मुंबई : मध्य रेल्वे 5 उन्हाळी स्पेशलच्या 100 फेऱ्या चालवणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. गोदिया जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाची हजेरी. वातावरणात गारवा. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आज नांदेड दौऱ्यावर. यासह देशविदेशातील बातम्या जाणून घ्या.
नवीन आर्थिक वर्षात कमाईची संधी
अनेक कंपन्या आयपीओ बाजारात दाखल होणार
इतक्या कंपन्या आयपीओ आणणार
गेल्या वर्षी आयपीओ बाजाराने केली होती निराशा
एलआयसीने तर अनेक गुंतवणूकदारांची केली निराशा, वाचा बातमी
मुंबई :
राज्यात आज दिवसभरात 694 नवीन रुग्णांची नोंद
राज्यातील करोनाबाधित रुग्णाांची एकूण सांख्या – ८१,४३,६८६
दिवसभरात १८४ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपयंत एकूण ७९,९२,२२९ करोनाबाधित रुग्ण बरे
राज्यात आज एकही करोनाबाधित रुग्णाच्या मत्यूची नोंद नाही
आता सदस्यांचा टीडीएस वाचणार
या सदस्यांना मिळाला मोठा दिलासा
पूर्वीपेक्षा कमी द्यावा लागणार टीडीएस
जाणून घ्या काय आहे नवीन नियम
आता केंद्र सरकारने काय केला बदल, बातमी एका क्लिकवर
येत्या येत्या 24 तासात मोठा बदल होणार
व्याजदराचा केंद्र सरकार घेणार आढावा
व्याजदरात वाढ होण्याची शक्यता
केंद्र सरकार गुंतवणूकदारांवर होणार का मेहरबान, वाचा बातमी
दुर्धर आजारावरील औषध आता होणार स्वस्त
केंद्र सरकारने सीमा शुल्क केले रद्द
रुग्णाच्या औषधावरील खर्चात होणार कमी
1 एप्रिलपासून मिळणार दिलासा, वाचा बातमी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील थोडयाच गिरीश बापट यांच्या निवासस्थानी येणार
बापट यांच्या कुटुंबीयांची सांत्वन भेट घेण्यासाठी वळसे पाटील येणार
नवी दिल्ली :
– उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट,
– दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याची उदयनराजेंची शहांकडे मागणी,
– त्याचबरोबर राष्ट्रपुरूषांचा अवमान रोखणारा कायदा आणावा,
– तसेच शिवाजी महाराजांचे शासनमान्य अधिकृत चरित्र प्रकाशित करावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली
पुण्यात अनेक ठिकाणी “मोदी हटवा, देश वाचवा” चे फ्लेक्स
आम आदमी पक्षातर्फे आज देशभरात “मोदी हटवा, देश वाचवा” पोस्टर लावण्याची मोहीम
मोदी सरकारच्या धोरणांना विरोध दर्शवण्यासाठी हे फ्लेक्स लावण्यात आले होते
शहरातील विविध ठिकाणी पक्षाकडून हे फ्लेक्स लावण्यात आले होते
मंत्री दीपक केसरकर नाशिकच्या काळाराम चरणी
काळाराम मंदिरात घेतले प्रभू श्री रामाचे दर्शन
नाशिकच्या काळाराम मंदिरात आज रामनवमी निमित्त मोठी गर्दी
केसरकर यांनी देखील घेतले श्री काळारामांचे दर्शन
पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात पीएमपीएमएल बसचे कंडक्टर आणि प्रवासी एकमेकांना भिडले
या प्रकरणानंतर चालकाने बस थेट पोलीस ठाण्यात नेली
पिंपरी चिंचवडच्या मोशी भागात सकाळच्या सुमारास घडली घटना
तिकिटाच्या वादातून घडली घटना
400 ते 500 अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल
शहरातील जिंसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
400 ते 500 जणांवर दंगल घडवल्याप्रकर्णी गुन्हा दाखल
दंगल घडवणे, खुनाचा प्रयत्न करणे, शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे या कलमाखाली गुन्हा दाखल
307, 353, 295, 332, 333, 143, 147, 148, 149, 153 या कलमाखाली गुन्हा दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील सर्वात जुने मंदिर मुंबादेवी येथे दर्शनासाठी पोहोचले
मुंबादेवी मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय
मुंबादेवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने पोहोचले आहेत
मुंबादेवीच्या विकास आराखड्यात मुख्यमंत्र्यांकडून महत्वाचं विधान करण्याची शक्यता
मुंबादेवी परिसराचा सामूहिक विकास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे पाऊल
चंद्रपूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय मुलाचा मृत्यू
घरासमोरील अंगणात शौचास बसलेल्या मुलाला बिबट्याने आईच्या डोळ्यासमोर नेले उचलून
सावली तालुक्यातील बोरमाळा येथील काल संध्याकाळची घटना
हर्षद कारमेंगे असं हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव
आज सकाळी घरापासून एक किलोमीटर अंतरावर एका शेतात सापडला मृतदेह
वनविभागाचं पथक घटनास्थळी दाखल
अंगणातून बिबट्याने मुलाला उचलून नेल्याने गावात भीतीचं
पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर
जवळपास अडीच हजार कर्मचाऱ्यांनी केली आरोग्य तपासणी
बुलढाणा पोलीस अधीक्षक यांच्या पुढाकाराने शिबिराचे आयोजन
माढ्यात रामनवमी निमित्त बैलगाडा शर्यत
राज्यभरातून बैलगाडा मालकांची हजेरी
कडाक्याच्या उन्हातदेखील बैलगाडा शर्यतीचा थरार
-गिरीश बापटांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागणार
-एक वर्षांपेक्षा जास्त कालावधी शिल्लक असल्यामुळे निवडणूक घ्यावी लागणार
– 1951 सालच्या 151A कायद्यानुसार लोकसभेची मुदत संपण्यास एक वर्षाचा कालावधी शिल्लक राहिल्यास निवडणूक घ्यावी लागते,
– महत्वाचं म्हणजे हि निवडणूक 6 महिन्यांच्या आत घ्यावी लागणार,
– कालावधी कमी असल्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जास्त
14 मार्च ते 20 मार्चपर्यंतचा पगार सरकार कापणार
जुन्या पेन्शन योजनेसाठी सात दिवस गैरहजर राहत केलेल्या काम बंद आंदोलनामुळे सात दिवसांचा पगार कापला जाणार
निर्णय बदला अशी संघटनांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
शिल्लक रजा मंजूर करून सेवा नियमित करावी अशी संघटनांची मागणी
1 एप्रिलपासून बदलाचे वारे
हॉलमार्क सोन्याची विक्री अनिवार्य
सिलेंडरच्या किंमतीत होणार का वाढ
कराबाबत आता काय घेतला निर्णय
तुमच्यावर काय होणार परिणाम, वाचा बातमी
बैठकीत व्हीएस आयच्या कामकामाजाचा घेणार आढावा
शरद पवार बैठकीसाठी दाखल
गाढवाच्या गळ्यात मंत्री तानाजी सावंत यांचा फोटो लटकवत शिवसैनिकांचे आंदोलन
बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेच्या गर्दीची तुलना तानाजी सावंत यांनी केल्यामुळे शिवसैनिक झाले आक्रमक
मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्या विरुद्ध तीव्र संताप
सोलापूर जिल्ह्यातील युवा सेनेकडून आंदोलन सुरू
या राज्यात मिळाल्या सोन्याच्या खाणी
चीन नंतर भारत करतो जगात सर्वाधिक सोन्याची आयात
नवीन ठिकाणी पण सोन्यासाठी शोध मोहिम
मोठ्या प्रमाणात सोने सापडल्या होणार फायदा, वाचा बातमी
नाशिक शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघाचा घेणार आढावा
दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात घेणार आढावा
त्यानंतर सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नियोजित कार्यक्रमाला लावणार हजेरी
IPL 2023 LSG News : मागच्या सीजनमध्ये केएल राहुलची टीम टॉप 4 मध्ये पोहोचली होती. यावेळी जेतेपद मिळवण्याच्या इराद्याने लखनौ सुपर जायंट्सची टीम मैदानात उतरेल. वाचा सविस्तर….
IPL 2023 : या दोघांपैकी एकाने मागचा सीजन आपल्या तडाखेबंद बॅटिंगने गाजवला होता. वाचा सविस्तर….
खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा उभारणार मूर्ती
28 एप्रिलला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,योगगुरू रामदेव बाबा,बागेश्वर महाराजांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा पार पडणार
आमदार रवी राणा यांची माहिती; 2024 मध्ये होणार मूर्तीचे काम पूर्ण
लोकार्पण सोहळ्याला पुढील वर्षी गृहमंत्री अमित शहा येणार
माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या इंदापूर मध्ये झालेल्या कार्यक्रमावर केली जहरी टीका.
काल परवा इंदापूर मध्ये झालेला कार्यक्रम हा गुंड टोळीचा कार्यक्रम.
गुंडाच्या टोळीच भाषण कधी ऐकायच नसतं. काही लोक अशा भाषणांवर टाळ्या वाजवतात याच मला वाईट वाटतं.
मी त्या संदर्भात ओपन बोलतो, अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा समाचार घेतला पाहिजे.
माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची भाजप च्या कार्यक्रमावर टीका.
या कार्यक्रमात गुंड प्रवृत्तीच्या लोकांची भाषण झाल्याचा भरणे यांचा आरोप.
गिरीश बापट यांचा निधन होऊन 24 तास उलटण्याच्या आतच गिरीश बापट यांचं जनसंपर्क कार्यालय सुरू
रोजच्या वेळेनुसार साडेनऊ वाजता आजही गिरीश बापट यांचं जनसंपर्क कार्यालय सामान्य लोकांसाठी सुरू ठेवण्यात आलं आहे
काल दुपारी गिरीश बापट यांचं निधन झालं असून काल रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले
आणि 24 तासाच्या आतच गिरीश बापट यांचं जनसंपर्क कार्यालय पुन्हा सुरू करण्यात आलं आहे
त्यासोबतच जनसंपर्क कार्यालयातील दैनंदिन कामे देखील सुरूच ठेवण्यात आली आहेत
पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या तीन आमदारांनी घेतली हायकोर्टात धाव
शिंदे फडणवीस सरकारने कामांना स्थगिती दिल्यानं केली याचिका
उद्या 12 वाजता हायकोर्टात यावर सुनावणी
माजी मंत्री दत्तात्रय भरणे, जून्नरचे आमदार अतुल बेनके, पुरंदरचे काँग्रेसचे आमदार संजय जगताप या तीन आमदारांनी केली याचिका
अतुल बेनकेंची जवळपास 38 कोटीची कामांना स्थगिती
दगडफेकी मागे एमआयएम भाजप आणि शिंदे गटाचा हात
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप
तर विरोधी पक्षनेते राजकारण करत असल्याचा संदीपान भुमरे यांचा पलटवार
चांदीचा दरही चढाच, सकाळच्या सत्रात किंमती वधारल्या
गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत सातत्याने वाढ
लग्नसराईत सोन्याने अनेकांचे तोंडचे पळवले पाणी
किंमती मिस्ड कॉलवर जाणून घ्या
बुलढाणा जिल्ह्यातील संत नगरी शेगावात आज भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. राम नवमीनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात दाखल झालेय. अतिशय आनंदमय आणि भक्तिमय वातावरण सध्या शेगावात पाहायला मिळत आहे. जवळपास तीन तास दर्शनासाठी लागत असून भाविकांची मोठी रांग लागलीय.
कोल्हापूर
माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांचा आज वाढदिवस
आमदार हसन मुश्रीफ यांच्या वाढदिनी अंबाबाई मंदिरासमोर महाआरती
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाद्वार या ठिकाणी महाआरती
महाआरतीत काँग्रेस आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित
इडा पिडा टळो सर्व सुरळीत होऊ दे यासाठी देवीकडे करणार प्रार्थना
औरंगाबादमध्ये इंधनाच्या दरात कपात
तेल कंपन्यांनी आज सकाळीच जाहीर केले भाव
पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर काय झाला परिणाम
आज कोणत्या शहरात भाव काय, जाणून घ्या
रामनवमी निमित्ताने श्री सेवालाल महाराजांच्या दर्शनासाठी देशभरातील लाखो भाविक पोहरादेवीत दाखल
गुजरात, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांतून आले लाखो भाविक
रामनवमी निमित्ताने सेवालाल महाराजांचे मंदिरही आकर्षक फुलांनी सजवले
शेकडो दिंड्या झाल्या पोहरादेवीत दाखल
Team India: इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने बऱ्याच काळापासून भारतीय टीमचा भाग नसलेल्या खेळाडूचा समावेश केला आहे. मागच्या सीजनमध्ये सुद्धा हा खेळाडू फ्लॉप ठरला होता. वाचा सविस्तर….
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्या नंतर प्रथमच खेड तालुक्यातील चऱ्होली येथे महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार पहायला मिळणार.
पाच दिवस चालणाऱ्या या शर्यतीसाठी प्रथम क्रमांकासाठी थार, ट्रॅक्टर आणि बुलेट यासह भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
450 एकर जागेसाठी सामंजस्य करार
जलसंपदा, पर्यटन विभागाच्या स्वाक्षऱ्या
रोजगार, पर्यटनाला चालना मिळणार
सांगली कोरोना अपडेट –
जिल्ह्यात आज दिवसभरात 11 कोरोना रुग्ण
(सांगली महापालिका पाच रुग्ण )
ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 47 वर
तर उपचार घेणारे 5 जण आज कोरोना मुक्त
कृष्णा नदीच्या पात्रात तडफडून मृत्यू झालेल्या माशांचं प्रकरण हरीत न्यायाधिकरण याचिका
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली याचिका
सांगली मिरज कुपवाड महापालिका, यांना प्रतिवादी करण्यात आलं आहे
31 तारखेला राष्ट्रीय हरीत लवादाच्या खंडपीठाकडे ही सुनावणी होणार आहे…
महाराष्ट्रासह इतर राज्याच्या रडारवर असलेला सऱ्हाईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या
मालेगाव पवारववाडी पोलिसांची कारवाई
अकबर खान ऊर्फ अकबर चोरवा असे आरोपीचे नाव
गावठी कट्टा आणि का जप्त करण्यात आले आहे
देसभरात बेकायदेशीर हत्यारे विक्री आणि अवैध हत्यारे बाळगण्याचे त्याच्यावर आरोप
पुणे शहरातील 2600 शासकीय वाहनं भंगारात जाणार
15 वर्षापेक्षा जास्त वयोमान झालेल्या गाड्यांच स्क्रॅप धोरण केंद्र सरकारने अवलंबलं आहे
शासकीय वाहनं स्क्रॅप करण्यासाठी परिवहन विभागानं आदेश काढले आहेत
1 एप्रिल पासून हे धोरणं राबविण्यात येणार आहे
पुणे शहरात अशी 2600 वाहनं आहेत
रामनवमीनिमित्त काँग्रेसने शहरात लावले बॅनर्स
बॅनरवर शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा ‘भावी नाही, तर फिक्स नगराध्यक्ष!’ असा उल्लेख
काँग्रेसने पालिका निवडणुकीची तयारी सुरू केल्याची चर्चा
दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात पोलिसांकडूनच मानसिक त्रास दिला जात असल्याची दर्शनच्या वडिलांची तक्रार
आमच्या जबाबनुसार गुन्हा दाखल करून न घेता पोलीस स्वतःच्या मर्जीच्या स्टेटमेंटनुसार गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव टाकत असल्याची पत्रात माहिती
चुकीच्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडून दबाव टाकला जात असून आमची बाजू पोलीस ऐकत नसल्याचा पत्रात उल्लेख
पत्रात दर्शन सोळंकी यांच्या वडिलांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे घेतली आहेत जे दबाव टाकत असल्याचा आरोप केलाय
अट्रोसिटीचा अँगल या प्रकरणातून हटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न होत असल्याची दर्शन सोळंकीच्या वडिलांची तक्रार
अवकाळी पावसाचे हवामान खात्याचे होते संकेत
जिल्हाच्या सर्वच ग्रामीण भागात पावसाची हजेर
विशेष म्हणजे जिल्ह्यात 5 दिवसापासून कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे
त्यामुळे कडधान्य पिकासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान होण्याच्या आकडेवारीत वाढ होणार
पुणे – सावंतवाडी रोड दरम्यान 20 स्पेशल फेऱ्या असतील
पनवेल – करमळी स्पेशल दरम्यान 18 स्पेशल फेऱ्या असतील
पनवेल-सावंतवाडी रोड दरम्यान 20 स्पेशल फेऱ्या असणार
लोकमान्य टिळक टर्मिनस – कन्याकुमारी दरम्यान 18 स्पेशल फेऱ्या चालवल्या जाणार