संजय राठोड जगदंबा मातेच्या मंदिरात; पोहरादेवीत प्रचंड गर्दी, पोलिसांचा लाठीमार

तब्बल 40 किलोमीटरचं अंतर कापून अखेर वन मंत्री संजय राठोड यांचा ताफा अखेर पोहरादेवीत दाखल झाला आहे. (maharashtra minister sanjay rathod reached at poharadevi)

संजय राठोड जगदंबा मातेच्या मंदिरात; पोहरादेवीत प्रचंड गर्दी, पोलिसांचा लाठीमार
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 12:51 PM

वाशिम: तब्बल 40 किलोमीटरचं अंतर कापून अखेर वन मंत्री संजय राठोड यांचा ताफा अखेर पोहरादेवीत दाखल झाला. त्यानंतर राठोड यांनी कुटुंबासह जगदंबा मातेच्या मंदिरातील गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर ते सेवालाल महाराज यांचं दर्शन घेणार आहेत. राठोड यांच्या स्वागतासाठी पोहरादेवीमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला. (maharashtra minister sanjay rathod reached at poharadevi)

संजय राठोड हे साधारण 10.55 च्या सुमारास यवतमाळमधून पोहरादेवीकडे सहकुटुंब रवाना झाले होते. हे 40 मिनिटांचं अंतर कापून ते तासाभरात पोहरादेवीत पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना नेते, पदाधिकारी आहेत. तब्बल 17 वाहनांच्या ताफ्यासह ते पोहरादेवीत आले आहेत. यावेळी मंदिर परिसरात हजारो लोक जमले आहेत. त्यामुळे राठोड यांची गाडीला वाट मिळण्यासाठी मोठी अडचण होत असल्याने पोलिसांना जमावावर लाठीमार करावी लागली. मंदिर परिसरात हजारो लोक जमल्याने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे तीन तेरा वाजले आहेत.

रस्त्यात गर्दी नाही, स्वागत नाही

राठोड यांचा ताफा यवतमाळहून पोहरादेवीकडे निघाला. तरोडा, जवळा आणि आर्णी या मार्गे राठोड यांचा ताफा तुफान वेगाने पोहरादेवीकडे निघाला होता. यावेळी कोणतीही वाहतूक कोंडी नव्हती. शिवाय या रस्त्यात राठोड समर्थकांनी गर्दी केली नव्हती. किंवा रस्त्यामध्ये त्यांच्या स्वागतासाठी कोणीही थांबलेले नव्हते.

पोहरादेवीत महंतांशी चर्चा करणार

पोहरादेवीत आधी ते सेवालाल महाराज यांचं दर्शन घेतील. त्यानंतर देवीचं दर्शन घेऊन होम हवन सुरू असलेल्या ठिकाणी जातील. या ठिकाणी त्यांच्या हस्ते होममध्ये समिधा अर्पण केलं जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते पोहरादेवी संस्थानच्या महंताशी चर्चा करतील. या चर्चेनंतर ते पोहरादेवीत आलेल्या समर्थकांशी संवाद साधतील.

पूजा चव्हाण प्रकरणावर बोलणार का?

दरम्यान, पूजा चव्हाण प्रकरणात आरोप झाल्यानंतर राठोड हे पहिल्यांदाच पोहरादेवीत येत आहे. मात्र, पोहरादेवीत आल्यावर ते कार्यकर्त्यांना संबोधित करण्याची शक्यता आहे. यावेळी ते पूजा चव्हाण प्रकरणी आपली बाजू मांडणार का? की केवळ देवीचं दर्शन घेऊन ते निघून जाणार? असा सवाल केला जात आहे. पूजा चव्हाण प्रकरणी आरोप झाल्यानंतर राठोड यांनी अद्याप शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अद्याप प्रत्यक्ष भेट घेतलेली नाही. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांना भेटूनच आपली भूमिका मांडतील की आज पोहरादेवीत आपली भूमिका मांडून नंतरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार? याबाबतचं कुतुहूल व्यक्त केलं जात आहे.

नेत्यांनी काय सल्ला दिला?

आज सकाळीच शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, माजी आमदार विश्वास नांदेकर, राठोड यांचे मेव्हणे सचिन नाईक आणि त्यांचे नातेवाईक आज राठोड यांच्या निवासस्थानी दाखल झाले. राठोड यांनी आज या नेत्यांशी बराचवेळ चर्चा केली. त्यानंतर ते पोहरादेवीकडे जायला निघाले. यावेळी शिवसेना नेत्यांनी राठोड यांना काय सल्ला दिला? किंवा राठोड यांनी शिवसेना नेत्यांकडे काय भूमिका मांडली? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. (maharashtra minister sanjay rathod reached at poharadevi)

संबंधित बातम्या:

Photo : 40 किमीपर्यंत भरगच्च ताफा, आर्णीजवळ आणखी एक गाडी वाढली, संजय राठोडांच्या ताफ्यात किती गाड्या?

PHOTO: नॉट रिचेबल संजय राठोड समोर आले तो क्षण

यंत्रणा अ‍ॅलर्ट! संजय राठोड कोणत्याही क्षणी पोहरादेवीत; पारंपारिक वाद्य वाजवून होणार स्वागत

(maharashtra minister sanjay rathod reached at poharadevi)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.