MLC Poll | महाविकास आघाडी 6 उमेदवार देणार, विधानपरिषद निवडणूक बिनविरोध न होण्याची चिन्हं

विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर होत आहे (Maharashtra legislative council polls). कारण काँग्रेसच्या सहाव्या जागेचा आग्रह महाविकास आघाडीने मान्य केल्याची चर्चा आहे.

MLC Poll | महाविकास आघाडी 6 उमेदवार देणार, विधानपरिषद निवडणूक बिनविरोध न होण्याची चिन्हं
Follow us
| Updated on: May 09, 2020 | 4:12 PM

मुंबई : विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर होत आहे (Maharashtra legislative council polls). कारण काँग्रेसच्या सहाव्या जागेचा आग्रह महाविकास आघाडीने मान्य केल्याची चर्चा आहे. त्यामुळे तिन्ही पक्ष आता प्रत्येकी दोन जागा लढवण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे 5 तर भाजपचे 4 उमेदवार निवडून येतील असा दावा केला जात असताना, काँग्रेसने सहाव्या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे आता शिवसेना 2, राष्ट्रवादी 2 आणि काँग्रेसही 2 जागा लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे (Maharashtra legislative council polls).

दुसरीकडे भाजपने संख्याबळानुसार 4 जागांवर दावा केला आहे. मात्र आता महाविकास आघाडीने जर सहावा उमेदवार दिल्यास, भाजपही आणखी एक उमेदवार देऊ शकतो, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे.

विधानपरिषदेत भाजप 3, राष्ट्रवादी काँग्रेस 3 , काँग्रेस 2 आणि शिवसेनेचे 1 सदस्य निवृत्त झाले आहेत. आता संख्याबळानुसार यंदा निवडणुकीत निवडून येण्यासाठी 29 मतांचा कोटा आवश्यक आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे विधानपरिषदेच्या उमेदवार जवळपास निश्चित आहेत. मात्र, काँग्रेसच्या उमेदरवांची नावे अजून ठरलेली नाहीत. विधानपरिषदेच्या 9 जागांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातील 162 इच्छुकांची यादी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवली आहे. यापैकी पुण्याचे मोहन जोशी, यवतमाळचे माणिकराव ठाकरे, वर्धाच्या चारुतला टोकस, नागपूरचे प्रफुल गुदडे पाटील, आशिष देशमुख या नेत्यांची नावे चर्चेत आहेत.

भाजपने 4 जागांवर उमेदवारी लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी भाजपने रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी देऊन अर्ज भरले आहेत.

दुसरीकडे मुख्यमंत्री स्वत: या निवडणुकीतील उमेदवार आहेत. त्यामुळे ज्या निवडणुकीत मुख्यमंत्री उमेदवार असतात ती बिनविरोध करण्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात संकेत आहेत. मात्र आता काँग्रेसने वाढीव जागा मागितल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे.

कुणाचं संख्याबळ काय?

सध्या ज्या जागा रिक्त झाल्यात त्यात भाजपच्या 3, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3, काँग्रेसच्या 2 आणि शिवसेनेची 1 अशा एकूण 9 जागांचा समावेश आहे. संख्याबळाचा विचार केला तर महाविकासआघाडीच्या 5 आणि भाजपच्या 3 जागा सहज निवडून येतील. पक्षीय बलाबल लक्षात घेता भाजपकडे 105, शिवसेनेकडे 56, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 54, काँग्रेसचे 44, बहुजन विकास आघाडी 3, समाजवादी पार्टी 2, एमआयएम 2, प्रहार जनशक्ती 2, मनसे 1, माकप 1, शेतकरी कामगार पक्ष 1, स्वाभिमानी पक्ष 1, राष्ट्रीय समाज पक्ष 1, जनसुराज्य पक्ष 1, क्रांतिकारी शेतकरी पक्ष 1, अपक्ष 13 आमदारांचा समावेश आहे. त्यातून निवडून येण्यासाठी एका जागेसाठी 29 मतांची गरज आहे. त्यामुळे या निवडणुकीत एका जागेसाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

विधानपरिषदेची निवडणूक कधी?

कोरोनामुळे रखडलेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी अखेर निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 21 मे रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्याच दिवशी म्हणजे 21 तारखेलाच मतमोजणी आणि निकाल जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा केली. (Maharashtra legislative council polls).

संबंधित बातमी :

MLC Polls | काँग्रेस सहाव्या जागेसाठी आग्रही, मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार?

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.