Maharashtra Breaking News Live : बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

| Updated on: Mar 25, 2023 | 6:09 AM

Maharashtra Breaking News : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live : बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला
Maharashtra Breaking NewsImage Credit source: tv9 marathi

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होण्याची शक्यता. सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावल्याने त्यांच्या खासदारकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहेत. राहुल गांधी यांना कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा सुनावल्याचे पडसाद आजही राज्यात उमटण्याची चिन्हे. सिनेमाच्या शुटिंगवेळी अभिनेता अक्षयकुमार जखमी. सांगलीत सुरू असलेल्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील ढिसाळ नियोजनामुळे महिला कुस्तीपटूंची गैरसोय. यासह राज्यातील विविध राजकीय घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 Mar 2023 08:32 PM (IST)

    पोस्टाची बँक आता तुमच्या दारी

    आयपीपीबीच्या सेवा आता घरपोच

    कर्ज देण्यापासून तर बँकिंग सुविधा

    इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने सुरु केली सेवी

    पण करावे लागेल हे काम, किती आहे शुल्क, वाचा बातमी 

  • 24 Mar 2023 07:34 PM (IST)

    पीपीएफ, एसएसवाय खात्यासंबंधी अलर्ट

    आधी करा हे काम, नाहीतर बसेल फटका

    तुमचे पीपीएफ, एसएसवाय खाते होईल निष्क्रिय

    हे काम नाही केले तर खात्यातील रक्कम विसरुन जा

    दंड भरुनही या खात्यात नाही होणार फायदा, वाचा बातमी 

  • 24 Mar 2023 06:55 PM (IST)

    चुनाभट्टीतील गोदरेज इमारतीला आग, 11,12,13 मजल्यावर आग

    मुंबई : 

    चुनाभट्टीतील गोदरेज इमारतीला आग, 11,12,13 मजल्यावर आग

    अग्निशामक दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी

    ईमारत पूर्णतः रिकामी करण्यात आली

  • 24 Mar 2023 06:52 PM (IST)

    दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात बैठक सुरु, सोनिया गांधी, प्रियांका गांधी उपस्थित

    नवी दिल्ली : 

    काँग्रेस मुख्यालयात बैठक सुरु

    सोनिया गांधी, प्रियांका गांधी बैठकीला उपस्थित

    मल्लिकार्जुन खरगे ,मुख्यमंत्री अशोक गहलोत बैठकीला उपस्थित

    राहुल गांधी यांच्या निलंबनानंतर काँग्रेस मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक

  • 24 Mar 2023 06:50 PM (IST)

    मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर घणाघात

    नवी दिल्ली :

    मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा घणाघात

    स्वतंत्र भारताच्या इतिहासात कधीही 12 वी पास असलेला पंतप्रधान नव्हता

    तो सरकार चालवू शकत नसतानाही PM ना अहंकार आहे

    मी भाजपच्या नेत्यांना आवाहन करतो की पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देश उद्ध्वस्त होत आहे

    ज्यांना देश उद्ध्वस्त करायचा आहे ते भाजपमध्येच राहतील आणि ज्यांना देश वाचवायचा आहे त्यांनी भाजप सोडावा

  • 24 Mar 2023 05:44 PM (IST)

    पॅनकार्डच्या माध्यमातून फसवणूक

    सायबर गुन्हेगार घालतायेत लाखोंचा चुना

    परस्पर तुमच्या नावे उचलण्यात येते कर्ज

    कर्जाची रक्कम थकल्यानंतर तुम्हाला येते नोटीस

    तुमच्या नावावर कोणते कर्ज आहे, कसे ओळखणार, वाचा बातमी 

  • 24 Mar 2023 04:56 PM (IST)

    अमेरिकन फेडरल बँकेच्या पावलावर पाऊल?

    भारतीय रिझर्व्ह बँक वाढवू शकते रेपो दर

    तुमचा ईएमआय वाढण्याची शक्यता

    पुढच्या महिन्यात पहिल्या आठवड्यात येईल वार्ता

    आतापर्यंत आरबीआयने रेपो दरात केली वाढच वाढ

    आरबीआयने रेपो दर 6.50% पर्यंत वाढवला, बातमी एका क्लिकवर

  • 24 Mar 2023 04:17 PM (IST)

    आमदारांच्या गावासाठी संघटनेकडून रस्ता

    आमदार संजय शिंदेना येण्याजाण्यासाठी रस्ता तयार करून त्याचे लोकार्पण करुन देण्यात येणार आहे.रस्ता तयार करुन देण्याचे काम जनशक्ती शेतकरी संघटनेने सुरुवात केली आहे. रस्ता तयार करण्याच्या कामासाठी नागरिकांसह महिलांनी ही श्रमदान करुन प्रतिसाद दिला.

