Maharashtra News Live Update : शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिंदे सरकारचं एक पाऊल पुढे, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच मोठे निर्णय
Uddhav Thackeray vs Eknath Shinde Live : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होतेय. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली घटनापीठासमोर सुनावणी होत आहे. यात हरिश साळवे आणि कपिल सिब्बल युक्तीवाद करत आहेत.
मुंबई : आज विविध घडामोडी घडण्याची शक्यता आहे. tv9 मराठीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक गौप्यस्फोट केले. त्यांच्या वक्तव्यांवर राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. विशेषत: राष्ट्रवादी आणि अजित पवार या सगळ्यावर काय प्रतिक्रिया दिली जाते, हे पाहणं महत्वाचं असेल. याचसोबत महाष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. राजकीय, सामाजिक याचसोबत मनोरंजन, अर्थकारण, क्रीडा क्षेत्रातही घडामोडींची शक्यता आहे. याचसह आज प्रेमाचा दिवस अर्थातच Valentine’s Day आहे. राज्यातील सर्वात मोठी बातमी म्हणजे सर्वोच्च न्यायालयात आजापासून सत्तासंघर्षाची सुनावणी होत आहे. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत. आज दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर…
LIVE NEWS & UPDATES
-
सोन्याच्या टॉयलेटनंतर सोन्याचा टॉयलेट पेपर
एका रोलमध्ये भारतात येईल हेलिकॉप्टर
या टॉयलेट पेपरला खरंच लागलंय का सोनं?
सोन्याची टॉयलेटची किंमत 9 कोटी 22 लाख रुपये, वाचा बातमी
-
नाशिकमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील मुद्दे :
नाशिकमधल्या अनेक लोकांनी या ठिकाणी प्रवेश केला. त्या सगळ्यांचे अभिनंदन आहे.
आज दादा भुसे, भाऊ चौधरी बाकीचे जिल्हाप्रमुख आहेत. गेले काही महिने या जिल्ह्यातून अनेक लोक बाळासाहेबांची शिवसेना पक्षात येत आहेत
आपलं सरकार आल्यानंतर आपण सगळ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहोत. त्यामुळे लोक आपल्याला मिळाले आहेत.
त्रास हा सगळ्यांना होतो. त्यांना जास्त होतोय
तिथे ( दिल्लीमध्ये) जशी तयारी सुरु आहे तशी इथे देखील आमची तयारी आहे.
तिथे जेव्हा जेव्हा ही लोक जातात तेव्हा इथे त्यांना धक्का दिला जातो
सगळ्या लोकांना आपल्या सरकारमध्ये न्याय मिळेल
सगळ्यांना शासन हे मदत करणार आहे. सगळ्यांना न्याय देखील देणार
लोकांचा उदंड प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला लाभतो.
यामुळे आमची जबाबदारी आम्हाला माहित आहेय त्यांना न्याय व पाठींबा देण्याचं काम आम्ही करत राहणार आहोत
आज नाशिक येथील ज्या नागरिकांनी प्रवेश केला त्यांचं अभिनंदन.
-
-
शेअर बाजारात लवकरच सर्जिकल स्ट्राईक
शॉर्ट सेलिंगविषयी सेबीने काय घेतला निर्णय?
