Maharashtra Breaking News Live : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत मुंबईत, भारत ऑस्ट्रेलिया एकदिवसीय क्रिकेट सामन्यासाठी आमंत्रण

| Updated on: Mar 18, 2023 | 6:12 AM

Maharashtra Breaking News : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत मुंबईत, भारत ऑस्ट्रेलिया एकदिवसीय क्रिकेट सामन्यासाठी आमंत्रण
Maharashtra Breaking News Image Credit source: tv9 marathi

मुंबई : शेतकऱ्यांचा लाँग मार्च ठाणे जिल्ह्यापर्यंत आलेला आहे. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावर सभागृहात निवेदन सादर करणार आहेत. त्यानंतर शेतकरी आपलं आंदोलन मागे घेणार आहेत. दुसरीकडे राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचारी अजूनही संपावर आहेत. या संपावर अजूनही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे या संपाचा सर्वाधिक फटका राज्यातील सरकारी रुग्णालयातील रुग्णांना बसला आहे. यासह राज्यातील विविध राजकीय घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 17 Mar 2023 06:42 PM (IST)

    गौतम अदानी यांचे औरंगाबाद कनेक्शन काय

    अदानी समूहाने नवीन कंपनी केली स्थापन

    औरंगाबादशी काय बरं आहे कनेक्शन

    औरंगाबादमध्ये कंपनी स्थापन करण्याचा इरादा तरी काय

    काय आहे या कंपनीचे काम, बातमी एका क्लिकवर

  • 17 Mar 2023 05:44 PM (IST)

    श्रीमंतीचं रामबाण औषध

    12 रुपयांच्या शेअरची उत्तुंग भरारी

    एक लाख रुपयांचे झाले एक कोटी रुपये

    12 वर्षांत गुंतवणूकदार झाले मालामाल

    येत्या काही वर्षांत कंपनी शेअरमध्ये 16 टक्के येणार तेजी, वाचा बातमी 

  • 17 Mar 2023 05:04 PM (IST)

    मालेगावमध्ये संजय राऊत यांचा शिवगर्जना महामेळावा

    नाशिक : 

    – मालेगावमध्ये संजय राऊत यांचा शिवगर्जना महामेळावा

    – उद्धव ठाकरे यांच्या सभे पूर्वी संजय राऊत यांची आढावा बैठक

    – संजय राऊत थोड्याच वेळात मेळाव्याला संबोधित करणार

    – मालेगाव मध्ये राऊत काय बोलणार हे बघणे महत्वाचं

  • 17 Mar 2023 04:56 PM (IST)

    कोण आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला

    जगात कोणत्या देशात सर्वाधिक महिला अब्जाधीश

    श्रीमंत महिलांच्या यादीत भारताचा क्रमांक कितवा

    भारतात किती महिला अब्जाधीश आहेत

    भारतातील सर्वात श्रीमंत महिलेची संपत्ती किती, वाचा बातमी 

  • 17 Mar 2023 04:16 PM (IST)

    पुणेकरांसाठी राज्य सरकारकडून आनंदाची बातमी

    पुणे : 40 टक्के मिळकतकराची सवलत कायम रहाणार,

    मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईत झालेल्या बैठकीत निर्णय,

    पुढील कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव आणून मान्यता देणार,

    मिळकत कर सवलतीचा मुद्दा पुण्याच्या राजकारणात चांगलाच गाजला होता.

  • 17 Mar 2023 03:46 PM (IST)

    गणपती बाप्पांकडे आम्हाला काही मागाव लागत नाही – संजय राऊत

    नाशिक : बाप्पा आम्हाला स्वतःहून देतात,

    उद्धव ठाकरेंनी मालेगाव मध्ये सभा होणार आहे,

    ही सभा ऐतिहासिक होणार आहे,

    मालेगाव हा पूर्वी पासूनच सेनेचा बाले किल्ला,

    मालेगाव खोक्याना विकला जात नाही हे लवकरच कळेल – राऊत

  • 17 Mar 2023 03:45 PM (IST)

    नाना पटोलेंचा सरकारला सवाल

    राहुल गांधींनी लोकसभेत बोलण्याची मागणी होत असतानाच कामकाज ठप्प झालं- नाना पटोले

    भाजपने लोकशाही संपवण्याची व्यवस्था केली आहे का?

    ज्या व्यक्तीने जनतेचा पैसा लुटला, ज्या अदानींशी पंतप्रधान मोदींचे संबंध आहेत, ज्यांच्याबद्दल राहुल गांधींनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केले, सरकार उत्तर का देत नाही?

    महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केला सवाल

  • 17 Mar 2023 03:43 PM (IST)

    नवी मुंबई: वंडर्स पार्कचा पाहणी दौरा, नागरिकांसाठी खुलं करण्याची मागणी.

    नवी मुंबईकरांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असणारे नेरुळ मधील वंडर्स पार्कचा माजी महापौर सागर नाईक यांनी मनपा अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा

    मागील 2 वर्षांपासून वंडर्स पार्क बंद असून तो लवकरात लवकर चालू करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

    वंडर्स पार्कची दुरावस्था झाली असून याची डागडुजी करण्यात यावी आणि सर्व खेळण्यांची सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणी करुन नंतरच हे मैदान नागरिकांसाठी खुले करावे अशी सूचना यावेळी करण्यात आली.

  • 17 Mar 2023 03:42 PM (IST)

    गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय

    राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या नव्या पेन्शन योजनेमध्ये सुधारणा

    शासकीय कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू योगदान देण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये मंजूर

    कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतही कॅबिनेटमध्ये झाला निर्णय

    कोतवालांच्या मानधन वाढीचा निर्णय

    आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णय

  • 17 Mar 2023 03:35 PM (IST)

    Entertainment Update : ‘ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ फेम कॉमेडियनवर बलात्काराचे आरोप; पोलिसांकडून तपास सुरु

    नोकरी देण्याचं आमिष दाखवून २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार, तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांकडून तपास सुरु

    ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ फेम कॉमेडियनच्या अडचणीत मोठी वाढ…. वाचा सविस्तर

  • 17 Mar 2023 03:01 PM (IST)

    सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला शेतकरी संघटनेचा विरोध

    पुणे : सरकारने जुनी पेंशन योजना लागू करू नये, रघुनाथ पाटील यांची मागणी,

    जुनी पेंशन योजना लागू केल्यास राज्याची अवस्था श्रीलंका, पाकिस्तान सारखी होईल,

    सरकारी कर्मचाऱ्यांना भरमसाठ पगार असताना जुनी पेंशनची मागणी करणे अयोग्य, रघुनाथ पाटलांची टीका

  • 17 Mar 2023 02:27 PM (IST)

    पुणेकरांसाठी खुशखबर

    पुणे- मुंबई, मुंबई-पुणे विमानसेवा पुन्हा सुरु होणार

    २६ मार्चपासून करता येणार पुणे – मुंबई विमानप्रवास

    गेल्या अनेक वर्षांपासून बंद होती पुणे – मुंबई विमानसेवा

  • 17 Mar 2023 02:09 PM (IST)

    महाराष्ट्र औद्योगिक संबंध नियम २०२३ यावर होणार चर्चा – सूत्राची माहिती

    कामगार कायद्यातील बदलांवर होणार चर्चा – सूत्राची माहिती,

    या सुधारित कायद्यास महाविकास आघाडी सरकारने केला होता विरोध,

    शिंदे फडणवीस सरकारकडून केंद्राच्या धर्तीवर कायदा बदलण्यास गती.

  • 17 Mar 2023 01:34 PM (IST)

    IND vs AUS 1st ODI : सुपरस्टार रजनीकांत मुंबईत

    दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना एमसीए अध्यक्ष अमोल काळे यांनी भारत ऑस्ट्रॅलिया एकदिवसीय क्रिकेट सामना पाहायला येण्याचे आमंत्रण दिले होते. रजनीकांत सध्या कुटुंबासह मुंबईत आले आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया सामना वानखेडे स्टेडियम येथे होत आहे.

  • 17 Mar 2023 01:26 PM (IST)

    रजनीकांत यांना भारत ऑस्ट्रेलिया एकदिवसीय क्रिकेट सामना पाहायला येण्याचे आमंत्रण

    दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना भारत ऑस्ट्रेलिया एकदिवसीय क्रिकेट सामना पाहायला येण्याचे आमंत्रण

    MCAअध्यक्ष अमोल काळे यांनी दिले आमंत्रण

    रजनीकांत स्ध्या कुटुंबासह मुंबईत

    भारत ऑस्ट्रेलिया सामना वानखेडे स्टेडियम होणार

  • 17 Mar 2023 01:23 PM (IST)

    महिला सन्मान योजनेला तांत्रिक अडसर

    महिला सन्मान योजनेअंतर्गत एसटी प्रवासात महिलांना 50 टक्के सूट आजपासून लागू होणार होती

    अनेक एसटी बसेस मध्ये 50% सवलत योजना लागू नाही

    तांत्रिक कारणांमुळे एसटी बसेस मध्ये ही योजना लागू नसल्याचा रिॲलिटी चेक मध्ये पाहायला मिळते

  • 17 Mar 2023 01:11 PM (IST)

    IND vs AUS 1st ODI : हार्दिक पंड्याने जिंकला टॉस, अशी आहे टीम इंडियाची Playing -11

    टीम इंडियात काय बदल? कोणाला संधी? कोण बाहेर? जाणून घ्या…..