  • 24 Mar 2023 02:17 PM (IST)

    राहुल गांधी यांचं संसदेतील सदस्यत्व अर्थात खासदारकी रद्द

    काँग्रेस आणि राहुल गांधी यांना दुसरा मोठा झटका

    सूरत कोर्टाने काल २ वर्षाची शिक्षा सुनावली होती

    २४ तासातच राहुल गांधी यांना सलग दुसरा झटका

  • 24 Mar 2023 02:09 PM (IST)

    पुणे रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेसाठी मनसे आक्रमक

    पुणे : मनसे नेते वसंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन,

    रेल्वे स्थानकात जास्तीत जास्त सीसीटीव्ही बसवा, स्थानकाच्या प्रवेशद्वारावर स्कॅनर मशीन बसवा,

    स्थानकात जाणारे अतिरिक्त रेल्वे मार्ग बंद करा, या मागणीसाठी पुणे स्टेशन येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयासमोर मनसेच्यावतीने आंदोलन,

    यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांच्या जोरदार घोषणाबाजी

  • 24 Mar 2023 12:32 PM (IST)

    देशातील कैद्यांबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

    कोरोना काळात पॅरोलवर बाहेर असलेल्या कैद्यांनी 15 दिवसांमध्ये आत्मसमर्पण करावं

    सुप्रीम कोर्टाचे निर्देश

    कोरोना काळात हजारो कैद्यांना देण्यात आली होती पॅरोल

  • 24 Mar 2023 12:30 PM (IST)

    पुण्यात तरुणांचा धुडगूस! १४ गाड्या फोडून केले नुकसान

    पुणे : परिसरात दहशत राहावी म्हणून १०-१२ जणांनी तलवारीने फोडल्या १४ हून अधिक गाड्या,

    रिक्षा, दुचाकी, टेम्पो, चार चाकी, दुचाकी अशा विविध गाड्यांचे केले नुकसान,

    पुण्यातील कोंढवा भागातील टिळेकर नगर मधील घटनेमुळे नागरिक भयभीत,

    हृषिकेश गोरे (२०), सुशील दळवी (२०), प्रवीण भोसले (१८) असे आरोपींचे नावे असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे,

    पोलिसांनी ३ जणांना अटक केली असून बाकीच्यांना शोध सुरू आहे.

  • 24 Mar 2023 11:41 AM (IST)

    संसद परिसरात विरोधी पक्षातील खासदार मार्च काढणार

    राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर विरोधी पक्ष आक्रमक

    संसद परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप

    भर पावसात विरोधी पक्ष नेते मार्च काढण्याच्या तयारीत

    बॅरिकेटिंग करून पोलिस आणि सुरक्षा दलांनी परिसराला घेरलं

  • 24 Mar 2023 11:29 AM (IST)

    केंद्र सरकारचा मोठा झटका

    म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या अडचणी वाढणार

    कर सवलतीचा लाभ बंद करण्याची तयारी

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काय केली होती घोषणा

    काय आहे नेमकं प्रकरण, काय बसेल फटका, वाचा बातमी 

  • 24 Mar 2023 11:04 AM (IST)

    राहुल गांधींच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन

    राहुल गांधींच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन

    क्रांती चौकात भाजपचे आंदोलन सुरू

    ओबीसी समाजाचा अपमान केल्याप्रकरणी निषेध आंदोलन

    भाजपचे शेकडो पदाधिकारी आंदोलनात सहभागी

    राहुल गांधी विरोधात जोरदार घोषणाबाजी

  • 24 Mar 2023 10:41 AM (IST)

    14 पक्षांची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

    नवी दिल्ली : ईडी आणि सीबीआय या संस्थांच्या मनमानी कारभार विरोधात याचिका दाखल,

    काँग्रेस सह 14 पक्षांनी दाखल केली याचिका,

    तृणमूल काँग्रेस, बी आर एस , डी एम के आणि इतर पक्षांचा समावेश.

  • 24 Mar 2023 10:29 AM (IST)

    हिंडनबर्ग अहवालात पुन्हा एक भारतीय अडकणार

    हिंडनबर्ग अहवालात का येत आहे या भारतीय महिलेचे नाव

    अमेरिकेतील भारतीय वंशाची ही महिला रडारवर

    काय आहे 3 लाख कोटींचे कनेक्शन

    अदानीनंतर अनेक गौप्यस्फोट, दिग्गजांची उडवली झोप, वाचा बातमी 

  • 24 Mar 2023 10:09 AM (IST)

    श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाच्या महासचिवांच सुधीर मुनगंटीवार यांना पत्र

    चंद्रपूर : अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे महासचिव चंपतरायजी यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्र लिहून मानले आभार.

