Maharashtra Rain Update | शनिवार ते मंगळवार, ४ दिवस अधिवेशनाला पावसामुळे ब्रेक | Maharashtra Monsoon session break for 4 days

| Updated on: Jul 28, 2023 | 7:18 AM

Maharashtra Mumbai Rains IMD Monsoon Alert LIVE : मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

Maharashtra Rain Update | शनिवार ते मंगळवार, ४ दिवस अधिवेशनाला पावसामुळे ब्रेक |  Maharashtra  Monsoon session break for 4 days

मुंबई | 27 जुलै 2023 :  मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहतूक धिम्या गतीने | आज मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरात पाऊस झाला | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या दरम्यान असलेल्या ठिकाणात जोरदार पाऊस झाला | जोरदार पावसामुळे मुंबई – पुणे एक्स्प्रेसवेवर कामशेत बोगद्याजवळ मातीचा ढिगारा कोसळला | यामुळे मुंबईकडे येणारी लेनची वाहतूक खोळंबली, लवकरच ही वाहतूक सुरु होईल | कर्जतमध्ये १७१ मिमी तर मंकीहिल या ठिकाणी १३४ मिमी पाऊस |

Traffic slow on Mumbai Pune Expressway |

Today it rained in both the cities of Mumbai and Pune |

There was heavy rain in the place between Mumbai-Pune Expressway |

Due to heavy rains, the Mumbai-Pune Expressway was hit by a mudslide |

Due to this, the traffic of the lane coming towards Mumbai was disrupted, this traffic will start soon |

171 mm in Karjat and 134 mm in Monkeyhill

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 Jul 2023 11:40 PM (IST)

    Maharashtra Rain Update | शनिवार ते मंगळवार, ४ दिवस पावसाळी अधिवेशनाला ब्रेक | Maharashtra Monsoon session break for 4 days

    Maharashtra Rain update, Mumbai rain update, pune rain update, kokan rain update

    मुंबई | राज्यात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भाग सोडला तर सर्वत्र पाऊस सुरू आहे, अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे, अशा स्थितीत महाराष्ट्राच्या यावेळच्या पावसाळी अधिवेशनाला ४ दिवसांचा अवकाश म्हणजेच ब्रेक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व आमदारांना आपआपल्या मतदारसंघात जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात पूरसदृश्य परिस्थिती असल्याने लोकप्रतिनिधी यांची निश्चितच गरज भासणार आहे. अनेक ठिकाणी नुकसानाची पाहणी, तेथील पंचनामे आणि भरपाईचे दावे करणे गरजेचे आहे, म्हणून आमदारांनासाठी देखील मतदारसंघात आढावा घेणे महत्त्वाचे झाले आहे.

    Monsoon session break for 4 days, there will be no monsoon session in Maharashtra from Saturday to Tuesday

  • 27 Jul 2023 11:07 PM (IST)

    mumbai rain news | Pune rain news | एक्स्प्रेस वे वर मुंबईकडे येणारी वाहतूक धिम्या गतीने | mumbai pune express way traffic update

    मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहतूक धिम्या गतीने |

    आज मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरात पाऊस झाला | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या दरम्यान असलेल्या ठिकाणात जोरदार पाऊस झाला | जोरदार पावसामुळे मुंबई – पुणे एक्स्प्रेसवेवर कामशेत बोगद्याजवळ मातीचा ढिगारा कोसळला | यामुळे मुंबईकडे येणारी लेनची वाहतूक खोळंबली, लवकरच ही वाहतूक सुरु होईल | कर्जतमध्ये १७१ मिमी तर मंकीहिल या ठिकाणी १३४ मिमी पाऊस |

    Traffic slow on Mumbai Pune Expressway |

    Today it rained in both the cities of Mumbai and Pune |

    There was heavy rain in the place between Mumbai-Pune Expressway |

    Due to heavy rains, the Mumbai-Pune Expressway was hit by a mudslide |

    Due to this, the traffic of the lane coming towards Mumbai was disrupted, this traffic will start soon |

    171 mm in Karjat and 134 mm in Monkeyhill

  • 27 Jul 2023 10:32 PM (IST)