सेबीने मांडली सर्वोच्च न्यायालयात बाजू
शेअरच्या किंमतींचा चढउतार रडारवर
अदानी समूहाविषयी मांडली न्यायपालिकेसमोर भूमिका, वाचा बातमी
-
महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या
1. श्री राजेंद्र भोसले, IAS (2008) जिल्हाधिकारी, अहमदनगर यांची जिल्हाधिकारी, मुंबई उप-शहरी जिल्हा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2. श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे, IAS (2011) मुख्य प्रशासक (नवीन टाउनशिप), सिडको, औरंगाबाद यांची जिल्हाधिकारी, बीड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
3. श्री राधाबिनोद शर्मा, IAS (2011) जिल्हाधिकारी, बीड यांची मुख्य प्रशासक (नवीन टाउनशिप), सिडको, औरंगाबाद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
4 श्री सिद्धाराम सलीमथ, IAS (2011) यांची जिल्हाधिकारी, अहमदनगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
5 श्रीमती निधी चौधरी, IAS (2012) जिल्हाधिकारी, मुंबई उप-शहरी जिल्हा, मुंबई यांची विक्रीकर, मुंबई सह आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
-
सोन्या-चांदीच्या किंमती घसरल्या
गुंतवणूकदारांनी खरेदीची करा लगबग
ऑल टाईम हायपेक्षा किंमतीत मोठी घसरण
काही दिवसानंतर भावात कमालीची वृद्धी
सोने 65000 रुपयांच्या आसपास जाऊ शकतात
तर चांदी 80000 रुपयांपर्यंत पोहचण्याची शक्यता, वाचा सविस्तर
-
-
मंत्रिमंडळ बैठकीत पाच महत्त्वाचे निर्णय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पाच मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
➡️ मंत्रिमंडळ निर्णय 1
शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी राज्यात पीएम-श्री योजना राबविणार ———-
➡️ मंत्रिमंडळ निर्णय 2
आणखी 2 विद्यापीठांच्या अधिनियमात बदल ———-
➡️ मंत्रिमंडळ निर्णय 3
पैनगंगा नदीवरील 11 बॅरेजसाठी ₹787.15 कोटींच्या सुधारित खर्चाला मंजुरी ———-
➡️ मंत्रिमंडळ निर्णय 4
महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण अधिनियम तयार करण्याचा निर्णय ———
➡️ मंत्रिमंडळ निर्णय 5
नोंदणीकृत धान उत्पादकांना जमीनधारणेनुसार प्रोत्साहन राशी, 1000 कोटी रुपयांची तरतूद
-
राज ठाकरे यांच्या हस्ते शिवाजी पार्क परिसरात सेल्फी पॉईंटचं उद्घाटन
मुंबई :
शिवाजी पार्क परिसरात मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटचं काही वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर सेल्फी पॉईंटला खास ‘रेड हार्ट’ची थीम
पत्रकारितेतील जोडप्यांच्या हस्ते केक कापून होणार व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन
राज ठाकरे यांच्यासह खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर हे देखील उपस्थित राहणार
-
बीबीसीवर आयकर धाडीमागचे काय आहे खरे कारण
बीबीसीवर धाड नव्हे तर केवळ अनियमिततेचा शोध
केंद्र सरकारच्या सूत्रांनी दिली माहिती
बीबीसीने कर चोरी केली की नाही, यासंबंधीची घेतली माहिती
हे ट्रान्सफर प्राईसिंग आहे तरी काय, त्याचा अर्थ काय, वाचा सविस्तर
-
एसटी कामगार संघटनेची अवमान याचिकेची नोटीस
मुंबई :
एसटी कामगारांच प्रलंबित वेतन वेळेत मिळत नसल्यानं परिवहनमंत्री, उपाध्यक्ष, व व्यवस्थापकीय संचालकांना अवमान याचिकेची नोटीस
मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेनं पाठवली नोटीस
प्रलंबित वेतनासाठी वकिलांमार्फत नोटीस पाठवण्यात आली आहे
न्यायालयाने प्रलंबित याचिकेसंदर्भात 14 फेब्रुवारी 2023 ला कर्मचाऱ्यांच वेतन जमा कराव असे आदेश दिले होते
मात्र अजूनही वेतन मिळालं नसल्यानं अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे…
बाईट – संदीप शिंदे – अध्यक्ष एसटी कामगार संघटना
-
महागाई दराने ठोकला षटकार
महागाईच्या आघाडीवर केंद्र सरकारला तगडा झटका
महागाई आटोक्यात नाहीच, उलट वाढला महागाईचा आलेख
औद्योगिक विकास दराची तर बातच विचारु नका, वाचा बातमी
-
यंदा आयटीआर भरण्यासाठी जास्त कालावधी
प्राप्तिकर भरण्यासाठी आयटीआर फॉर्म लवकरच उपलब्ध
एप्रिलपूर्वीच आयटीआर फॉर्म भरण्याची मोठी संधी
तांत्रिक अडचणी, सर्व्हर डाऊन या अडचणींपूर्वीच भरा अर्ज
करदात्यांना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचा मोठा दिलासा, वाचा बातमी
-
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्यापासून कसब्यात ठाण मांडणार
पुणे : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उद्या भाजपच्या कोअर कमिटीची बैठक,
उद्या दिवसभरात बावनकुळे कसब्यात चार मेळावे घेणार,
बावनकुळे उद्यापासून कसब्याची सूत्र आपल्या हाती घेणार.
