Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई: आज दिनांक 27 ऑक्टोबर 2022 जाणून घेणार आहोत राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी. सध्या आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यामधील वाद चर्चेचा विषय ठरत आहे. दुसरीकडे या वादावर प्रतिक्रिया देताना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला जोरदार टोला लगावला आहे. कोणाला किती खोके पोहोचले यावरून आता आमदारांमध्ये भांडण सुरू झाल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावरू राजकारण तापण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्यात 15 ऑक्टोबरपासून गाळप हंगामाला सुरुवात झाली असून आतापर्यंत राज्यातील 18 साखरकारखाने सुरू झाले आहेत. राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. याचा मोठा फटका हा साखर उद्योगाला बसला आहे.
हे सुद्धा वाचा