    Mumbai Rain दिवसभरात या ठिकाणी जास्त पाऊस, कुठे किती मिमी पाऊस |

    पेण ३३२ मिमी | कर्जत १७१ मिमी | इगतपुरी १५८ मिमी | सीएसएमटी १३५ मिमी | मंकीहील १३४ मिमी | लोणावळा १२८ मिमी | कल्याण १२० मिमी | सॅण्डहस्ट रोड ११६ मिमी | मस्जीद बंदर ११४ मिमी | भायखळा ११४ मिमी | मुलूंड ११३ मिमी |

    mumbai rains

    Where is the most rain in this place during the day? How many mm of rain? Highest rainfall stations

    Pen-332mm | Karjat-172mm | Igatpuri-158mm | CSMT-135mm | Monkeyhill-134mm | Lonavala-128mm | Kalyan-120mm | Sandhurst-116mm | Masjid-114mm | Byculla-114mm | Mulund-113mm |

  • 27 Jul 2023 08:45 PM (IST)

    वसई तालुक्यात 12 तासात सर्वाधिक 104 मिमी पावसाची नोंद

    वसई : 

    वसई तालुक्यात आज दिवसभरात सर्वाधिक 104 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. सकाळपासून रिपरिप पडणारा पाऊस दुपारपासून मुसळधार झाला. वसई तालुक्यात आज दिवसभरात 12 तासात सर्वाधिक 104 मिमी. पावसाची नोंद झालीय.

  • 27 Jul 2023 08:38 PM (IST)

    बुलढाण्यात पावसाचं थैमान, पांडव, जटाशकंर नदीला पूर, काही घरं वाहून गेली

    बुलढाणा :

    सातपुड्याच्या पायथ्याशी तासाभरापासून जोरदार पाऊस सुरु आहे. पांडव नदी, जटाशकंर नदीला पुर आला आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अनेक गावात पाणी घुसले आहे. संग्रामपूर तालुक्यातील शिवाजी नगर येथील काही घरं वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. नदी काठच्या गावांनी सतर्क राहावे, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

  • 27 Jul 2023 08:35 PM (IST)

    ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर

    ठाणे : 

    ठाणे जिल्ह्यातील पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जोरदार पावसाचा अंदाजामुळे ठाणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

  • 27 Jul 2023 08:32 PM (IST)

    वसई तालुक्यातील कामन मोरी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा

    वसई : 

    वसई तालुक्यातील कामन मोरी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा

    गावातील अनेक घरात गुडगाभर पाणी साचल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

    घरातील सर्व सामान, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तूही पाण्यात भिजल्या आहेत

    आज दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू असून, रात्रभर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे

  • 27 Jul 2023 07:01 PM (IST)

    Yawatal Rains | यवतमाळ शहरातील बांगर रोडवरील नालीत पडून महिलेचा मृत्यू

    यवतमाळ शहरातील बांगर रोडवरील नालीत पडून महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत महिलेचा मृतदेह सापडला आहे. गेल्या 3 तासांपासून राबविले जात होत शोध कार्य. या महिलेचा नालीमध्ये पडताना cctv फुटेज देखील हाती लागला आहे.

  • 27 Jul 2023 06:56 PM (IST)

    राज्यातील अतिवृष्टीचा फटका राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारालाही बसला

    राज्यातील अतिवृष्टीचा फटका राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारालाही बसला आहे.  राज्यातील 2284 ग्रामपंचायतीच्या मतदार याद्या सुधारीत करण्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय. अतिवृष्टीमुळे मतदार याद्या पाठवण्याची मुदत वाढवली आहे. 31 तारखेपर्यंत निवडणूक आयोगाला मतदार याद्या पाठवण्याच्या प्रशासनाला सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र आता 10 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवली आहे.

  • 27 Jul 2023 06:19 PM (IST)

    Mumbai Rains News Live : मुंबईहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या पश्चिम द्रुतगती महामार्गवर प्रचंड वाहतूक कोंडी

    मुंबई :

    मुंबईहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या पश्चिम द्रुतगती महामार्गवर वाहतूक कोंडी निर्माण झालीय. जोगेश्वरी, गोरेगाव, बोरिवली येथील महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झालीय.  महामार्गावर संतगतीने वाहन सुरू असल्याने घरी जात असल्याने चाकरमाण्याना मोठा त्रास सहन करावे लागत आहे.

  • 27 Jul 2023 06:08 PM (IST)

    दहिसर सबवेमध्ये पाणी तुंबले

    मुंबईसह बोरीवली, कांदिवली, मालाड आणि दहिसरमध्ये आज सकाळपासून अधूनमधून पाऊस पडत आहे. गोराई रोड महात्मा फुले झोपडपट्टी, डॉन वास्को लिंक रोड, कांदिवली ९० फूट रोड, बोरिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ आणि दहिसर चेक नाका या पुलाखाली आणि दहिसर सबवेमध्ये पाणी तुंबले आहे.

