महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यावर मंत्रिमंडळात एकमत : राजेश टोपे

महाराष्ट्रात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन आणखी 15 दिवसांनी वाढवण्याबाबत मंत्रिमंडळ आग्रही असल्याचं समोर आलंय.

महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यावर मंत्रिमंडळात एकमत : राजेश टोपे
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 8:09 PM

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन आणखी 15 दिवसांनी वाढवण्याबाबत मंत्रिमंडळ आग्रही असल्याचं समोर आलंय. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वतः याबाबत सुतोवाच केलंय. लॉकडाऊन वाढवण्याबाबत मंत्रिमंडळ आग्रही आहे, मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असं मत त्यांनी व्यक्त केलं (Maharashtra lockdown to be extended till 31 march 2021 inform Health Minister Rajesh Tope).

राजेश टोपे म्हणाले, “लॉकडाऊनबाबत अनेकांना अपेक्षा आहेत. मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत बोलून दाखवलं. कारण लॉकडाऊन केल्यानंतर कोरोना रुग्णसंख्या कमी झाली. साधारणतः कोरोना रुग्णांच्या संख्येत 7 लाखांना पोहचलेला महाराष्ट्र आता 4 लाख 75 हजाराच्या दरम्यान आलाय. म्हणजे मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या संख्येत घट झालीय.”

महाराष्ट्राचा वाढीचा दर भारताच्या रुग्णवाढीच्या दराच्या निम्मा

भारताचा दर दिवशीचा रुग्णवाढीचा दर 1.4 म्हणजे साधारणतः दीड टक्का आहे. महाराष्ट्राचा रुग्णवाढीचा दर प्रतिदिवस 0.8 इतकाआहे. त्यामुळे महाराष्ट्राचा वाढीचा दर भारताच्या रुग्णवाढीच्या दराच्या निम्मा आहे. बाधितांच्या दरातही महाराष्ट्रात घट झालीय. त्यामुळे ही संख्या आणखी कमी करण्यासाठी राज्यात लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याची एकमताने मागणी बैठकीत झाली. याबाबत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, ” असंही राजेश टोपे यांनी नमूद केलं.

राजेश टोपे, “रुग्णांच्या संख्येत घट म्हणजे कोरोनाची कर्व पूर्ण स्टेबल झालीय असा याचा अर्थ नाही. पण आपण संख्येत घट होत असलेल्या राज्यांमध्ये आहोत. इतर राज्यांमध्ये याचं प्रमाण खूप जास्त आहे. 36 राज्यांच्या या देशात आपण रुग्ण वाढीत 30 व्या क्रमांकावर आहोत. राज्यात म्युकरमायकोसिस वाढत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्ण कमी होताना दिसत असले तरी काही ठिकाणी वाढत आहेत. त्यामुळे हा लॉकडाऊन किमान 15 दिवस वाढवावा अशी चर्चा आणि अपेक्षा मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांना सांगितली. तेच यासंदर्भातील अंतिम निर्णय घेतील.”

राजेश टोपे नेमकं काय म्हणाले?

राजेश टोपे म्हणाले, “राज्यातील लसीकरण केंद्रावर आता केवळ दुसरा डोस घेणाऱ्यांनीच यावे. पहिला डोस लसीकरण केंद्रांवर आता मिळणार नाही. पहिल्या डोसनंतर दुसरा डोस कोरोना रोखण्यासाठी तितकाच महत्वाचा आहे. राज्यात 20 लाख नागरिकांना दुसरा डोस देणे बाकी आहे. अशात राज्य सरकारने लसीकरण केंद्रावर केवळ दुसरा डोस पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सध्या 16 लाख कोविशिल्ड (Covishield), तर 4 लाख कोव्हॅक्सिन (Covaccin) अशी 20 लाख लस बाकी आहे. 7 लाख कोविशिल्ड, तर 4 लाख कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांची संख्या बाकी आहे. हे लक्षात घेता सरकारने केवळ लसीकरण केंद्रांवर तूर्तास दुसऱ्या लस देण्यासाठी प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.”

हेही वाचा : 

18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणाला तूर्तास ब्रेक : राजेश टोपे

कोरोनाचा लहान मुलांना विळखा, पुण्यासह ठाणे, नागपुरात चाईल्ड कोव्हिड सेंटर उभारणार

लहान मुलांवर कोरोनाचा हल्ला, खबरदारी म्हणून राज्यात तज्ज्ञांची टास्क फोर्स

Maharashtra lockdown to be extended till 31 march 2021 inform Health Minister Rajesh Tope

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.