-
सत्तासंघर्षाची आजची सुनावणी संपली
उद्या पुन्हा नियमित सुनावणी होणार
कपिल सिब्बल, हरिष साळवे यांचा युक्तीवाद
१० व्या सूचीचा गैरवापर केल्याचा सिब्बल यांचा दावा
-
सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा सुरु
न्यायालयात विश्रांतीनंतर सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु
रेबिया प्रकरणावरुन जोरदार युक्तीवाद
रेबिया प्रकरण महाराष्ट्रासाठी लागू करता येणार नाही- सिब्बल
दहाव्या सूचीनुसार आमदार अपात्र ठरायला हवे होते
-
BBC IT Raid: दिल्लीसोबतच मुंबईतील BBC कार्यालयात IT चं धाडसत्र
सिक्योरिटीकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ITची टीम येथे आली असून, त्यांची कारवाई सुरू आहे.
विंडसर बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावर बीबीसीचे कार्यालय आहे. आणि त्याचवेळी ITचे कर्मचारी हजर राहून कारवाई करत आहेत.
मुंबई आयकर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथे आलेली आयकर टीम दिल्लीची आहे.
सध्या आयकर पथकाने बीबीसी कार्यालयात कोणालाही जाण्याची परवानगी नाही.
-
अदानी समूहासाठी चांगली बातमी
हिंडनबर्गच्या अहवालात जो उल्लेख होतो तो मॉरीशसने फेटाळला
अदानी समूहाला मॉरीशसने क्लीन चीट दिली
तपासणीत कुठेही कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आम्हाला आढळले नाही…वाचा सविस्तर
-
राहुल गांधींच्या विमानाचं वाराणसी एअरपोर्टवर लँडिंग नाकारल्याचं प्रकरण
विमानाला उतरवण्याची परवानगी दिली नसल्याचा आरोप वाराणसी एअरपोर्टने फेटाळला
राहुल गांधींना घेऊन जाणाऱ्या चार्टर जेट कंपनीने स्वत:हून विमान रद्द केल्याचं केलं स्पष्ट
-
BBC च्या मुंबई आणि दिल्ली कार्यालयावर आयकर विभागाचे छापे
कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे मोबाईल जप्त… वाचा सविस्तर
-
thackeray vs shinde Live : कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तीवाद
तथ्य तपासून निर्णय देणार- न्या. चंद्रचूड
रबिया प्रकरणावरुन महाराष्ट्राचा निर्णय नाही- न्या. चंद्रचूड
शिंदे गटांकडून निरज कौर युक्तीवाद करणार
हरीश साळवे ऑनलाइन सहभागी झाले
-
Shiv Sena Symbol Hearing LIVE : सिब्बल यांनी काय केला दावा
निवडणूक आयोगाला स्वतंत्र अधिकार तसेच अध्यक्षांना स्वतंत्र अधिकार
नोटीस देऊन अध्यक्षांना हटवता येत नाही
विधानसभा अध्यक्षांचे अधिकार डावलले गेले
आमदार उपस्थित असताना अध्यक्षांवर अविश्वास आणता येतो
-
Shiv Sena Symbol Hearing LIVE : काय म्हणतात सिब्बल युक्तीवादात
10 व्या सूचीनुसारच कारवाई हवी होती
14 दिवसांची नोटीस द्यायला हवी होती
विधानसभा अध्यक्षांचे अधिकार डावलले गेले
अधिवेशन सुरु असताना अध्यक्षांवर अविश्वास आणू शकतात
-
Prithvi Shaw Married : अखेर Valentine’s Day च्या दिवशी बातमी फुटली, पृथ्वी शॉ झालं लग्न
Prithvi Shaw Married : कोण आहे ती? जिच्यासोबत पृथ्वी आयुष्यभरासाठी विवाहबंधनात अडकला? वाचा सविस्तर….
