मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर आता काँग्रेसच्या सर्वच खासदारांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा घेतला आहे. त्यामुळे भाजपची राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याचे आज देशभरात पडसाद उमटण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ. बागेश्वर बाबा विरोधात उदयपूरमध्ये गुन्हा दाखल. यासह राज्यातील विविध राजकीय घडामोडी जाणून घ्या.
ही आहे खऱ्या सोन्याची ओळख, आता झाले आणखी सोपे
हॉलमार्किंगचे जाणून घ्या कसब, लागलीच पकडाल नकली सोने,
तुमची फसवणूक टाळण्यासाठी सरकारचे महत्वपूर्ण पाऊल
काय आहे हॉलमार्किंग, कसा होईल तुम्हाला फायदा, वाचा बातमी
पुणे :
पुण्यात पुरुष मंडळींचं अनोखं आंदोलन
स्त्रियांसारखा समान कायदा आम्हालाही द्या, या मागणीसाठी पुण्यात पुरुष मंडळी बसले आंदोलनाला
सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या वैवाहिक बलात्कार विरोधात पुरुषांच्या हक्कासाठी आंदोलन सुरू
अनेक कायदे हे फक्त महिलांच्या बाजूने, पुरुषांचा देखील विचार व्हावा, आंदोलनकर्त्या पुरुषांची मागणी
आंदोलनकर्त्या पुरुषांकडून ट्विटरचे सर्वासर्वे Elon Musk यांची पूजा आणि आरती
पुरुषांना न्याय देण्याची पुरुषांचीच मागणी
आंदोलकांचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
पुणे :
– मिशन बारामतीला बळ देण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे उद्या पुन्हा बारामती दौऱ्यावर,
– बारामती,इंदापूर आणि कर्जत जामखेडमध्ये बावनकुळे करणार 52 भाजप शाखांचे उदघाटन,
– तर उद्या संध्याकाळी 5 वाजता बावनकुळे यांची इंदापूरात जाहीर सभा,
– पवारांच्या बारामतीत आणि रोहित पवारांच्या कर्जत जामखेड मतदारसंघावर भाजपचे विशेष लक्ष
मालेगाव :
संजय राऊत यांची मुस्लिम बांधवांशी चर्चा
शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष युसूफ भाई नॅशनल वाले यांच्या घरी दिली भेट
उद्याच्या सभेच्या पार्शवभूमीवर चर्चा
पावर लूम संदर्भातील विषयांवर केली चर्चा
भिवंडी आणि मालेगावमधील पावर लूम व्यवसाया संदर्भात चर्चा
हा गोड आवाज करेल घात, आला आता पॅनकार्ड स्कॅम
मुलगी करेल कॉल, विचारेल पॅनकार्ड आणि इतर माहिती
त्यानंतर तुमचे बँक अकाऊंट होईल एकदम साफ
कसा केला जातो हा फ्रॉड, कशी होते फसवणूक, वाचा बातमी
ऑडिटनंतर मिळणार 41104 रुपये
केंद्र सरकारने दिली मोठी अपडेट, मिळणार का रुपये
तुम्हाला आला की नाही ई-मेल, प्रकरण नेमकं आहे तरी काय
सत्यता कोण तपासणार, खरे-खोटेपणा तपासा, वाचा बातमी
आशियातील सर्वात धनाढ्य व्यक्तीचा किस्सा व्हायरल
यांच्या खिशात कधीच नसतो पैसा
कधीच नाही वापरत क्रेडिट कार्ड
व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय
पैशाच्या महत्वाविषयी सांगितली ही बाब
उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी मालेगावमध्ये उर्दूत बॅनर
भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी कठोर शब्दात केली टीका
तुषार भोसले यांनी उद्धव ठाकरेंना मौलवीकडे जाऊन उद्धवोद्दिन ठाकरे असे नामकरण करण्याचा दिला सल्ला
अध्यात्मिक गुरु कालीचरण महाराज यांनी सोलापुरातील रूपा भवानी देवीचे दर्शन घेतले
देवीच्या दर्शनानंतर कालीचरण महाराजांनी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे.
राज ठाकरे जसजसे हिंदूंचे मुद्दे उचलत राहतील त्यामुळे त्यांना हिंदूंचा सपोर्ट प्राप्त होईल
आज आणि उद्या असा दोन दिवसांचा राज ठाकरे यांचा पुणे दौरा
ठाकरेंचा दौरा खाजगी असला तरी उद्या पुण्यात कार्यकर्त्यांची बैठक घेण्याची शक्यता
पुण्यात पुणेश्वर आणि नारायणेश्वर मंदिरावरून मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे
नवी मुंबई : दर्गा हा पामबीच मार्गावर असलेल्या मरीन नेव्ही युनिव्हर्सिटी असलेल्या चाणक्या इमारतीच्या पाच मिनिटांच्या अंतरावर नेरुळकडे जाणाऱ्या मार्गावर उभारण्यात आला आहे.
पामबीचला लागून या दर्गाकडे जाण्यासाठी रस्ता तयार केला आहे.
त्याठिकाणी नमाज पठण केला जातो. अनेक मुस्लिम बांधव त्याठिकाणी येतात.
शेजारी कांदळवन, समुद्रकिनारा आणि समोर करावे गाव आहे
याबाबत मनसे जिल्हाध्यक्ष गजानन काळे यांनी सिडको, वन, मेरीटाईम बोर्डा, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांकडे चौकशी करण्याची मागणी केली
काल एकाच दिवशी 9 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून यातील 5 पुरुष तर 4 स्त्री रुग्ण
113 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली, त्यातील 104 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले तर 9 कोरोना पॉझिटिव्ह आढळले
दाराशा हॉस्पिटल, जिजामाता रुग्णालय, मुद्रा सनसिटी, रामवाडी, साबळे नगर, सोरेगाव नागरी आरोग्य केंद्राच्या हद्दीत हे रुग्ण आढळले
कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे महापालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
नागरिकांनी मास्क वापरावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे
ज्यांनी अद्यापपर्यंत पहिला, दुसरा आणि बुस्टर डोस घेतला नाही त्यांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले
वसंत मोरेंच्या डॉग पाँड उद्घाटन कार्यक्रमाला लावणार हजेरी
गेल्या आठवड्यात राज ठाकरेंनी वसंत मोरेंना 26 तारखेची दिली होती वेळ
उद्या सकाळी 10 वाजता राज ठाकरे पुण्यात
मनसेनं पुण्यातील दर्ग्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे, त्यातचं राज ठाकरेंचा उद्या पुणे दौरा होतोय
पुण्येश्वर मंदिरासंदर्भात एका महिन्याच्या आत कारवाई करा, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरणार
पुण्येश्वर मंदिराच्या कारवाई संदर्भात मनसेचा राज्य सरकारला एका महिन्याचा अल्टीमेटम
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसबा पोटनिवडणूकीत पुण्येश्वर मंदिराच्या घोषणा दिल्या होत्या
या घोषणा राजकीय न राहता त्यावर थेट कारवाई व्हावी, मनसेची मागणी
कल्याण : डोक्याला काळ्या फिती लावून नारेबाजी करत रस्ता रोको आंदोलन,
अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात.
पुण्यात काँग्रेसचं आंदोलन
राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस आक्रमक
केंद्र सरकारच्या विरोधात पुणे शहर काँग्रेसच आंदोलन
केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसची सह्यांची मोहीम
पुण्यातील एम. जी रोड परीसरात काँग्रेसचं आंदोलन
महाविकास आघाडीची जनता चौकामध्ये भाजपा व मोदी सरकारच्या विरोधात निदर्शने
राहुल गांधी यांचे खासदारकी पद रद्द केल्यामुळे जोरदार निदर्शने
काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरे शिवसेना गट आक्रमक
भाजप सरकार सूडबुद्धीने वागत आहे येणाऱ्या 20 24 च्या निवडणुकीमध्ये भाजपाला जनता धडा शिकवेल
काय आहे केंद्र सरकारचा तगडा प्लॅन
जुनी पेन्शन योजनेसाठी आग्रही कर्मचाऱ्यांना गिफ्ट
मोदी सरकार खेळणार इलेक्शन कार्ड
नवीन पेन्शन योजना होणार अधिक आकर्षक
अनेक गोष्टींचा होणार समावेश
पण मोदी सरकार तिजोरीवर ही पडू नाही देणार मोठा भार, वाचा बातमी
केंद्र सरकारच्या निषेधार्थ विरोधकांचे तोंडाला काळ्यापट्ट्या लावून आंदोलन
हातात फलक घेऊन केला केंद्र सरकारचा निषेध
विरोधकांची मुस्कटदाबी होतेय, देशात हुकूमशाही असल्याचा आरोप
राहुल गांधी यांची काल खासदारकी रद्द झालीय, त्यामुळे विरोधक आक्रमक
नवी दिल्ली
लोकप्रतिनिधी कायद्याला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात
लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधील अनुच्छेद 8 मधील तरतुदीविरोधात याचिका दाखल
याच कायद्यामुळे आमदार, खासदारांचे पद धोक्यात
राहुल गांधी यांच्या निलंबनानंतर सामाजिक कार्यकर्त्यांकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता
कृष्णा नदीचे पाणी सतत प्रदूषण होत आहे. सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये सांडपाणी आणि कारखान्यांचे दूषित पाणी सतत सोडत असल्यामुळे कृष्णा नदी प्रदूषित होत आहे. आणि त्याला विरोध करण्यासाठी आज सर्व सांगलीकर रस्त्यावर उतरून मानवी साखळी करत आहे.
