Maharashtra New CM Government Formation LIVE : ज्येष्ठ कामगार नेते डॉ बाबा आढाव यांनी उपोषण सोडलं

| Updated on: Dec 03, 2024 | 8:24 AM

Maharashtra New CM Government Formation LIVE : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण असणार? याबाबतची उत्सुकता लोकांच्या मनात आहे. अशातच महायुतीच्या नेत्यांची बैठक आज दिल्लीत होणार आहे. याबाबतचे ताजे अपडेट्स...

Maharashtra New CM Government Formation LIVE : ज्येष्ठ कामगार नेते डॉ बाबा आढाव यांनी उपोषण सोडलं
महत्वाची बातमीImage Credit source: tv9

महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे आज साताऱ्यातील दरेगाव या त्यांच्या मूळगावी गेले आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेबाबत होणाऱ्या महायुतीच्या बैठका आता लांबणीवर पडल्या आहेत. शरद पवार आज पुण्यात आहेत. बाबा आढाव यांची ते भेट घेणार आहेत. मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल लागलेली आहे. आज किमान तापमान १८.२ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे. – आज दिवसभर नाशिक शहरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.  तर उद्या (रविवारी) कमी दाबाने शहरात पाणीपुरवठा होणार आहे. याबाबतचे सर्व अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा हा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 30 Nov 2024 05:06 PM (IST)

    ज्येष्ठ कामगार नेते डॉ बाबा आढाव यांनी उपोषण सोडलं

    ज्येष्ठ कामगार नेते डॉ बाबा आढाव यांनी उपोषण सोडलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पिऊन बाबा आढाव यांनी उपोषण सोडलं आहे. बाबा आढाव यांचं गेल्या 2 दिवसांपासून पुण्यात ईव्हीएमविरोधात आंदोलन सुरु होतं.

  • 30 Nov 2024 04:24 PM (IST)

    एकनाथ शिंदेंची प्रकृती ठीक नसल्याने डॉक्टरांचं पथक तपासणीसाठी दाखल

    राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री यांची प्रकृती स्थिर नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शिंदेच्या तपासणीसाठी डॉक्टरांचं पथक दाखल झालं आहे. शिंदे हे सध्या त्यांच्या मूळगावी साताऱ्यातील दरे इथे आहेत.

  • 30 Nov 2024 04:21 PM (IST)

    राज्याचा मात्र खोळंबा होतोय याचं महायुतीला काहीही देणंघेणं नाही : आमदार रोहित पवार

    निकाल लागून ८ दिवस उलटले तरी नेता निवडला जात नाही आणि सरकारही बनवलं जात नाही. राज्याचा खोळंबा होतोय. मात्र महायुतीला काही देणंघेणं नाही, असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत महायुतीवर निशाणा साधला आहे.

    रोहित पवार यांची एक्स पोस्ट

  • 30 Nov 2024 04:12 PM (IST)

    निवडणुकीत गडबड झाल्याचा संशय : बाबा आढाव

    ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं पुण्यात ईव्हीएमविरोधातील आत्मक्लेश आंदोलन सुरु आहे. बाबा आढाव यांची अजित पवार आणि इतर नेत्यांनी भेट घेतली. त्यानंतर आता उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्यासोबत बाबा आढाव पत्रकारांशी संवाद साधत आहेत. या निवडणुकीत सरकारी तिजोरीतून पैशांचं वाटप झालं, असं बाबा आढाव यांनी म्हटलं आहे. तसेच निवडणुकीत गडबड झाल्याचा संशयही बाबा आढाव यांनी व्यक्त केला आहे.

  • 30 Nov 2024 03:42 PM (IST)

    विरोधक पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडत आहेत – अजित पवार

    लोकसभेच्या वेळी इव्हीएम चांगले होते. आता विरोधक विधानसभेत ईव्हीएम विनाकारण खापर फोडत आहेत असा आरोप ज्येष्ठ समाज सेवक बाबा आढाव यांची भेट घेतल्यानंतर अजित पवार यांनी केला आहे.

  • 30 Nov 2024 03:28 PM (IST)

    पाच महिन्यात लोकांचे मत बदलले त्याला आम्ही काय करायचं ? – अजित पवार

    लाडकी बहिण योजना मध्य प्रदेश आणि कर्नाटकातही आहे, आम्ही ती लागू केल्याने आम्हाला मतदान जास्त झाले, पाच महिन्यात लोकांचे मत बदलले त्याला आम्ही काय करणार असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली तेव्हा केला आहे.

