मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राज्यातील 18 कर्मचाऱ्यांच्या संपाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. तसेच शेतकरी मोर्चाचे पडसादही उमटण्याची शक्यता असून या दोन्ही आंदोलनावर आज तोडगा निघण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. राज्यातील अनेक भागात आज ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यासह राज्यातील विविध राजकीय घडामोडी जाणून घ्या.
एक छदामही खर्च नाही करावा लागणार
या कालावधीत नागरिकांना घेता येईल सुविधेचा लाभ
ऑनलाईन आधार अपडेट करण्यासाठी नाही खर्च
UIDAI ने आणली खास योजना, वाचा बातमी
लवकरच बाजारात येणार Foods FPO
एप्रिल महिन्यात एफपीओ बाजारात दाखल होण्याची शक्यता
प्रमोटर्सचे शेअर एनएसई आणि बीएसईने केले जप्त
नियमांचे उल्लंघन केल्याने केली कारवाई, वाचा बातमी
बुलेट ट्रेनसाठी स्टेशन तयार करणाऱ्या कंपनीचा शेअर रॉकेटसिंग
गुंतवणूकदारांमध्ये लागली अशी स्पर्धा
या स्टॉकची किंमत आजही आहे कमी
कंपनीला मिळाले 3,681 कोटी रुपयांचे कंत्राट, वाचा सविस्तर
अंतिम संधी सोडाल तर नाही मिळणार सवलत
31 डिसेंबर 2023 नंतर पुन्हा संधी
करदात्यांना दंड आणि व्याज ही करावे लागते जमा
काय आहे प्रक्रिया, घ्या जाणून, वाचा सविस्तर
मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात शिवसेनेच्या कट्ट्यातून ठाकरे गटाच्या नेत्याचा फोटो काढून गोंधळ उडाला आहे.
शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्या निधीतून हा कट्टा करण्यात आल्याचा आरोप आहे.
गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात गेले असता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा फोटो काढला.
आणि आज काही लोकांनी या कट्ट्यातून ठाकरे गटाच्या नेत्यांचे फोटो काढले होते.
सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांना शांत करून वातावरण शांत केले.
महाविकास आघाडीची बैठक झाली
जिल्हापातळीवरील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली
तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढतील, त्या अनुषंगाने ती बैठक होती
कार्यकर्त्यांच मनोमिलन व्हाव यासाठी बैठक
लोकसभेच्या वाटपाबद्दल अफवा पसरवली जात आहे
तशी कोणतीही चर्चा झाली नाही
कार्यकर्त्यांनी गैरसमज करून घेऊ नका
जागावाटपाबद्दल चर्चा झाली नाही
खेडमध्ये मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा
मुख्यमंत्री बनण्यासाठी शिंदेंनी सरकार पाडलं
शिंदेंच्या बेईमानीचं बक्षीस म्हणून त्यांना मुख्यमंत्री बनवलं
बहुमताला नाही, ज्या परिस्थितीत आदेश दिला त्याला विरोध
निवडणूक आयोगाचा निर्णय नसताना विधिमंडळ पक्षालाच राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिल्याचं दिसतंय
10 व्या सूचीत राजकीय पक्षाच्या फुटबाबत स्पष्टता
तत्कालीन पंतप्रधान नरसिम्हा राव यांनी अल्पमतातील सरकार चालवून दाखवलं
राज्यपाल हे विधीमंडळ पक्षाशी संवाद ठेवू शकतात. वैयक्तिक कोणाशीही नाही
पक्षातील अंतर्गत वादाकडे राज्यपाल लक्ष देऊ शकत नाही
राज्यपाल कोणा एकाला तुम्हीच आता मुख्यमंत्री असं म्हणू शकत नाही, राज्यपालांनी शिंदे यांच्या बाबतीत तेच केलं
राज्यपाल सरकार अस्थिर करू शकत नाही
शिंदे गटाच्या वेगवेगळ्या भूमिका, आधी सांगितलं आम्हीच शिवसेना, नंतर सांगितलं पक्षप्रमुखांना कंटाळून बाहेर पडलो
Legends League : इंडियन महाराजाकडून कोण खेळलं? वाचा सविस्तर….