  • 27 Jul 2023 06:06 PM (IST)

    मीरा भाईंदर शहरात पावसाची जोरदार बॅटिंग

    मीरा भाईंदर शहरात पावसाची जोरदार बॅटिंग ही बघायला मिळत आहे. सखल भागात रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास होत आहे. मीरा भाईंदर शहरात सर्वत्र ठिकाणी पाणी पाणी साचले आहे.

  • 27 Jul 2023 05:22 PM (IST)

    rains update | रत्नागिरीत पुराचा कहर | मुंबई-गोवा महामार्ग पावसामुळे बंद | Mumbai Goa highway closed due to heavy rain

    मुंबई गोवा महामार्ग मुसळधार पावसामुळे बंद रत्नागिरीत मुसळधार पावसाचा कहर राजापूर तालुक्यातील अर्जुना, कोदवली नद्यांना पूर सहा नद्यांना पूर, धोक्याचा इशारा रत्नागिरीत मागील २४ तासांपासून मुसळधार पाऊस काजळी नदीला पूर, मुंबई गोवा महामार्ग मुसळधार पावसामुळे बंद रत्नागिरीला जाण्यासाठी पावस मार्गे वाहतूक वळवली Mumbai Goa highway closed due to heavy rain Heavy rain wreaks havoc in Ratnagiri Flooding of Arjuna and Kodavali rivers in Rajapur taluka Six rivers flood in Ratnagiri, warning of danger Heavy rain in Ratnagiri since last 24 hours Ratnagiri Kajli river floods, Mumbai Goa highway closed due to heavy rains Traffic diverted to Ratnagiri via Pavas

  • 27 Jul 2023 05:00 PM (IST)

    Mumbai Rains | पाणी साचलं कल्याण स्टेशनवर, पण सेन्ट्रल रेल्वे रडतखडत, दादर स्टेशनला गर्दी

    कल्याण आणि ठाण्यात दुपारी जोरदार पाऊस झाल्याने, मध्य रेल्वेच्या लोकलचा स्पीड मंदावला आहे, यामुळे मध्य रेल्वेच्या दादर स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झाली. दरम्यान मुंबईला हवामान विभागाकडून पुन्हा रेड अलर्ट देण्यात आला आहे, ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबईला हा रेड अलर्ट देण्यात आला आहे.

  • 27 Jul 2023 03:17 PM (IST)

    Nagpur Rains | मुसळधार पावसामुळे नागपुरमध्ये देखील वाहतुकीला खोळंबा

    मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचलं, नरेंद्रनगर पूल खालीही पाणी साचलं, अनेक ठिकाणी वाहतुकीला खोळंबा, अंबाझरी तलाव पाण्याने ओव्हर फ्लो

  • 27 Jul 2023 03:17 PM (IST)

    Nashik Rains | नाशिक – इगतपुरीचं नैसर्गिक सौंदर्यं पहिल्या पावसानंतर आणखी खुललं

    नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीचं नैसर्गिक सौंदर्य आणखी खुललंय. निसर्गाचा आनंद घेणारे पर्यंटक येथे दिसून येत आहेत. धबधबे आणि हिरवाईने नटलेले डोंगर सर्वांना खुणावतायत.

  • 27 Jul 2023 03:09 PM (IST)

    Thane Rains | ठाणेकरांना मुसळधार पावसाचा फटका, वंदना टॉकीजजवळ घुडघ्याच्या वर पाणी

    ठाणेकरांना मुसळधार पावसाचा फटका, वंदना टॉकीजजवळ घुडघ्याच्या वर पाणी साचलं, पंप लावूनही पाण्याचा निचरा होईना, रिक्षा आणि दुचाक्या बंद पडतायत, सतत पाऊस सुरु असल्याने पाणी साचण्याचं प्रमाण वाढलं.