  • 30 Nov 2024 03:11 PM (IST)

    शरद पवार यांच्या पाठोपाठ अजितदादा देखील बाबा आढाव यांच्या भेटीला

    ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी विधानसभा निवडणूक निकालानंतर पुणे येथे आत्मक्लेश आंदोलन सुरु केले आहे. त्यास शरद पवार यांनी भेट दिल्यानंतर आता अजितदादांनी भेट दिली आहे.

  • 30 Nov 2024 02:58 PM (IST)

    इम्तियाज जलील यांच्या भेटीसाठी शेकडो नागरिक दाखल

    इम्तियाज जलील यांच्या भेटीसाठी शेकडो नागरिक दाखल झाले आहेत. आदर्श बँकेतील असंख्य ठेवीदार इम्तियाज जलील यांच्या घरासमोर जमा झाले आहेत. इम्तियाज जलील यांच्या पराभवानंतर सांत्वन भेटीसाठी शेकडो नागरिक दाखल झाले आहेत.

  • 30 Nov 2024 02:50 PM (IST)

    धुळ्यात वोट जिहाद झाल्याचा भाजपाचा दावा

    धुळे शहर विधानसभा निवडणुकीत यंदा देखील वोट जिहाद झाल्याचा दावा भाजपाचे नवनियुक्त आमदार अग्रवाल यांनी केला आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत वोट जिहाद झाला आहे. या निवडणुकीत विशिष्ट समाजाने एमआयएमच्या फारुख शहा यांना 90 टक्के मतदान केले ,मात्र इतर लोकांनी लोकसभेत झालेल्या पराभवाची कसर भरून काढत भूतो ना भविष्य एक लाख मताच्या पुढे मला मतदान करून विजयी केले.

  • 30 Nov 2024 02:40 PM (IST)

    महादेव जानकर यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावं

    सध्या ईव्हीएमवरून तापलेलं असताना हे मशीन सहज हॅक करता येतो असा दावा महादेव जानकर यांनी केला. त्यावर आता भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी थेट आव्हान दिले आहे. निवडणूक आयोगाने सर्व विरोधकांना एकत्र करावे आणि ईव्हीएम हॅक करणाऱ्यांना पाचारण करावे. जानकर यांनी ईव्हीएम हॅक करुन दाखवावे असे वक्तव्य दानवे यांनी केले.

  • 30 Nov 2024 02:30 PM (IST)

    3 एकर कपाशीवर फिरविला रोटावेटर

    जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील धावडा आणि आसपासच्या परिसरात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि बोंडअळी रोगाच्या प्रादुर्भावामुळे कपाशी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालय.त्यामुळे परिसरात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.ऐन बोंड लागण्याच्या अवस्थेत अतिवृष्टीच्या पावसाने जोरदार तडाखा दिल्यामुळे एक दोन वेचणी मध्येच खराटा होत असल्यामुळे धावडा येथील एका शेतकऱ्याने आपल्या 3 एकर क्षेत्रावरील कपाशी पिकावर ट्रॅक्टर द्वारे रोटावेटर फिरवत कपाशीचे पीक जमीनदोस्त केलय.

  • 30 Nov 2024 02:20 PM (IST)

    आम्ही असतो तर राष्ट्रपती राजवट लागली असती-संजय राऊत

    महाराष्ट्राला मुख्यमंत्री नकोय की यांना प्रदीर्घकाळ काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राहायचं आहे. आम्ही असतो तर इतक्यात त्यांनी राष्ट्रपती राजवट लागू केली असती. निकाल लागून आठ दिवसांपेक्षा जास्त कालावधी गेला आहे. निकालावर लोक खुश नाहीत. स्वत: काळजीवाहू मुख्यमंत्री अमावस्येच्या निमित्ताने गावाला गेले आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

  • 30 Nov 2024 02:10 PM (IST)

    निवडणूक आयोगाकडून काँग्रेसला निमंत्रण

    केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काँग्रेसला चर्चेचे निमंत्रण देण्यात आले आहे. 76 लाख मतं कशी वाढली आणि संध्याकाळी ते रात्रीपर्यंत मताचा टक्का कसा वाढला असा सवाल काँग्रेसने केला होता. त्यावर आता आयोगाने हा पवित्रा घेतला आहे.

  • 30 Nov 2024 02:00 PM (IST)

    माध्यमांच्या चर्चेवर आम्ही लक्ष देत नाही

    राज्यात महायुतीच्या सरकार स्थापनेपूर्वीच नाराजी नाट्य सुरू असल्याच्या चर्चेवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांच्या चर्चेवर आम्ही लक्ष देत नाही, असा दावा त्यांनी केला.