अविश्वास प्रस्ताव आल्यानंतरही अपात्रतेची कारवाई होतेच
अविश्वास प्रस्ताव आणि अपात्रतेची कारवाई या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत
राज्यपालांनी चुकीच्या पद्धतीने बहुमत चाचणी बोलावली
शिंदे गटाने त्यांचाच व्हीप पाळला
संस्थान गणपती पासून काही वेळात निघणार मोर्चा
संस्थान गणपती परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त
भारतीय बँकांमधून मिळवा जोरदार परतावा
भारतीय बँका करतील तुम्हाला मालामाल
शेअर देतील इतका परतावा
अभ्यासानुसार, या बँकाचा शेअर देईल फायदा, एका क्लिकवर बातमी
हे बघा महाराष्ट्र आणि कर्नाटक हा सीमा प्रश्न अनेक वर्ष हा प्रश्न पडला आहे
महाराष्ट्र शासनाने तेथील ८०० गावाना सर्व निधी दिला आहे
शाळकरी मुलांना ही दिला आहे
जे आज विरोध करतात हे त्यांनी विरोध करू नये
त्या स्थानिकांची मेर्जी आहे की त्यांना कुठल्या सेवा घ्याच्या आहेत
महाजन समिती ने अत्यंत चुकीचे केले
आहे
ज्यांना जिथे राहायचे आहे राहू द्या आणि त्यानं कुठल्या सेवा घ्याच्या आहेत त्या घेऊ द्या तो त्यांचा सांविधानिक अधिकार आहे
लोकप्रतिनीधींना पगारापेक्षा जास्त खर्च करावा लागतो- संजय गायकवाड
महापुरूषांच्या जयंती, सामाजीक कार्य यासाठी लोकप्रतिनीधींना खर्च लागतो, हा खर्च सरकारी कर्मचाऱ्यांना नसतो- संजय गायाकवाड
जुन्या पेंशनच्या निर्णयासाठी सरकारला वेळ द्यावा, संजय गायकवाड यांची मागणी
दोन वेळच्या चहावर सोडा पाणी
अवघ्या 20 रुपयात व्हाल कोट्याधीश
एसआयपी करेल जोरदार मदत
अभ्यास आणि स्ट्रॅटर्जी करेल कमाल, वाचा बातमी
अज्ञाताने शेतकऱ्याचा हरभरा दिला पेटून
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील घटना
पोलिसात गुन्हा दाखल
शेतकऱ्याचे झाले लाखोंचे नुकसान
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीची छापेमारी
देशभर चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या ११ कार्यालयावर छापा
नागपुरात ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल दहा तास कार्यालयाची केली झाडाझडती
नागपूरच्या धाडीत महत्त्वपूर्ण कागदपत्र ईडीच्या हाती
बिशप पी शिंग यांनी मिशनतर्फे चालवण्यात येणाऱ्या शाळांमधील शुल्काचा गैरवापर केल्याचा आरोप
नवी दिल्ली : आज राज्यातील सगळ्या खासदारांसोबत राष्ट्रपती संवाद साधणार,
सर्वपक्षीय खासदार राष्ट्रपती भवनात उपस्थित असल्याची माहिती,
राष्ट्रपती प्रत्येक राज्यातील सगळ्या खासदारांशी साधतायेत संवाद,
आज महाराष्ट्रातील खासदारांसोबत चहापाण्याचा कार्यक्रम.
मुंबई नाशिक महामार्गावर पिंपरी फाटा ते तळेगाव फाटा दरम्यान वाहतूक कोंडी
पिंपरी फाटा येथे कंटेनर बंद पडल्याने वाहतूक कोंडी
दीड किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा
वाहनचालक लवकर जायच्या नादात कुठल्याही दिशेने वाहने चालवत असल्याने वाहतूक कोंडीत भर
वाहतूक कोंडीमुळे सर्व्हिस रोड वरून अवजड वाहने नेल्याने सर्व्हिस रोडवरही वाहतूक कोंडी
एक किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा
महामार्ग पोलिस केंद्र घोटीचे कर्मचारी गेल्या दीड तासापासून करताय वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न
Russia vs America : रशियाने काल अमेरिकेच MQ-9 रिपर ड्रोन हे शक्तीशाली विमान पाडलं. आता समुद्राच्या तळाशी विसावलेल्या या ड्रोनमुळे शक्तीशाली अमेरिका चिंतेत आहे. कारण….वाचा सविस्तर….
