Maharashtra Breaking News Live : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर…

| Updated on: Mar 07, 2023 | 7:42 AM

Maharashtra News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर…
Maharashtra News Live Image Credit source: tv9 marathi

मुंबई : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा आठवडा आहे. आज अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता असून खडाजंगी होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमध्ये मोठं राजकीय संकट उभं राहिलं आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे. त्याच्या भाषणावर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे. तर, बुलढाण्याच्या सैलानीत आज हजारो नारळांची होळी पेटणार आहे. यासह इतर घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 06 Mar 2023 07:08 PM (IST)

    महागाईच्या विरोधात पुणे शहर काँग्रेसकडून होळीचे आयोजन

    पुणे :

    – महागाईच्या विरोधात पुणे शहर काँग्रेसकडून होळीचे आयोजन,

    – स्वारगेट चौकात होळी पेटवली जाणार

    – सिलेंडरची प्रतिकृती होळीत दहन केली जाणार

  • 06 Mar 2023 07:03 PM (IST)

    राष्ट्रवादीच्यावतीने  पन्नास खोक्यांची प्रतितात्मक होळी

    मुक्ताईनगर : 

    राष्ट्रवादीच्यावतीने  पन्नास खोक्यांची प्रतितात्मक होळी

    राष्ट्रवादीच्यावतीने मुक्ताईनगरात आज 50 खोक्यांची होळी एकनाथ खडसेंच्या हस्ते पेटवण्यात आली

    राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात शिंदे सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी 50 खोक्यांची होळी करण्यात आली

    शिंदे गटावर नेहमी पन्नास खोके घेतल्याचा आरोप विरोधकाकडून होत असतानाच मुक्ताईनगरात करण्यात आली 50 खोक्यांची होळी.

    50 खोक्या वाल्यांना अद्दल घडवण्यासाठी आम्ही हे होळी पेटवली असल्याची खडसेंची प्रतिक्रिया

  • 06 Mar 2023 06:44 PM (IST)

    भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कानिफनाथांच्या मढीत आजपासून यात्रेला सुरुवात

    अहमदनगर : पारंपारिक पद्धतीने आज होळीची विधिवत पूजा करून होळी पेटविण्यात येते पेटवून

    तर कैकाडी समाजाच्या वतीने मानाच्या काठ्या कलशाला टेकवल्या जातात

    यात्रेला होळीपासून सुरू होते तर गुढीपाडव्याला सांगत होते

    तर यात्रेचा मुख्य दिवस रंगपंचमीला असतो,

    या यात्रेनिमित्त लाखो भाविक कानिफनाथांच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ घेतात

  • 06 Mar 2023 05:46 PM (IST)

    उद्धव ठाकरे गटाचे माजी नगसेवक योगेश भोईर याच्या घरावर छापा

    मुंबई : 

    कांदिवली मधील ALPINE सरोवा इमारतीत अँटी करप्शनचा छापा

    उद्धव ठाकरे गटाचे माजी नगसेवक योगेश भोईर याच्या घरावर छापा

    तीन तास चौकशी करून अँटी करप्शन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही दस्तावेज घेतले ताब्यात

  • 06 Mar 2023 04:29 PM (IST)

    कल्याण

    मुंबई-नाशिक महामार्गावर खातीवली येथे भीषण अपघात

    कंटेनरच्या धडकेत दोन युवक जागीच ठार

    गजानन काठोळे आणि कैलास भेरे अशी मयत तरुणांची नावे

  • 06 Mar 2023 04:21 PM (IST)

    औरंगाबाद

    ठाकरे गटाच्या वतीने शिंदे सरकारच्या विरोधात खोक्याची होळी

    विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली खोक्यांची होळी

    औरंगाबाद शहरात खोके पेटवून साजरी केली खोक्यांची होळी

    आज होळी सणानिमित्त ठाकरे गटाची निषेध होळी

  • 06 Mar 2023 02:39 PM (IST)

    जळगावमध्ये बोगस बियाण्यांचा विरोध करत बियाणे विक्रेत्यांनी केली बोगस बियाणांची होळी

    बियाणे विक्रेत्यांनी एकत्रित येत केला बोगस बियाणांचा निषेध

    बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान याकडे बियाणे विक्रेत्यांनी वेधले लक्ष