  • 30 Nov 2024 01:53 PM (IST)

    गुलाबराव पाटील यांचा राऊत यांच्यावर आरोप

    शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर आरोप केले आहे. ते म्हणाले, संजय राऊत यांना रुग्णालयात दाखल केले पाहिजे. त्यांना आधी शिवसेना संपवली. त्यानंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी संपवली. आता उद्धव ठाकरेंना संपवले.

  • 30 Nov 2024 01:42 PM (IST)

    केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काँग्रेसला चर्चेचे निमंत्रण

    केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काँग्रेसला चर्चेचं निमंत्रण दिलंय.  3 डिसेंबरला चर्चेला येण्याचं निमंत्रण आयोगाने पाठवलंय. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील फेरफारच काँग्रेसने आरोप केलाय. त्यामुळे ही बैठक बोलवली आहे. सविस्तर वाचा…

  • 30 Nov 2024 01:21 PM (IST)

    चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

    चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील निलसनी- पेडगाव शेतशिवारात वाघाच्या हल्ल्याची घटना घडली. वाघाच्या हल्ल्यात रेखाबाई मारोती येरमलवार (वय 55) यांचा मृत्यू झाला.

  • 30 Nov 2024 01:11 PM (IST)

    भाजपची ३ डिसेंबरला बैठक

    भाजपची गटनेता निवडणुसाठी ३ डिसेंबर रोजी विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

  • 30 Nov 2024 01:04 PM (IST)

    नवीन सरकार पाच तारखेपर्यंत- राहुल नार्वेकर

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शनिवारी साई दरबारी आले. यावेळी त्यांनी साई समाधीचे दर्शन घेतले. तसेच नवीन सरकार बाबत वक्तव्य केले. 5 तारखेच्या सुमारास शपथविधी होणार नवीन सरकार स्थापन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • 30 Nov 2024 11:50 AM (IST)

    5 तारखेपर्यंत आमचे काळजीवाहू मुख्यमंत्री काय करतील सांगू शकणार नाही- राऊत

    “पाच तारखेपर्यंतचा वायदा तुम्ही करत आहात तोपर्यंत आमचे काळजीवाहू मुख्यमंत्री काय करतील सांगू शकणार नाही. त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य खचलेलं आहे. त्यांचा चेहरा मावळलेला आहे, डोळ्यांत चमक दिसत नाही. तुम्ही मोदी शहा यांचे लाडके भाऊ राहिलेला नाहीत,” अशी टीका संजय राऊतांनी केली.

  • 30 Nov 2024 11:40 AM (IST)

    “मुख्यमंत्रिपद भाजपकडे गेलं तर गृहखातं आमच्याकडे असावं”; संजय शिरसाट यांची मागणी

    “मुख्यमंत्रिपद भाजपकडे गेलं तर गृहखातं आमच्याकडे असावं हीदेखील आमची मागणी राहणार आहे. गृहखातं आमच्याकडे असायला हवं, काहीच हरकत नाही,” अशी मागणी संजय शिरसाट यांनी केली.

  • 30 Nov 2024 11:30 AM (IST)

    शपथविधीसाठी आठ दिवस उशिराने काही आभाळ कोसळलं नाही- संजय शिरसाट

    “२०१९ मध्ये सरकार स्थापन करायला १ महिना लागला. याला जबाबदार कोण होतं? सकाळच्या शपथविधी विसरले का, ते पाप आठवा. आठ दिवस उशिराने काही आभाळ कोसळलं नाही. विरोधकांच्या टीकेला आम्ही किंमत देत नाही. विरोधी पक्ष देखील राहिला नाही,” असं संजय शिरसाट म्हणाले.

  • 30 Nov 2024 11:20 AM (IST)

    “जनमत नसताना लाख मतांनी निवडून येणं म्हणजे..”; अंबादास दानवेंची टीका

    “जय-पराजय हा निवडणूक प्रकियेचा भाग आहे. पण जनमत नसताना असे लोक लाख मतांनी निवडून येतात. असा निकाल लागणं म्हणजेच शेकडो उदाहरण आहे ज्यावरून ईव्हीएमवर प्रश्न निर्माण होत आहे. तुम्ही बॅलेटवर निवडणूक घ्या,” असं अंबादास दानवे म्हणाले.