  • 27 Jul 2023 02:43 PM (IST)

    Mumbai rains | मुंबई – सायनच्या किंगसर्कलमध्ये पाणी साठलं, मुंबईला पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा

    मुंबईत सायनच्या किंग्जसर्कलमध्ये पाणी साठलं, दादर स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी, चर्चगेट स्टेशनवरील पावसाचा अखेर निचरा

  • 27 Jul 2023 02:41 PM (IST)

    Maharashtra Rains | हिंगणघाटमध्ये एनडीआरएफच्या जवानांकडून १७ वीटभट्टी कामकारांची सुटका

    हिंगणघाट – १७ वीटभट्टी कामगारांना एनडीआरएफच्या जवानांनी पाण्यातून सुरक्षित बाहेर काढलं, अनेक तासापासून अडकलेल्या कामगारांची अखेर सुटका

  • 27 Jul 2023 01:57 PM (IST)

    पुण्यातील शिरूरमध्ये पाण्याचे अनोखे स्वागत

    राज्यात एकीकडे पावसाने थैमान घातले असताना पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात मात्र पावसाने पाठ फिरवली आहे. आता चास-कमान कालव्याला पाणी येताच शेतकऱ्यांनी पाण्याची पूजा करून वाजत गाजत पाण्याचे अनोख्या पध्दीतीने स्वागत केलं.

  • 27 Jul 2023 01:55 PM (IST)

    मंत्री अनिल पाटील यांनी घेतली इर्शाळवाडीतील बचावलेल्या नागरिकांची भेट

    मंत्री अनिल पाटील यांनी इर्शाळवाडीतील नागरिकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सोयी सुविधा देखील पहिल्या. येथील प्रत्येक नागरिकांची भेट घेत विश्वास व्यक्त केला आहे.

  • 27 Jul 2023 01:53 PM (IST)

    विरोधी पक्षांचे खासदार मणिपूरला जाणार

    विरोधी पक्षांचे खासदार 29 आणि 30 तारखेला मणिपूर दौऱ्यावर जाणार आहेत. इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख नेतेमंडळी मणिपूरला जाणार आहेत. मणिपूरमध्ये जाऊन पीडितांची भेट घेणार आहेत.

  • 27 Jul 2023 01:36 PM (IST)

    लवकरच काही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना देणार

    राज्यात तिसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर लवकरच काही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दिले जाणार आहे. यावेळी काही जिल्ह्यांचे पालकमंत्र्यांच्या पदाची अदलाबदल केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. सध्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे.

    चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत. मात्र कोल्हापूरचे पालकमंत्री पदासाठी नव्याने सरकारमध्ये सहभागी झालेले मंत्री हसन मुश्रीफ हे देखील इच्छुक आहेत. त्यामुळे पालकमंत्री पदावरून पून्हा एकदा सरकारमधील मंत्र्यांमध्ये तिढा वाढू शकतो.

    दुसरीकडे भंडारा गोंदिया जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद हे धर्मराव बाबा अत्राम यांना तर नाशिकचे पालकमंत्री म्हणून छगन भुजबळ आणि बीडचे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे कळते.

  • 27 Jul 2023 01:32 PM (IST)

    अमरावती शहरात संभाजी भिंडे यांना जोरदार विरोध

    अमरावतीच्या नवाथे चौकात संभाजी भिंडे यांच्या विरोधात भीम आर्मीने आंदोलन सुरु आहे. संभाजी भिंडे यांच्या पोस्टरला चप्पल मारत बॅनर फाडले. संभाजी भिडे यांच्या सभेला परवानगी न देण्याची मागणी भीम आर्मीने केली आहे. अमरावतीत सायंकाळी संभाजी भिंडे यांची सभा आहे.

  • 27 Jul 2023 01:24 PM (IST)

    Rain Update : वसई, विरार, नालासोपारामध्ये दुपारनंतर जोरदार पावसाची हजेरी

    वसई, विरार, नालासोपारामध्ये दुपारनंतर पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मागच्या 24 तासात वसई तालुक्यात 64 मिलिमीटर एवढा पाऊस पडला आहे. पालघर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट आहे. दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने पुन्हा एकदा ओसरलेले पाणी सकल भागात भरण्यास सुरवात झाली आहे.

  • 27 Jul 2023 01:13 PM (IST)

    Rain Update : यवतमाळमध्ये नाल्यात महिला वाहून गेली

    यवतमाळमध्ये मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात महिला वाहून गेली आहे. शहरातील बांगर नगर परिसरातील नाल्यात महिला वाहून गेली. नगरपरिषद अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरू आहे.

