Maharashtra New CM Government Formation LIVE : दिल्लीत महाबैठक, अमित शाह यांच्यासोबत शिंदे-फडणवीस-अजित पवार यांची चर्चा, मुख्यमंत्री ठरणार

| Updated on: Nov 28, 2024 | 10:26 PM

Maharashtra New CM Government Formation LIVE : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण असणार? याबाबतची उत्सुकता लोकांच्या मनात आहे. अशातच महायुतीच्या नेत्यांची बैठक आज दिल्लीत होणार आहे. याबाबतचे ताजे अपडेट्स...

Maharashtra New CM Government Formation LIVE : दिल्लीत महाबैठक, अमित शाह यांच्यासोबत शिंदे-फडणवीस-अजित पवार यांची चर्चा, मुख्यमंत्री ठरणार
महत्वाची बातमीImage Credit source: tv9

महाराष्ट्रच्या सत्ता कारणाचे सर्व अपडेट्स… महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण असणार?, याबाबत राजकीय वर्तुळासह गावच्या पारांवर चर्चा होतेय. अशातच आज अमित शाह यांनी बोलावलेल्या बैठकीत मुख्यमंत्रिपदाबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे. तसंच महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार? हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर विनोद तावडे आणि अमित शाह यांच्यात चर्चा झाली आहे. या बैठकीत राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मराठा चेहरा नसल्यास, त्याचे काय परिणाम होतील? या मुद्द्यावरवर या दोघांमध्ये चर्चा झाली आहे. याबाबतचे सर्व अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा हा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 28 Nov 2024 10:26 PM (IST)

    दिल्लीतून मोठी बातमी, अमित शाह यांच्या निवासस्थानी खलबतं सुरु

    नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतून मोठी बातमी समोर येत आहे. दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे अमित शाह यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. या बैठकीत राज्याचा मुख्यमंत्री ठरणार आहे. तसेच खातेवाटपही ठरणार असल्याची माहिती आहे.

  • 28 Nov 2024 06:29 PM (IST)

    भाजपच्या तीनही नवनिर्वाचित आमदारांचा पक्षाच्या वतीने सत्कार

    नाशिक : नाशिक शहरातील भाजपच्या तीनही नवनिर्वाचित आमदारांचा पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात येतोय. देवयानी फरांदे, सीमा हिरे यांनी विजयाची हट्रिक केल्याने तर राहुल ढिकले दुसऱ्यांदा विजयी झाल्याने सत्कार करण्यात येत आहे. नाशिक शहरातील सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. नाशिक शहरातील भाजपच्या पक्ष कार्यालयात सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

  • 28 Nov 2024 05:55 PM (IST)

    महाराष्ट्र निवडणुकीसंदर्भात काँग्रेस नेते उद्या निवडणूक आयोगाला भेटू शकतात

    महाराष्ट्र निवडणुकीतील कथित गैरप्रकारांबाबत काँग्रेसचे शिष्टमंडळ उद्या सकाळी 11 वाजता निवडणूक आयोगाला भेटू शकते.

  • 28 Nov 2024 05:41 PM (IST)

    आज रात्री 8 नंतर दिल्लीत महायुतीची बैठक होणार

    महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार याबाबत महायुतीचे बडे नेते एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत अमित शहा यांची भेट घेणार आहेत. रात्री आठ वाजता तिन्ही नेत्यांची बैठक होणार आहे.

  • 28 Nov 2024 05:26 PM (IST)

    शेख हसीना यांनी बांगलादेशातील परिस्थितीवर प्रश्न उपस्थित केले

    बांगलादेश अवामी लीगच्या अध्यक्षा आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देशातील वाढत्या हिंसाचार आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनाबाबत गंभीर विधान केले आहे. चितगाव येथील वकिलाच्या हत्येचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आणि या घटनेत सहभागी असलेल्या गुन्हेगारांना तातडीने पकडून शिक्षा झाली पाहिजे, असे सांगितले.

  • 28 Nov 2024 05:14 PM (IST)

    जम्मू-काश्मीर भूकंपाने हादरले

    जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी संध्याकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.0 इतकी मोजली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमावर्ती भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि, त्याचे केंद्र जमिनीपासून 209 किमी अंतरावर असल्याने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.

