Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरांसह गावागावांतील बातम्यांचे अपडेट आणि ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई : आज सोमवार, 14 नोव्हेंबर. बालदिन. देशासह महाराष्ट्रात बालदिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनीही वेग घेतलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आलंय. आपण राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहो, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. या पार्श्वभूमीवर दिवसभर महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या सीबीआय प्रकरणातील जामीनावर आज हायकोर्टात (High Court) सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय. राज्यातील राजकीय घडामोडींसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि तुमच्याशी निगडीत ताज्या घडामोडी आणि ब्रेकिंग न्यूजचा आढावा या ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
LIVE NEWS & UPDATES
-
Virender Sehwag: ‘तो T20 टीम आणि वनडे संघातही नाही’, मुंबईच्या ‘या’ खेळाडूसाठी सेहवागची जोरदार बॅटिंग
विरेंद्र सेहवाग म्हणतो, मुंबईचा ‘हा’ प्लेयर टीम इंडियामध्येच हवाच, तरच….वाचा सविस्तर
-
रोहित शर्माची कॅप्टनशिप जाणार? जानेवारीत भारतीय क्रिकेटमध्ये घडणार मोठा बदल
भविष्याचा विचार करुन BCCI एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत. वाचा सविस्तर….
-
-
IPL 2023: धोनी समोरच एक टॉप ऑलराऊंडर क्रिकेटपटू लागला KKR च्या गळाला
CSK काहीच करु शकली नाही. त्याला 10 कोटी रुपयापेक्षा पण जास्त रक्कम मोजून विकत घेतलं होतं. वाचा सविस्तर…..
-
Anil Kumble ची भारतीय T20 क्रिकेट टीमसाठी जबरदस्त आयडिया
घाव भरुन काढणारी अनिल कुंबळेंची आयडिया कुठली? वाचा सविस्तर….
-
पत्रकार परिषदेत बोलताना जितेंद्र आव्हाड यांच्या डोळ्यात पाणी
हा षडयंत्राचाच भाग, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
पत्रकार परिषदेत बोलताना जितेंद्र आव्हाड यांच्या डोळ्यात पाणी
राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर गेलंय, इतकं घाणेरडं राजकारण आम्ही पाहिलेलं नाही
जितेंद्र आव्हाड यांचा भाजप आणि शिंदे सरकारवर निशाणा
-
-
शेलार आणि माझा जितेंद्र आव्हाड यांना एकच सल्ला- पाटील
‘आशिष शेलार आणि माझा जितेंद्र आव्हाड यांना एकच सल्ला आहे, तोच देण्यासाठी मी इथे आलो आहे’
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा पत्रकार परिषदेत टोला
व्यथित होऊन जितेंद्र आव्हाड यांना राजीनामा देत आहेत- जयंत पाटील
-
‘ठरवून जितेंद्र आव्हाड यांना टार्गेट केलं जातंय’
ठरवून जितेंद्र आव्हाड यांना टार्गेट केलं जातंय, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचा गंभीर आरोप,
विनयभंगाचा गुन्हा दाखल होण्याआधी तक्रारदार महिला आणि मुख्यमंत्री यांच्यात भेट झाल्याचंही समजतंय, जयंत पाटील यांचं मोठं विधान
-
जितेंद्र आव्हाड यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा सोपवला
जितेंद्र आव्हाड यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा सोपवला
जयंत पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती
आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरु- जयंत पाटील
-
जितेंद्र आव्हाड राजीनामा देण्याची नौटंकी करत आहेत, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
शरद पवारांनी आणि राष्ट्रवादीने जितेंद्र आव्हाडांना निलंबित करावं
सुप्रिया सुळे यांनी जितेंद्र आव्हाडांचे समर्थन करू नये, आम्ही अब्दुल सत्तारांचे कधी समर्थन केले नाही
महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारणाऱ्यांनी तरी याचे समर्थन करू नये, सुप्रिया सुळे यांना टोला
मध्यावधी घेतल्या तर राष्ट्रवादीच्या 20 जागा पण येणार नाहीत
राष्ट्रवादीचे नेते सत्ता नसल्यामुळे अस्वस्थ झाले आहेत
-
जळगाव : गावठी कट्टे बाळगणार्यांना अटक
जळगाव : 4 गावठी कट्टे बाळगणार्या श्रीरामपुरातील 2 अट्टल गुन्हेगारांना अटक
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
-
चेन्नई, तमिळनाडूच्या इतर भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरूच
चेन्नई, तमिळनाडूच्या इतर भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरूच
मुगलीवक्कम, तिरुवल्लुवर नगर परिसरात साचलं पाणी
दक्षिणेकडील काही भागांमध्ये हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी
तिरुवल्लूर, मदुराई, शिवगंगा आणि कांचीपुरमसह विविध जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्याचे निर्देश
मदुराई, कांचीपुरम आणि त्रिवल्लूरमध्येही संततधार पावसामुळे महाविद्यालये बंद ठेवण्याचे निर्देश
-
भाजपच्या रीदा राशीद यांची पत्रकार परिषद LIVE
भाजपच्या रीदा राशीद यांची पत्रकार परिषद
आव्हाडांविरोधात विनयभंगाची तक्रार करणाऱ्या रीदा राशीद माध्यमांसमोर
भाजप म्हणून मला कमी ओळखतात, माझी ओळख खरी एक समाजसेविका म्हणून- रीदा राशीद
काल नेमकं काय घडलं होतं, याची रीदा राशीद यांनी दिली माहिती
राष्ट्रवादीकडून व्हायरल केल्या जात असलेल्या व्हिडीओवर मी योग्य वेळी बोलेन
राज्य महिला आयोगानेही स्वतःहून माझ्यासोबत घडलेल्या प्रकाराची दखल घ्यावी- राशीद
-
भायखळा येथील रहिवासी चाळीत अग्नितांडव
भायखळा स्टेशन येथे लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट या ठिकाणी आगडोंब
आग आटोक्यात आणण्यात यश, सुदैवानं जीवितहानी नाही
फायर ब्रिगेडच्या 14 गाड्यांनी तातडीने धाव घेत आग विझवली
रहिवासी चाळीला लागली होती आग, आगीचं कारण अस्पष्ट
-
पीडितेचा दादागिरी करताना व्हिडीओ राष्ट्रवादीकडून व्हायरल
जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा आरोप करणाऱ्या महिलेचा एक व्हिडीओ व्हायरल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पीडितेचा दादागिरी करताना व्हिडीओ व्हायरल
जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानं वातावरण तापलं
-
T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया हरली पण एक क्रिकेटपटू खोऱ्याने छापणार पैसे
नशीब फळफळल, आतापासूनच त्याच्या घराबाहेर लागली रांग. वाचा सविस्तर….
-
लोकसभा-विधानसभा निवडणुकीबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा दावा
भाजपा शिवसेनेसोबत युती करुन (शिंदे गट) एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 2024 ची विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढवेल. लोकसभेच्या 45 आणि विधानसभेच्या 200 पेक्षा जास्त जागा जिंकू असा दावा महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे यांनी केला.
BJP will contest Assembly & Lok Sabha polls in 2024 in alliance with Shiv Sena (Shinde faction) & under leadership of Eknath Shinde & Devendra Fadnavis. We are prepared to win 45 Lok Sabha seats &over 200 Assembly seats: Maharashtra BJP Chief Chandrashekhar Bawankule
(file pic) pic.twitter.com/UCCD8GcPes
— ANI (@ANI) November 14, 2022
-
जितेंद्र आव्हाड – विनयभंग प्रकरणावर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया
जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले
सरकारची एक प्रकारे महाराष्ट्रभर दडपशाही सुरु आहे
विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे
आव्हाडावर एक प्रकारे सूड भावनेने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो
एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया
-
महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांवर गुजरात निवडणुकीची जबाबदारी येणार?; काँग्रेसच्या हालचाली
पृथ्वीराज चव्हाण आणि मुकुल वासनिक या दोन्ही नेत्यांवर निरीक्षक पदाची जबाबदारी देण्याची शक्यता
पक्षश्रेष्ठी घेणार लवकरच निर्णय
यापूर्वी भाजपकडून गुजरात निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव
आता गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण आणि मुकुल वासनिक या दोन्ही नेत्यांची नावे चर्चेत
-
देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट
राजभवनावर उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल यांची एकमेकांशी चर्चा
-
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सुट्टी मागणारी याचिका फेटाळली
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सुट्टी मागणारी याचिका फेटाळली
सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश मागणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
हा निर्णय भारत सरकारने घ्यावा- सर्वोच्च न्यायालय
-
मुंब्रा : जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी
मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी
जितेंद्र आव्हाड यांची पत्नी ऋता आव्हाड या देखील आंदोलनात सहभागी
-
अंधेरीचा गोखले पूल बंद झाल्यानंतर पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
गोरेगाव ते विलेपार्ले गाड्या धीम्या गतीने जाताना दिसत आहेत.
