अजित पवार गटातील 12 बडे नेते भाजपात जाणार? महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप?

महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात खूप मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळताना दिसत आहेत. कारण काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप घडणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी काळ खूप महत्त्वाचा असणार आहे.

अजित पवार गटातील 12 बडे नेते भाजपात जाणार? महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप?
Follow us
| Updated on: Mar 11, 2024 | 4:40 PM

मुंबई | 11 मार्च 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक मोठा भूकंप येणार असल्याचा मोठा दावा काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस गटात फूट पडलेली आहे. या गटात अजून एक फूट पडणार असल्याचा मोठा दावा अतुल लोंढे यांनी केला आहे. अजित पवार गटातील धनंजय मुंडे, सुनील तटकरे, सुनील शेळके यांच्यासह अनेक बडे नेते भाजपात प्रवेश करु शकतात आणि उरलेले नेते शरद पवार यांच्याकडे परत येऊ शकतात, असा दावा अतुल लोंढे यांनी केला आहे. भाजप सर्वांना धोका देईल. त्यामुळे अजित पवार एकटे पडू शकतात, असं अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे. “फुटलेल्या गटात पुन्हा अजून एक फूट पडणार आणि काही लोक भाजपात जाणार, असा दावा अतुल लोंढे यांनी केला आहे. अजित पवार गटातील तब्बल 12 नेते हे भाजपात प्रवेश करतील”, असा धक्कादाक दावा अतुल लोंढे यांनी केला आहे.

अतुल लोंढे नेमकं काय म्हणाले?

“धोके पे धोका…. ऐसा कोई सगा नहीं जिसे भाजपने ठगा नहीं. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 12 बडे नेते, मंत्री आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीचा दुसरा गट शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत जाणार, सूत्रांची माहिती”, असा दावा अतुल लोंढे यांनी ट्विटरवर केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात आता विविध चर्चांना उधाण आलं आहे.

राजकारणात खरंच भूकंप घडणार?

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे सध्या प्रचंड घडामोडी घडत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत आहेत. महायुतीत तर जागावाटपावरुन मित्रपक्षांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरु असल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळातल्या घडामोडींना जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. लोकसभेच्या निवडणुकींनंतर महाराष्ट्रात विधानसभेचीदेखील निवडणूक असणार आहे. त्यामुळे सध्या घडणाऱ्या घडामोडी जास्त महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्राने दोन वर्षांपूर्वी राजकीय भूकंप पाहिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्षात मोठी फूट पडली. त्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही तशीच फूट पडली.

या दोन भूकंपाचे पडसाद आतापर्यंत उमटत असताना आता पुन्हा तिसऱ्या भूकंपाचे संकेत अतुल लोंढे यांच्याकडून देण्यात आले आहेत. अजित पवार गटातले 12 बडे नेते भाजपात जाणार असल्याचा त्यांचा दावा कितपत खरा आहे? हे आगामी काळात स्पष्ट होईलच. पण या नेत्यांची भाजपसोबत युती करण्याची इच्छा होती हे आधीच स्पष्ट झालं आहे. त्यांच्या या आग्रहाखातर त्यांनी खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल? हे सांगता येणं फार कठीण आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.