  • 28 Nov 2024 04:06 PM (IST)

    दिल्लीत आपला नक्की विजय होईल : प्रफुल पटेल

    अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिल्ली विधानसभा निवडणुका लढवण्याचे संकेत मिळाले आहेत. राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी दिल्ली विधानसभा निवडणुका लढवायच्या आहेत. दिल्लीत आपला नक्की विजय होईल, असा विश्वास प्रफुल पटेल यांनी कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना व्यक्त केला. तसेच राष्ट्रीय पक्षाचा गेलेला दर्जा या निवडणुकीत आपण पुन्हा मिळवू, असंही पटेल यांनी स्पष्ट केलं.

  • 28 Nov 2024 03:50 PM (IST)

    अजित पवार राष्ट्रवादीच्या दिल्ली कार्यलायत दाखल, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

    मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार राष्ट्रवादीच्या दिल्ली कार्यलायत दाखल झाले आहेत. विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर दादांचं दिल्ली कार्यालयात वाजतगाजत स्वागत करण्यात आलं. दादांसोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित आहेत. तसेच दादांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे दादा या पत्रकार परिषदेत काय म्हणतात? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

  • 28 Nov 2024 03:12 PM (IST)

    आजही सत्यशोधक विचारांची आपल्याला गरज आहे : रुपाली चाकणकर

    16 सोमवार, 15 गुरुवार, 14 रविवार काय करायचे असतील ते करा पण संविधान वाचायला विसरू नका, असं आवाहान रुपाली चाकणकर यांनी महिलांना केलं आहे. त्यांनी पुण्यात महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त बोलत असताना हे आवाहन केलं. तसेच भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक व्हावं यासाठी भुजबळ साहेबांनी पाठपुरावा केला तर अजित पवारांनी 100 कोटी रुपयांचा निधी दिल्याचंही चाकणकर यांनी म्हटलं.

    रुपाली चाकणकर आणखी काय म्हणाल्या?

    • महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांनी राज्याचे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील
    • आजही सत्यशोधक विचारांची आपल्याला गरज आहे.
    • सत्यशोधक विचार आपण अंगिकारला पहिजे.
    • तुम्हाला पोथ्या,पुराण वाचायच असेल तर वाचा पण संविधान आणि घटना वाचलीच गेली पाहिजे.
    • 16 सोमवार, 15 गुरुवार, 14 रविवार काय करायचे असतील ते करा पण संविधान वाचायला विसरू नका, असं महिलांना माझं आवाहन आहे.
  • 28 Nov 2024 02:58 PM (IST)

    छगन भुजबळ यांनी घेतली बाबा आढाव यांची भेट

    छगन भुजबळ यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली. बाबा आढाव यांचा आजपासून आत्मक्लेश आंदोलन सुरू झाले आहे. ईव्हीएमच्या विरोधात पुण्यातील फुले वाड्यात बाबा आढाव यांचं आंदोलन सुरू आहे. आंदोलन स्थळी जात छगन भुजबळ यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली.

  • 28 Nov 2024 02:50 PM (IST)

    जितेंद्र आव्हाड यांचा सरकारवर गंभीर आरोप

    कळव्याचा विकास आराखडा निवडणुकीच्या धामधूमीत आखला गेला. त्यामुळे संपूर्ण कळवा उध्वस्त होणार आहे. हा प्लॅन मनात काही उद्दिष्ट ठेऊन केलेला आहे. कळवा, खारेगाव मधील सर्व सोसायट्या उध्वस्त होणार आहेत. खारेगाव मधील गावठाण मधील रस्ते, शंभर दीडशेहून जुनी घर आहेत, त्यांचं पुनर्वसन रोखण्याचं काम केल जातं आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

  • 28 Nov 2024 02:40 PM (IST)

    नाना पटोले यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

    नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. 76 लाख मतं वाढली, ती कशी वाढली याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यावीत असे ते म्हणाले. आयोगाने अद्याप याविषयी एक पत्रकार परिषद सुद्धा घेतले नसल्याचे ते म्हणाले.