    बोगस बियाणाबाबत कठोर कारवाई करण्याची आणि दखल घेण्याची विक्रेत्यांकडून मागणी

  • 06 Mar 2023 02:34 PM (IST)

    डोक्यात हेल्मेट अंगावर कोट घालून घरफोड्या करणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद

    मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

    चोरी केल्यानंतर रस्त्यावर गस्त घालणाऱ्या पोलिसांना बघून पळ काढत असल्याने संशयानंतर पोलिसांनी पाठला करून आरोपीना घेतले ताब्यात

    36 गुन्हे दाखल असलेल्या आरोपीकडून पोलिसांनी 21 लाख 94 हजार रुपयांचा मुद्देमाल ही केला जप्त

  • 06 Mar 2023 02:17 PM (IST)

    Jaya Kishori : एकटेपणा कसा दूर घालवायचा? जया किशोरींनी दिला मंत्र

    प्रेम म्हणजे नेमकं काय असतं? ते सुद्धा जया किशोरी यांनी समजावलं. वाचा सविस्तर…..

  • 06 Mar 2023 02:17 PM (IST)

    उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना न्यायालयीन कोठडी

    नवी दिल्ली : 20 मार्च पर्यंत सिसोदिया यांना न्यायालयीन कोठडी,

    होळी सण जेलमध्येच साजरा करावा लागणार,

    सीबीआयने अटक केल्यानंतर आज सिसोदिया यांना राऊज एवेन्यू कोर्टासमोर हजर करण्यात आलं.

  • 06 Mar 2023 02:17 PM (IST)

    IND vs AUS : वनडे सीरीजआधी ऑस्ट्रेलियाला झटका, प्रमुख खेळाडू बाहेर, मुंबई इंडियन्सच टेन्शन वाढलं

    9 महिन्यानंतर पुनरागमन करणारा खेळाडू पुन्हा बाहेर. वाचा सविस्तर…..

  • 06 Mar 2023 02:16 PM (IST)

    IPL 2023 साठी नवीन नियम, अटीतटीच्या प्रसंगात ‘या’ अधिकारामुळे फिरु शकते मॅच

    टीमच्या कॅप्टनला मिळाला महत्त्वाचा अधिकार. अटीतटीच्या प्रसंगात कॅप्टनने हा अधिकार वापरल्यास सामना फिरु शकतो. वाचा सविस्तर…..

  • 06 Mar 2023 02:15 PM (IST)

    IND vs AUS Test : टेस्ट फॉर्मेटमध्ये अश्विन एका मोठ्या रेकॉर्डच्या उंबरठ्यावर

    IND vs AUS Test : चौथ्या टेस्ट मॅचमध्ये अश्विनकडे मोठी संधी. वाचा सविस्तर……

  • 06 Mar 2023 01:56 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीचे महागाई विरोधात आंदोलन

    जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवत केले निषेध आंदोलन

    महिला कार्यकर्त्यांनी केला गॅस सिलेंडर दरवाढीचा निषेध

    केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केली निदर्शने

  • 06 Mar 2023 01:25 PM (IST)

    राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्याचा खळबळजनक खुलासा

    दाक्षिणात्य अभिनेत्री, भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांचा खळबळजनक खुलासा

    मी 8 वर्षांची असल्यापासून माझे वडील लैंगिक शोषण करत होते

    त्यावेळी मी कोणत्या परिस्थितीत होते, याचा विचारही करू शकत नाही

    आपल्याला याविषयी बोलताना आई विश्वास ठेवणार नाही, अशी लहानपणी मला भीती वाटायची

  • 06 Mar 2023 11:52 AM (IST)

    Entertainment Update : ए आर रेहमान यांच्या मुलासोबत घडली गंभीर घटना; म्हणाला, ‘मी आज जिवंत आहे, कारण…’

    प्रसिद्ध गायक संगीतकार ए आर रेहमान यांचा मुलगा गंभीर अपघातातून थोडक्यात बचावला

    सेटवर अमीन याच्यासोबत एक धक्कादायक घटना, त्यानंतर ए आर रेहमान म्हणाले… वाचा सविस्तर

  • 06 Mar 2023 10:57 AM (IST)

    Entertainment Update : मोठी बातमी… महानायक अमिताभ बच्चन यांचा अपघात

    सिनेमाच्या शुटिंग दरम्यान ॲक्शन सीन शुट करताना बिग बींचा अपघात

    खु्द्द अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून अपघाताची माहिती दिली… वाचा सविस्तर

  • 06 Mar 2023 10:55 AM (IST)

    IND vs AUS : Rohit Sharma ने एका चांगल्या खेळाडूला संधी नाकारुन आपल्या पायावर मारली कुऱ्हाड

    IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरीजमध्ये टीम संकटात असताना हा प्लेयर निश्चित उपयोगाला आला असता. वाचा सविस्तर…..

