Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Wadettiwar | चंद्रपूर, पुण्याच्या पोटनिवडणुका होणार नाहीत, त्यावर राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांच म्हणणं काय?

Vijay Wadettiwar | "लालकृष्ण आडवणी कोणाच्या अंहकारामुळे राष्ट्रपती होऊ शकले नाहीत? कोणाच्या अधोगतीमुळे देश अधोगतीकडे चाललाय? हे देशातील सव्वाशेकोटी लोकांना ठाऊक आहे"

Vijay Wadettiwar | चंद्रपूर, पुण्याच्या पोटनिवडणुका होणार नाहीत, त्यावर राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांच म्हणणं काय?
vijay wadettiwar Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 09, 2023 | 12:38 PM

नागपूर : राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज नागपूर दौऱ्यावर आहेत. विरोधी पक्षनेते म्हणून आपला उद्देश, लक्ष्य काय आहे? आपल्यालाय काय करायचं आहे? राज्यातील पोटनिवडणुका यावर त्यांनी भाष्य केलं. “महाराष्ट्रातील अनेक आव्हानं पेलायची आहेत. ओबीसींना त्यांचे हक्क मिळवून देण्याची जिद्द आहे. 14 कोटी लोकांच हित जपण्याची, परिवर्तनाची आगामी 2024 ची निवडणूक जिंकण्याची जिद्द आहे” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

“सरकारची चुकीची धोरणं, सरकारची चुकीच पावलं, या सरकारने चालवलेला भ्रष्टाचार, महिलांवर अत्याचार होतायत, महागाईने जनता होरपळतेय, यामुळे महाराष्ट्राची अधोगती झाली आहे. या विषयांवर जनतेला न्याय हवा आहे, विरोधी पक्षनेता म्हणून तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

आडवाणी कोणामुळे राष्ट्रपती होऊ शकले नाहीत?

शरद पवार यांना काँग्रेसने पंतप्रधान बनू दिलं नाही. असं पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी “लालकृष्ण आडवणी कोणाच्या अंहकारामुळे राष्ट्रपती होऊ शकले नाहीत? कोणाच्या अधोगतीमुळे देश अधोगतीकडे चाललाय? हे देशातील सव्वाशेकोटी लोकांना ठाऊक आहे” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

अजून दुसऱ्याच्या जीवावर किती सत्ता टिकवणार?

“फार मोठ्या विकासाच्या कल्पना करणाऱ्या मोदी सरकारला 10 वर्ष झाली. अजून किती वर्ष आरोप करणार? अजून दुसऱ्याच्या जीवावर किती सत्ता टिकवणार? 10 वर्ष सत्तेत असूनही 26 पक्षांचा टेकू घ्यावा लागतो, हाच तुमचा पराभव आहे. आरोप करण्यापेक्षा उपलब्धी काय ते सांगा?” अशा शब्दात वडेट्टीवार यांनी मोदी सरकारचा समाचार घेतला.

पोटनिवडणुकाबद्दल राज्याचे विरोधी पक्षनेते काय म्हणतात?

चंद्रपूर आणि पुण्याच्या पोटनिवडणुका होणार नाहीत, याबद्दल वडेट्टीवार यांना विचारण्यात आलं. त्यावेळी ते म्हणाले की. “चंद्रपूर, पुण्याच्या पोटनिवडणुका घेणं उचित नाही. कमी कालावधी उरला आहे. 60 दिवसांचा कार्यक्रम आणि 9 महिने उरलेत, त्यामुळे पोटनिवडणुका न घेण्याच मी समर्थन करतो” सत्तेत असूनही बच्चू कडू यांना शेतकऱ्यांसाठी आंदोलन कराव लागतय, त्यावर वडेट्टीवार म्हणाले की, “बच्चकडूंना आता कोण ऐकतय, हे कळून चुकलय. बच्चू कडू योग्य निर्णय घेतील ही अपेक्षा आहे”

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.