  • 27 Jul 2023 01:12 PM (IST)

    स्वराज्य संघटना करणार खड्डे बुजवा आंदोलन

    स्वराज्य संघटना राज्यात 100 ठिकाणी खड्डे बुजवा आंदोलन करणार आहे. 28 जुलैला सकाळी 10 ते 1 या वेळेत आंदोलन करणार आहेत. पावसाळ्यात अनेक शहरांमध्ये रस्त्यावरील खड्डयांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या स्वराज्य संघटनेकडून राज्यातील प्रमुख शहरात हे आंदोलन केलं जाणार आहे.

  • 27 Jul 2023 01:10 PM (IST)

    Rain Update : सोलापूरमध्ये पावसाची संततधार सुरुच

    सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. सोलापुरात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत. स्मार्ट सिटी असलेल्या सोलापूर शहरात अनेक दिवसांपासून महापालिकेच्या अनास्थेमुळे खड्डेच खड्डे पडलेत. खड्ड्यांमुळे मागील तीन ते चार वर्षात 25 हून अधिक जणांचा मृत्यू झालाय.

  • 27 Jul 2023 01:07 PM (IST)

    Mumbai Rain News Live : मुंबईसाठीचा अलर्ट बदलला

    मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुन्हा मुंबईसाठीचा अलर्ट बदलण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट वरुन पुन्हा रेड अलर्ट करण्यात आला आहे. रेड अलर्ट म्हणजे अतिवृष्टीचा इशारा मानला जातो.  उद्या सकाळी 8.30 वाजतापर्यंत हा रेड अलर्ट असणार आहे.

  • 27 Jul 2023 01:05 PM (IST)

    Rain Update : मुंबईला हवामान विभागाचा रेड अलर्ट

    मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. हवामान विभागाने मुंबईला रेड अलर्ट दिलेला आहे. उद्या सकाळी 8.30 वाजतापर्यंत हा रेड अलर्ट असणार आहे. अत्यावशक असल्यास घरा बाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाने दिले आहे.

  • 27 Jul 2023 12:35 PM (IST)

    Rain Update : मुंबईतील चर्चगेट परिसर जलमय

    चर्चगेट रेल्वे ट्रॅकवरील पाणी उपसल्याने चर्चगेट परिसर जलमय झाला आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबलं आहे. पंप लावून पाण्याचा निचरा करण्यात येत आहे. परिसरात पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. जवळपास गुढगाभर पाणी रस्त्यावर साचंले आहे. पालिका कर्मचारी पाण्याचा निचरा करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.

  • 27 Jul 2023 12:24 PM (IST)

    Rain Update : साताऱ्यात मुसळधार पाऊस 

    साताऱ्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. साताऱ्याचे कन्हेर धरण 57 टक्क्यांनी भरले आहे. समाधानकारक पाऊस झाल्याने पाण्याची पातळी वाढली आहे.

  • 27 Jul 2023 12:12 PM (IST)

    Rain Update : मुंबईतील अनेक भागात पावसाचा जोर वाढला

    हवामाल खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर मुंबईत अनेक भागात पावसाचा जोर वाढायला सुरूवात झाली आहे. चर्चगेच, सायन, वांद्रे, कुर्ला, अंधेरी आणि बोरीवली या भागात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. प्रशासनाकडून नागरीकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

  • 27 Jul 2023 11:40 AM (IST)

    राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना शहरातील नागरिकांना मदत करायचे आवाहन

    उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज ठाणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयच्या उद्घाटनाला हजर राहणार होते पण अतिवृष्टीमुळे आजचा कार्यक्रम कॅन्सल करून राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना शहरातील नागरिकांना मदत करायचे आवाहन केले. तसेच सर्व नागरिकांनी आवश्यकता असेल तरच बाहेर पडावे असे आवाहन करून काळजी घ्यायला सांगितली.

  • 27 Jul 2023 11:30 AM (IST)

    नाशिक: चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन

    भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा नाशिक दौरा. बावनकुळे यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन. द्वारका सर्कल येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे औद्योगिक सहकारी सभागृहात कार्यक्रम. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजस्थान मधील सिकर येथे पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता वितरीत करण्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मेळाव्याचे आयोजन.

  • 27 Jul 2023 11:19 AM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ठाण्यात आयोजित कार्यक्रम तूर्तास स्थगित

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ठाण्यात आयोजित कार्यक्रम तूर्तास स्थगित. रेड अलर्टमुळे कार्यक्रमाला जाणार नसल्याचं अजित पवार यांचं स्पष्टीकरण.