-
तमिळनाडू | आयआयटी मद्रासच्या वसतिगृहात महाराष्ट्राच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
तणावामुळे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज
कोट्टूरपुरम पोलिसांकडून तपास सुरू
स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांची मागिती
-
Shiv Sena Symbol Hearing LIVE : विधानसभा अध्यक्ष पक्षपाती असू नये-सिब्बल
संपुर्ण प्रक्रिया अधिवेशन काळात व्हायला हवी होती का
न्यायूमर्ती हिमा कोहली यांचा सिब्बल यांना सवाल
सिब्बल यांनी न्या. कोहली यांच्या प्रश्नाला होय उत्तर दिले
५० मिनिटांपासून युक्तीवाद सुरु
-
thackeray vs shinde Live : कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तीवाद
विधानसभा अध्यक्षांना अपात्र करण्याचा अधिकार – सिब्बल
दहाव्या सूचीनुसार अध्यक्षांना अपात्र करण्याचा अधिकार
योग्य निर्णय होत नसतील तर दहाव्या सूचीचा काय फायदा
-
Shiv Sena News Live : राज्यपालांनी अधिवेशनाच्या तारखा बदल्या
कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद सुरु
राज्यपालांनी मागणी नसताना अधिवेशन बोलवले
विधानसभा अध्यक्षांऐवजी राज्यपालांनी अधिवेशन बोलवले
सिब्बल यांच्या युक्तीवादास हरीश साळवे यांचा आक्षेप
-
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु
सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाच्या सुनावणी सुरु
हरीश साळवे यांचा युक्तीवाद सुरु
कपिल सिब्बल यांनी न्यायालयात
नरहरी झिरवळ यांच्या अविश्वास प्रस्तावावर सिब्बल यांचा आक्षेप
-
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे.
नवी दिल्ली : नबाम रेबिया प्रकरणाचा हरिश साळवे यांनी दाखला दिला आहे.
विधानसभा अध्यक्ष हे राजकीय पक्षांना सहकार्य करत असल्याचा कपिल सिब्बल यांनी केला आहे.
हरिश साळवे हे शिंदे गटाकडून बाजू मांडत आहे.
-
परदेशी मद्यावर भारतीयांच्या उड्या
या स्कॉच व्हिस्कीची देशात प्रचंड मागणी
कोट्यवधींच्या व्हिस्कीची देशात आयात
आयातीत 60 टक्के वाढ, फ्रांसलाही टाकले मागे, वाचा सविस्तर
-
ज ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत आज बैठक
– कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकिसंदर्भात मनसे आज आपला निर्णय जाहीर करणार,
– राज ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत आज बैठक,
– बैठकीला शहरातील कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित राहणार,
– राज ठाकरेंशी चर्चा करून मनसे नेते आज दुपारपर्यंत निर्णय जाहीर करणार,
– कसबा आणि चिंचवडमध्ये मनसे तटस्थ रहाणार की पाठींबा देणार याकडे लक्ष
-
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकिसंदर्भात मनसे आज आपला निर्णय जाहीर करणार,
राज ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत आज बैठक
बैठकीला शहरातील कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित राहणार
राज ठाकरेंशी चर्चा करून मनसे नेते आज दुपारपर्यंत निर्णय जाहीर करणार
कसबा आणि चिंचवडमध्ये मनसे तटस्थ रहाणार की पाठींबा देणार याकडे लक्ष
-
IND vs AUS Test : टीम इंडियाचा एक मोठा खेळाडू दुसऱ्या टेस्टमधून OUT
IND vs AUS Test : टीम इंडियासाठी चिंता वाढवणारी बाब. वाचा सविस्तर….
-
Smriti Mandhana मुळे पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आजम ट्रोल
Smriti Mandhana मुळे बाबर आजम कसा ट्रोल झाला? काय कारण ठरलं? वाचा सविस्तर….