    श्रीरामजन्मभूमी मंदिरासाठी देशातील सर्वोत्तम सागवान उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे देखील मानले आभार.

  • 24 Mar 2023 10:00 AM (IST)

    पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार

    – पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार.

    – आयुक्त विक्रम कुमार आज अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर करणार.

    – प्रशासक म्हणून आयुक्त दुसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर करणार.

    – कसबा पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अर्थसंकल्प सादर करता आला नाही.

  • 24 Mar 2023 09:56 AM (IST)

    दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

    शिक्षक आंदोलनाचा पेपर तपासणीवर परिणाम नाही

    वेळेवर निकालाचं काम पूर्ण होणार

    दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी बारावी आणि दहावीचा निकाल वेळेत लागणार

    मे अखेरीस अथवा जूनच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा आणि दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता

    विश्वसनीय सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती

  • 24 Mar 2023 09:42 AM (IST)

    अवकाळी पावसाचा फटका, भाज्या महागल्या

    अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचं मोठं नुकसान

    पालेभाज्या 60 रुपये किलोंच्यावर

    ढेमसा 100 तर भरताची वांगी 80 रुपये किलोवर

    काही भाज्या दुप्पट तर काही 50 टक्के महाग

  • 24 Mar 2023 09:29 AM (IST)

    चांदीची दरवाढीची वर्दी, आज भावात वाढ

    चांदी रेकॉर्ड किंमतींच्या अगदी जवळ

    चांदी पण यापूर्वीचा रेकॉर्ड मोडणार का?

    सोन्याच्या भावात आज वाढ, काल भावात घसरण

    आज सोने-चांदी यांच्या किंमती वधारल्या, बातमी एका क्लिकवर

  • 24 Mar 2023 09:16 AM (IST)

    अखेर १२ बाजार समित्यांच्या निवडणुकीचा वाजला बिगुल

    निवडणूक होणाऱ्या बाजार समित्या

    चंद्रपूर, मूल, ब्रह्मपुरी, भद्रावती, राजुरा, कोरपना, पोंभुर्णा, गोंडपिपरी, नागभीड, सिंदेवाही, चिमूर, वरोरा येथील बाजार समितीमध्ये निवडणूक होईल.

    नामनिर्देशन दाखल २७ मार्च ते ३ एप्रिल २०२३.

    नामनिर्देशन अजांची छाननी ५ एप्रिल २०२३ना

    मनिर्देशन मागे घेणे ६ ते २० एप्रिल

    उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध व चिन्ह वाटप २१ एप्रिल

    मतदान २८ एप्रिल २०२३ मतमोजणी मतदान दिनांकापासून तीन दिवसांच्या आत

  • 24 Mar 2023 09:13 AM (IST)

    संभाजीनगर नामांतराविरोधातील याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

    नामांतरणाच्या समर्थनार्थ दाखल झालेल्या अर्जांची संख्या कमी

    काल दिवसभरात 46 हजार 295 आक्षेप अर्ज दाखल

    छ. संभाजीनगर नामांतरावर 1 लाख 18 हजारांपेक्षा अधिक हरकती

  • 24 Mar 2023 09:10 AM (IST)

    सायन महामार्गावर ट्रक झाला पलटी, काही काळ वाहतूक कोंडी

    पनवेल शहरातील ठाणा नाका येथील ब्रिजवर ट्रक पलटी झाल्याची घटना

    सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही

    या ट्रक वरील चालक याचे नियंत्रण सुटले आणि ठाणा नाका येथील ब्रिजवर तो पलटी झाला

    सुदैवाने यावेळी ब्रिजवर वाहतूक कमी होती. पहाटे ट्रक पलटी झाल्याने वाहतूक कोंडी कमी झाली

  • 24 Mar 2023 08:52 AM (IST)

    इंधनाच्या आघाडीवर दिलासा

    भावात कोणतीही दरवाढ नाही

    कच्चा तेलाच्या किंमतीत मोठा बदल नाही

    आज पेट्रोल-डिझेलचा भाव काय

    राज्यातील प्रमुख शहरातील इंधनाचे दर काय, वाचा बातमी 

  • 24 Mar 2023 08:51 AM (IST)

    जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी खासदार ए टी पाटील राजकारणात पुन्हा सक्रिय

    जळगाव : तब्बल चार वर्षे राजकारणात पडद्यामागे राहिल्यानंतर पुन्हा उतरले मैदानात,

    पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची हाती घेतली सूत्रे,

    राज्यात भाजप आणि शिंदे गटाची युती असताना बाजार समितीच्या निवडणुकीत ए टी पाटील हे थेट शिंदे गटासमोर आव्हान उभं करण्याची शक्यता,

    बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ए टी पाटील यांनी पारोळा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांची घेतली बैठक,

    बैठकीत निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांसोबत केली चर्चा.

