Pune VIDEO | नारळाच्या झाडावर चढले, उतरताना वाट लागली, 40 फुटांवर अडकून, पुण्यात सुटकेचा थरार
नारळ काढून उतरताना त्यांनी वापरलेले स्टँड अचानक घसरु लागला. थोरात घाबरलेल्या अवस्थेत अंदाजे 40 ते 45 फूट उंचीवर ताटकळत राहिले. साधारण अर्धा ते पाऊण तास ते अडकून बसलेले होते.
पुणे : कोकणात नारळाच्या झाडावर (Coconut Tree) सरसर चढणारी माणसं अनेकांनी पाहिली असतील. एक वेळ झाडावर चढणं सोपं आहे, मात्र इतक्या उंचावर गेल्यानंतर खाली बघत उतरताना तंतरते, असा अनुभव अनेक जण सांगतात. माडाच्या झाडावरुन खाली उतरताना ततपप झाल्याचंही अनेक जणांनी सांगितलं असेल. पुण्यातही (Pune Video) नारळ काढण्यासाठी झाडावर चढलेल्या एका व्यक्तीची उतरताना पाचावर धारण बसली. स्टॅन्ड अचानक घसरु लागल्यामुळे अंदाजे 40 ते 45 फूट उंचीवर गेल्यानंतर या व्यक्तीला कापरं भरलं. त्यामुळे ते तसेच झाडावर जवळपास पाऊण तास अडकून बसले. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने त्यांची सुखरुप सुटका (Rescue Operation) झाली. या सुटकेचा थरार कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
नेमकं काय घडलं?
पुणे शहरात वानवडी भागातील नेताजी नगरमध्ये बिल्डींग नंबर 21 या ठिकाणी ही घटना घडली. माडाच्या झाडावरुन नारळ काढण्यासाठी सुजित ज्ञानदेव थोरात हे झाडावर चढले होते. नारळ काढून उतरताना त्यांनी वापरलेले स्टँड अचानक घसरु लागला. थोरात घाबरलेल्या अवस्थेत अंदाजे 40 ते 45 फूट उंचीवर ताटकळत राहिले. साधारण अर्धा ते पाऊण तास ते अडकून बसलेले होते.
अग्निशमन दलाकडून बचावकार्य
अग्निशमन दलाला कॉल मिळताच ते या ठिकाणी गेले. एक्सटेंशन लॅडर आणि रश्शीच्या सहाय्याने त्यांनी नारळाच्या झाडाला रस्सी बांधली आणि थोरात यांची सुखरुप सुटका केली.
या कामगिरीमध्ये ड्रायव्हर मंगेश काळे, फायरमन संदीप जगताप, अनिमिष कोंडगेकर, मदतनीस ढगळे, देवदूत जवान ड्रायव्हर बागल, मनोज गायकवाड, अक्षय तारु यांनी बचावकार्यात मोठी मदत केली.
पाहा व्हिडीओ :
Pune VIDEO | नारळाच्या झाडावर चढले, उतरताना वाट लागली, 40 फुटांवर अडकून, पुण्यात सुटकेचा थरार #Pune #CoconutTree #Rescue pic.twitter.com/xkF2mP6Lyc
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 7, 2022
संबंधित बातम्या :
CCTV | बघता-बघता टँकर थेट बसमध्ये घुसला, पुणे-यवतमाळ ट्रॅव्हल्सच्या अपघाताची भयंकर सीसीटीव्ही दृश्यं
अमरावती-यवतमाळ मार्गावर बस-ट्रकची धडक; 1 ठार, 24 जखमी, 6 गंभीर
एकवीरा देवीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची कार तीनवेळा झाली पलटी; लोणावळ्यातला थरार CCTVत कैद