मुंबई : राज्यासाठी एक चिंताजनक बातमी आहे. राज्यात आज ओमिक्रॉन (Omicron) रुग्णांची उच्चांकी नोंद झाली आहे. आज दिवसभरात ओमिक्रॉनची लागण झालेले 23 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तशी माहिती आरोग्य विभागानं (Health Department) दिली आहे. या 23 रुग्णांपैकी 13 रुग्ण एकट्या पुण्यातील आहेत. मुंबईत 5, उस्मानाबादेत 2 आणि ठाणे, मीरा-भाईंदर आणि नागपुरात प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे राज्यात ओमिक्रॉनचा फैलाव आता वेगानं होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
#Maharashtra #COVID19 Updates for today
▶️No. of new cases of #OmicronVariant reported in the state, today – 23
(#Pune-13, #Mumbai – 5, Osmanabad- 2, Thane-1 Nagpur-1, Mira-Bhayandar – 1)
▶️Total #Omicron cases reported in state till date – 88
District-wise breakup?
(1/6) pic.twitter.com/GIXJM4Hrjd
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) December 23, 2021
महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या कोरोना विषाणूचा समूह संसर्ग अजून तरी झालेला नसल्याचे उघड झाले आहे. जिनोमिक सिक्वेंसिंगच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. राज्यातील सर्व वयोगटातील करोना बाधितांचे घेतलेले नमुने दिल्लीला पाठवण्यात आले होते. आता त्याचा अहवाल समोर आला आहे.
जिनोमिक सिक्वेंसिंगच्या अहवालात म्हटले आहे की, राज्यात अजून तरी ओमिक्रॉनचा समूह संसर्ग झालेला नाही. आजपर्यंत केलेल्या सर्वेक्षणावरून राज्यात डेल्टाचाच समूह संसर्ग असल्याचे पुढे आले आहे. पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजकडे देण्यात राज्य समन्वयाची जबाबदारी आहे. त्यानुसार राज्यातील सर्व वयोगटातील कोरोनाबाधितांच्या घेतलेले नमुने दिल्लीला पाठवण्यात आले होते. त्यातूनच ही माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक अँण्ड इंटीग्रेटीव्ह बायोलॉजी या संस्थेसोबत जीनोम सिक्वेंसिगंच्या अहवाल देण्याबाबत करार केला आहे. आता या इन्स्टिट्यूटने दिलेल्या अहवालात राज्यात ओमिक्रॉनचा समूह संसर्ग सुरू झाला नसल्याचे स्पष्टीकरण दिल्यामुळे महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे.
देशात ओमिक्रॉन धोका वाढत असतानाच बूस्टर डोसबाबत पुढच्या आठवड्यात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सध्या पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत कोविशील्ड आणि कोवॅक्सिन या लसींचा ओमिक्रॉनवर कितपत परिणाम होतोय, याबाबतचा अभ्यास सुरू असून भारतीयांना बुस्टर डोस द्यायचा की नाही याचा निर्णय पुढच्या आठवड्यात घेतला जाणार आहे.
आतापर्यंत 16 राज्यांमध्ये ओमिक्रॉनचे 269 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने या नव्या विषाणूची गंभीर दखल घेतली आहे. ओमिक्रॉन रोखण्यासाठी राज्यांनी काय तयारी केली त्याचा आढावा आज केंद्र सरकारने घेतला. तसेच ओमिक्रॉनला रोखण्यासाठी नाईट कर्फ्यूपासून ते सणांवर बंदी घालण्यापर्यंतच्या सूचनाही दिल्या आहेत.
राज्यांमधील जिल्ह्यांतील पॉझिटिव्ह केसेस, डबल रेटिंग आणि क्लस्टरवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही केंद्र सरकारने यावेळी दिल्या. त्याशिवाय राज्यांना सण आणि स्थानिक स्तरावर प्रतिबंध घालण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. दोन डोसमुळे कोरोनापासून बचाव होतो. तसेच ओमिक्रॉनची लागण आणि रुग्णालयात भरती होण्यापासून दोन डोसच बचाव करू शकतात. त्यामुळे घरोघरी जाऊन लसीकरण करा, असा सल्लाही केंद्राने राज्यांना दिला आहे.
इतर बातम्या :