मावळ खोऱ्यातून महायुतीत वादळ? तिन्ही विधानसभेत महायुतीत ठिणगी

मावळ पट्ट्यात सध्या महायुतीत ठिणगी पडली आहे. एक-दोन नव्हे तर तीन विधानसभा जागांवर दावेदारी सुरु झाली आहे. त्यावरुन एकमेकांच्या विरोधात काम करण्याचे इशारेही दिले जात आहेत. 

मावळ खोऱ्यातून महायुतीत वादळ? तिन्ही विधानसभेत महायुतीत ठिणगी
Follow us
| Updated on: Sep 21, 2024 | 10:14 PM

जस-जश्या निवडणुका जवळ येतायत., तसं-तसं अजित पवारांचा गट महायुतीत राहणार की नाही, हा प्रश्न अजून गडद होतो आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ, पिंपरी आणि चिंचवड या तिन्ही विधानसभेत महायुतीत ठिणगी पडली आहे. बावनकुळे-अजित पवारांच्या दाव्यानुसार जी जागा ज्याच्याकडे त्याला ती मिळणार आहे. त्यानुसार या घडीला मावळ, पिंपरीचे आमदार अजित पवार गटाचे तर चिंचवडचे आमदार भाजपचे आहेत. मावळातून दादा गटाचे सुनिल शेळके आमदार आहेत. या जागेवर भाजपच्या बाळा बेगडेंनी दावा सांगितला आहे. पिंपरीत अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे आमदार आहेत. तिथं आपण अजित पवार गटाचा प्रचार करणार नसल्याचा ठराव स्थानिक भाजपनं मांडला आहे.

चिंचवडमध्ये अश्विनी जगताप भाजपच्या आमदार आहेत. तिथं अजित पवार गटाच्या नाना काटेंनी काम सुरु केलंय. पण मावळातून यंदा स्थानिक भाजप शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काम करणार असल्याचा दावा अजित पवार गटाच्या सुनिल शेळके यांनी केला आहे. तर पिंपरीत अजित पवारांचा प्रचार न करण्याचा ठरावच स्थानिक भाजपनं पुढे केला आहे.

जर महायुतीत पिंपरीची जागा अजित पवार गटाला गेली तर प्रचार न करण्याचा निर्णय स्थानिक भाजपनं घेतला आहे. जर चिंचवडची जागा भाजपनं अश्विनी जगतापांना दिली नाही तर त्या दुसरा विचार करु शकतात, अशी चर्चा सुरु आहे. चिंचवडमध्ये अजित पवार गटानं संधी न दिल्यास मविआचा पर्याय उपलब्ध असल्याचा दावा नाना काटे करत आहेत. आणि मावळात तर स्थानिक भाजपचेच लोक शरद पवार गटाचा प्रचार करणार असल्याचा आरोप अजित पवार गटाच्या सुनिल शेळकेंनी केला आहे.

पुणे जिल्हा अजित पवारांसह भाजपसाठी सुद्दा महत्वाचा आहे. कारण, एकट्या पुणे जिल्ह्यात 21 आमदार निवडून येतात. त्यापैकी 2019 ला राष्ट्रवादीनं 10 तर भाजपनं 9 आमदार जिंकले होते. फुटीनंतर अजितदादांकडे 9 तर शरद पवारांकडे एक आमदार आहेत. मात्र महायुतीचे प्रमुख नेते एकजुटीची वज्रमूठ आवळत असले तरी पुणे जिल्ह्यातल्या काही मतदारसंघात स्थानिकांच्या मुठी मात्र एकमेकांच्या विरोधात आवळल्या जात आहेत.

राज ठाकरे यांनी केले अत्यंत मोठे विधान, शिवरायांच्या पुतळ्यावर..
राज ठाकरे यांनी केले अत्यंत मोठे विधान, शिवरायांच्या पुतळ्यावर...
नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?
नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?.
म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?
म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?.
भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू
भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू.
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी.
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस.
धारावी प्रकरणात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा मोठा दावा काय?
धारावी प्रकरणात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा मोठा दावा काय?.
धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात...
धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात....
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप.
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव.