन घडामोडींना वेग
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईच्या बीकेसीत दाखल
एकनाथ शिंदे यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळाची पाहणी
विशेष म्हणजे दुपारीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांच्या सभास्थळाची पाहणी केली होती
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर, त्याच पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग
-
धनशक्ती आम्ही कशी पाडणार आहोत, हे आम्ही 2 तारखेला दाखवून देणारः शुभांगी पाटील यांची तांबेंवर टीका
जळगाव
जो खुर्चीसाठी खेळी करू शकतो, त्याच्याकडे बघण्यात अर्थ नाही, जो एकनिष्ठ राहू शकत नाही, त्या गोष्टींकडे मी लक्ष देत नाही
माझा जनतेवर विश्वास आहे, जनता एवढी दुधखुळी नाही, जनता कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही
जनता, पदवीधरांमध्ये खूप उत्साह आहे, ते 30 तारखेची वाट पाहत आहेत
धनशक्ती आम्ही कशी पाडणार आहोत, हे आम्ही 2 तारखेला दाखवून देणार
-
आमदार कपिल पाटील यांचा सत्यजित तांबे यांना पाठिंबा
आमदार कपिल पाटील यांचा सत्यजित तांबे यांना पाठिंबा
कपिल पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला निर्णय
-
Pune Live- कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक
– भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर
– पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची भाजपची मागणी
– मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक किंवा मुलगा कुणाल टिळक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता
– मुक्ता टिळक यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा पराभव केला होता
– निवडणूक झाल्यास काँग्रेस कुणाला संधी देणार याकडे लक्ष
– राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील यांनीही पक्षाकडे मागितली उमेदवारी
-
राधिका मर्चंटच्या हातावर लागली अनंत अंबानी यांच्या नावाची मेहंदी
राधिका मर्चेंट लवकरच होणार सर्वात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या सून
मेंहदी सोहळ्यातील व्हिडीओ पाहून तुम्हीही अंबानी यांच्या होणाऱ्या सुनेचं कराल कौतुक… वाचा सविस्तर
-
IND vs NZ 1st ODI: Rohit Sharma च्या कॅप्टनशिपमध्ये विराट जास्त धोकादायक, सेहवाग-पॉन्टिंगच्या रेकॉर्डच खरं नाही
IND vs NZ 1st ODI: टीम इंडियाच्या निशाण्यावर आता न्यूझीलंड आहे. विराट या सीरीजमध्ये एक रेकॉर्ड करु शकतो. वाचा सविस्तर….
-
अमृता फडणवीस यांनी रिल स्टारसोबत धरला ‘तेरे नाल ही नचणा वे’ गाण्यावर ठेका
‘तेरे नाल ही नचणा वे’ या गाण्यावर रिल स्टारसोबत थिरकल्या अमृता फडणवीस; व्हिडीओ सर्वत्र व्हायरल
अमृता फडणवीस यांनीच्या त्यांच्या इनस्टाग्रामवरुन शेअर केला व्हिडीओ… वाचा सविस्तर
-
पिंपरी-चिंचवड, मावळ जिल्हाप्रमुखपदी शिवसेना ठाकरे गटाकडून नियुक्त्या जाहीर
पिंपरी चिंचवड : -शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुख पदी गौतम चाबुकस्वार,
पिंपरी-चिंचवड मावळ जिल्हाप्रमुख पदी माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांची निवड,
शिवसेना मध्यवर्ती कार्यलयातुन ही निवड करण्यात आली
गौतम चाबुकस्वार हे पिंपरी विधानसभेचे माजी आमदार
-
IND vs NZ 1st ODI: न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाने टॉस जिंकला, अशी आहे Playing 11
IND vs NZ 1st ODI: न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वनडेमध्ये कोणाला मिळाली संधी? वाचा सविस्तर….