  • 06 Mar 2023 10:54 AM (IST)

    पुण्यात पीएमपी ठेकेदारांचा संप

    पुणे : ठेकेदार दुसऱ्या दिवशीही संपावर ठाम,

    ओलेक्ट्रा, हंसा, ॲंथोनी, ट्रॅव्हल टाईम या चार ठेकेदारांनी पुकारलाय संप,

    ३ महिन्यांची बिले थकल्याने पुकारला आहे पुण्यात संप,

    ९०० बसेस धावणार नसल्याने प्रवाशांची हेळसांड,

    बस स्थानका वर प्रवाशांची मोठी गर्दी.

  • 06 Mar 2023 10:54 AM (IST)

    Sunil Gavaskar भडकले, सिलेक्टर्सना सरळ सांगितलं, ‘राजीनामा द्या’, सत्य तेच बोलले

    सुनील गावस्करांनी उपस्थित केलेले मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्याची उत्तर आहेत का? वाचा सविस्तर…..

  • 06 Mar 2023 10:54 AM (IST)

    IND vs AUS : नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाच्या एका खेळाडूपासून ऑस्ट्रेलियाला सर्वात जास्त धोका

    IND vs AUS : ऑस्ट्रेलियावर हा खेळाडू भारी पडेल. कारण नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्याचा रेकॉर्डच तसा आहे. वाचा सविस्तर…..

  • 06 Mar 2023 10:53 AM (IST)

    MI vs RCB : आज हरमनप्रीत विरुद्ध स्मृती, कोण मारणार बाजी?, WPL मध्ये आज टॉप टीम्स भिडणार

    स्मृती मांधनाच्या वाघिणी पहिल्या विजयासाठी आतुर, हरमनप्रीतपण वार करण्यासाठी सज्ज. वाचा सविस्तर….

  • 06 Mar 2023 10:52 AM (IST)

    IPL 2023 आधी विराट कोहलीच्या RCB ला झटका, 3.2 कोटीला विकत घेतलेल्या खेळाडूला दुखापत

    IPL 2023 : दुखापतीमुळे विराट कोहलीच्या RCB च्या अडचणी वाढणार आहेत. आधीच दोन प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीच टेन्शन असताना आता आणखी एका तिसऱ्या खेळाडूला दुखापत झालीय. वाचा सविस्तर…..

  • 06 Mar 2023 10:49 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमधील चौकाला दिलेले आलमगीर औरंगजेब अखेर मिटवले

    छत्रपती संभाजीनगरमधील चौकाला दिलेले आलमगीर औरंगजेब अखेर मिटवले

    जालना रोडवरील चौकाला दिले होते औरंगजेबाचे नाव

    चिकलठाणा चौकात असणाऱ्या डिव्हाईडरला दिले होते औरंगजेबाचे नाव..

    चौकाला औरंगजेबाचे नाव देताच निर्माण झाली होती संतापाची लाट

    औरंगजेबाचे नाव टाकल्यानंतर काही वेळातच आले मिटवण्यात चौकाचे नाव

  • 06 Mar 2023 10:10 AM (IST)

    एमआयएमच्या उपोषण आंदोलनात बसली बिर्याणीचे पंगत

    एमआयएमच्या उपोषण आंदोलनात बसली बिर्याणीचे पंगत

    उपोषणाच्या मंडपातच उपोषणकर्त्यांनी मारला बिर्याणीवर ताव

    एमआयएमच्या वतीने औरंगाबाद शहरात सुरू आहे साखळी उपोषण

    साखळी उपोषणासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी बिर्याणीवर मारला ताव

    उपोषणकर्त्यांसाठी खास करण्यात आली होती बिर्याणीची सोय

  • 06 Mar 2023 10:02 AM (IST)

    वसंत ऋतू लागताच गोंदियात फुलला पिवळा आणि पांढरा पळस

    गोंदिया : रंगपंचमीच्या पर्वावर बहरली पळसाची झाडे फुलांनी.