  • 17 Mar 2023 12:35 PM (IST)

    IND vs AUS : ‘जसप्रीत बुमराह नसल्याने काही फरक पडत नाही’, टीम इंडियातील एका मोठ्या खेळाडूच्या कमेंटमुळे खळबळ

    IND vs AUS, 1st ODI: जसप्रीत बुमराह मागच्यावर्षीपासून क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहे. सप्टेंबर महिन्यात सर्वप्रथम बुमराहला पाठदुखीचा त्रास सुरु झाला. वाचा सविस्तर….

  • 17 Mar 2023 11:39 AM (IST)

    सांगलीत H3N2 चे पाच रुग्ण

    महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी सांगलीतून आली आहे.

    सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनानंतर ‘एच3,एन2’ चा विळखा

    जिल्ह्यातही पाच रुग्ण आढळून आले आहे.

    सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात तीन आणि ग्रामीण भागात दोन रुग्णांचा समावेश आहे

  • 17 Mar 2023 11:37 AM (IST)

    दूध भेसळ करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या; अजित पवार यांची मागणी

    राज्यात दूध भेसळीचा प्रश्न गंभीर, कच्च्या-बच्च्या लहानग्यांच्या जिवाशी खेळ

    दूध भेसळीच्या मुद्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार विधानसभेत आक्रमक

    राज्यात दूध भेसळीची समस्या अत्यंत गंभीर झाली आहे

    दूध भेसळीचे मोठे सामाज्र पसरले आहे

    अतिरिक्त दूध उत्पादनाच्या काळात सहकारी संस्थांना पावडर करुन एक्सपोर्ट करण्याची परवानगी देण्याची मागणीही अजित पवार यांनी केली

  • 17 Mar 2023 11:22 AM (IST)

    IND vs AUS : कोहलीची 8 वेळा शिकार, ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ 5 खेळाडूंपासून टीम इंडियाला सर्वात जास्त धोका

    IND vs AUS : टीम इंडियाला ऑस्ट्रेलियन टीममधील 5 प्लेयरपासून जास्त सावध रहाव लागेल. हे पाच खेळाडू खूप धोकादायक आहेत. वाचा सविस्तर….

  • 17 Mar 2023 11:17 AM (IST)

    दोन आठवड्यात तीन अमेरिकन बँका बाद

    भारतीय बँकांत तुमचा पैसा सुरक्षित आहे की नाही

    भारतीय बँकां बुडाल्यावर कोण घेतो हमी

    बँक बुडाल्यावर कोण देतो तुमच्या ठेवीची, बचतीची भरपाई

    किती मिळेत ग्राहकाला नुकसान भरपाई, वाचा बातमी 

  • 17 Mar 2023 11:05 AM (IST)

    ब्लॅकमेलिंगची घटना घडते म्हणजे पोलिसांवर राजकीय दवाब – संजय राऊत

    ब्लॅकमेलिंगसारखी घटना कोणासोबतच घडू नये- संजय राऊत

    देवेंद्र फडणवीस यांचे हात दगडाखाली अडकले आहे- संजय राऊत

    राज्याचे सुत्रधार देवेंद्र फडणवीसच, संजय राऊत यांचा आरोप

    तुमच सरकार असतानाही अशा घटनांच खापर महाविकास आघाडीवर फोडलं जात आहे.

  • 17 Mar 2023 10:42 AM (IST)

    Team India : सौंदर्यामध्ये टीम इंडियाच्या ‘या’ क्रिकेटरची पत्नी सुद्धा अनुष्का शर्मा पेक्षा कमी नाही

    Team India : तिचं मनमोहक सौंदर्य अनेकांना भुरळ पाडतं. तिच्या सौदर्याची जादूच तशी आहे. विराट कोहलीची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मा इतकीच अशरिता शेट्टी सुंदर आहे. वाचा सविस्तर….

  • 17 Mar 2023 10:41 AM (IST)

    IND vs AUS : 1268 दिवसात फक्त 3 वनडे खेळणारा धुमाकूळ घालणार, आज ‘तो’ टीम इंडियाच मुख्य अस्त्र

    IND vs AUS : वनडे सीरीजचा पहिला सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात 1268 दिवसात 3 वनडे खेळणारा एक प्लेयर मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. तो ऑस्ट्रेलियन टीमवर नक्कीच भारी पडेल. वाचा सविस्तर….