  • 27 Jul 2023 11:09 AM (IST)

    पुणे : महापालिकेकडून जलपर्णी काढण्याच्या कामाला सुरुवात

    पुण्यातील नदीपात्रात जलपर्णीचा विळखा. कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलाव, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय तलाव, सारसबाग येथील पेशवे पार्क तलाव, पाषाण तलाव, जांभुळवाडी तलाव आणि संगमवाडी ते मुंढवा जॅकवेलपर्यंत नदीपत्रात साचली जलपर्णी. संपूर्ण नदीपात्रात साचला जलपर्णीचा खच. ऐन पावसाळ्यात महापालिकेकडून जलपर्णी काढायला सुरुवात. मुळा मुठा नदीतून वाहत आलेली जलपर्णी शहरातील अनेक नदीकाठावर साचली. महापालिकेकडून जलपर्णी काढण्याच्या कामाला सुरुवात

  • 27 Jul 2023 11:01 AM (IST)

    Rain update : मुंबईतील अनेक भागांत पावसाचा जोर वाढला

    मुंबईतील अनेक भागांत पावसाचा जोर वाढायला सुरूवात झाली आहे. चर्चगेट, वांद्रे, सायन, कुर्ला या भागांत मुसळधार पाऊस पडत आहे.

    अंधेरी , मालाड, कांदिवली बोरिवली इथेही पावसाला जोरदार सुरूवात झाली असून अनेक सखल भागांत पाणी साचले आहे.

  • 27 Jul 2023 10:54 AM (IST)

    Rain update : नागपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू, NDRF कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू

    नागपूरमध्ये कालपासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी कंबरेपर्यंत पाणी साचलं आहे. अनेक भागांत लोकांच्या घरातही पाणी शिरल असून तेथील नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी NDRF च्या पथकाकडून अथक प्रयत्न केले जात आहे.

  • 27 Jul 2023 10:43 AM (IST)

    Rain update : नागपूरचा अंबाझरी तलाव झाला ओव्हरफ्लो

    नागपूर मध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.

  • 27 Jul 2023 10:34 AM (IST)

    Rain update : मुंबईला आज ‘ ऑरेंज अलर्ट ‘चा इशारा

    हवामान खात्यानं अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला होता. मात्र आज मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काल रेड अलर्ट देण्यात आला होता, पण आज मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

  • 27 Jul 2023 10:23 AM (IST)

    Rain update : वसई – मुंबई अहमदाबाद महामार्ग जाम

    मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या लेनवर 2 किलोमीटरपर्यंत तर गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर 10 किलोमीटर पर्यंत वाहतूक जाम झाली आहे.

    वसई हद्दीत अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडून पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.

  • 27 Jul 2023 10:18 AM (IST)

    Rain update : चर्चगेटजवळ रेल्वे परिसरात पाणी साचलं

    सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चर्चगेटजवळ रेल्वे परिसरात पाणी साचलं. रेल्वे रुळांवरच पाणी रस्त्यावर आल्याने सखल भागात पाणी साचलं.

  • 27 Jul 2023 09:56 AM (IST)

    गोंदियामध्ये 96 गावांना पुराचा धोका

    गोंदिया जिल्ह्यातील 96 गावांना पुराचा धोका आहे. यामुळे गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पूरप्रवण गावांची पाहणी केली. गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली.

  • 27 Jul 2023 09:50 AM (IST)

    मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक ठप्प

    मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या लेनवर 2 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. गुजरातवरुन मुंबईला जाणाऱ्या लेनवर 10 किलोमीटरपर्यंत वाहतूक जाम झाली आहे. वसई हद्दीत मालजीपाडा, ससूनवघर, कामन क्रीक ब्रिज या ठिकाणी मोठे मोठे खड्डे निर्माण झाले आहे. या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.

  • 27 Jul 2023 09:40 AM (IST)

    अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला जाणार

    अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला जाणार आहे. सकाळी अकरा वाजल्यापासून दीड लाख क्यूसेकने धरणातून पाणी सोडले जाणार आहे. सध्या 1 लाख 25 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. अलमट्टी धरणामधील विसर्ग 25 हजार क्यूसेकने वाढणार आहे.

