महाविकासआघाडीच्या पंचनाम्याला महायुतीचं रिपोर्टकार्डच्या माध्यमातून उत्तर

महायुतीनं आधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा, जाहीर करावा असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन एकनाथ शिंदे यांनी बोचरी टीका केली आहे. आमच्याकडे कोणालाही डोहाळे लागलेले नाहीत, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. पाहुयात

महाविकासआघाडीच्या पंचनाम्याला महायुतीचं रिपोर्टकार्डच्या माध्यमातून उत्तर
Follow us
| Updated on: Oct 16, 2024 | 10:13 PM

2 दिवसांआधी महाविकास आघाडीनं गद्दारांचा पंचनामा म्हणत पत्रकार परिषद घेतली आणि त्याच टीकेला महायुतीनं रिपोर्टकार्डनं प्रत्युत्तर दिलं आहे. सव्वा 2 वर्षातली कामं या रिपोर्टकार्डच्या माध्यमातून महायुतीनं मांडली, मात्र रिपोर्टकार्डनंतर, मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंकडे मोर्चा वळवला. आमच्याकडे मुख्यमंत्रिपदासाठी कोणाला डोहाळे लागलेले नाहीत, असा सणसणीत टोला शिंदेंनी लगावला.

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करुनच निवडणुकीला सामोरं जा, असं उद्धव ठाकरे वारंवार म्हणत आहेत. 2 महिन्यांआधी दिल्लीत त्यांनी सोनिया गांधींचीही भेट घेतली. मात्र, स्वत: उद्धव ठाकरेंना किंवा इतर कोणताही चेहरा निवडणुकीआधीच जाहीर करण्यास ना काँग्रेस तयार आहे ना शरद पवार. त्यामुळंच मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरुन शिंदे आणि फडणवीसांच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे आले आहेत. दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी घाई घाईच्या निर्णयावरुन जेलमध्ये टाकण्याचा इशारा दिला होता त्यावरही मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर दिलं आहे.

महायुतीच्या रिपोर्टकार्डमध्ये प्रकल्प, रस्ते, घरकुल योजना, लाडकी बहीणसह शेतकऱ्यांच्या योजनांसह मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा दाखला देण्यात आलाय. त्याचवेळी उद्धव ठाकरेंवर टीका करताना, शिंदेंनी शेजारीच बसलेल्या अजित दादांना साक्षीदार असल्याचा टोलाही लगावला. निवडणुका घोषित होण्याच्या एक दिवसाआधीच मुख्यमंत्र्यांनी मुंबईतल्या पाचही टोलनाक्यावर लहान वाहनांना टोलमाफी करत मास्टरस्ट्रोक लगावला. हा महाविकास आघाडीला अखेरचा झटका दिल्याचं शिंदे म्हणाले आहेत.

महाविकास आघाडीनं गद्दारांच्या पंचनाम्यातून शेतकऱ्यांना हमीभाव, जीएसटी, गुजरातला गेलेले रोजगार, महिला सुरक्षेवरुन निशाणा साधला. मात्र 3 दिवसांतच महायुतीनंही रिपोर्टकार्डच्या माध्यमातून विकास कामांचा लेखाजोखा सांगत पलटवार केला. सध्या पत्रकार परिषदेला, पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिलं असलं तरी, येत्या काही दिवसांत जाहीर सभांमधून आमना-सामना होईल हे स्पष्ट आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.