Supriya Sule | राज ठाकरेंचं भाषण एंटरटेनमेंट, मसाला, अनेक फॅक्चुअल चुका… सुप्रिया सुळेंनीही दुर्लक्ष केलं

राज ठाकरेंच्या भाषणात अनेक फॅक्चुअल चुका असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. त्यांना बऱ्याच गोष्टींची माहिती नाही, असं दिसलं. त्यामुळे अजित दादा पवार म्हणाले तसं त्याला फार महत्त्व देऊ नका, अशी खोचक टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

Supriya Sule | राज ठाकरेंचं भाषण एंटरटेनमेंट, मसाला, अनेक फॅक्चुअल चुका... सुप्रिया सुळेंनीही दुर्लक्ष केलं
राज ठाकरे यांच्या भाषणावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 11:13 AM

मुंबई | राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तर सभेत शरद पवार (Sharad Pawar) आणि कुटुंबियांना प्रचंड ताशेरे ओढले. मात्र पवार कुटुंबियांनी राज ठाकरेंचे (Raj Thackeray) हे आरोप अत्यंत हलकेपणाने उडवून लावले आहेत. राज ठाकरेंच्या भाषणापेक्षाही आपल्याकडे दुसरे महत्त्वाचे मुद्दे आहेत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सुनावलं तर त्यानंतर सुप्रिया सुळे यांनीही अशाच प्रकारची प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांचं भाषण मुळात आपण ऐकलंच नाही, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. मात्र आज वर्तमान पत्रातून त्यांच्या भाषणाचे मुद्दे वाचले, असं त्या म्हणाल्या. तसेच त्यांच्या भाषणात अनेक अवास्तव मुद्दे होते. मुळात अजित पवारांवर ईडीची धाड पडलीच नव्हती, असे सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले. एकूणच, या भाषणाकडे थोडं एंटरटेनमेंट म्हणून पहा, एखाद्या मालिकेत, सिनेमात कसं असतं तसं.. त्यामुळे थोडा मसाला तो हक है उनका.. अशी शब्दात सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंचे मुद्दे अत्यंत कमी दर्जाचे असल्याचं बोलून दाखवलं. तर दुसरीकडे देशात आणि राज्यात महागाई, उद्योग व्यवसाय, पर्यटन असे इतरही मुद्दे असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या भेटीसाठी सुप्रिया सुळे आल्या होत्या, तेव्हा त्यांनी पत्रकारांशी हा संवाद साधला.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

मुंबईतल्या ब्रिज कँडी रुग्णालयात आलेल्या सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, ‘ खरं तर मी पूर्ण भाषण बघितलं नाही. मी माझ्या लोकसभा मतदार संघात होते. पण वर्तमानपत्रातून जे वाचलं ते 95 टक्के राष्ट्रवादीवर विमोचन केलं. त्यामुळे राजकीय दृष्ट्या आमचा पक्ष किती महत्त्वाचा आहे, हे त्यातून कळलं. दुसरं म्हणजे काही मुद्दे आश्चर्यकारक वाटले. कालच्या भाषणात त्यांचा पर्सनल अटॅक जास्त होता होता. देशासमोरर खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. महागाईचं आव्हान आहे. सर्नांनी त्याकडे बघणं लोकप्रतिनिधींचं काम आहे. त्यांनी या विषयावर काही बोललं नाही. नव्या पिढीच्या प्रश्नांवर काही भाष्य केले नाही. ते इतिहासात जास्त रमले, हे मला प्रकर्षानं जाणवलं असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

ज्यांनी हिंदुहृदय सम्राटांना दुखावलं, त्यांच्याबद्दल काय बोलणार?

राज ठाकरे यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना दुखावलं, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार, अशी खोचक टीका देखील सुप्रिया सुळे यांनी केली. पण एकूणच ही लोक असतात. त्यांना इतिहासात रमायला आवडतं, इतिहास जरूर वाचावा, पण देशाचं वास्तव आज आणि उद्यात असतं. आज काय आव्हानं आहेत, याकडे लक्ष दिलं पाहिजे. महागाईमुळे महिलांचं कंबरडं मोडलंय. देशात नवीन स्टार्टअप्स कसे वाढतील. आज देशात महाराष्ट्रातील स्टार्टअप्सची संख्या जास्त आहे. महाराष्ट्राचा हा उपक्रम कसा उपक्रम कसा पुढे नेऊ शकतो, हे बघितलं पाहिजे. माझ्या लोकसभा मतदार संघात बारामती, इंदापूर, दौंड, नव्या पिढीच्या गरजा बदलत आहेत. पर्यटनातून मोठी संधी निर्माण होऊ शकते का, याचा मी विचार करत आहे. ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे.

‘भाषणात अनेक चुका… मसाला जास्त’

राज ठाकरेंच्या भाषणात अनेक फॅक्चुअल चुका असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. त्यांना बऱ्याच गोष्टींची माहिती नाही. त्यामुळे अजित दादा पवार म्हणाले तसं त्याला फार महत्त्व देऊ नका, अशी खोचक टीका त्यांनी केली.

ठाण्यातील सभेत पवार कुटुंबियांवर आरोप

राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तर सभेत शरद पवार आणि कुटुंबियांवर अनेक आरोप केले. जातीपातीच्या राजकारणाची सुरुवात पवार यांनी केली. तसेच भोंग्यांविषयीचं वक्तव्य मी याआधीही तीन वेळा केलं पण ते अजित पवारांना ऐकू गेलं नव्हतं. कारण पहाटेच्या शपथविधीनंतर शरद पवार यांनी त्यांच्या कानाखाली आवाज काढले होते, त्यामुळे त्यांना पुढचे तीन-चार महिने ऐकूच येत नव्हतं. मात्र माझा गुढीपाडव्याचा भोंगा त्यांना ऐकू गेला, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. तसेच अजित पवारांवर ईडीची धाड पडते आणि सुप्रिया सुळेंची चौकशी कशी होत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. सुप्रिया सुळे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे ‘सुळे’ अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती.

इतर बातम्या-

Photo Gallery | अभिनेत्री शनाया कपूरचा पूल पार्टीचा हॉट लूक व्हायरल!

Pune NCP agitation : खोटं बोलणाऱ्या चित्रा वाघ यांच्यावर कारवाई करा, पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.