  • 17 Mar 2023 10:29 AM (IST)

    मोबाईलसाठी आता स्क्रॅप पॉलिसी

    वापरकर्त्यांना होईल मोठा फायदा

    ई-वेस्टच्या त्रासातून लवकरच सूटका

    ई-वेस्टची समस्या होईल कमी

    सध्या वाहनांसाठी ई-वेस्ट पॉलिसी

    इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी असेल स्क्रॅप पॉलिसी, वाचा सविस्तर 

  • 17 Mar 2023 09:51 AM (IST)

    केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता

    केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक, बैठकीकडे कर्मचाऱ्यांचं लक्ष

    बैठकीत देशातील कोरोना परिस्थितीवरही होणार चर्चा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी होणार केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक

    कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्यासाठी मोठी घोषणा होण्याचीही शक्यता

  • 17 Mar 2023 09:44 AM (IST)

    नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप आक्रमक

    राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करावी भाजपची मागणी

    लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी लिहिलं पत्र

    राहुल यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव असतानाच आता विशेष अधिकार समिती नेमा

    चौकशी करून खासदारकी रद्द करावी भाजपची मागणी

    पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे भाजप आक्रमक

  • 17 Mar 2023 09:31 AM (IST)

    h3n2 आणि कोविड यांचे पेशंट वाढले

    आरोग्य विभाग सतर्क झालं आहे- तानाजी सावंत

    गुरुवारी आरोग्य खात्याची बैठक झाली आहे

    या रोगाचे याचं सर्व्हे करणं हे सांगितलं आहे

    खासगी आणि शासकीय रुग्णालय यांना आदेश दिले आहेत

  • 17 Mar 2023 09:26 AM (IST)

    सोन्या-चांदीची राघोभरारी

    सगळे अंदाज केले आडवे

    सोन्याची जोरदार मुसंडी

    चांदीने पण घेतली आघाडी

    सोन्याची जोरदार घौडदौड

    दरमजल करत रेकॉर्ड गाठणार

    फेब्रुवारी महिन्यातील विक्रम मोडीत निघणार

    चांदीची पण किंमतींवर कुरघोडी,  वाचा बातमी 

  • 17 Mar 2023 08:41 AM (IST)

    IND vs AUS ODI : Hardik pandya च्या कॅप्टनशिपमध्ये टीम इंडियाने किती T20 सीरीज जिंकल्या?

    IND vs AUS ODI : हार्दिक पंड्याचा ODI सीरीजमध्ये कॅप्टन म्हणून हा पहिलाच सामना आहे. त्याआधी हार्दिकने वर्षभरात टी 20 सीरीजमध्ये कॅप्टन म्हणून कशी कामगिरी केलीय, ते समजून घेणं आवश्यक आहे. वाचा सविस्तर….

  • 17 Mar 2023 08:41 AM (IST)

    Russia vs America : फक्त टेक्निक, रशियन पायलट्सनी असं पाडलं अमेरिकेच शक्तीशाली ड्रोन, VIDEO

    Russia vs America : अमेरिका सर्वात जास्त जाहीरात करते, त्याच शक्तीशाली MQ 9 रिपर ड्रोनला जलसमाधी देऊन रशियाने अमेरिकेच्या प्रतिष्ठेवर घाव घातलाय. वाचा सविस्तर….

  • 17 Mar 2023 08:40 AM (IST)

    आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल घसरले

    आंतरराष्ट्रीय घडामोडींचा झाला परिणाम

    आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव काय

    केंद्र सरकार कधी करणार कर कपात

    या महिन्यात पेट्रोल-डिझेलची विक्री घटली

    देशात इंधनाची मागणी घटल्याने चिंता

    कच्चा तेलाच्या किंमतीत सातत्याने घसरण

    मग नागरिकांना दर कपातीचा दिलासा केव्हा, वाचा बातमी 

  • 17 Mar 2023 08:18 AM (IST)

    गोपीनाथ मुंडेंच्या सर्वात मोठ्या पुतळ्याचे उद्या लोकार्पण

    नाशिक : नितीन गडकरी, पंकजा मुंडे, मुख्यमंत्री आणि सर्व पक्षीय नेत्यांची राहणार उपस्थिती,

    राज्यातील सर्वात उंच 16 फूट उंच पुतळ्याचे होणार लोकार्पण,

    नाशिकच्या नांदूर शिंगोटे गावात होणार कार्यक्रम,

    मुंडेंच्या सार्वजनिक कार्यक्रमाला गडकरींची पहिल्यांदाच उपस्थिती असल्याने राजकीय चर्चा,

    गडकरी काय बोलणार याकडे लक्ष.

