Maharashtra Lok Sabha Election : कोल्हापुरात सर्वाधिक तर बारामतीत सर्वात कमी मतदान, महाराष्ट्रात दिवसभरात किती टक्के मतदान?

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद झालीय. कोल्हापुरात सर्वाधिक मतदान झालं असून बारामतीत सर्वात कमी मतदान झालं.

Maharashtra Lok Sabha Election : कोल्हापुरात सर्वाधिक तर बारामतीत सर्वात कमी मतदान, महाराष्ट्रात दिवसभरात किती टक्के मतदान?
महाराष्ट्र लोकसभा निवडणूकImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: May 07, 2024 | 8:32 PM

पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 5 जागांसाठी मतदान झालं. तिथं 61.9 टक्के मतदान झालं. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात 8 जागांसाठी मतदान झालं. तेव्हा मतदानाची टक्केवारी 59.6 टक्के होती. आणि तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात 11 जागांसाठी मतदान पार पडलं. 5 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार 53.40 टक्के मतदानाची नोंद झालीय. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, संध्या 5 वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान कोल्हापुरात 63.71 टक्के झालंय. तर सर्वात कमी मतदान बारामतीत झालंय. बारामतीत 45.68 टक्के मतदानाची नोंद झालीय. काँग्रेसनं आमदारांना मतदानासाठी खास जबाबदारी सोपवली होती. त्याचाच परिणाम कोल्हापुरात आकडेवारीवर दिसलाय.

तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात लोकसभेच्या 11 लोकसभेच्या मतदारसंघात उदयनराजे, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, नारायण राणे, प्रणिती शिंदेसारख्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला आहे. 5 वाजेपर्य़तंच्या आकडेवारीनुसार, या 11 ठिकाणी किती मतदान झालं तेही पाहुयात..

  • बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत आहे. इथं 45.68 टक्के मतांची नोंद झालीय.
  • कोल्हापुरात शिंदे गटाच्या संजय मंडलिकांचा सामना काँग्रेसच्या छत्रपती शाहू महाराजांशी आहे. कोल्हापुरात 63.71 टक्के मतदान झालं.
  • माढ्यात भाजपचे रणजीत सिंह निंबाळकर विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते अशी लढत आहे. इथं 50 टक्के मतांची नोंद झालीय.
  • रायगडमध्ये अजित पवार गटाचे सुनिल तटकरे आणि उद्धव ठाकरे गटाच्या अनंत गितेंमध्ये स्पर्धा आहे. रायगडमध्ये 50.31 टक्के मतदान झालंय.
  • सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपच्या राम सातपुतेंमध्ये लढत आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात 49.17 टक्के मतांची नोंद झालीय.
  • सांगलीत तिहेरी लढत आहे. भाजपचे संजय काका पाटील, ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटलांमध्ये फाईट आहे. सांगलीत 52.56 टक्के मतांची नोंद झालीय.
  • साताऱ्यात भाजपचे उदयनराजे भोसले आणि शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदेंमध्ये लढत आहे. सातारा लोकसभेत 54.11 टक्के मतदान झालंय.
  • रत्नागिरी-सिंधुदुर्गात ठाकरे गटाचे विनायक राऊत आणि भाजपच्या नारायण राणे एकमेकांसमोर उभे ठाकलेत. इथं 53.75 टक्के मतदान झालंय.
  • हातकणंगलेतही तिहेरी सामना आहे, शिंदेंच्या शिवसेनेचे धैर्यशील माने, ठाकरे गटाचे सत्यजित पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींमध्ये आहे. हातकणंगलेत 62.18 टक्के एवढ्या मतांची नोंद झालीय.
  • धाराशीवमध्ये ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर आणि अजित पवार गटाच्या अर्चना पाटील आमनेसामने आहेत. धाराशीवमध्ये 52.78 टक्के मतदान झालंय.
  • लातूरमध्ये भाजपचे सुधांकर श्रृंगारे आणि काँग्रेसच्या डॉ. शिवाजी काळगेंमध्ये थेट लढत आहे. लातूरमध्ये 55.38 टक्के मतदान झालं.

देशात तिसऱ्या टप्प्यात 5 वाजेपर्यंत 60 टक्के मतदान

महाराष्ट्रातल्या 11 जागांसह देशभरात तिसऱ्या टप्प्यात एकूण 93 जागांवर मतदान पार पडलं. भारतात तिसऱ्या टप्प्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 60 टक्के मतदान झालंय, ज्यात सर्वाधिक मतदान पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये झालंय. बंगालमध्ये 73.93 टक्के इतकं मतदान झालंय. उत्तर प्रदेशात 55.13 टक्के, मध्य प्रदेशात 62.28 टक्के मतदान, छत्तीसगडमध्ये 66.87 टक्के, बिहारमध्ये 56.01 टक्के मतदान, आसाममध्ये 74.86 टक्के मतदान झालं. तर सर्वात कमी मतदान महाराष्ट्रातच झालंय. महाराष्ट्रात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 53.40 टक्के मतदान झालं. आतापर्यंत देशभरात 284 जागांवर मतदान झालंय. आता चौथ्या टप्प्याचं मतदान 13 तारखेला आहे. ज्यात महाराष्ट्रच्या 11 जागांवर मतदान असेल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.