Nashik Oxygen Leakage : नाशिक दुर्घटनेच्या चौकशीसाठी 7 सदस्यीय उच्चस्तरीय समिती नियुक्त, अहवालानंतर कारवाई होणार

नाशिकमधील दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी 7 सदस्यीय उच्च स्तरीय चौकशी समिती नेमण्यात आलीय. तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.

Nashik Oxygen Leakage : नाशिक दुर्घटनेच्या चौकशीसाठी 7 सदस्यीय उच्चस्तरीय समिती नियुक्त, अहवालानंतर कारवाई होणार
नाशिक दुर्घटनेनंतर राजेश टोपेंकडून रुग्णालयाची पाहणी
Follow us
| Updated on: Apr 21, 2021 | 8:42 PM

नाशिक : झाकिर हुसेन रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी 7 सदस्यीय उच्च स्तरीय चौकशी समिती नेमण्यात आलीय. तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. ही समिती झालेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करेल आणि त्यांनी केलेल्या सूचना SOP म्हणून वापरल्या जातील, असंही टोपे यांनी स्पष्ट केलंय. या चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असंही टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. आज राजेश टोपे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी रुग्णालयाची पाहणी केली. (7 member high level inquiry committee to investigate Nashik oxygen leak tragedy)

चौकशी समितीत कोण कोण?

नाशिकची दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेच्या चौकशीसाठी 7 सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिलीय. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती चौकशी करेल. या समितीमध्ये वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य, महापालिकेचे अभियंता आणि ऑक्सिजन प्लांट उभारणीचं काम करणाऱ्या लोकांचा समावेश असेल, असं टोपेंनी सांगितलं.

चौकशी समितीच्या सूचनानंतर SOP ठरवणार

या दुर्घटनेनंतर आता ऑक्सिजन लिक्विड टँकमध्ये किती साठा आहे, किती प्रेशर आहे याची व्यवस्था करण्याची गरज आहे. त्याचबरोबर 24 तास सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज आणि स्वतंत्र मेंटेनन्ससाठी व्यक्ती नेमावा लागणार असल्याचं टोपे यांनी यावेळी सांगितलं. त्याचबरोबर या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी SOP ठरवली जाईल. चौकशी समितीकडून मिळालेल्या सूचना SOP म्हूण लागू करु, असं टोपे यांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून प्रत्येकी 5 लाख तर महापालिकेकडून 5 लाखाची मदत दिली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं

संबंधित बातम्या :

‘दोन तास ऑक्सिजन नव्हता, माझा भाऊ तडपून तडपून गेला, हाताशी आलेला भाऊ गेला’, रुग्णालयाबाहेर भावाचा आक्रोश

Nashik Oxygen leakage : ‘नाशिकच्या दुर्घटनेला सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत, आता तरी जागे व्हा’, दरेकरांचा संताप

7 member high level inquiry committee to investigate Nashik oxygen leak tragedy

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.