    पळसाला पाने तीनच नव्हे तर तीन रंगाचे फुलंसुद्धा

    पळसाच्या फुलांच्या रंगाचा वापर रंगपंचमीला.

  • 06 Mar 2023 09:25 AM (IST)

    नागपुरात ३० वर्षांच्या तरुणाला गोवरच निदान

    तरुणाला गोवरचे निदान झाल्याने आरोग्य यंत्रणा अलर्टवर

    १० वर्षांपर्यंत गोवर होतो, रोगप्रतिकारक शक्ती तयार झाल्यावर गोवर दिसून येत नाही

    धक्कादायक बाब म्हणजे नागपुरात ३० वर्षीय तरुणाला गोवरची लागण

    हर्ड इम्युनिटी कमी झाल्याने तरुणाला गोवर झाल्याची शक्यता

  • 06 Mar 2023 09:10 AM (IST)

    रवींद्र धंगेकर घेणार शरद पवार यांची भेट

    कसबा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर घेणार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट

    शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी होणार दोघांची भेट

    भेटीनंतर शरद पवार माध्यमंशी संवाद साधणार

  • 06 Mar 2023 09:09 AM (IST)

    माजी आमदार संजय कदम उद्धव ठाकरेंच्या भेटीला

    काल सभेत संजय कदमांनी केला शिवसेनेत पक्ष प्रवेश

    रविंद्र वायकरांच्या घरी ठाकरेंना भेटण्यासाठी आलेत

  • 06 Mar 2023 08:55 AM (IST)

    मुंबई

    मातोश्री बाहेरील मुख्य रस्त्यावर शिंदेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी

    होळीच्या शुभेच्छा देणारा बॅनर पोलीस आणि मनपाने काढला

    होळीच्या शुभेच्छा देणार्या बॅनरवर अंक रंग एक संग असा आशय

    आयुष्यात भगवा रंग भरू दे अशा आशयाचा बॅनर

    डिवचणारा बॅनर असल्याने आणि वाद चिघळू नये यासाठी पोलिसांकडून घेण्यात आली दखल

  • 06 Mar 2023 08:50 AM (IST)

    मुश्रीफ यांच्या मुलाच्या जामिनावर आज सुनावणी

    आमदार हसन मुश्रीफ यांच्या मुलांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

    ईडी करावाईनंतर अटकपूर्व जामिनासाठी नविद, साजिद आणि आबिद मुश्रीफ यांनी दाखल केलाय अर्ज

    मागील सुनावणी वेळी आजच्या तारखेपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याच्या न्यायालयाने दिल्या होत्या सूचना

    आजच्या सुनावणीत हसन मुश्रीफ यांच्या मुलांना दिलासा मिळणार की अडचणीत वाढ होणार याकडे लक्ष

  • 06 Mar 2023 08:31 AM (IST)

    केसरकर ऑन शरद पवार बदलाचे वारे

    पिंपरी-चिंचवडचा काही भाग बारामती मतदारसंघाचा भाग आहे मग तुमची बारामतीची सीट जाईल असे आम्ही म्हणू का? कासब्यातील नाराजीचा फायदा तुम्हाला मिळाला धंगेकर सातत्याने जनतेत होते म्हणू निवडून आले आम्ही टिळक कुटुंबातील उमेदवार देऊ शकलो नाही ही वस्तुस्थिती चिंचवड बालेकिल्ला असताना तुम्ही का हारला याचे आत्मपरिक्षण करा कासब्याच्या निकालाचा वर्षभर काय आनंद साजरा करायचा तो करा वर्षानंतर मोदी साहेबांची लाट कशी असते हे पुन्हा तुम्हाला दिसेल देशात बदलाचे वारे सुरू झाल्याच्या शरद पवारांच्या वक्तव्यावर केसरकरांची प्रतिक्रिया

  • 06 Mar 2023 08:30 AM (IST)

    केसरकर ऑन उद्धव ठाकरे साई बाबांची शॉल

    साईबाबांची शॉल नेऊन उद्धव ठाकरेंना पांघरली होती हे ते विसरले ज्यांनी शॉल पांघरली त्यांची सुद्धा आठवण न ठेवण्या एव्हढे कठोर झालात मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी बाळासाहेबांनी जे केलं ते मोदी विसरले नाही तुम्ही मात्र एका मिनिटांत सगळं विसरले सत्तेसाठी शिवसेना फोडणाऱ्यांसोबत गेलात