  • 30 Nov 2024 11:10 AM (IST)

    बाबा आढाव यांच्या उपोषणावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया

    “बाबा आढाव उपोषणाला बसले आहेत, आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. बाबा आढाव यांच्यासारख्या माणसाने भूमिका मांडली असताना तरी सरकारने याची दखल घावी. अन्यथा याचं जनआंदोलन केवळ राज्यभरात नाही तर देशभरात उभं राहिल,” असं अंबादास दानवे  म्हणाले.

  • 30 Nov 2024 10:55 AM (IST)

    बाबा आढावा यांची उद्धव ठाकरे आज घेणार भेट

    बाबा आढावा यांची उद्धव ठाकरे आज भेट आहेत. बाबा आढव यांचे गेल्या तीन दिवसांपासून आत्मक्लेष उपोषण सुरू आहे. ईव्हीएममध्ये घोटोळा झाल्या आरोप बाबा आढाव यांनी केला आहे. काही वेळापूर्वी शरद पवार यांनीही बाबा आढाव यांची भेट घेतली होती.

  • 30 Nov 2024 10:43 AM (IST)

    मानसिक संतुलन कोणाचं बिघडलं ते निवडणूक निकालानंतर समजलं – राऊतांना शिरसाटांचं प्रत्युत्तर

    मुख्यमंत्री शिंदे यांचं मानसिक संतुलन बिघडलं अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली. मात्र त्या टीकेला शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. मानसिक संतुलन कोणाचं बिघडलंय हे निवडणुकीच्या निकालानंतरच समजलं, असा टोला शिरसाट यांनी लगावला.

  • 30 Nov 2024 10:42 AM (IST)

    मुख्यमंत्रीपदाबाबत मोदी, शाह निर्णय घेतील – संजय शिरसाट

    मुख्यमंत्रीपदाबाबत मोदी, शाह निर्णय घेतील.  वरिष्ठांचा निर्णय मान्य असेल हे शिंदेंनी आधीच स्पष्ट केलं आहे – संजय शिरसाट यांनी नमूद केलं.

  • 30 Nov 2024 10:37 AM (IST)

    भाजप अजून मुख्यमंत्री का ठरवत नाही हे माहीत नाही – संजय शिरसाट

    भाजप अजून मुख्यमंत्री का ठरवत नाही हे माहीत नाही. सरकार वाऱ्यावर सोडलेलं नाही, काम सुरू आहे. शिंदे अजून दोन दिवस गावी राहणार आहेत. त्यांना अजून काही वेगळा निर्णय घ्यायचा आहे असं समजू नका – संजय शिरसाट

  • 30 Nov 2024 10:27 AM (IST)

    भाजप नाग आहे, जे सोबत येतात त्यांना डंख मारतात – संजय राऊतांचे टीकास्त्र

    महायुतीचा विजय खरा नाही. भाजप नाग आहे, जे सोबत येतात त्यांना डंख मारतात असे टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडलं.

  • 30 Nov 2024 10:22 AM (IST)

    76 लाख मतं कशी वाढली ? संजय राऊतांचा सवाल

    76 लाख मतं कशी वाढली ? हरियाणाच्या निवडणुकीतही 14 लाख मतं वाढली होती. रांगा लावून रात्री 11.30 पर्यंत मतदान कुठे सुरू होतं ? असे अनेक सवाल विचारत संजय राऊत यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे.

  • 30 Nov 2024 10:19 AM (IST)

    बीड – परळीत डॉक्टरने तरूणीची छेड काढल्याचा आरोप.

    बीड – तपासणीसाठी डॉक्टरकडे गेलेल्या तरूणीची डॉक्टरने छेड काढल्याचा आरोप, परळीतील घटना.  विनयभंग करणाऱ्या डॉक्टरविरोधात परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्भूमीवर आज परळी बंदची हाक देण्यात आली असून आंदोलकांनी पोलिसांना निवेदनदेखील दिलं आहे.

  • 30 Nov 2024 10:07 AM (IST)

    निफाड तालुक्याचा तापमानाचा पारा घसरला…

    निफाड तालुक्याचा किमान तापमानाचा पारा घसरला.  राज्यात सर्वात नीचांकी किमान तापमानाची नोंद निफाड तालुक्यातील ओझर HAL येथे झाली असून तेथे 5.4 अंश सेल्सिअस किमान तापमान आहे.

    तर कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. थंडीत वाढ झाल्याने नागरिकांना हुडहुडी भरली.