  • 28 Nov 2024 02:30 PM (IST)

    विस्तार अधिकार्‍याला फासले काळे

    महिलेचा विनयभंग करत शरीर सुखाची मागणी विस्तार अधिकार्‍याला काळे फासण्यात आले. शिंदखेडा पंचायत समितीतील विस्तार अधिकारी एस के सावकारे यांनी ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी केली होती. ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी काळे फासले.

  • 28 Nov 2024 02:19 PM (IST)

    गुलाबराव पाटील भावी उपमुख्यमंत्री

    जळगावात शिवसेनेचे गुलाबराव पाटील भावी उपमुख्यमंत्री अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली.एकनाथ शिंदे यांचा उपमुख्यमंत्री पद घेण्यास नकार असून गुलाबराव पाटलांना उपमुख्यमंत्री पद दिलं जावू शकत अशा असल्याच्या एका वर्तमान प्रकाशित झालेल्या बातमीच्या आधारावर कार्यकर्त्यांकडून पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे.

  • 28 Nov 2024 02:10 PM (IST)

    बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसा शिंदे पुढे घेऊन जात आहे

    बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसा शिंदे पुढे घेऊन जात आहे, असे उदय सामंत म्हणाले. भाषणात जमलल्या हिंदु बांधवांनो भगिणींनो म्हणारे देशप्रेमी बोलावं लागत आहे. शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य आहे. महायुतीने ही निवडणूक लढवली होती. २० आमदार असलेल्या शिवसेनेची काँग्रेस झालेली आहे. काँग्रेसच्या आदेशावर चालणार्‍या पक्षाने आम्हाला शिकवू नये, असा टोला त्यांनी लगावला.

  • 28 Nov 2024 02:01 PM (IST)

    ओबीसी मुख्यमंत्र्यांपेक्षा नैसर्गिक हक्क देवेंद्र फडणवीस – छगन भुजबळ

    ओबीसी मुख्यमंत्री व्हावा यापेक्षा गोर गरिबांच संरक्षण करणारा मुख्यमंत्री राज्याला भेटावा ही अपेक्षा आहे. भाजपचाच मुख्यमंत्री होईल, देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या काही वर्षांमध्ये काम केलं. याआधी ते मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते. पण पक्षाने त्यावेळेस उपमुख्यमंत्री म्हणून काम दिलं त्यांनी काम केलं आणि झोपून काम केलं. मुख्यमंत्री होऊन देवेंद्र फडणवीस यांचा नैसर्गिक हक्क अमच्या त्यांना शुभेच्छा, असे मत छगन भुजबळ यांनी मांडले.

  • 28 Nov 2024 01:52 PM (IST)

    दिल्लीला जाण्याआधी एकनाथ शिंदे यांची ठाण्यात बैठक

    दिल्लीला जाण्याआधी काळजीवाहू एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी प्रमुख नेत्याची महत्त्वाची बैठक सुरु आहे. बैठकीसाठी संजय राठोड ,गुलाबराव पाटील ,शंभूराजे देसाई ,प्रकाश सुर्वे उपस्थित आहेत.

  • 28 Nov 2024 01:43 PM (IST)

    महाविकास आघाडीतून बाहेर पडले पाहीजे असे मी म्हणालो नाही – अंबादास दानवे

    मी काल शिवसैनिक ताकत निर्माण केली पाहिजे अशी भूमिका मांडली. स्वराज्य संस्था निवडणुकीत कामाला लागले पाहिजे, महाविकास आघाडीतून बाहेर पडले पाहिजे असे मी म्हणालो नाही असे शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी स्पष्टीकरण केले आहे.

  • 28 Nov 2024 01:35 PM (IST)

    कॉंग्रेसचे शिष्ठमंडळ उद्या निवडणूक आयोगाची भेट घेण्याची शक्यता

    महाराष्ट्र निवडणुकीतील कथित गैरप्रकारांबाबत काँग्रेसचे शिष्टमंडळ उद्या सकाळी 11 वाजता निवडणूक आयोगाला भेटण्याची शक्यता

  • 28 Nov 2024 01:24 PM (IST)

    जळगावात गुलाबराव पाटील यांचे अनोखे बॅनर चर्चेत

    जळगावच्या आकाशवाणी चौकात शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिनंदनासाठी कार्यकर्त्यांनी बॅनर लावले आहेत,त्यावर ‘नाद करा, पण आमचा कुठ ..दमदार आमदार गुलाब भाऊ असे बॅनरवर लिहीले आहे.