  • 06 Mar 2023 08:30 AM (IST)

    केसरकर ऑन शिंदे सभा गर्दी आणि मोदींना फसवलं

    एकनाथ शिंदेंच्या १९ तारखेच्या सभेला गर्दी होईलच बाळासाहेब सुद्धा जाणाऱ्यांना कोल्हे लांडगे म्हणत नव्हते उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत मुख्यमंत्री राहा म्हणून सांगितलं मात्र शरद पवार आणि राहुल गांधींवर तुमचा विश्वास होता तुम्हाला वाटलं कुणी पदावरून काढू शकत नाही भाजपने तुम्हाला जवळ घेण्याचा प्रयत्न केला मात्र मोदींना तुम्ही खोटं बोलून फसवलं

  • 06 Mar 2023 08:30 AM (IST)

    केसरकर ऑन शिंदे सभा गर्दी आणि मोदींना फसवलं

    एकनाथ शिंदेंच्या १९ तारखेच्या सभेला गर्दी होईलच बाळासाहेब सुद्धा जाणाऱ्यांना कोल्हे लांडगे म्हणत नव्हते उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत मुख्यमंत्री राहा म्हणून सांगितलं मात्र शरद पवार आणि राहुल गांधींवर तुमचा विश्वास होता तुम्हाला वाटलं कुणी पदावरून काढू शकत नाही भाजपने तुम्हाला जवळ घेण्याचा प्रयत्न केला मात्र मोदींना तुम्ही खोटं बोलून फसवलं

  • 06 Mar 2023 08:30 AM (IST)

    केसरकर ऑन माझं कुटुंब माझी जबाबदारी

    माझं कुटुंब माझी जबाबदारी हे फक्त म्हणण्या पुरतं कोरोना काळात आतमध्ये दडून होता नुसतं टीव्हीवर दिसून क्रेडिट घ्यायचं नसतं आदित्य आज दारोदार फिरताय मात्र कोरोनाच्या वेळी एकदा तरी गेले का..? त्यांनाही दडवून ठेवलं होतं कोरोना काळात तुम्हाला तुमचं कुटुंब महत्वाचं होतं शिंदे साहेबांसारख्या बाळासाहेबांच्या कार्यकर्त्याला संपवण्याचा प्रयत्न केला युवासेनेचे कार्यकर्ते आमच्या आजूबाजूला पहारा देत असताना तुम्हाला काही वाटलं नाही का..? त्यांना थांबवण्याची हिम्मत तुमच्यात नव्हती त्यामुळे तुम्हीही बोलू नका म्हणजे आम्हीही उत्तर देणार नाही

  • 06 Mar 2023 08:29 AM (IST)

    केसरकर ऑन निवडणूक आयोग टीका

    त्यांना सुप्रीम कोर्टही मान्य नसतं प्रत्येकाला बरखास्त करा अशी त्यांना सवय झालीये जनतेला न्याय देता आला नाही म्हणून तुमचं पद गेलं

  • 06 Mar 2023 08:29 AM (IST)

    केसरकर ऑन खेड सभा गर्दी

    राज ठाकरे कोकणात आले तर दुप्पट गर्दी होईल नारायण राणेंचा पराभव करायला गेला तेंव्हा तुमच्या उमेदवारांची डिपॉजिट जप्त झाली तरीही नंतरच्या काळात कोकण तुमच्या मागे उभा राहिला अजितदादांच्या समोर बोलायची तुमची कधी हिंमत झाली नाही शाखा प्रमुखांना वर्षाच्या जवळही फिरकू दिले जात नव्हतं आज माझ्यावर अन्याय केला असं दाखवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न तुम्हीच मुख्यमंत्री राहा असे आमदार शेवटपर्यंत सांगत असताना राजीनामा का दिला..? खोटं बोलू नका खरं बोला, एव्हढीच नम्रपणे विनंती

  • 06 Mar 2023 08:29 AM (IST)

    केसरकर ऑन भाजप

    मोदींना संपूर्ण भारतात जो प्रतिसाद मिळतो तो केवळ शिवसेनेमुळे मिळतो का..? मोदी तुमच्याशी किती चांगले वागले हे मला माहित आहे ज्या मोदींनी हिंदुत्वासाठी लढा दिला त्यांच्याबद्दल सामनामध्ये काय छापत होता..? संजय राऊतला तुम्ही का आडवू शकला नाही..? दिपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना सवाल

