मुंबई : बुली बाई या प्लॅटफॉर्मवर महिलांचे फोटो टाकून त्यांची बोली लावणे तसेच आक्षेपार्ह वक्तव्य केले जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकारणातंतर एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून तपास सुरु आहे. याबाबत अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी पोलिसांचा तपास योग्य दिशेनं सुरू आहे, शेवटपर्यंत याचा छडा लावलेयाशिवाय पोलीस थांबणार नाहीत. मागील सहा महिन्यांपासून हे सुरु असून राज्य सरकार तसेच पोलीस याचा छडा लावणार आहेत, अशी माहिती दिली आहे. याआधी त्यांनी बुली बाई आणि सुली डील अशा प्लॅटफॉर्मवर अल्पसंख्यांक समाजाच्या महिलांची बोली लावली जात असल्याचा आरोप केला होता.
“बुली बाई प्रकरणात तपास सुरू होता. हा तपास योग्य दिशेनं सुरू आहे. या प्रकरणाचा शेवटपर्यंत याचा छडा लावल्याशिवाय पोलीस थांबणार नाहीत. अल्पसंख्यांक समाजाच्या महिलांची बोली लावली जातेय. 6 महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. दिल्ली पोलिसांनी याची दखल घेतली नाही. मात्र राज्य सरकार आणि पोलीस याचा छडा लावणार आहेत,” असे नवाब मलिक यांनी सांगितले.
तसेच पुढे बोलताना त्यांनी कोरोनाचा वाढता प्रसार आणि भाजपकडून घेतल्या जाणाऱ्या सभा यावर प्रश्न उपस्थित केला. “कोविड भाजपला घाबरते का असा प्रश्न उपस्थित होतोय. कोरोना त्यांना घाबरतो का हे भाजपने सांगितले पाहिजे. मोदींच्या सभेत गर्दी होते. अमित शहांच्या सभेत गर्दी होते. मग तिथे कोरोना भाजपला घाबरतो का ? हे त्यांनी स्पष्ट करावं,” असा टोला मलिक यांनी भाजपला लगावला.
दरम्यान, मलिक यांनी सुल्ली डील या अॅपवर मुस्लीम महिलांचे फोटो टाकून त्यांची बोली लावली जात असल्याचा आरोप केला होता. तसेच ज्या महिला समाजातील वेगवेगळ्या प्रश्नांवर मत प्रदर्शित करतात त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये या अॅपवर केले जात आहेत, असंदेखील सांगितलं होतं. त्यानंतर आता महाराष्ट्र पोलिसांनी बंगळुरु येथून एकास अटक केलं आहे. पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.
इतर बातम्या :
Nashik Corona|नाशिकमध्ये कोरोना निर्बंध वाढले; लग्नासाठी आता 50 वऱ्हाडी, जाणून घ्या नवे नियम…