RCB vs UPW WPL 2023 : टीमसाठी ती बनली संकटमोचक. सोफी डिवाइन, स्मृती मांधना आणि एलिसा पेरीला OUT करुन यूपीला वाटलं मॅच आपलीच. पण कनिका आहुजाने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरवलं. वाचा सविस्तर….
सोन्याच्या उसळीने अनेकांना धडकी
दरवाढ रेकॉर्ड मोडणार का?
चांदीच्या किंमतींत मात्र तेजी
चांदीचा भाव वधरल्याने गुंतवणूकदारांची चांदी
अमेरिकेतील घडामोडींचा असा ही परिणाम, वाचा बातमी
नऊ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम वृद्धाला बेड्या ठोकल्यात
संतोष वाघू कंधारे असं बेड्या ठोकण्यात आलेल्या आरोपीच नाव आहे
घराच्या अंगणात खेळत असलेल्या पीडित मुलीला चॉकलेट चं अमिश दाखवून बलात्कार केला
कळमना एपीएमसी मार्केटमध्ये धान्य पावसात भिजलं
रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे व्यापाऱ्यांचं धान्य भिजलं
काल झालेल्या लिलावाचं धान्य पोत्यात भरुन ठेवण्यात आलं होतं
काही धान्य ताडपत्रीने झाकण्यात आलं, तर काही धान्य पावसात भिजलं
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा झाला परिणाम
कच्चा तेलाच्या किंमतीत सातत्याने घसरण
मग नागरिकांना दर कपातीचा दिलासा केव्हा
केंद्र सरकार अनुकूल, अनेकदा दिले संकेत
प्रत्यक्षात नागरिकांना स्वस्ताईचा दिलासा मिळणार केव्हा, वाचा बातमी
Rohit Sharma यावेळी टेन्शन घेणार नाय, देणार. वाचा सविस्तर….
शाहीन आफ्रिदीचा स्वत:वरील ताबा सुटला. त्याला नियंत्रण ठेवता आलं नाही. वाचा सविस्तर….
अंबरनाथमध्ये आज सकाळपासून अवकाळी पावसाच्या हलक्या सरी
पावसामुळे वातावरणात निर्माण झाला गारवा
सकाळपासून होतोय अवकाळी पावसाचा शिडकावा
अचानक आलेल्या पावसामुळे कामावर जायला निघालेले चाकरमानी आणि शालेय विद्यार्थ्यांची तारांबळ
उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात संप पुकारलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस
रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बजावल्या शिस्तभंगाच्या नोटीस
त्वरित कामावर रुजू होण्याचे दिले आदेश
दोन नोटीस बजावूनही कामावर न आल्यास होणार मेस्मांतर्गत कारवाई
जवळपास 100 कर्मचाऱ्यांना बजावण्यात आली नोटीस
वीज थकबाकी वसुलीसाठी गेलेल्या पथकावर नाशिकमध्ये हल्ला
नाशिकच्या भारत नगर परिसरातील घटना
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कर्मचारी वैभव कांडेकर यांच्यावर एका कुटुंबाने केला हल्ला
थकीत विज बिल संदर्भात वसुलीसाठी गेले असताना घडली घटना
नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक : द्राक्ष, कांदा, गहू , कोबी पिकांचे मोठे नुकसान,
आधीच्या नुकसनाचे पंचनामे झालेले नसताना पुन्हा एकदा अवकाळीचा फटका,
हवामान खात्याकडून पुढचे तीन दिवस नाशिकला ऑरेंज अलर्टरात्रभर पावसाची संततधार.