  • 27 Jul 2023 09:34 AM (IST)

    मुंबईत हर्बर अन् पश्चिम रेल्वे सुरळीत

    मुंबईत सकाळापासून पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने गुरुवारी मुंबईसाठी रेड अलर्ट दिला आहे. पावसाचा परिणाम मध्य रेल्वेवर झाला आहे. मात्र, पश्चिम आणि हर्बल मार्गावरील रेल्वेसेवा सुरळीत असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

  • 27 Jul 2023 09:30 AM (IST)

    पावसामुळे भूस्खलन, माथेरानमधील मालडुंगा पॉईंट बंद

    माथेरानच्या मालडुंगा पॉईंट येथे पावसामुळे भूस्खलन झाले आहे. यामुळे हा पाईंट पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे भुस्खलन झाले आहे. सुदैवाने या ठिकाणी वस्ती नाही. यामुळे कोणतीही हानी झाली नाही.

  • 27 Jul 2023 09:18 AM (IST)

    साताऱ्यात पावसामुळे धरणांमध्ये साठा वाढला

    सातारा जिल्ह्यात सध्या रेड अलर्ट जारी असल्यामुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार सुरू आहे. सातारा शहरानजीक असणाऱ्या कन्हेर धरणाची पाणी पातळीतही वाढ होताना पाहायला मिळत आहे. सध्या हे धरण 57 टक्के भरले असून जिल्हा प्रशासन सुरक्षेच्या दृष्टीने सज्ज झालेला पाहायला मिळत आहे.

  • 27 Jul 2023 09:08 AM (IST)

    मुंबईत पावसामुळे रेल्वेवर परिणाम

    मुंबईत मध्य रेल्वे अन् पश्चिम रेल्वेवर पावसाचा परिणाम झाला आहे. दोन्ही मार्गावर रेल्वे उशिराने धावत आहे. सुमारे १५ ते २० मिनिटे रेल्वे उशिराने धावत आहे.

  • 27 Jul 2023 08:58 AM (IST)

    गडचिरोलीत मुसळधार

    गडचिरोली जिल्ह्यात काल रात्री दहा वाजेपासून सकाळपर्यंत मुसळधार पाऊस बरसतोय. प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती, वैनगंगा, पर्लाकोटा, पामुला, गौतम या सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. प्राणहिता आणि गोदावरी नदीची पाणी पातळी वाढत आहे. त्यामुळे या नदीच्या काठावर असलेले मेडिगट्टा धरणाचे दरवाजे चार फुटांनी उघडण्यात आले आहेत. 4 लाख 57 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.

  • 27 Jul 2023 08:50 AM (IST)

    कोल्हापुरात पावसाची विश्रांती

    कोल्हापुरात पावसाने विश्रांती घेतली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या दहा तासापासून स्थिर आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 40 फूट पाच इंचांवर स्थिर आहे. राधानगरी धरणाच्या पाच स्वयंचलित पैकी एक दरवाजा पहाटे चार सुमारास बंद झाला आहे. एक स्वयंचलित दरवाजा बंद झाल्याने भोगावती नदीतील विसर्ग 1 हजार हुन अधिक क्यूसेकने कमी झाला आहे. पावसाचा विश्रांती, पंचगंगा नदीची स्थिर पाणी पातळी, आणि राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा बंद झाल्याने कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • 27 Jul 2023 08:43 AM (IST)

    Rain update : कोयना धरण परिसरात पाऊस अपडेट

    कोयना धरणात पाणीसाठा 64.32 TMC. धरणात 36,007 cusecs पाण्याची आवक सुरु. पायथा वीजगृहातून फक्त 1050 cusecs पाणी विसर्ग नदीपात्रात सुरु. दुपारी पायथा वीजगृहाचे आणखी एक युनिट सुरु करुन 1050 cusecs पाणी विसर्ग नदीपात्रात सुरु करणार.

    कोयना पाणलोट क्षेत्रात

    कोयनानगर 119 mm

    नवजा 189 mm

    महाबळेश्वर 154 mm

    पावसाची नोंद

  • 27 Jul 2023 08:40 AM (IST)

    Rain update : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज 2 दोन तासांचा विशेष ब्लॉक

    पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज पुन्हा दोन तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार. दुपारी 12 ते 2 या वेळेत सैल झालेल्या दरडी हटवल्या जाणार. या वेळेत हलकी वाहतूक मॅजिक पॉईंट पासून जुन्या पुणे मुंबई महामार्गाकडे वळवली जाईल. जड वाहतूक जिथे आहे तिथेच थांबवणार.