कोल्हापूर शहरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट
एकाच रात्रीत शेकडो पाणी मीटर चोरीला
शिवाजी पेठ, मिरजकर टिकटी, कदमवाडी सह उपनगरातील मीटर चोरीला
कुलूप बंद घराच्या दारातील पाणी मीटर चोरट्यांनी केले लक्ष
एकाच रात्रीत शेकडो पाणी मीटर चोरीला गेल्यान आश्चर्य
पाणी मीटर चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्याचा संशय
पुण्यात दर्ग्याबाबत आज मनसेची पत्रकार परिषद
पुण्येश्वर, नारायणेश्वर आणि शनिवार वाडा परिसरात दर्ग्याचे अनाधिकृत बांधकामाचा आरोप
मनसेच्या आरोपानंतर मंदिर परिसरात पुणे पोलिसांचा कडक बंदोबस्त
सात आठवड्यानंतर डॉलर झाला मजबूत
आंतरराष्ट्रीय बाजारात काय झाला बदल
सोने-चांदीवर आता काय होणार परिणाम
आज सकाळच्या सत्रात सोन्याचा भावात वाढ
चांदीही लवकरच मोडणार यापूर्वीचा रेकॉर्ड, वाचा बातमी
नवी मुंबई : शहरात अनेक ठिकाणी पाणथळे आहेत त्या ठिकाणी फ्लेमिंगो आपल्याला पाहायला मिळत आहे,
मात्र वाशी खाडी किनाऱ्यावर हजाराचे संख्येने फ्लेमिंगो पक्षी पाहायला मिळत आहे.
रशियाने कच्चा तेलाचे उत्पादन घटवले
इंधनाच्या किंमती भडकल्या नाहीत
अमेरिकेतील, युरोपातील घडामोडींमुळे घसरण सुरुच
देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत काय झाला बदल, बातमी एका क्लिकवर
पुण्यात पुन्हा एकदा पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरांचा मुद्दा चर्चेत
मंदिर परिसरात अनधिकृत मस्जिदचं बांधकाम केलं जात असल्याचा मनसेचा आरोप
मनसे सरचिटणीस अजय शिंदे आज पत्रकार परिषद घेणार
मनसेच्या आरोपानंतर मंदिर परिसरात पुणे पोलिसांचा कडक बंदोबस्त
पत्रकार परिषदेत शिंदे कागदपत्रांसह पुरावे मांडणार
– पुण्यात पुन्हा एकदा पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरांचा मुद्दा चर्चेत,
– मंदिर परिसरात अनधिकृत मस्जिदचं बांधकाम केलं जात असल्याचा मनसेचा आरोप,
– यासंदर्भात मनसे सरचिटणीस अजय शिंदे आज पत्रकार परिषद घेणार,
– मनसेच्या आरोपानंतर मंदिर परिसरात पुणे पोलिसांचा कडक बंदोबस्त,
– पत्रकार परिषदेत शिंदे कागदपत्रांसह पुरावे मांडणार,
– राज्य सरकारने या ठिकाणी उत्खनन करावं, मनसेची मागणी
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले निर्देश
कर्मचाऱ्यांनी 14 ते 20 मार्च या कालावधीत केलेल्या संपामुळे आर्थिक कामकाज झाले होते ठप्प,
राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षणाधिकारी, मुंबईच्या शिक्षण निरीक्षकांना या संदर्भातील सूचना गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे दिल्या
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये मंजूर तरतूद, पूरक मागणीपत्राद्वारे मंजूर तरतूद आणि सुधारित अंदाजपत्रकामध्ये नमूद केलेली तरतूद 100 टक्के उपलब्ध होणार
मावळ,पुणे
-पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाक्यावर शिरगाव परंदवडी पोलिसांची मोठी कारवाई,बेकायदा गोमांस वाहतूक करणारा टेम्पो पकडला
-टेम्पोत 5 टन गोमांस,हा टेम्पो सांगलीवरून मुबंईकडे जात असताना एका सजग नागरिकाच्या लक्ष्यात हा प्रकार येताच त्याने उर्से टोलवर तैनात पोलीसांना ही बाब सांगताच पोलिसांनी टेम्पो चालकाला हटकले असता गोमांस मुंबईला विक्रीसाठी घेऊन जात असल्याचं उघड झालंय