  • 17 Mar 2023 08:17 AM (IST)

    मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतील प्रकल्पासाठी जागा हस्तांतरित

    अहमदनगर : जिल्ह्यातील पहिला प्रकल्प राहता तालुक्यात साकारणार,

    तालुक्यातील केलवड गावातील 5.45 हेक्टर शासकीय जमीन महावितरणकडे केली हस्तांतरित,

    पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पुढाकाराने साकारणार जिल्ह्यातील पहिला प्रकल्प,

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सौर कृषी वाहीनी योजना मिशन मोडवर राबवण्याची केली होती सुचना,

    लोणी येथील महसुल परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी महसुल विभागाला केली होती सुचना.

  • 17 Mar 2023 08:14 AM (IST)

    पुणेकरांच्या मिळकतकर सवलतीसंदर्भात मुंबईत आज बैठक

    पुणे :  मिळकत करात 40 टक्के सवलत कायम ठेवण्याची माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची मागणी,

    यासंदर्भात आज 2:30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठकीचे आयोजन,

    बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार,

    याच बैठकीत पीएमपीएल संदर्भात काही महत्वाचे निर्णय होणार

  • 17 Mar 2023 07:51 AM (IST)

    चंद्रपूर : नाफेडच्या चना खरेदी शेतकरी नोंदणीस 31 मार्चपर्यंत मुदतवाढ

    नाफेडतर्फे आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात चना खरेदी

    शेतकरी नोंदणीसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली

    खरेदी केंद्रावर जाऊन ऑनलाइन नोंदणी करून घेण्याचे आवाहन

  • 17 Mar 2023 07:49 AM (IST)

    एसटी बस मध्ये महिलांना प्रवास तिकिटात 50 टक्के सवलत.

    अमरावती : आजपासून एसटी महामंडळाच्या सर्वच एसटी बस मध्ये महिलांना प्रवास तिकिटात 50 टक्के सवलत,

    निमआराम,वातावरणकुलीत,शिवशाही,शिवाई,शिवनेरी बस मध्येही 50 टक्के सवलत,

    महिला सन्मान योजना नावाने चालणार ही योजना.

  • 17 Mar 2023 06:28 AM (IST)

    लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत कुठलीही बैठक झाली नाही: काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील

    काँग्रेसची 48 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू मात्र महाविकास आघाडीच्या माध्यमातून जास्तीत जास्त जागा कशा मिळतील यातून पक्षश्रेष्ठ मार्ग काढणार

    काँग्रेसला 8 जागा मिळणार असल्याची चर्चा, मात्र चर्चेतून आलेला आकडा हा काँग्रेसला कदापि मान्य नसेल

  • 17 Mar 2023 06:26 AM (IST)

    शहापूर येथे झाडावर वीज पडून झाड पूर्णपणे जळून खाक

    शहापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात काल संध्याकाळ पासूनच वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला

    किन्हवली परिसरातील उंब्रई गावाशेजारी एका झाडावर वीज पडल्याने झाड जळून खाक झाले आहे

    सुदैवाने झाडा शेजारी कोणी नसल्यामुळे जीवीतहाणी झाली नाही

    तसेच या गावातील राजेंद्र जयराम चौधरी, सुनील शंकर चौधरी आणि भगवान शंकर चौधरी यांच्या घरातील इलेक्ट्रिक उपकरणांचं विजेच्या झटक्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

  • 17 Mar 2023 06:23 AM (IST)

    गाड्या थांबवा, भाजपच्या कार्यालयात घुसा आणि कार्यालय तोडा मात्र काम करून दाखवा

    युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांचे जळगाव येथे युवा संवाद मेळाव्यात वादग्रस्त वक्तव्य

    निवडणुका जर वादाने होत असतील तर तुम्ही जनतेचे काम वादानेच करा, राऊत यांचं आवाहन

  • 17 Mar 2023 06:20 AM (IST)

    शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला प्रचंड यश, मागण्या मान्य; आज आंदोलन मागे घेणार

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत विधानसभेत निवेदन सादर करणार

    त्यानंतर शेतकरी आपलं आंदोलन मागे घेण्याची घोषणा करणार

    अनेक मागण्या मान्य झाल्या, चर्चा सकारात्मक झाल्याचं शेतकरी नेते जे. पी. गावित यांनी सांगितलं

Published On - Mar 17,2023 6:16 AM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.