  • 24 Mar 2023 08:36 AM (IST)

    मावळातील तळेगाव दाभाडे नगरपरिषद कर संकलन विभागाच्या वतीने धडक कारवाई

    कर थकलेल्या एकूण सहा मोबाईल टॉवर्सना ठोकले टाळे

    नगरपरिषद हद्दीतील मोठे थकबाकीदार असलेल्या कंपन्यांचे दहा मोबाईल टॉवर्सपैकी सहा टॉवर्सना टाळे

    यामध्ये जिजामाता चौक, राव कॉलनी, मावळ लँड, तपोदान कॉलनी या  ठिकाणच्या मोबाईल टॉवर्सचा समावेश

    तळेगाव नगरपरिषद हद्दीतील दहा टॉवर्सची एकूण 44 लाख 37 हजार 332 रुपये थकबाकी

  • 24 Mar 2023 08:34 AM (IST)

    पुणे | पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरांचा मुद्दा चर्चेत

    मंदिर परिसरात अनधिकृत मशिदीचं बांधकाम केलं जात असल्याचा मनसेचा आरोप

    यासंदर्भात पुणे शहर मनसे लवकरच घेणार पत्रकार परिषद

    पत्रकार परिषदेत कागदपत्रांसह पुरावे मांडणार

    मनसेच्या आरोपानंतर मंदिर परिसरात पुणे पोलिसांचा कडक बंदोबस्त

  • 24 Mar 2023 08:28 AM (IST)

    रेल्वे फाटक तीन दिवस बंद

    पिंपरी चिंचवडच्या दापोडी आणि कासारवाडी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी

    रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीची कामे सुरू असल्यामुळे कासारवाडी आणि खडकी दापोडी इथल रेल्वे फाटक तीन दिवस बंद राहणार

    कासारवाडी आणि दापोडी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा असा आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलय

  • 24 Mar 2023 08:18 AM (IST)

    मराठवाड्यात यावर्षी जीएसटीतून तब्बल साडेतीन हजार कोटींची उत्पन्न

    मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातून मिळाले साडेतीन हजार कोटी उत्पन्न

    जीएसटीचे आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिली माहिती

    गेल्या वर्षीच्या तुलनेत 300 कोटींची झाली उत्पन्नात वाढ

    तर उत्पन्न वाढीसाठी जीएसटीने टाकल्या तब्बल 40 धाडी

    40 धाडी टाकून 12 कोटींचा दंड केला वसूल तर 4 जणांना केली अटक

    जीएसटी आयुक्त जी. श्रीकांत यांच्या विशेष पथकाची कारवाई

    एका वर्षात 300 कोटींनी उत्पन्न वाढवणारे जी. श्रीकांत ठरले पहिले आयुक्त

  • 24 Mar 2023 08:10 AM (IST)

    कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलय

    – कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलय,

    – राज्यात सध्या एक हजार ६१७ अॅक्टिव्ह कोरोनाचे रुग्ण

    – यामध्ये पुणे जिल्ह्यातील ४६० रुग्णांचा समावेश आहे.

    – राज्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ही पुणे जिल्ह्यात

    – सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असलेले जिल्हे जिल्हा आणि अॅक्टिव्ह रुग्ण पुणे – ४६० मुंबई – ४०३ ठाणे – ३११

  • 24 Mar 2023 08:01 AM (IST)

    VIDEO | सासरा काढतोय मोबाईलमध्ये सुनेचा फोटो, सासूने पकडली ओढणी, नेटकरी म्हणाले…

    VIDEO | सुनेचा फोटो चांगला निघावा यासाठी म्हाताऱ्या सासू-सासऱ्यांनी चांगल्या पोझ केली मदत, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

    वाचा सविस्तर बातमी 

  • 24 Mar 2023 07:31 AM (IST)

    संजय राऊत दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर

    संजय राऊत आज करणार मालेगाव दौरा

    येत्या रविवारी उद्धव ठाकरे यांची मालेगाव मध्ये सभा

    सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राऊत मालेगाव ला जाणार

  • 24 Mar 2023 07:11 AM (IST)

    राहुल गांधींच्या विरोधात भाजप आक्रमक

    पुणे : सावरकरांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात शहर भाजपचे आज आंदोलन,

    भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन,

    राहुल गांधी यांनी माफी मागावी भाजपची मागणी.