-
IND vs NZ 1st ODI: CSK चा स्टार बॅट्समन वनडे सीरीजमध्ये टीम इंडियावर पडू शकतो भारी
न्यूझीलंड विरुद्ध सीरीजमध्ये MS Dhoni च्या फेव्हरेट प्लेयरपासून टीम इंडियाला अलर्ट राहण्याची गरज. वाचा सविस्तर…
-
Live- अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथे शंकर पटाचा आजचा शेवटचा दिवस…
आज शेवटच्या दिवशी महिला शेतकरी शंकर पटात हाकलणार बैलजोडी…
तबल 9 वर्षानंतर तळेगांव मध्ये भरला शंकर पट; शंकरपटात विदर्भासह महाराष्ट्रातील
नामांकित बैलजोड्या…
शंकर पट पाहण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी
-
Nashik Live- शिक्षक लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांची आज नाशिक मध्ये पत्रकार परिषद
– नाशिक विधान परिषद पदवीधर निवडणूक संदर्भात होणार आहे पत्रकार परिषद
– याच पत्रकार परिषदेत कपिल पाटील करणार पाठिंबा देण्यासंदर्भात घोषणा
– दुपारी 3.30 वाजात करणार घोषणा सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याची शक्यता
– सत्यजित तांबे देखील पत्रकार परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता
-
राज ठाकरे यांच्या दिमतीला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते
परळी: राज ठाकरे यांच्यासोबतचे चार आरोपी राष्ट्रवादीचे पदाधिकारी,
एक आरोपी भाजपचा पदाधिकारी,
मनसेकडून केवळ राज ठाकरे,
2019 मध्ये सर्व आरोपींचा मनसेला जय महाराष्ट्र,
राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क.
-
Sarfaraz Khan ला शतकानंतर कोच अमोल मजूमदार यांनी दिला खास सम्मान, आपली हॅट काढून सलामी दिली VIDEO
टीम इंडियात निवड न झाल्यामुळे त्याच्या मनात किती खदखद आहे, ते यातून दिसून आलं. शतक झळकवल्यानंतर सर्फराजन खानने सिद्धू मुसेवालाच्या स्टाइलमध्ये रिएक्ट केलं. वाचा सविस्तर…..
-
Raj Thackeray Parli Beed LIve : अटक वॉरंट अखेर रद्द; राज ठाकरे मुंबईच्या दिशेने
राज ठाकरे यांच्या विरोधातील अटक वॉरंट अखेर रद्द
राज ठाकरे यांना 500 रुपयांचा दंड ठोठावला
कोर्टाच्या निकालानंतर कोर्ट परिसरात जोरदार घोषणाबाजी… संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
-
Rishabh Pant Health महत्वाची अपडेट, डॉक्टरांनी ऋषभला अजून हॉस्पिटलमध्ये का ठेवलय?
Rishabh Pant Health: ऋषभ पंतला हॉस्पिटलमधून कधी डिस्चार्ज मिळणार? डॉक्टरांना काय पहायचय? वाचा सविस्तर….
-
National Live: तेलंगणा भाजप प्रमुख बंडी संजय यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल
कॉलेज प्रशासनाच्या तक्रारीनंतर बंडी साई भगीरथविरोधात गुन्हा दाखल
बंडी साई भगीरथ हा तेलंगणा भाजपचे प्रमुख बंडी संजय यांचा मुलगा
बंडी साई भगीरथने विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा व्हिडीओ झाला होता व्हायरल
आम्ही तपास हाती घेतला असून नोटीस बजावली जाईल- तेलंगणाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी
-
IND vs NZ 1st ODI: टीम इंडियानंतर न्यूझीलंडलाही झटका, त्यांचाही प्रमुख खेळाडू पहिल्या वनेडमधून बाहेर
IND vs NZ 1st ODI: आज होणाऱ्या पहिल्या वनडेआधी न्यूझीलंडलाही मोठा झटका बसलाय. वाचा सविस्तर….
-
केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद
नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होणार
येत्या वर्षभरात नऊ राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडणार
त्यापैकी तीन राज्यातील विधानसभा निवडणुकांची आज दुपारी अडीच वाजता घोषणा होणार
-
राज ठाकरे औरंगाबादेत दाखल, थोड्याच वेळात कोर्टात हजर राहणार
अटक वॉरंट रद्द करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे परळी कोर्टात हजर राहणार आहेत
त्यापूर्वीच मनसे पदाधिकाऱ्यांनी परळी शहरात राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर लावून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला
गोपीनाथ गड ते थेट न्यायालय रोड पर्यंत बॅनरबाजी करण्यात आलीय
-
National Live: चित्रपटांविषयी बोलणाऱ्या भाजप नेत्यांना मोदींचा कठोर संदेश
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या समारोपाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भाजप नेत्यांना कठोर संदेश
पक्षाच्या नेत्यांना अनावश्यक वक्तव्ये टाळण्याची दिली सूचना, वाचा सविस्तर
-
IND vs NZ 1st ODI: Rohit Sharma टीम इंडियातील ‘या’ स्फोटक बॅट्समनची बॅटिंग पोजिशन बदलणार
न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सीरीजआधी रोहित शर्माने पत्रकार परिषदेत एक गोष्ट स्पष्ट केलीय. वाचा सविस्तर….
