Ajit Pawar | पुढच्या महिन्यात अजितदादा कधी मुख्यमंत्री होणार? काँग्रेस आमदाराने सांगितली तारीख

Ajit Pawar | "राजकारणात खेळी थोड्या सांगितल्या जातात. प्रत्येक दिवशी जे घडणार ते सांगायच नसतं. अजित पवार सरकारमध्ये सामील होणार, हे सांगितलं होतं का?"

Ajit Pawar | पुढच्या महिन्यात अजितदादा कधी मुख्यमंत्री होणार? काँग्रेस आमदाराने सांगितली तारीख
अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा फाईल फोटो
Follow us
| Updated on: Jul 25, 2023 | 2:01 PM

मुंबई : मागच्या आठवड्यात अजित पवार यांचा वाढदिवस होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी एक टि्वट केलं. त्यांनी अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात लवकरच अजित पवार यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार अशी चर्चा सुरु झाली आहे. या सर्व चर्चांना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे.

त्यांनी सांगितलं की, “महायुती आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढेल” मात्र, तरीही या चर्चा थांबण्याच नाव घेत नाहीयत.

‘हा शिंदेंचा सेंडऑफ तर नाही ना?’

आता विधान परिषदेतील काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाची तारीख सांगितली आहे. टीव्ही 9 च्या प्रतिनिधीने त्यांना अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले की, “तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना भेटणं चुकीच नाहीय. पण यावेळी शिंदेंसोबत त्यांचं कुटुंब होतं. पत्नी, सुना, वडिल, मुलगा सर्व होते. हा शिंदेंचा सेंडऑफ तर नाही ना? अशी विधिमंडळात चर्चा सुरु आहे”

सत्ता बदलाची तारीख सांगितली

10 किंवा 11 ऑगस्टपर्यंत स्पीकरला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, निर्णय घ्यायचा आहे. शिंदे यांना कदाचित सेंडऑफ दिला जाईल. अजित दादांना मुख्यमंत्री केलं जाईल, असं अभिजीत वंजारी म्हणाले. त्यावर वंजारी यांना, फडणवीस यांनी शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवू असं म्हटलं आहे, याची आठवण करुन दिली. ‘अजित पवार सरकारमध्ये सामील होणार, हे सांगितलं होतं का?’

त्यावर वंजारी म्हणाले की, “राजकारणात खेळी थोड्या सांगितल्या जातात. प्रत्येक दिवशी जे घडणार ते सांगायच नसतं. अजित पवार सरकारमध्ये सामील होणार, हे सांगितलं होतं का? राजकारणात खेळी सांगितल्या जात नाहीत. ज्या दिवशी घडेल, त्यादिवशी आम्ही अजितदादाच्या नेतृत्वाखाली काम करु असं बोलतील”

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.