अमित ठाकरेंची आणखी एक मागणी मान्य, बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ
बंधपत्रित (बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा तसेच कंत्राटी डॉक्टर्सचे आणि त्यांचे मानधन समान करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांची आणखी एक मागणी मान्य केली आहे. बंधपत्रित (बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा (Enhance Pay Of Doctors On Contract) तसेच कंत्राटी डॉक्टर्सचे आणि त्यांचे मानधन समान करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी हा निर्णय जाहीर केला. कोरोना लढाईला यामुळे निश्चितपणे बळ मिळेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच, यामुळे डॉक्टर्सना सुद्धा प्रोत्साहन मिळणार (Enhance Pay Of Doctors On Contract) आहे, असंही ते म्हणाले.
अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तसेच आरोग्य मंत्र्यांची भेट घेऊन डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती. त्याआधी अमित ठाकरे यांनी पुण्यात अडकलेल्या एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना सुरक्षित घरी पोहोचवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. या दोन्ही मागण्या आता पूर्ण झाल्या आहेत.
बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ
वाढीव मानधनानुसार आता आदिवासी भागातील बंधपत्रित डॉक्टर्सना 60 हजारांच्या ऐवजी 75 हजार रुपये मानधन मिळणार आहे. आदिवासी भागातील बंधपत्रित विशेषज्ञ डॉक्टर्सना 70 हजार ऐवजी 85 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. तर इतर भागातील एमबीबीएस डॉक्टर्सना 55 हजारांऐवजी 70 हजार रुपये मानधन आणि इतर भागातील विशेषज्ञ डॉक्टर्सना 65 हजारांऐवजी 80 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. (Enhance Pay Of Doctors On Contract)
For doctors on contract and on bond, the Maharashtra State Govt has decided to not just enhance pay, but bring at par. They are our covid warriors and this was due. (1/n)
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 29, 2020
अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मनसे नेते अमित ठाकरे यांनी अलीकडेच पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती. तसेच, या मागणीसाठी अमित ठाकरे हे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनासुद्धा भेटले होते.
कोरोनाच्या लढाईत सगळ्यात जास्त जीव धोक्यात घालून लढणाऱ्या आरोग्य सेवकांच्याच (बंधपत्रित डॉक्टर्स आणि नर्सेस) मानधनात कपात? खरं तर सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या सेवेचं मोलच होऊ शकत नाही इतकी मेहनत ते करत आहेत. त्यांच्या परिश्रमाचं मोल त्यांना अधिक भत्ता देऊन करायला हवं, मानधन कमी करुन नाही. ह्या विषयात महाराष्ट्र शासनाने लक्ष घालावं अशी विनंती मनसे नेते अमित ठाकरे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे केली होती.
‘डॉक्टर हेच देव’, त्यांच्या मानधनात कपात होणार नाही याची काळजी घ्यावी, अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्रhttps://t.co/IS8yYNFDF5 @dineshdukhande @mnsadhikrut @AmitThackeray24 thackeray
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 19, 2020
Enhance Pay Of Doctors On Contract
व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
अमित ठाकरेंना दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी बारा तासात पाळला
CORONA | अमित ठाकरे आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या भेटीला, बैठकीत ‘या’ चार मुद्द्यांवर चर्चा