  • 30 Nov 2024 09:56 AM (IST)

    Maharashtra News: देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी विठ्ठल-रुक्मिणीला साकडं

    दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे विठ्ठल मंदिरात भजन किर्तन करत विठ्ठलाला घातलं साकडं… विठ्ठल मंदिरात ग्रामस्थांकडून भजन करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत तर आमदार सुभाष देशमुख यांना मंत्रिपद मिळावे यासाठी घालण्यात आलं साकडं… दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार झालेले सुभाष देशमुख यांनाही मंत्रिपद देण्यासाठी घालण्यात आलं साकडं…

  • 30 Nov 2024 09:40 AM (IST)

    Maharashtra News: मतदानाच्या दिवशीची शेवटच्या 2 तासातली आकडेवारी धक्कादायक – शरद पवार

    मतदानाच्या दिवशीची शेवटच्या 2 तासातली आकडेवारी धक्कादायक… ईव्हीएम हॅक होऊ शकतं यांचं काहींनी प्रेझेंटेशन केलं… पण आम्ही निवडणूक आयोगावर विश्वास ठेवला… सत्ता, पैशांद्वारे निवडणूक यंत्रणाच हातात घेतली… असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.

  • 30 Nov 2024 09:35 AM (IST)

    Maharashtra News: नाशिक आणि निफाडकरांना भरली हुडहुडी, तापमानात मोठ्या प्रमाणात घट

    नाशिक आणि निफाडमध्ये यंदाच्या हंगामातील सर्वात नीच्चांकी तापमानाची नोंद… निफाडमध्ये किमान 7 अंश सेल्सिअस इतक्या नीच्चांकी तापमानाची नोंद तर नाशिकचा पारा 8.9 अंशावर… कडाक्याच्या थंडीने निफाड, नाशिककर गारठले… उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्र गारठला… पुढचे काही दिवस थंडीचा कडाका कायम राहणार, हवामान विभागाचा अंदाज

  • 30 Nov 2024 08:57 AM (IST)

    दहा लाखांची खंडणी मागितली, दोन जणांवर गुन्हा दाखल

    खेड तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे दहा लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल झालेत. खेड तहसील कार्यालयातून बोगस रेशनिंग कार्ड दिले जात असून याप्रकरणी केलेल्या अर्ज मागे घेण्यासाठी दहा लाखांची मागणी करण्यात आली आहे. महेश नेहरे आणि सुनील नंदकर यांच्या विरोधात खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. खेड तहसीलदार यांच्या व्हाट्सअप वर मेसेज करून दहा लाखाची मागणी केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

  • 30 Nov 2024 08:45 AM (IST)

    नाशिकमध्ये पाणीपुरवठा बंद

    आज दिवसभर नाशिक शहरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर उद्या रविवारी कमी दाबाने शहरात पाणीपुरवठा होणार आहे. नाशिक मनपा व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याच्या ठिकाणी कामे होणार आहे. जलशुद्धीकरण पंपिंग स्टेशन येथे फ्लोमीटर , वॉलव्ह बसवण्याचे काम घेण्यात हाती येणार आहे. संपूर्ण दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार असून महापालिकेने सहकार्य आव्हान करण्याचे केले आहे.

  • 30 Nov 2024 08:30 AM (IST)

    शरद पवार पुण्यात, बाबा आढाव यांची भेट घेणार

    शरद पवार आज पुण्यातील निवासस्थानी मुक्कामी आहेत. थोड्याच वेळात शरद पवार निवासस्थानातून बाहेर पडतील. त्यानंतर भारतीय जैन संघटनेचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन पुण्यातील बिबेवाडी येथे पार पडतेय. त्या त्या ठिकाणी शरद पवार जातील. त्यानंतर पुण्यातील महात्मा फुले वाड्यात बाबा आढाव यांचं आत्मक्लेष आंदोलन सुरू आहे. त्या ठिकाणी शरद पवार भेट देणार आहेत.

  • 30 Nov 2024 08:15 AM (IST)

    मतमोजणीची पडताळणी करण्याची मागणी कुणी केली?

    ‘ईव्हीएम’ वर संशय व्यक्त करण्यात आला आहे. प्रशांत जगताप यांच्यासह 6 उमेदवारांनी शुल्क भरलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या जिल्ह्यातील 11 उमेदवारांनी ईव्हीएम बाबत संशय व्यक्त केला आहे. पुन्हा मतमोजणीची पडताळणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यामध्ये सहा उमेदवारांनी मतमोजणीसाठी आवश्यक असलेले शुल्क ही सरकारी तिजोरीत जमा केले आहे.

Published On - Nov 30,2024 8:06 AM

Follow us
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.