  • 28 Nov 2024 12:58 PM (IST)

    रूपाली चाकणकर यांची नाव न घेता मनोज जरांगे यांच्यावर टीका

    छगन भुजबळ यांच्यावर टीका, टिप्पणी झाली. अनेक आरोप झाले पण ते लढत राहिले, आधी घरामध्ये घुसून वार करायचे आता अवतीभवती राहून वार करत आहेत. रूपाली चाकणकर यांची नाव न घेता मनोज जरांगे यांच्यावर टीका. महात्मा फुलेंचे विचार भुजबळ साहेबांनी जोपासले आहेत असं रूपाली चाकणकर म्हणाल्या.

  • 28 Nov 2024 12:49 PM (IST)

    एकनाथ शिंदे यांच्या आमदाराच्या विजयी मिरवणुकीत तरुणांचा राडा

    एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या विजयी मिरवणुकीत तरुणांचा राडा. आमदार आमश्या पाडवी यांच्या भव्य विजय रॅलीला गालबोट. सिने स्टाईलने हाणामारी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. तरुणांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी. बँडच्या तालावर नाचणारे तरुणांचे दोन गट आपसात भिडले.

  • 28 Nov 2024 12:20 PM (IST)

    अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून बारामती ते शिर्डी पायीवरी

    अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून साईचा सेवा ट्रस्टच्या वतीने हजारो भाविकांची बारामती ते शिर्डी पायीवरी. माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांच्या वतीने पायी वारीचे आयोजन. एकंदरीत 10 दिवस पायी वारी असणार असून आम्हाला लवकरच अजित पवार मुख्यमंत्री झाल्याची गोड बातमी मिळेल असा विश्वास बिरजू मांढरे यांनी व्यक्त केलाय

  • 28 Nov 2024 12:18 PM (IST)

    ठाकरेंच्या शिवसेनेचा स्वबळाचा नारा

    ठाकरेंच्या शिवसेनेचा स्वबळाचा नारा. येणाऱ्या काळात निवडणुका स्वबळावर लढणार. विधानसभा निवडणुकीनंतर नाशिकमध्ये महाविकास आघाडीत धुसफूस. ठाकरे गटाची महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादीवर नाराजी. आघाडीतील घटक पक्षांनी ज्या पद्धतीने काम करणं अपेक्षित तसं सहकार्य झालं नाही ठाकरे गटाचा आरोप. शिवसेना ठाकरे गट महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी या भावना व्यक्त केल्या.

  • 28 Nov 2024 11:50 AM (IST)

    धुळे – वाहतूक शाखेत मार्फत लावण्यात आलेले शहरातील सर्व सिग्नल बंद

    धुळे ब्रेक –  आज पासून राज्यात हेल्मेट सक्ती.. धुळे शहरात हेल्मेट सक्ती करण्यात आली असून शहर वाहतूक पोलिसांकडून वाहनधारकांना दंड..

    हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनधारकांना दंड लावल्याने वाहनचालक नाराज.

    एकीकडे धुळे शहरातील पाच मुख्य चौकातले सिग्नल यंत्रणा बंद आहेत. सिग्नल यंत्रणा बंद असताना वाहतूक शाखेच्या वतीने मात्र नियम तोडणे म्हणून वाहनधारकांना दंड आकारण्यात येतो.  अगोदर वाहतूक शाखेने आपले सिग्नल सुरू करावेत जनजागृती करावी मग दंड आकाराव अशी नागरिकांची मागणी आहे.

  • 28 Nov 2024 11:39 AM (IST)

    मुख्यमंत्री होणं नशिबात हवं – विजय बापू शिवतारेंनी अजित पवारांना डिवचलं

    एकनाथ शिंदे यांच्या मनाचा मोठेपणा आहे. ते बाजूला झाले आहेत. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे. तो मोदी आणि अमित शहा यांनी घ्यावा. तो मान्य असेल हा त्यांचा मनाच्या मोठेपणा आहे.

