दोन दिवसांनी लॉकडाऊन लागणारच, व्यावहारिक भूमिका घ्या, हसन मुश्रीफ यांचं व्यापाऱ्यांना आवाहन

Maharashtra Lockdown update : राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांची आज व्यापारी आणि औद्योगिक वसाहतीमधल्या शिष्टमंडळाशी चर्चा झाली.

दोन दिवसांनी लॉकडाऊन लागणारच, व्यावहारिक भूमिका घ्या, हसन मुश्रीफ यांचं व्यापाऱ्यांना आवाहन
हसन मुश्रीफ अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोडणार?
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 1:38 PM

कोल्हापूर : राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांची आज व्यापारी आणि औद्योगिक वसाहतीमधल्या शिष्टमंडळाशी चर्चा झाली. यावेळी हसन मुश्रीफ यांनी 2 दिवसांनी लॉकडाऊन (Maharashtra Lockdown ) लागणारच आहे. आपण व्यावहारिक भूमिका घेऊ, असं आवाहन व्यापाऱ्यांना केलं. (Minister Hasan Mushrif said lockdown in Maharashtra in next two days)

हसन मुश्रीफ म्हणाले, “दुकानं सुरू करण्याच्या परवानगीबाबतची भावना वरिष्ठ पातळीवर पोहोचवल्या आहेत. 2 दिवसांनी लॉकडाऊन लागणारच आहे. आपण व्यावहारिक भूमिका घेऊ. आम्ही राजकारण करणार नाही पण लस, रेमडिसिव्हीर कमी पडणार नाही याची काळजी मोदी साहेबांनी घेतली पाहिजे. मुख्यमंत्री गेले तीन-चार दिवस वेगळ्या घटकांची चर्चा करताहेत. पॅकेजबाबत योग्य तो निर्णय ते घेतील. इतके जीव गेल्यानंतर का होईना केंद्राने रेमडेसिव्हीरची निर्यात थांबवली. याबद्दल केंद्राचे आभार मानले पाहिजेत. दरेकर म्हणतात आम्ही केंद्रावर बोलतो, औषध लस याची कमतरता असताना आणखी काय केलं पाहिजे”

मुख्यमंत्र्यांच्या मॅरेथॉन बैठका

कोरोनाच्या विस्फोटामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन (Maharashtra lockdown) होणार हे जवळपास निश्चित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे गेल्या दोन दिवसांपासून मॅरेथॉन बैठका घेत आहेत. दोन दिवसापूर्वी त्यांनी सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं म्हटलं होतं. त्याशिवाय काल रविवार 11 एप्रिलला झालेल्या टास्कफोर्सच्या बैठकीत कडक लॉकडाऊनवर चर्चा झाली. त्यामुळे महाराष्ट्रात 8 किंवा 14 दिवसांचा लॉकडाऊन लागणार हे निश्चित आहे.

अजित पवारांची बैठक 

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची बैठक होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पण सध्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित आहेत. याशिवाय तिन्ही विभागाचे सचिवदेखील बैठकीत हजर आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीमध्ये मृतदेह विल्हेवाट, ऑक्सिजन लिक्विड प्लान्ट, आर्थिक पॅकेज यावर चर्चा होणार आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आर्थिक पॅकेजवरही चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. लॉकडाऊनचा फटका बसणाऱ्या कामगारवर्गाला आर्थिक पॅकेज देण्याची मागणी भाजपने लावून धरली आहे. आधी पॅकेज, मग लॉकडाऊन अशी भाजपची भूमिका आहे. त्यामुळे आज त्याबाबत काही ठरतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लॉकडाऊन किती, 8 की 14 दिवस? 

कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) 11 एप्रिलला टास्क फोर्सची बैठक (task force meeting) घेतलीय. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात 8 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. मात्र टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी निदान 14 दिवसांचा लॉकडाऊन लागू झाला तर परिस्थिती नियंत्रणात येईल, असं मत मांडलं. त्यामुळे टास्क फोर्सचे तज्ज्ञ देखील लॉकडाऊनच्या बाजूने आहेत.

बाळासाहेब थोरातांची भूमिका 

कोरोनाबाधित रुग्णांचे आकडे वाढत चालले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मंत्री, विरोधक आणि तज्ज्ञांशी चर्चा केली आहे. लवकरच याबाबत निर्णय झाला पाहिजे, असे महसूलमंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले.  लॉकडाऊनमध्ये कामगारांना काय मदत द्यायची याबाबत अर्थमंत्र्यांबरोबर चर्चा केली जाईल. हातावर पोट आहे त्यांच्याकरिता काही करावं लागेल. लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असं मला वैयक्तिक वाटते. तसं केलं नाही तर हा संसर्ग वाढत जाईल, असंही थोरातांनी नमूद केलं.

संबंधित बातम्या 

Maharashtra lockdown Package : अजित पवार, राजेश टोपे, एकनाथ शिंदेंची बैठक, मृतदेह विल्हेवाटीवर चर्चा

आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, पण हातावर पोट असणाऱ्यांसाठी काही करावं लागेल : बाळासाहेब थोरात

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.