-
Rohit Sharma ला कॅप्टनशिपवरुन हटवल्यानंतर एका खेळाडूच्या करिअरची होऊ शकते दुर्दशा
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, रोहित शर्माचा कर्णधारपदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर एका खेळाडूच करिअर सुद्धा संपू शकतं. महेंद्रसिंह धोनी टीम इंडियाच्या कॅप्टनशिपवरुन पायउतार झाल्यानंतर सुरेश रैनाच आंतरराष्ट्रीय करिअर संपुष्टात आलं. वाचा सविस्तर….
-
पिंपरी चिंचवड शहरात आजपासून आठ केंद्रावर कोव्हीशिल्ड लसीचे डोस मिळणार
पिंपरी चिंचवड : तब्बल दीड महिन्याच्या खंडानंतर महापालिकेकडे कोरोना प्रतिबंधक कोविशील्ड लस उपलब्ध झाली आहे,
8500 डोस उपलब्ध झाले असून आजपासून प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी 500 उपलब्ध असणार आहेत,
दरम्यान शहरातील लसीकरणाला दोन वर्ष पूर्ण झाली असून या कालावधीत 38 लाख 12 हजार 266 व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक डोस देण्यात आले.
-
चंद्रपूर जिल्ह्यात बनावट दारूचे मोठे रॅकेट, उत्पादन शुल्कची कारवाई
एक हजार बाटल्या जप्त : एकाला अटक, दुसरा चंद्रपुरातून फरार
राज्य उत्पादन शुल्क विभागाने सिंदेवाही तालुक्यातील मीनघरी येथे बनावट देशीदारूचा मोठा साठा जप्त केला आहे.
-
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत पुन्हा वृद्धी
क्रूड ऑईलच्या किंमतीत जवळपास 2 डॉलर प्रति बॅरलची वाढ
आज ब्रेंट क्रूडच्या किंमती 86 डॉलरच्या पुढे
दिल्लीत पेट्रोल 96.65 तर डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर
मुंबईत पेट्रोल 106.31 तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
कोलकत्तामध्ये पेट्रोल 106.03 आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
-
पुण्यातील मंगळवार पेठेतील जुना बाजार येथे दुकानांना मोठी आग
अग्निशमन दलाच्या आठ वाहने घटनास्थळी रवाना
आज विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू, आगीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट
सकाळी 7.30 वाजता लागली आग
अग्निशमन जवानांकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू
-
Bollywood News Live: अथिया शेट्टी-केएल राहुलच्या लग्नाची तयारी सुरू
टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात
केएल राहुलच्या मुंबईतल्या घराला सजावट, रोषणाई
सुनील शेट्टी यांच्या खंडाळा इथल्या फार्महाऊसवर पार पडणार लग्न, वाचा सविस्तर
-
कोल्हापूर उपनगरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच
शहराजवळील सरनोबतवाडीत दोन बंद घरे फोडली
दागिन्यांसह रोख रक्कम असा जवळपास दहा लाखांचा ऐवज केला लंपास
तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
गांधीनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद
-
उल्हासनगरमध्ये बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईचा धडाका
उल्हासनगर : अनधिकृतपणे पार्किंग केल्यास थेट गुन्हा दाखल,
पोलिसांकडून १७ दिवसात तब्बल ११ गुन्हे दाखल,
तीन जणांना कोर्टाने सुनावली शिक्षा.
-
पुण्यात आज परदेशी पाहुण्यांचा हेरिटेज वॉक
G20 परिषदेसाठी आलेले परदेशी पाहुणे, पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंना देणार भेट
आज सकाळी हे सगळे राजदूत पुण्यातील शनिवार वाडा, लाल महाल तसेच नाना वाडा या ऐतिहासिक ठिकाणी हेरिटेज वॉक करणार आहेत
त्यासोबतच हे पाहुणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला देखील भेट देणार आहेत
G20 परिषदेसाठी आलेल्या प्रतिनिधींचा हेरिटेज वॉक
-
BSF चा पाकिस्तानातून आलेल्या ड्रोनवर गोळीबार
सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफच्या जवानांना काल रात्री पाकिस्तानातून ड्रोन आल्याचा संशय आला. बीएसएफ जवानांनी त्या दिशेने गोळीबार केला. शोध मोहिमेदरम्यान गुरदासपूरच्या उंचा टाकाला येथे एका पॅकेटमध्ये 4 पिस्तुल, 8 मॅगझिन सापडले.