  • 27 Jul 2023 08:38 AM (IST)

    रायगडमध्ये धो-धो…

    रायगडमध्ये मुसळधार पावसाळा सुरूवात झाली आहे. आज रायगड सह अन्य जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर डोंगर वस्तीमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय.  पर्यटन स्थळी पर्यटकांना न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलं. आहे. त्यामुळे नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आळा आहे.

  • 27 Jul 2023 08:36 AM (IST)

    Rain update : पिंपरी-चिंचवड, मावळ तालुक्यासाठी चांगली बातमी

    संपूर्ण पिंपरी-चिंचवड आणि मावळ तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाची बॅटिंग जोरात सुरू आहे. पवना धरण 73.59 टक्के भरलं आहे. असचा दमदार पाऊस मावळात सुरू राहिला तर काही दिवसात पवना डॅम शंभरी पार करेल. सध्या पवनानगर परिसरात पाऊस चांगला पडत असल्याने पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह पिंपरी-चिंचवड आणि मावळवासियांना दिलासा मिळाला आहे. सध्याचा चालू असलेला पाऊस भातपिकासाठी पोषक असल्याने मावळातील शेतकरी इंद्राचे आभार मानू लागलेत.

  • 27 Jul 2023 08:32 AM (IST)

    Rain update : रायगडमधील नदीने ओलांडली धोक्याची पातळी

    रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदी पत्रातील पाण्याचा पातळी वाढली आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अतिधोकादायक घरातील नागरिकांच सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे.

  • 27 Jul 2023 08:27 AM (IST)

    कोल्हापूरकरांसाठी दिलासादायक बातमी…

    कोल्हापूरकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे. अलमट्टी धरणातून एक लाख क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.  राज्य सरकार आणि समन्वय समिती यांनी केलेल्या चर्चेनंतर अलमट्टी प्रशासनाने विसर्ग वाढवला आहे.  अलमट्टी धरणातील विसर्ग वाढल्याने कोल्हापूरसह सांगली जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

  • 27 Jul 2023 08:11 AM (IST)

    राज्यात कुठे-कुठे रेड अलर्ट? जाणून घ्या…

    घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे शहरात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. पुण्याच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट, उर्वरित जिल्ह्यात आणि शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. राज्यात आज कोकणातील काही भाग, घाटमाथा तसेच विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्यांचा घाटमाथा, तसंच विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूरमध्ये रेड अलर्ट देण्यात आलाय. उर्वरित कोकण, कोल्हापूर, नागपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

  • 27 Jul 2023 07:58 AM (IST)

    पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर रेड अलर्ट, तर शहरात मध्यम पावसाचा इशारा

    बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाने लावली हजेरी लावली आहे. पुण्याच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यात आणि शहरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. राज्यात आज कोकणातील काही भाग, घाटमाथा तसेच विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

    रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्यांचा घाटमाथा तसेच विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित कोकण, कोल्हापूर, नागपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ जिल्ह्यांत काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • 27 Jul 2023 07:51 AM (IST)

    रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात

    रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. येथील डोंगर वस्तीच्या भागात पावसाने अधिकच जोर धरला आहे. त्यामुळे पर्यटकांना पर्यटनस्थळी येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

  • 27 Jul 2023 07:27 AM (IST)

    वसई, विरार, नालासोपाऱ्यात पावसाची रिपरिप सुरू, जोरदार पावसाची शक्यता

    वसई, विरार, नालासोपाऱ्यात पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. तर अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे. पालघर जिल्ह्याला आज हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. वसई, विरार परिसरातील सर्व शाळा, महाविद्यालयसह लोकल रेल्वे सेवा सुरू आहेत.

  • 27 Jul 2023 07:13 AM (IST)

    गरज असेल तरच घराबाहेर पडा, मुंबईत अतिमुसळधार पावसाची शक्यता

    मुंबईत आज दुपारपर्यंत अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन मुंबई महापालिका आयुक्तांनी केलं आहे. अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

  • 27 Jul 2023 07:09 AM (IST)

    राज्यात अतिवृष्टीचा इशारा, सहा जिल्ह्यात रेड तर पाच जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

    राज्यात आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, पालघर, नाशिक, यवतमाळ आणि चंद्रपूर या पाच जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Published On - Jul 27,2023 7:01 AM

Follow us
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.