    प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्या, नेत्याला वाटत असत आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. मुख्यमंत्री व्हायला नशिबात हवं. विजय बापू शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना ‘मुख्यमंत्री’ पदावरून पुन्हा डिवचले.

  • 28 Nov 2024 11:24 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याची धमकी, पोलीस नियंत्रण कक्षाला धमकी वजा फोन

    पंतप्रधान नरेंद्र मोदीना मारण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बुधवारी रात्री ९ च्या सुमारास धमकीचा हा फोन आला.

    मोदींना मारण्याचा कट सुरू असून वेपनची तयारी झाल्याची माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीने दिली. या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी कसून तपास करत एका महिलेला ताब्यात घेतलं आहे.

  • 28 Nov 2024 11:03 AM (IST)

    प्रियंका गांधींनी घेतली खासदारकीची शपथ

    प्रियंका गांधी संसदेत दाखल झाल्या असून त्यांनी खासदारकीची शपथ घेतली. हातात संविधान घेत त्यांनी घेतली शपथ.

    राहुल गांधी, सोनिया गांधीही संसदेत दाखल. वायनाडमधून लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्यांदाच प्रियंका गांधी संसदेत.

  • 28 Nov 2024 10:52 AM (IST)

    Maharashtra News: काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाणार

    महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय आज दिल्लीत होणार… त्यासाठी एकनाथ शिंदे चार वाजता दिल्लीला रवाना होणार… कालच पत्रकार परिषद घेऊन अमित शहा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असल्याचं एकनाथ शिंदे यांनी केले होते जाहीर… त्यानुसार आज महायुतीच्या तिन्ही नेत्यांची अमित शहा यांच्याबरोबर संध्याकाळी दिल्लीत होणार बैठक… महायुतीच्या सत्ता स्थापने संदर्भात अतिशय महत्त्वाचे निर्णय आज घेतले जाणार

  • 28 Nov 2024 10:42 AM (IST)

    Maharashtra News: प्रियंका गांधी संसदेत दाखल

    थोड्याच वेळात खासदारकीची घेणार शपथ… राहुल गांधी सोनिया गांधीही संसदेत दाखल… वायनाडमधून लोकसभा निवडणूक निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच प्रियंका गांधी संसदेत

  • 28 Nov 2024 10:15 AM (IST)

    Maharashtra News: कृष्णा नदी पुलावरून भरधाव गाडी कोसळून तीन जण ठार,तर 2 जण गंभीर जखमी

    सांगलीच्या अंकली येथील कृष्णा नदी पुलावरून भरधाव गाडी कोसळून तीन जण ठार,तर 2 जण गंभीर जखमी… रात्री एकच्या सुमारास कोल्हापूरहून सांगलीकडे येताना अपघात… लग्न सोहळा आटपून सांगलीकडे येताना गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट नदीपात्रात कोसळली… मृतांमध्ये दोन महिला आणि पुरुषाचा समावेश….

  • 28 Nov 2024 10:07 AM (IST)

    Maharashtra News: दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी अजित गटाचा झेंडा

    दक्षिण सोलापूरच्या राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या तालुकाध्यक्ष अरुणा राज साळुंखे यांची सरपंचपदी निवड झालीय… एकीकडे राज्यात महायुतीने जोरदार विजय प्राप्त केल्यानंतर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बोरामणी ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवलाय… या निवडीनंतर बोरामणी ग्रामस्थांनी गुलाल उधळत जल्लोष केलाय… बोरामणी ग्रामपंचायत ही दक्षिण सोलापूर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत मानली जाते…. आगामी काळात महिला सक्षमीकरणासोबत गावातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावणार असल्याचे नूतन सरपंच अरुणा साळुंखे यांनी सांगितले…

  • 28 Nov 2024 09:57 AM (IST)

    आळंदीत राज्यभरातून दिंड्या दाखल

    संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी सोहळ्याला काही अवधी उरलेला आहे. त्याआधी आळंदी नगरीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक दिंड्या दाखल झालेले आहे याच दिंड्या आता इंद्रायणी नदी घाटावरून मंदिर प्रदक्षिणा घालताना पाहायला मिळत आहे.