-
जगामध्ये आर्थिक मंदी मोठ्या देशांना आहे – नारायण राणे
आम्ही मंत्रीमंडळात आहोत पीएम मार्गदर्शन करत असतात,
आपल्याकडे येणार नाही पण आली तर जूननंतर अपेक्षित आहे,
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच मोठं वक्तव्य,
जूननंतर आर्थिक मंदी अपेक्षित आहे,
येऊ नये यासाठी मोदींचे प्रयत्न आहेत मंदीची झळ पोहोचू नये.
-
रत्नागिरीच्या शेट्येनगर भागात पहाटे 5 वाजता सिलेंडरचा स्फोट
2 जणांना बाहेर काढले, 2 जण अडकले
2 महिला अद्यापही घरात अडकून
दुमजली चाळीत असलेल्या घरात पहाटे 5 वाजता झाला स्फोट
-
मुंबईतील बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानावर होणाऱ्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या पार्किंगची व्यवस्था मुंबई विद्यापीठात
मुंबई विद्यापीठच्या आवारातील सुरक्षा भिंत तात्पुरती पाडली जाणार, युवासेना ठाकरे गटाचा भिंत पाडण्याच्या निर्णयाचा निषेध
विद्यापीठ आवारातील कंपाउंड वॉल तात्पुरत्या स्वरूपात तोडण्या संदर्भात बीएमसीचे मुंबई विद्यापीठाला पत्र
19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील विविध विकास कामांचे उद्घाटन, भूमिपूजन होणार आहे
या कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांची व्यवस्था ही विद्यापीठात केली जाणार आहे
कार्यक्रमसाठी आलेल्या नागरिकांची ये-जा करण्यासाठी विद्यापीठ आवारातील कंपाउंड वॉल तोडण्यात येणार आहे
त्यानंतर ही कंपाउंड वॉल बीएमसीकडून बांधून दिली जाणार आहे, असं आश्वासन पत्रात देण्यात आलं आहे
-
केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक
बैठकीत मोठे निर्णय होण्याची शक्यता
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीनंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक
शेतकरी आणि बेरोजगार युवकांसाठी केंद्र सरकार मोठ्या घोषणा करण्याची शक्यता
-
डोंबिवलीतून 10 लाख रुपये किंमतीचा घातक रसायनांचा साठा जप्त
टिळकनगर पोलिसांनी छापा टाकत केली कारवाई
कारवाईत टँकर चालकासह स्थानिक केमिकल माफिया पोलिसांच्या ताब्यात
गणेश सोनवणे व मुशरब खान अशी या आरोपींची नावे
अटक झालेल्या आरोपींपैकी एक आरोपीला कोरोनाची लागण
-
नवी मुंबईतील तळोजात एकाच रात्रीत 20 ते 25 गाड्यांचे पार्ट चोरून नेल्याची घटना घडली
नवी मुंबईतील तळोजात एकाच रात्रीत 20 ते 25 गाड्यांचे पार्ट चोरून नेल्याची घटना घडली
नवी मुंबईतील अनेक ठिकाणी पार्ट चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे
अनेक गाडी मालक चिंतेत, अनेक टुरिस्ट गाड्यांचे पार्ट चोरीला
इमारतीच्या समोरून गाडीचे पार्ट काढले
तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलीस अधिक तपास करत आहेत
-
गर्भलिंग निदान प्रकरणी कोल्हापुरात दोन ठिकाणी छापे, चौघांना अटक
बोगस डॉक्टर विजय कोळूस्कर आणि श्रीमंत पाटील यांना गर्भलिंग निदान करताना रंगेहाथ पकडले
एसपी ऑफिस, आरोग्य विभाग यांची संयुक्त कारवाई
मडीलगे आणि राधानगरी येथे छापे, मोठे रॅकेट हाती लागण्याची शक्यता
मडीलगे येथे गर्भलिंग निदानचे मशीन, गर्भपाताची औषधे सापडली
राधानगरी मध्येही सोनग्राफी मशीन पकडले
भुदरगड पोलिसांत गुन्हा दाखल, पीसीपीएनडिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल
Published On - Jan 18,2023 6:16 AM