महापालिकांसाठी आता पुन्हा चारचा प्रभाग होणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज प्रस्ताव येणार, सूत्रांची माहिती
महापालिकांसाठी आता पुन्हा चारचा प्रभाग, सूत्रांची माहिती
पुणे : सध्या राज्यात महापालिका निवडणुकांची (Municipal Corporation Election) जोरदार तयारी सुरू आहे. अश्यात आता महापालिका निवडणुकीसाठी पुन्हा चार सदस्यीय प्रभाग करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) मंजुरीसाठी आणला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र, हा निर्णय झाला तरी त्याच्या अंमलबजावणीबाबत शंका व्यक्त केली जात आहे. पुणे, पिंपरी चिंचवडसह राज्यातील तब्बल 18 महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या महापालिकांमध्ये त्रिसदस्यीय अंतिम प्रभागरचना निश्चित झाली असून, न्यायालयाच्या आदेशानुसार कधीही निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर पुन्हा चार सदस्यीय प्रभागाच्या मागणीने जोर धरला आहे. भाजपने आग्रही भूमिका घेतली. त्यामुळे आता या प्रस्तावाबाबत काय निर्णय होणार, याकडे राजकारण्यांसह राजकीय जाणकारांचं लक्ष लागलंतय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा चारचा प्रभागाचा निर्णय घेतला जाणार का, याबाबत विचारणा केली असता त्यांनी याबाबत जेव्हा निर्णय होईल, तेव्हा तुम्हाला कळेलच की, असं म्हणत त्यांनी यावर स्पष्टपणे बोलणं टाळलंय. बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार सदस्यीय प्रभागरचनेचा प्रस्ताव मंजुरीसाठी आणला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
मंत्रिमंडळात हा प्रस्ताव मंजूर झाला तरी त्याची प्रत्यक्ष महापालिका निवडणुकीत अंमलबजावणी होण्याबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील सर्व महापालिकांची अंतिम प्रभागरचना आणि मतदार यादी जाहीर झाली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही 15 दिवसांत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुन्हा चारच्या प्रभागासाठी नव्याने प्रक्रिया राबविणे शक्य नसल्याचं बोललं जात आहे.
सध्या राज्यात महापालिका निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. अश्यात आता महापालिका निवडणुकीसाठी पुन्हा चार सदस्यीय प्रभाग करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी आणला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र, हा निर्णय झाला तरी त्याच्या अंमलबजावणीबाबत शंका व्यक्त केली जात आहे. पुणे, पिंपरी चिंचवडसह राज्यातील तब्बल 18 महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या महापालिकांमध्ये त्रिसदस्यीय अंतिम प्रभागरचना निश्चित झाली असून, न्यायालयाच्या आदेशानुसार कधीही निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर पुन्हा चार सदस्यीय प्रभागाच्या मागणीने जोर धरला आहे.