जयंत पाटलांना दे धक्का, भाऊच भाजपात; राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत मोठ्या नेत्यांचीही बीजेपीत एंट्री
रायगडमध्येही भाजपने मोठी खेळी केली असून शेतकरी कामगार पक्षाला सर्वात मोठा हादरा बसला आहे. माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे पुत्र आस्वाद पाटील आज भाजपात जाणार आहेत. तसेच शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचे बंधू आणि माजी आमदार पंडित पाटील यांचाही आज भाजपात प्रवेश होणार असल्याचे वृत्त आहे.

लोकसभा निवडणुकांपासूनच सुरू झालेलं राज्यातील मोठमोठ्या पक्षातील इनकमिंग-आऊटगोईंग अद्यापही कायम आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी आणि त्या निकालांनंतरही मविआतील अनेक नेत्यांनी आपापले पक्ष सोडत महायुतीमध्ये प्रवेश केलेला दिसून आला. तीच प्रोसेस अद्यापही सुरू असून महायुतीमध्ये विशेषत: भारतीय जनता पक्षामध्ये येणं-जाणं कायम आहे. यावेळी भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीतील काही मोठ्या नेत्यांना पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पांडूरंग बरोरा यांनी तिसऱ्यांदा पक्ष बदलला असून ते भाजपात दाखल झाले आहेत. कपिल पाटील यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश झाला असून बरोरा यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. तसेच रायगडमध्येही भाजपने मोठी खेळी केली असून शेतकरी कामगार पक्षाला सर्वात मोठा हादरा बसला आहे. माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे पुत्र आस्वाद पाटील आज भाजपात जाणार आहेत. तसेच शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचे बंधू आणि माजी आमदार पंडित पाटील यांचाही आज भाजपात प्रवेश होणार असल्याचे वृत्त असून हा जयंत पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
तिसऱ्यांदा पक्ष बदलून पांडुरंग बरोरा भाजपवासी
माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पांडूरंग बरोरा यांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केला. त्यांनी तिसऱ्यांदा पक्ष बदलला असून कपिल पाटील यांच्या पुढाकारानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला रामराम करत भाजपात एंट्री केली. मंगळवारी पार पडलेल्या या प्रवेशावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. बरोरा यांच्या पक्षप्रवेशानंतर भाजपाची शहापुरातील ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच स्थानिक राजकीय समीकरणेही बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राजकीय समीकरणे बदलणार ?
शहापूर मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेकडे होता. मात्र अजित पवारांच्या महायुतीतील समावेशाने हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला. मात्र यावरील शिवसेनेचा दावाही कमी झाल्याचे बोलले जाते. त्यात आता माजी आमदार आणि दावेदार असलेले पांडूरंग बरोरा भाजपात गेल्याने भविष्यात या मतदारसंघावरही भाजप दावा करणार असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघात भाजप राष्ट्रवादीला शह देणार की काय अशी चर्चा आत्ता रंगू लागली आहे.
जयंत पाटीलांनाही मोठा धक्का, बंधू भाजपावासी
भाजपमध्ये अनेकांची एंट्री होत असून नेते शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनाही मोठा धक्का बसला आहे. जयंत पाटलांचे बंधू व माजी आमदार पंडित पाटील यांचा आज भाजपात प्रवेश होणार आहे. तसेच रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाला सर्वात मोठा हादरा बसला आहे, कारण माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे पुत्र आस्वाद पाटील आज भाजपात जाणार आहेत. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाणांच्या नेतृत्वात आज दोन्ही पक्ष प्रवेश होणार आहेत. आज सकाळी 11 वाजता भाजप प्रदेश कार्यालयात हे पक्षप्रवेश पार पडतील अशी माहिती समोर आली आहे.