  • 28 Nov 2024 09:47 AM (IST)

    देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर त्यांचे स्वागत- संजय राऊत

    देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर त्यांचे स्वागत आहे. कारण मुख्यमंत्री हे राज्याचे असतात, एखाद्या पक्षाचे मुख्यमंत्री नसतात.

  • 28 Nov 2024 09:40 AM (IST)

    संजय राऊत यांची भाजप, एकनाथ शिंदेवर टीका

    एकनाथ शिंदे यांनी यापुढे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊ नये, अशी टीका संजय राऊत यांनी केला. भाजपला बहुमत मिळूनही मुख्यमंत्री होत नाही, याबद्दल त्यांनी टीका केली.

  • 28 Nov 2024 09:38 AM (IST)

    अभिनेत्री आर्या घारेकडून संजीवनी सोहळ्याचे फोटो शेअर

    संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 728 वा संजीवन सोहळा पार पडत आहे. हा संजीवन समाधी सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आळंदीत दाखल झाले. या वारकऱ्यांची विविध पैलू सोशल मीडियावर आघाडीची अभिनेत्री आर्या घारे शेअर करत आहेत.

  • 28 Nov 2024 09:24 AM (IST)

    मुंबईतील हवेची गुणवत्ता खराब

    मुंबईत हवेची गुणवत्ता पुन्हा खराब झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मुंबईत एक्यूआय हा ११८ वर पोहोचला आहे. मुंबईची हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रादेशिक एअरशेड धोरणाची गरज आहे असे अभ्यासकांकडून सांगण्यात येत आहे.

  • 28 Nov 2024 09:09 AM (IST)

    दत्तात्रय भरणे यांच्यासाठी अजित पवारांना साकडे

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इंदापूर विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार दत्तात्रय मामा भरणे यांना मंत्रिमंडळातमध्ये स्थान मिळावे यासाठी आज सोलापुरातील तीन ते चार नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याकडे पत्र देत प्रमुख मागणी केली.

  • 28 Nov 2024 08:57 AM (IST)

    बच्चू कडू राजकीय भूमिका ठरवणार

    विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर बच्चू कडू राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत.  बुलढाण्याच्या शेगाव येथे दोन डिसेंबरला राज्यभरातील प्रहारच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. सत्ता की सत्तेच्या बाहेर, झेंडा की सेवा याचा निर्णय बच्चू कडू घेणार आहेत. मेळाव्या माध्यमातून बच्चू कडू आपली भूमिका मांडणार यावेळी पदाधिकाऱ्यांचेही म्हणणं बच्चू कडू एकूण घेणार आहेत. बच्चू कडू यांच्या दोन तारखेच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष आहे.

  • 28 Nov 2024 08:45 AM (IST)

    निफाडमध्ये पारा 6 अंशावर

    निफाड तालुक्याचा किमान तापमानाचा पारा घसरला आहे. ओझर एचएएल इथं 6.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.  तर कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात 8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. या थंडीपासून उब मिळवण्यासाठी ठीक-ठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. थंडीत दररोज अशीच वाढ होत राहिल्यास द्राक्ष पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

  • 28 Nov 2024 08:30 AM (IST)

    भाजपमधील बंडखोरांच्या घरवापसीला विरोध

    भाजपमधील बंडखोरांच्या घरवापसीला विरोध आहे. पक्षश्रेष्ठी वरिष्ठांना अहवाल देणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देखील बंडखोरंबाबतचा अहवाल दिला जाणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरी करणाऱ्यांना धडा शिकवण्याची तयारी आहे. निवडणुकीसाठी अनेकांनी पक्षाशी बंडखोरी केली होती.

  • 28 Nov 2024 08:15 AM (IST)

    22 जानेवारीला स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत सुनावणी

    स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्णय पुढच्या वर्षी होणार आहे. 22 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. प्रलंबित याचिकांवर सुनावणी घ्यावी या याचिकाकर्त्यांच्या मागणीनंतर अखेर सुप्रीम कोर्टाकडून तारीख देण्यात आली आहे.

Published On - Nov 28,2024 8:03 AM

Follow us
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.