-
Hardik pandya : आज हार्दिक पंड्या करणार दुसर लग्न, राजस्थानमध्ये शाही विवाहाची तयारी जोरात
व्हॅलेंटाइन्स डेच्या दिवशी टीम इंडियाचा कॅप्टन हार्दिक पंड्या लग्न करतोय. वाचा सविस्तर….
-
WPL Auction : एकूण किती खेळाडूंची खरेदी? किती खर्च झाला? कोणावर सर्वाधिक बोली? जाणून घ्या 10 पॉइंट्समध्ये
फक्त 10 पॉइंटसमध्ये समजून घ्या WPL Auction चे सर्व डिटेल्स
-
WPL Mumbai Indians Team 2023: मुंबईच्या टीममध्ये कुठले खेळाडू? जाणून घ्या पूर्ण लिस्ट
Mumbai Indians ने कुठल्या प्लेयर्सना विकत घेतलं? संपूर्ण यादी एका क्लिकवर.
-
Mumbai News Live | सिद्धीविनायक मेट्रो स्टेशनच्या मेट्रो शेडमध्ये आग
आगीचं कारण अद्याप अस्पष्ट
-
International News Live | मध्य आफ्रिकी देशांमध्ये मारबर्ग व्हायरसचा प्रसार
मारबर्ग व्हायरसमुळे इक्वेटोरियल गिनीमध्ये 9 जणांचा मृत्यू
हा विषाणू कोरोना आणि इबोलापेक्षाही अधिक धोकादायक- WHO
व्हायरसच्या प्रादुर्भावावर चर्चा करण्यासाठी WHO ची बैठक
-
Pune Live- प्रचार सभेच्या बॅनर्सवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो नसल्यामुळे कसब्यात महाविकास आघाडीत नाराजीनाट्य
कसब्यातील काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकरांच्या कोपरा सभेच्या बॅनर्सवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो गायब
बॅनर्सवर शरद पवार, अजित पवारांचे फोटो नसल्यामुळे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी व्यक्त केली नाराजी
-
आज सोने-चांदीचा भाव काय?
व्हॅलेंटाईन डेला द्या खास सुवर्ण भेट
ऑल टाईम हाय 58,847 रुपयांपेक्षा सोने स्वस्त
चांदीच्या किंमतीतही मोठी पडझड
स्वस्तात सोने-चांदीचे गिफ्ट देण्याची संधी, वाचा सविस्तर
-
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळ विस्तार
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळ विस्तार
केंद्रातला आणि राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतरच होणार
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतरच शिंदे गटाला केंद्रात मंत्री पद दिले जाणार
निर्णय येईपर्यंत भाजप हायकमांडकडून वेट अँड वॉच
एक केंद्रीय मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद शिंदे गटाला दिले जाणार
महाराष्ट्रातला मंत्रिमंडळ विस्तारही निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतरच होणार
-
आगामी शिवजयंतीनिमित्त आज मुख्यमंत्री महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता
– विविध जिल्ह्यांमध्ये शिवजयंती साजरी करण्याचा सरकारचा मानस
– मुख्यमंत्र्यांकडून शिवजयंतीऊत्सवासाठी महत्त्वाचे आदेश जारी केले जाणार…
– दुपारी दोन वाजता मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
– तर समृद्धी हायवेलगत ऊद्योग ऊभारणीबाबतही आज महत्वाचे निर्णय होणार… फुड माॅल, मेडीकल हेल्प, आणि सिग्नल यंत्रणेबाबत महत्वाचे निर्णय होणार
-
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळ विस्तार
नवी दिल्ली : केंद्रातला आणि राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतरच होणार,
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतरच शिंदे गटाला केंद्रात मंत्री पद दिले जाणार,
निर्णय येईपर्यंत भाजप हायकमांडकडून वेट अँड वॉच,
एक केंद्रीय मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद शिंदे गटाला दिले जाणार,
महाराष्ट्रातला मंत्रिमंडळ विस्तारही निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतरच होणार.
-
व्हेंलटाईन डे रोजी पेट्रोल-डिझेल झाले का स्वस्त?
