कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्र सज्ज, पहिल्या टप्प्यात 8 लाख आरोग्यसेवकांना लस
पहिल्या टप्प्यात 8 लाख आरोग्य सेवकांना लस दिली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. (Maharashtra Priority to 8 lakh Health worker For Corona Vaccination)
मुंबई : देशभरात येत्या 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राज्यात जय्यत तयारी केली जात आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 8 लाख आरोग्य सेवकांना लस दिली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. (Maharashtra Priority to 8 lakh Health worker For Corona Vaccination)
“राज्यात कोरोना लसीकरणाची संपूर्ण तयारी झाली आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात 8 लाख आरोग्य सेवकांना लस देऊ. ज्या क्षणाला केंद्र सरकार लसीची उपलब्धता करून देईल. त्यानंतर लगेचच आम्ही लसीकरण सुरु करु. यासाठी कोल्ड चेन ही तयार आहे. काही कमतरता असेल तर ती दूर करु,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण
कोरोनाच्या लसीकरणासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. येत्या 16 जानेवारीपासून देशभर कोरोना लसीकरण होणार आहे. केंद्र सरकारने यासंबंधी घोषणा केली आहे. यामध्ये सगळ्यात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि अग्रभागी काम करणाऱ्या कामगारांना लस दिली जाईल. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, अंदाज 3 कोटी कामगारांना आधी लस दिली जाणार आहे. त्यानंतर 50 वर्षांवरील आणि 50 वर्षांखालील लोकसंख्या असलेल्या सहकारी गटाला लस दिली जाईल. यामध्ये तब्बल 27 कोटी नागरिकांचा समावेश असणार आहे अशी माहिती केंद्राकडून देण्यात आली आहे. (Maharashtra Priority to 8 lakh Health worker For Corona Vaccination)
Vaccination drive to kick off on 16th Jan, 2021. Priority will be given to the healthcare workers and the frontline workers, estimated to be around 3 cr, followed by those above 50 years and the under-50 population groups with co-morbidities numbering around 27 cr: Govt of India pic.twitter.com/M4CzcBzMqf
— ANI (@ANI) January 9, 2021
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून कोरोना लसीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 16 जानेवारीपासून कोरोनाची ही लस सर्वसामान्यांना दिली जाईल. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्यानंतर वर्षभराच्या आतच भारताना कोरोना प्रतिबंधक लस विकसित केली आहे. कोरोनाची ही लस सर्वात आधी डॉक्टर, नर्स यासारखे आरोग्य कर्मचारी, सैनिक यासारख्या कोरोना योद्धांना दिली जाणार आहे.
On 16th January, India takes a landmark step forward in fighting COVID-19. Starting that day, India’s nation-wide vaccination drive begins. Priority will be given to our brave doctors, healthcare workers, frontline workers including Safai Karamcharis. https://t.co/P5Arw64wVt
— Narendra Modi (@narendramodi) January 9, 2021
लसीकरणासाठी तीन कोटी कोरोना योद्धांना प्राधान्य
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आरोग्य विभागातील कर्मचारी आणि फ्रंटलाईन कोरोना योद्ध्यांना लसीकरणासाठी नोंदणी करण्याची गरज नसल्याचं स्पष्ट केले. सैन्य दल आणि पोलीस आणि सफाई कर्मचाऱ्यांना कोवीन अॅपवर नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. सामान्य व्यक्तींना कोरोना लसीसाठी नोंदणी करावी लागेल.
लस प्रत्येक बूथवर पोहोचण्यासाठीची सिस्टम तयार
राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना लस ही प्रत्येक बूथवर पोहोचण्यासाठी पूर्ण सिस्टम तयार करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक राज्याने यासाठी युनिट तयार केले आहे. यासाठी डिजीटल प्लॅटफॉर्मचा वापर केला जाऊ शकतो. (Maharashtra Priority to 8 lakh Health worker For Corona Vaccination)
संबंधित बातम्या :
देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण, केंद्र सरकारची मोठी घोषणा