ठाण्यातील रस्ते झाले जलमय
या अवकाळी पावसाचे चाकरमान्यांचे, शाळेत जाणाऱ्या मुलांचे हाल
ठाणेकरांनी घेतला छत्रीचा सहारा
अचानक पडणाऱ्या पावसाने वातावरणात बदल
अवैध रेती उत्खनन करताना दोघांचा बुडून मृत्यू
यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील चिकणी कसबा येथील घटना
जिल्ह्यात अवैध रेती वाहतुक रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कलम 144 लागू
स्थानिक अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष मुळे अवैध रेती सुरूच
अवैध रेती उत्खनन करताना नदीपात्रात दोघांचा बुडून मृत्यू
कैलास पारधी आणि रामदास भुजाडे असे मृतकाचे नाव
चिखली कसबा तलाठी,मंडळधिकारीवर जिल्हाधिकारी कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष
यवतमाळ
जिल्ह्यात कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा
पुसद तालुक्यात पुन्हा शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभार
यवतमाळच्या पुसद तालुक्यातील बेलोरा शाळेत सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस
श्री शिवाजी विद्यालयातील प्रकार
10विचा भूमितीचा पेपरला टाकली उपविभागीय अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी धाड
केंद्र संचालक, उपकेंद्र संचालक सह 11 खोलीवरील पर्यवेक्षक असे 13 जणांवर कारवाई केली शिक्षण मंडळाकडे प्रस्तावित
जवळच्या अविरन ऑनलाइन सेंटरवरील कॉम्प्युटर, स्कॅनर, झेरॉक्स मशीन केली जप्त
यापूर्वी याच पुसद तालुक्यातील कातखेडा येथील शाळेवर धाड टाकून 9 जनावर केली होती उपविभागीय अधिकारी यांनी कारवाई
गेल्या वर्षी तब्बल 16 हजार 569 लोकांचा श्वानांनी घेतला चावा
पुणे शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला
शहरात साडेतीन लाखांच्यावर भटक्या श्वानांची संख्या
तर 16000 जणांचा या श्वानांनी घेतला चावा
पुणे महापालिका प्रशासनाची माहिती
एका वर्षात पुणे महापालिकेकडून 20 हजार 956 श्वानांची नसबंदी
विजांच्या कळकळाटासह पावसाला सुरुवात
नागपूरसह विदर्भाच्या काही भागात आज सकाळपासून ढगाळ हवामान
नागपूरसह विदर्भात पुढचे दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज
हवामान विभागाने विदर्भाच्या काही भागात ऑरेंज अलर्ट केला जारी
अवकाळी पावसामुळे पुन्हा रब्बी पिकांच्या नुकसानीचे संकट
पुणे
पुण्यात मेट्रोस्थानकातच चोरांचा डल्ला
पुण्यातील गरवारे मेट्रोस्थानाकातून मेट्रोच्या साहित्याची मोठ्या प्रमाणात चोरी
गरवारे मेट्रोस्थानाच्या आवारातून ५० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांकडून लंपास
गरवारे मेट्रोस्थानाच्या आवारातील पत्रे, छोटे पाईप, लोखंडी बॅरिकेड गेली चोरीला
डेक्कन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
भंडारा : त्याने धैर्याने सोडविला दहावीचा पेपर,
घरी वडिलांचा मृतदेह ठेवून तो परीक्षा केंद्रावर गेला,
पेपर सोडवून आल्यावर प्रेताला अग्नी दिला,
ही घटना भंडारा जिल्हाच्या लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथील घटना.
जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा आणि धुळे तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची मुसळधार हजेरी
वादळी वारा…विजांच्या कळकळाटासह जिल्ह्यात सर्वत्र पाऊस
पावसाळ्यात पडावा तसा पाऊस पडत असल्याने शेतकरी हवालदिल
रब्बी पिकासह फळबागांच प्रचंड नुकसान, पंचनामे कोण करणार? हा मोठा प्रश्न
काल रात्री अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत
वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडाल्याने पादचारी आणि वाहनधारकांचे हाल
हवामान खात्याने दिला अंदाजानुसार जिल्ह्यात पावसाची शक्यता
हातातोंडाशी आलेल्या पिकांच पावसामुळं नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांची पाहायला मिळतीय लगबग
काढणीसाठी तयार असलेल्या गहू, ज्वारी, हरभरा पिकांच पावसामुळे नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती
वसई-विरारमध्ये रात्री पासून ढगाळ वातावरण आहे
मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी रिमझिम पाऊस पडला आहे
सद्या परिसरात पाऊस नाही, पण दिवसभरात पाऊस पडण्याची शक्यता आहे