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर स्थिर
तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या भावात काय झाला बदल
वाहनाची टाकी फुल करण्यापूर्वी किंमत घ्या जाणून, वाचा बातमी
-
कसबा विधानसभा निवडणूकसाठी माहविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार तयारी
कसबा विधानसभा निवडणूकसाठी माहविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार तयारी
निवडणुकीच्य प्रचारासाठी राज्यातले आणि केंद्रातले बडे नेते मैदानात
निवडणुकीसाठी अनेक दीगजांच्या होणारं सभा
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कसबा आणि पिंपरी चिंचवड मध्ये होणार दोन सभा
तर भाजपकडून नितीन गडकरी ,पंकजा मुंडे, मंगल प्रभाती लोढा ,उदयनराजे भोसले शिवेंद्र सिंग राजे भोसले प्रचाराच्या मैदानात
तर काँग्रेस राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाकडून देखील बड्या नेत्यांच्या कसब्यात सभा
काँग्रेस कडून नाना पटोले,बाळासाहेब थोरात , माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण घेणार सभा
अजित पवार, जयंत पाटील , अमोल कोल्हे यांच्या प्रचार सभा
ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे ही उतरणार मैदानात
-
महावितरणचा कंत्राटी कर्मचारी 150 रु लाच घेताना रंगेहात अटक
महावितरणचा कंत्राटी कर्मचारी 150 रु लाच घेताना रंगेहात अटक
रोहित खोत रा.तारदाळ असे कर्मचाऱ्यांचे नाव
नवीन लाईट कनेक्शन सर्वे फॉर्म पास करून देण्यासाठी ग्राहकाकडे मागितली होती लाच
कोल्हापूर लाच लुचपत विभागाची कारवाई
-
संजय राऊत आज नाशिकमध्ये येणार
नाशिक : प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार,
शिंदे गटाविरुद्ध रणनीती आखण्याची शक्यता,
शिंदे गटात गेलेल्या माजी नगरसेवकांच्या प्रभागातील घेणार आढावा.
-
मोटारपंप चोरट्यांना गावकऱ्यानी रंगेहात पकडले
भंडारा
– मोटारपंप चोरट्यांना गावकऱ्यानी रंगेहात पकडले.
– शेतकऱ्यांनी नामी शक्कल लढवून पोलिसांना पूर्व सूचना देत चोरट्यांना अधिक पैशाचे आमिष देत दोन आरोपीला रंगेहात पकडल्याची घटना घड़ली .
– मोरेश्वर हत्तीमारे (55) व मनोज हत्तीमारे (28) राहणार ढिवरखेडा तालुका लाखनी असे आरोपींची नावे
– आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.त्यांच्यावर चोरीच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद घेण्यात आली.
-
शिवजयंती निमित्त नाशिक 15 दिवस मनाई आदेश लागू
शिवजयंती निमित्त नाशिक 15 दिवस मनाई आदेश लागू
शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आजपासून 28 फेब्रुवारीपर्यंत आदेश लागू
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध ठिकाणी गर्दी होणार
या गर्दीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून निर्णय
या कालावधीत परवानगीशिवाय मोर्चे, आंदोलन करण्यास मनाई
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार
-
पुण्यात दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार
बुधवार आणि गुरुवार पुणे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे
पुणे महापालिकेकडून समान पाणी योजनेअंतर्गत पाण्याचे ऑडिट करण्यासाठी शहरातील मुख्य जलवाहिन्यांवर फ्लो मीटर बसवण्यात येणार
यासाठी 14 आणि 15 फेब्रुवारी रोजी शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे
शहरातील नऱ्हे, धायरी, खडकी, औंध, शिवाजीनगर, भोसले नगर, घोले रोड, सेनापती बापट रोड, हनुमान नगर,
जनवाडी, वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, वडारवाडी रेवेन्यू कॉलनी, पोलीस लाईन, गोखलेनगर, भांडारकर रोड, पद्मावती टाकी परिसर
अशा मुख्य भागातील पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार
Published On - Feb 14,2023 7:34 AM