लोकांना 30 मिनिटांचा प्रवास तासात करावा लागतोय.
गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेल्या या वाहतूक कोंडीमुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत.
-
जितेंद्र आव्हाड अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता
वकील प्रशांत कदम जितेंद्र आव्हाड यांच्या भेटीसाठी दाखल
जितेंद्र आव्हाड अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता
-
संजय राऊत फोर्टीस रुग्णालयात दाखल
रुटीन चेकअपसाठी संजय राऊत फोर्टीस रुग्णालयात दाखल
आज फुल बॉडी चेकअप करुन घेणार असल्याची माहिती
डॉक्टरांच्या सल्लानंतर भारत जोडो यात्रेतही सहभागी होण्याचा निर्णय घेणार
-
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात
एकूण 21 टेबलवर ही मतमोजणी प्रक्रिया सुरू
काल 16 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती
संपूर्ण तालुक्याचे एज्युकेशन सोसायटीच्या निकालाकडे लक्ष लागले आहे
प्रगती पॅनल आणि परिवर्तन पॅनलमध्ये अतिशय चुरशीची निवडणूक झाली होती
मात्र मतदारांनी कल कोणाला दिलं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे
-
PFI सदस्य मौलाना इरफान दौलत नदवीला अटक
PFI सदस्य मौलाना इरफान दौलत नदवीला अटक
नाशिक ATS ने दाखल केलेल्या FIR नंतर महाराष्ट्र ATS ची कारवाई
याप्रकरणी आतापर्यंत सात आरोपींना अटक
नदवी यांच्यावर देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप- एटीएस
-
चंद्रशेखर बावनकुळे आज पुणे दौऱ्यावर
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज पुणे दौऱ्यावर
बावनकुळे आज भाजप पदाधिकारी आढावा बैठक घेणार
त्याआधी पुण्यातील आरएसएसच्या कार्यालयाला भेट देणार
-
अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव मृत्यूप्रकरणी FIR दाखल
अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव मृत्यू प्रकरण
आयपीसी आणि मोटार वाहन कायद्यानुसार एफआयआर दाखल
कोल्हापूर पोलिसांची माहिती
सांगली कोल्हापूर हायवेवर हालोंडी गावाजवळ झाला होता अपघात
12 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजता घडला अपघात
दुचाकीवर असलेल्या कल्याणीला ट्रॅक्टरची जोरदार धडक
Marathi actress Kalyani Kurale died in a road accident on Sangali Kolhapur highway near Halondi village in Kolhapur dist around 11pm on 12 Nov. She was on her way home on a 2 wheeler when a tractor hit her. FIR registered u/s of IPC & Motor Vehicles Act: Kolhapur Police officials pic.twitter.com/lIkpCpN1k6
— ANI (@ANI) November 14, 2022
-
काश्मीर खोऱ्यात आज पहाटेपासून जोरदार भरपूर बर्फवृष्टी
अनेक रस्ते बंद झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल
स्थानिक प्रशासनाकडून बर्फ हटवण्याचे काम सुरू
उत्तर भारतात येत्या 48 तासात थंडीचा कडाका वाढणार
हिमाचल प्रदेश, उत्तराखंड राज्यातही थंडी वाढण्याची शक्यता
कश्मीरमधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पहाटे शून्य डिग्री पेक्षा कमी तापमानाची नोंद
-
9 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरु
पुणे – पुणे जिल्ह्यातील 9 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरु
नऊ बाजार समित्यांच्या मतदारांची प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध होणार
प्रारूप मतदार यादीवर 23 नोव्हेंबरपर्यंत आक्षेप व हरकती लेखी स्वरूपात दाखल करता येणार, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
पुरंदर, भोर, दौंड, आंबेगाव, खेड, शिरूर, इंदापूर, बारामती, जुन्नर या 9 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश
-
कारचालकाने सायकलस्वार शिक्षकाला चिरडलं
मुंबई : बीकेसीत मद्यधुंद कारचालकाने सायकलस्वाराचा चिरडलं
पहाटेच्या सुमारास घडला भीषण अपघात
अफघातात 45 वर्षीय शिक्षक गंभीर जखमी
सायक्लोथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या शिक्षकाला कार चालकाने धडक देत फरफटत नेलं
अपघातात शिक्षक राजेश पै यांचा खांद्याचा दुखापत
-
नाशिक महापालिकेत डिसेंबर अखेर 706 पदांसाठी होणार भरती
महापालिका प्रशासनाचा शासनाकडील पाठपुरावा यशस्वी
अग्निशमन तसेच वैद्यकीय अशा अत्यावश्यक सेवांसाठी मिळणार कर्मचारी
त्रयस्थ संस्थेमार्फत होणार नोकरभरती
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार कोकण दौरा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार कोकण दौरा
१ ते ९ डिसेंबर पर्यंत राज ठाकरे असणार कोकण दौऱ्यावर
संघटनात्मक बैठकांवर राज ठाकरेंचा जोर
कोल्हापूरला महालक्ष्मी मातेचे दर्शन घेवून करणार कोकण दौऱ्याची सुरुवात
-
ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं अल्पशा आजाराने निधन
ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं अल्पशा आजाराने निधन
‘गांधी’, ‘सरफरोश’, ‘वास्तव’ यांसारख्या चित्रपटांमध्ये साकारल्या भूमिका
-
राज्यात 2 दिवसांनंतर पुन्हा थंडीचा कडाका
पुणे : राज्यात 2 दिवसांनंतर पुन्हा थंडीचा कडाका
बंगालच्या उपसागरानंतर सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र
पुढील दोन दिवसात पुन्हा रात्रीच्या तापमानात घट होणार
-
कोल्हापूरात तरूणाची हत्या
टोळीयुद्धातून तरुणाचा पाठलाग करत कोयत्याने तब्बल 20 वार
घटनेत कुमार गायकवाड या तरुणाचा जागीच मृत्यू
कोल्हापुरातील टाका खण परिसरातील घटना
राजेंद्र नगर परिसरातील वर्चस्वादातून हत्या
टोळी युद्धातून झालेल्या हत्येमुळे खळबळ
शहरात टोळी युद्धाचा पुन्हा एकदा भडका
-
पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरच हत्याकांड
नागपूर : इमाम वाड्यात किरकोळ वादातून हत्या
हत्या करून मृतदेह विहिरीत फेकल्याने खळबळ
पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरच हत्याकांड
रामसिंग ठाकूर असे मृतकाचं नाव, दोघा आरोपींना अटक
-
दादरमधील टिळक पूलला मिळणार नवा लूक
मुंबई : दादरमधील टिळक पूलला मिळणार नवा लूक
लवकरच सी लिंकच्या धर्तीवर उभारला जाणार केबल पूल
सी लिंकच्या धर्तीवर एमआरआयडीसी उभारणार गोखले पूल
पालिकेकडून पूल उभारणीसाठी एमएमआरडीएला 374 कोटी
-
भीमा सहकारी साखर कारखान्याची आज मतमोजणी
सोलापूर – भीमा सहकारी साखर कारखान्याची आज मतमोजणी
सकाळी 9 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार
भीमा सहकारी साखर कारखान्यासाठी काल झाले होते
संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी एकूण 78.86 टक्के मतदान झाले होते.
खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार राजन पाटील यांची प्रतिष्ठा पणाला
मागील दहा वर्षापासून भीमा सहकारी साखर कारखाना हा खासदार धनंजय महाडिक यांच्या ताब्यात
-
तेलाचे भाव वाढल्याने सोयाबीनचा भाव तेजीत
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव वाढल्याने सोयाबीनचा भाव तेजीत
आठवड्याभरात क्विंटल मागे पाचशे रुपयांचा रुपयांनी दर वाढला
बाजारपेठेत येणाऱ्या सोयाबीनची आवकही घटली
आणखी आठवड्याभरात सहा हजारापर्यंत सोयाबीनचे भाव जाण्याची शक्यता
Published On - Nov 14,2022 7:39 AM