एका आठवड्यात तीन लाख महिलांचा पन्नास टक्के सवलतीत प्रवास
२३ मार्चपर्यंत एसटीच्या पुणे विभागात एकूण ३ लाख १० हजार १३८ महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला
यातून एसटी महामंडळाला ८९ लाख १४ हजार १३८ रुपयांचे उत्पन्न मिळाले
१७ मार्चपासून महिला सन्मान योजना कार्यान्वित करण्यात आली आहे
नाशिक : नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाख रुपये अल्प मुदतीचे कर्ज मिळणार,
सन 2022-23 या हंगामात जिल्हा बँकेला 515 कोटींचे होते कर्ज वितरण लक्ष्यांक,
त्यातील जवळपास 80 टक्के पीककर्ज वाटप केल्याचा जिल्हा बँकेचा दावा.
पुणे : प्रक्रियेत आतापर्यंत ३ लाख ५३ हजार ६७२ अर्ज दाखल,
या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी १७ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती,
पालक आणि संघटनांच्या मागणीमुळे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने अर्जांसाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली होती.
राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस आक्रमक
केंद्र सरकारच्या विरोधात पुणे शहर काँग्रेस आज आंदोलन करणार
शिवाय सरकारच्या विरोधात सह्यांची मोहीम राबवणार
काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
40 हजारांची लाच घेताना एसीबीने केली रंगेहाथ अटक
गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी मागितला होता आयफोन किंवा एक लाख
एसीबीने सापळा कारवाई करत त्यापैकी 40 हजार स्वीकारताना केली रंगेहाथ अटक
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील अर्ज करण्याची मुदत आज संपणार
आतापर्यंत 3 लाख 53 हजार 672 अर्ज दाखल
प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी 17 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती
तांत्रिक अडचणींमुळे काही पालकांना अर्ज करता न आल्याने, कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने अर्ज करता आला नाही.
त्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने अर्जांसाठी 25 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली
आंबेगाव तालुक्यातील मंचर विभाग आणि शिरूर तालुक्याचा पश्चिम भाग येथे बिबट्यांची संख्या वाढली
जुन्नर वनविभागाचे उपसंरक्षक अमोल सातपुते यांची माहिती
बिबट्याची संख्या वाढली असल्याचे निदर्शनास आल्यामुळे बिबट्यांचा हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ
लम्पी आजारामुळे जिल्ह्यातील 1 हजार 226 पशुधनांचा आतापर्यंत मृत्यू
त्यामध्ये 682 गाई, 161 बैल आणि 163 वासरांचा समावेश
यापैकी सुमारे 700 पशुधन मालकांना मोठे पशुधन 30 हजार रुपये आणि लहान पशुधनसाठी 16 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांवरून 42 टक्के झाला आहे
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत महागाई भत्ता वाढीला मंजुरी
ही वाढ जानेवारी 2023 पासून म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे
महागाई भत्तावाढीमुळे केंद्रावर दरवर्षी 12,815 कोटींचा बोजा पडणार
वाढीव महागाई भत्त्याचा 47.58 लाख कर्मचारी आणि 69.76 निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार