Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई: आज दिनांक 15 ऑक्टोबर 2022 जाणून घेणार आहोत राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी. सध्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. भाजपकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेने देखील मुरजी पटेल यांना पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ऋतुजा लटके यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने पाठिंबा दिलाय. याच पार्श्वभूमीवर आज देखील काही महत्त्वाच्या घडामोडी पहायला मिळू शकतात. दुसरीकडे पुणे शहरासह जिल्ह्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यात काल केवळ 2 तासात 78 मिमी पावसाची नोंद झालीये. राज्याच्या इतर भागात देखील पावसाची शक्यता आहे.