  • 06 Mar 2023 08:28 AM (IST)

    केसरकर ऑन बाळासाहेबांचं नाव

    बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले त्यामुळे तुम्हीच त्यांचं नाव बाजूला करा शिवसेनेसाठी आम्ही आमदारक्या पणाला लावल्या तुमच्याबद्दलचा आदर तसाच रहावा असं वाटतं असेल तर संयमाने बोला तुमच्यापेक्षा जास्त गर्दी राज ठाकरेंच्या सभेला जमते पण ते कुणाला चोर म्हणत नाहीत तुम्हाला टिकवता आलं नाही म्हणजे ते कुणीतरी चोरलं अशा भ्रमात राहू नका जनतेनं भाजप-सेना युती म्हणून मतदान केलेलं होतं काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत जाणं बाळासाहेबांच्या कुटुंबियांना शोभण्यासारखं नाही

  • 06 Mar 2023 08:28 AM (IST)

    केसरकर ऑन ठाकरे सहानुभूती प्रयत्न

    सत्ता गेल्याची खात्री झाल्यावर औरंगाबादचं संभाजीनगर केल्याचे दाखवण्याचा प्रयत्न ज्या मुंबईची आजपर्यंत लूट झाली तीला न्याय देण्याचं काम सुरू आजही तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मागे फरफटत जाताय ज्या शरद पवारांनी अनेकदा शिवसेना फोडली त्यांच्याबरोबर तुम्ही जाताय जे काही गेलं त्यामागे तुम्ही घेतलेले निर्णय कारणीभूत सहानुभूतीची खोटी लाट निर्माण करण्याचा प्रयत्न जागे व्हा, काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडा हे आसाममधून सुद्धा सांगितलं होतं खोके घेतले असते तर अडीच वर्ष तुमचं सरकार का टीकलं असतं?

  • 06 Mar 2023 08:28 AM (IST)

    शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर सहपरिवार ‌साई दरबारी

    रात्रीची शेजारती आणि पहाटच्या काकड आरतीला हजेरी

    केसरकर ऑन ठाकरे धनुष्यबाण वक्तव्य

    अजित पवारांनी निर्दयीपणे कोकणचे पैसे काढले तेंव्हा हु की चू केलं नाही खुर्ची सांभाळण्यासाठी कोकणातल्या लोकांवर अन्याय केला कोकणवर अन्याय होत असताना तुमच्या आदरापोटी चूप होतो जेंव्हा तुमच्या हातात होतं तेंव्हा कोकणाला का नाही दिलं? ज्या सत्तेपोटी राष्ट्रवादीची लाचारी केली ती सत्ताही तुमच्या हाती राहिली नाही तुमच्याकडे पक्षाचे नाव आणि चिन्ह होतं तेंव्हा कोकणात एक आमदार निवडून आला

  • 06 Mar 2023 08:03 AM (IST)

    पुण्यात कात्रज बोगद्याजवळ विचित्र अपघात

    अपघातात चार वाहनांचा चुराडा

    भरधाव ट्रकने दिली टेम्पो ट्रॅव्हल्सला धडक

    विचित्र अपघातात सहा जण जखमी

    दरी पूल पेट्रोल पंपाच्या 100 मीटर अंतरावर घडला अपघात

    सुदैवाने जीवितहानी नाही मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

  • 06 Mar 2023 07:36 AM (IST)

    पुणे विभागातील रेल्वेच्या सर्व मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण

    पुणे विभागातील रेल्वेच्या सर्व मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण

    पुण्यातील जवळपास 531 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम झाले पूर्ण

    रेल्वे विभागाचे विद्युतीकरण झाल्यामुळे इंधनावर होणारा 246 कोटी रुपयांचा खर्च होणार कमी

    महिन्याला जवळपास 20303 लिटरची होणार इंधन बचत

    इंजिन बदलासाठी लागणारा वेळ देखील वाचणार

    पुणे रेल्वे प्रशासनाची माहिती

  • 06 Mar 2023 07:07 AM (IST)

    नागपूरात आजपासून तीन दिवस 60 संवेदनशील ठिकाणी पोलिसांद्वारे कोंबिंग ऑपरेशन

    होळी आणि धुलिवंदनाच्या पार्श्‍वभूमीवर कुठलाही गैरप्रकार होऊ नये म्हणून पोलीस ॲक्शन मोडवर

    शहरात 6 ते 8 मार्चदरम्यान 40 ठिकाणी बंदोबस्त

    होळीच्या पार्श्‍वभूमीवर नागपुरात ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह तपासणीची कारवाई मोहिम

    शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आजपासून मुख्य चौकात नाकाबंदी मोहीम

    शाळकरी मुला-मुलींचे वसतिगृह, महिलांच्या वसतिगृहाजवळ फिक्स पॉईंट, या परिसरात पोलिस सलग गस्त घालणार

    4 हजार पोलिसांवर होळी-धुलिवंदनाच्या बंदोबस्तासाठी तैनात असणार

    हातभट्टी, अवैधदारू विक्री करणारे, शस्त्रे बाळगणारे आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाई सुरू

  • 06 Mar 2023 06:14 AM (IST)

    नगर शहरात एका युवकावर हल्ला, या हल्ल्यात युवक गंभीर जखमी

    युवकाच्या गळा आणि छातीवर वार, उपचारासाठी युवक खासगी रुग्णालयात दाखल

    शहरातील महेश टॉकीज, नटराज हॉटेलजवळ झाला हल्ला

    अमन युनूस शेख असे हल्ला झालेल्या युवकाचे नाव

    नेमका हल्ला कोणत्या कारणावरून झाला कारण अस्पष्ट

    रुग्णालयात मोठी गर्दी तर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल

  • 06 Mar 2023 06:11 AM (IST)

    खेडमधील सभेत उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर गुलाबराव पाटील यांचे प्रत्युत्तर

    धनुष्यबाणावर आमच्यासारखे लोक निवडून आलेत

    35 वर्षापासून धनुष्यबाण आमच्या हातात

    शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने धनुष्यबाण आम्ही पेलवू

    प्रत्येकाने आपला पक्ष वाढवावा, घोडा मैदान दूर नाही, आगामी निवडणुकीत चित्र स्पष्ट होईल

  • 06 Mar 2023 06:08 AM (IST)

    डोंबिवली पूर्व शांती उपवन कॉम्प्लेक्स मधील रहिवाशांनी केला रस्ता रोको

    200 ते 250 नागरिक रस्त्यावर

    कल्याण शीळ रोड पलावा जंक्शनवर केला रस्ता रोको

    परिसरात वाहतूक कोंडी, वाहनाच्या रांगा

    शांती उपवन कॉम्प्लेक्समधील एका विंगला तडा गेल्याने काल 240 कुटुंबीयांचे करण्यात आले होते स्थलांतर

    राहत्या घराच्या प्रश्न निर्माण झाल्याने रहिवाशी संतप्त

    लोढा बिल्डरने प्रत्यक्ष येवून घरांबाबत निर्णय घ्यावा.. आंदोलनकर्त्यांची मागणी

  • 06 Mar 2023 06:04 AM (IST)

    वसई-विरारमध्ये मध्यरात्री अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

    विजांच्या कडकडाटसह पहाटे 3 ते साडे तीन असा अर्धातास जोरदार पाऊस पडला

    अचानक विजांच्या कडकडाटसह पडलेल्या पावसामुळे काहीवेळ वीज गायब झाली

    पडलेल्या अवकाळी पावसाने आंब्याच्या मोहराचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले

  • 06 Mar 2023 06:02 AM (IST)

    बुलढाण्याच्या सैलानीत आज हजारो नारळांची होळी पेटणार

    तर 12 मार्चला सैलानीबाबांच्या दर्ग्यावर चढणार संदल

    सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सैलानीबाबांच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे

    परंपरेनुसार 15 ते 20 ट्रक नारळाची होळी सैलानीत पेटवली जाणार आहे

    सैलानीतील नारळांच्या होळीला मोठे महत्त्व असल्याने या होळी उत्सवात महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होतात

    होळीभोवती प्रदक्षिणा घालत नारळाची होळी करतात, यामुळे शारीरिक व्याधी दूर होतात अशी भाविकांची भावना आहे

    या होळीसाठी प्रशासन सज्ज झाले असून होळीच्या जागेभोवती बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत

Published On - Mar 06,2023 5:58 AM

Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.