  • 24 Mar 2023 06:22 AM (IST)

    जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी खासदार ए टी पाटील राजकारणात पुन्हा सक्रिय

    तब्बल चार वर्षे राजकारणात पडद्यामागे राहिल्यानंतर पुन्हा उतरले मैदानात

    पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची हाती घेतली सूत्रे

    राज्यात भाजप आणि शिंदे गटाची युती असताना बाजार समितीच्या निवडणुकीत ए टी पाटील हे थेट शिंदे गटासमोर आव्हान उभं करण्याची शक्यता

    बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ए टी पाटील यांनी पारोळा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांची घेतली बैठक

    बैठकीत निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांसोबत केली चर्चा

  • 24 Mar 2023 06:21 AM (IST)

    हातावर असलेल्या गोंदणावरून 15 वर्षांपासून फरार असलेला आरोपी अटकेत

    आर ए के किडवाई मार्ग पोलिसांनी हातावर असणाऱ्या गोंदणाच्या मदतीने 15 वर्षांनी आरोपीला शोधलं

    घरफोडी आणि चोरीच्या प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी शोधलं

    आरमुगम पल्लास्वामी देवेंद्र उर्फ मुदलियार (65) असं आरोपीचे नाव

    आरोपी हा नाव बदलून विविध पत्त्यांवर वास्तव्य करत होता

    मात्र रेकॉर्डवर असलेल्या माहितीनुसार हातावर ‘बदाम आणि क्रॉस’ असलेल्या गोंदणाच्या माहितीने आरोपीला अटक

    आरोपी सध्या ‘मुंबई दर्शन’ दाखवणाऱ्या एक खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये चालक म्हणून काम करत होता

    पोलिसांनी त्याचा मोबाईल नंबर शोधून लोकेशन तपासून त्या एजन्सीचाही शोध लावला आणि आरोपीला सापळा रचून अटक केलीय

  • 24 Mar 2023 06:19 AM (IST)

    कोरोनातील दोन वर्षांच ईडब्लूएस प्रमाणपत्र नसलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार मुलाखतीची संधी

    कोरोना काळात ईडब्लूएस प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना काढता आलं नव्हतं

    मुख्य परीक्षेनंतर मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांना ईडब्लूएस प्रमाणपत्र बंधनकारक होतं

    मात्र राज्य शासनाने परिपत्रक काढून कोरोना काळातील प्रमाणपत्र न मागता 2022-23 प्रमाणपत्र ग्राह्य धरावं एमपीएससी आयोगाला दिल्या सूचना

  • 24 Mar 2023 06:16 AM (IST)

    उद्धव ठाकरे यांच्या मालेगावच्या सभेचा टीझर लाँच

    29 तारखेला उद्धव ठाकरेंची मालेगावात जाहीर सभा

    बरं झालं गद्दार गेले अशा आशयाचा टीझर

    उद्धव ठाकरे यांच्या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आरोपांवर काय उत्तर देणार?, लक्ष लागलं

  • 24 Mar 2023 06:13 AM (IST)

    पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ढिसाळ नियोजन, महिला कुस्तीपटूंची गैरसोय

    या स्पर्धांसाठी राज्यातील जवळपास 400 अधिक महिला कुस्तीगीर सांगलीत दाखल झाल्या आहेत

    मात्र कुस्ती स्पर्धांच्या ठिकाणी अत्यंत ढिसाळ नियोजन पाहायला मिळाले आहे

    ज्या क्रीडा संकुलाच्या आवारात कोणत्याही प्रकारची स्ट्रीट लाईट चालू नसल्याने अंधारातून वाट काढत महिला कुस्तीपटूंना बाहेर पडावे लागतंय

    याशिवाय या महिला कुस्तीपटूंचे जेवणाची सोय करण्यात आली होती, त्या ठिकाणी ही अत्यंत ढिसाळ अशा पद्धतीचे नियोजन पाहायला मिळालं

    क्रीडा संकुलाच्या अत्यंत छोटयाश्या मेसमध्ये महिला कुस्तीगिरसाठी जेवणाची सोय करण्यात आली होती

    त्यामुळे रांगेत ताटकळत ठेवून या मुलींना आत सोडण्यात येत होतं

    आसन व्यवस्था नसल्याने महिला कुस्तीपटूंना खाली बसून जेवण करावे लागेल

    पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील नीट नव्हती

    जेवण झाल्यानंतर हात धुण्यासाठी देखील कुस्तीगीर महिलांना पाण्याची व्यवस्था नव्हती

Published On - Mar 24,2023 6:08 AM

Follow us
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.